गुरुवार, ११ जून, २०२०

रामनगर येथे रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद


कार्यक्रममाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना आयोजक माजी आमदार अरविंद चव्हाण   छायाचिञ(श्याम गिराम)

सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) :- जालना तालुक्यातील रामनगर येथील अजितदादा पवार कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त बदनापूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा जालना जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मा. आ.श्री.अरविंदराव चव्हाण यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला.यावेळी 101 जणांनी रक्तदान केले.तसेच कोरोना प्रतिबंधक असनीक-३० औषध व मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्रदेश प्रदेश सरचिटणीस बळीराम कडपे ,जिल्हा परिषद सदस्य जयमंगल जाधव,राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब वाकुळणीकर संजय काळबांडे एकबाल पाशा, शहा आलमखान दिलीप भुतेकर, कैलास मदन, पांडुरंग ज-हाड,धैर्यशील चव्हाण,मुकेशच चव्हाण, राजेश पवार,पदमाकर हांडे,उमेश मोहिते,राजेश छबुराव पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


कोरोनाविरुद्धचा लढा सुरूच! ‘गर्दी टाळा-शिस्त पाळा’- मुख्यमंत्र्यांचे राज्यातील जनतेला आवाहन.


मुंबई,ब्युरोचीफ :- कोरोनाविरुद्धचा आपला लढा संपलेला नाही तो सुरुच आहे, त्यामुळे आपल्याला सावध राहून कोरोनासोबत जगावे लागेल, कुठेही घाई गडबड करून किंवा गर्दी करून चालणार नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना गर्दी टाळण्याचे आणि कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे पुढे म्हणाले की,  लॉकडाऊन जसे टप्प्याटप्प्याने लावले तसेच ते टप्प्याटप्प्याने  आपण हटवत आहोत, कोरोनासोबत जगतांना आपल्याला सावधानता बाळगायची आहेच, मास्क लावणे, हात धुत राहणे यासारख्या  सवयी अंगी बाळगायच्याच आहेत, गर्दी करायची नाही, झुंडीने फिरायचे नाही.  संकट अजून टळलेले नाही. कोरोनाविरुद्धचा आपला लढा संपलेला नाही. सावध राहून अर्थचक्र सुरु करतांना सर्व नियमांचे पालन करूनच आपल्याला काम करावयाचे आहे. मिशन बिगिन अगेन अंतर्गत आपण काही नियम शिथिल केले असता  पहिल्या दिवशी गर्दी झालेली दिसली. असे करू नका,  सकाळी पाच ते सायंकाळी ७ पर्यंत फिरायला जाण्याची, व्यायाम करण्याची मुभा दिली ती आरोग्यासाठी, गर्दी करून आरोग्य बिघडवण्यासाठी नाही हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

राज्यातील जनतेवर विश्वास
सर्व सांगून आणि काळजी घेऊनही परिस्थिती हाताबाहेर जातांना दिसली, ती जीवघेणी होतांना दिसली तर पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल, पण राज्य सरकार जे काही निर्णय घेत आहे ते जनतेच्या हिताचेच आहेत याची कल्पना जनतेला असल्याने राज्यातील नागरिक ती वेळ येऊ देणार नाहीत. शिस्त पाळून शासनाला सहकार्य करतील,  त्याबद्दल मला विश्वास वाटतो असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. अत्यावश्यक सेवेतील, जीवनावश्यक काम करणाऱ्या लोकांसाठी लोकल सुरु करण्याची मागणी केंद्र शासनाकडे केल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.



अनुसूचित जातीच्या बांधवांवरील अन्याय, अत्याचार अजिबात सहन केले जाणार नाहीत

दोषींविरुद्ध कडक कारवाईचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश



मुंबई,ब्युरोचीफ :-राज्यात अनुसूचित जातीच्या बांधवांवर होणारे अन्याय, अत्याचार कोणत्याही परिस्थितीत अजिबात सहन केले जाणार नाहीत, महाराष्ट्र शासन या बांधवांच्या पाठीशी असून अशा प्रकारच्या गुन्ह्यातील  दोषींविरुद्ध तात्काळ व कडक कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा सांगणारे आपले राज्य असून या राज्यात गोरगरीब, अनुसूचित जाती व नवबौद्ध बांधवांवर अन्याय अत्याचार होता कामा नये. राज्यात काही ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यातील दोषींविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस विभागाला दिले असल्याचे गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांनी सांगितले.
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सांगवी पोलीस ठाण्यातंर्गत दोन-तीन दिवसांपूर्वी एका मुलाला मारहाण झाली, त्यात तो मयत झाला. या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी पकडले असून पुढील कारवाई सुरू आहे.तसेच नरखेड तालुक्यातील पिंपळधरा येथील अरविंद बनसोड या तरूणाच्या मृत्यूची चौकशी देखील पारदर्शी व निःपक्षपातीपणे करण्यात येईल. त्यासंबंधातील निर्देशही गृहमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता हा तपास उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याकडे  दिला असल्याचे असल्याचेही गृहमंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २१व्या वर्धापन दिननिर्मित परतूर येथे आज भव्य रक्तदान शिबीर


परतूर प्रतिनिधी/इम्रान कुरेशी

हॅलो रिपोर्टर न्युज
परतूर :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त परतूर येथील लाल बहादूर शास्त्री वरिष्ठ महाविद्यालयात आज दि.११ जून रोजी सकाळी १० ते दुपारी२ च्या दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल भैया आकात यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी शहरातील व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी कार्यकर्त्यांनी रक्तदान करून राष्ट्र कार्यास हातभार लावण्याचे आव्हान राष्ट्रवादी युवक कांग्रेस चे जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती कपिल भैया आकात यांनी केले, अंकुश शिंदे, राखे नाना,योगेश बरकुले, अशोक साखळकर, कैलास मुळे,कैलास शिंदे इतर उपस्थित होते


बुधवार, १० जून, २०२०

रोजगार हमी योजनेची कामे सुरु ठेवण्याची मागणी


परतूर –प्रतिनिधी इम्रान कुरेशी
      हॅलो रिपोर्टर न्युज
तालुक्यात रोजगार हमी योजनेचे कामे सुरु ठेवण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाचे युवक जालना जिल्हाध्यक्ष अच्युत पाईकराव यांनी तहसीलदार रूपा चित्रक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि लॉकडाऊनच्या काळात मंजुराच्या हाताला काम मिळाले नाही.यामुळे गरिबांच्या घरात अन्न धान्य व संसार चालवण्यासाठी पैसे नाहीत. मंजुराना हाताला कामे मिळावे म्हणून शासन स्तरावर कामे चालू करण्याच्या सांगितले जात असताना ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवकांच्या उदासीन धोरणामुळे व पावसाळा सुरु झाल्याचे करण पुढे करत कामे बंद केले आहेत. जो पर्यंत चांगला पाऊस होत नाही तो पर्यंत रोजगार हमी योजनेचे कामे सुरु करण्याची ठेवण्याची मागणी शेवटी पाईकराव यांनी केली आहे.


शिक्षकांकरिता राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे उपक्रम

पुणे,ब्युरोचीफ :- महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, पश्चिम महाराष्ट्र विभागाचे वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील शासन मान्यताप्राप्त कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षकांसाठी लॉकडाऊन मध्ये भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धेचे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे नाव '  शोध उत्कृष्ट अध्यापकाचा ' असून स्पर्धेला कालावधी हा १० मे २०२० ते १९ जून २०२० पर्यंत आहे.स्पर्धेचे विषय हे वस्तुस्थितीवर आधारित आहेत.यामध्ये  १)कोव्हीड १९ विरुद्ध लढा - मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे नेतृत्व, २)विद्यार्थी, शिक्षक व लॉकडाऊनचा मेळ व ३)कोरोना विरुद्ध दैवी शक्ती - डॉक्टर, पोलीस व अन्य शासकीय कर्मचारी,अधिकारी आदी विषय आहेत. या ऑनलाईन स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्राभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक शिक्षकांस सहभागाबद्दल संघटनेकडून प्रमाणपत्र मिळणार आहे.व विजेत्या शिक्षकांना  आकर्षक बक्षिसे व उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक व स्पर्धेचे संयोजक सुनिलभाऊ जगताप आणि सोलापूर शिक्षक सेनेचे शहराध्यक्ष मुरलीधर कडलासकर यांनी सांगितले.जे शिक्षक स्पर्धेत अद्याप सहभागी झालेले नाहीत त्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. स्पर्धेबद्दल अधिक माहितीसाठी ९०११९०३१०१ या क्रमांकावर संपर्क साधावा.**
     सदर स्पर्धेकरिता आप्पासाहेब पाटील , वल्लभ चौगुले, अंबादास चव्हाण , विश्वनाथ बिराजदार, संतोष साठे , रविंद्र वाघ, एकनाथ आंबले, रणजित बोत्रे,संजय नायडू ,बाळासाहेब पवार, स्वाती वाळके,नीता गुंजिकर, शैला क्षीरसागर,मल्लिकार्जुन डीग्गे,अतुल शेलार, संजय अहिरे,सुखदेव आंबले,राजेंद्र खेडेकर,कल्पना पोतदार आदी  पदाधिकारी मेहनत घेत आहेत.

जिल्हा शल्य चिकित्सक ,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दि. 11 जुन 2020 रोजी साधणार फेसबुकद्वारे जनतेशी संवाद.


जालना,ब्युरोचीफ :- दि. 11 जुन 2020 रोजी सायं. 4-00 ते 4-30 या वेळेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड हे आरोग्य विषयक असलेल्या बाबींची माहिती देण्याबरोबरच जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देणार असुन सायं. 4-30 ते 5-00 या वेळेत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नानासाहेब चव्हाण हे कापुस खरेदी (पणन), महात्मा ज्योतिबा फुले पीककर्ज योजना या विषयावर तर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे हे पीकविमा, पीककर्ज, खरीप हंगाम, पोखरा योजना, खते, बि-बियाणे व कृषि विषयक योजनांची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्या https://www.facebook.com/diojalna या फेसबुक खात्यावरून जनतेशी संवाद साधून माहिती देणार आहेत.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...