सोमवार, १३ एप्रिल, २०२०


     शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे अतिरिक्त नियतन मंजूर
           धान्यवाटपाबाबत तक्रार असल्यास संपर्क साधा.
        जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती बसेय्ये यांचे आवाहन
 जालना,प्रतिनिधी :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत शिधापत्रीकाधारकांना 
धान्य  वाटप करण्यात येत आहे. या धान्य वाटपाबाबत नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसैय्ये यांनी केले आहे.
               नागरिकांच्या तक्रारीसाठी शैलेश राजमाने जालना-८००७०७०२२२,डी. बी. राजपूत,  बदनापूर,  ९४२१९९२८३८,  बी.बी.पाप्पूलवाड  भोकरदन-७४१०११५२२२,  श्रीमती व्ही.बी.पाप्पूलवाड जाफ्राबाद-८८०५१२८२४४, श्रीमती धनश्री भालचीम, परतूर-९१७५१००८८८,आर.आर.राखे,मंठा- ९९२१९६१२४४,एन.वाय.दांडगे,अंबड-९५५२७५६८२४ व श्री.एम.बी.उन्हाळे   घनसावंगी- ७३८७३७२७६६ यांना संपर्क साधावा,
     शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे अतिरिक्त नियतन
अंत्योदय अन्न योजने मध्ये लाभार्थ्यांना दरमहा प्रति कार्ड २३ किलो गहु व १२ किलो तांदुळ असे एकूण ३५ किलो धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये २ रुपये प्रति किलोप्रमाणे गहु व ३ रुपये प्रति किलोप्रमाणे तांदुळ असा दर राहणार आहे.
प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजने मध्ये व एपीएल केशरी शेतकरी लाभार्थी योजने मध्ये दरमहा प्रति सदस्य ३ किलो गहु व २ किलो तांदुळ असे एकूण ५ किलो धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये २ रुपये किलोप्रमाणे गहु व ३ रुपये किलो प्रमाणे तांदुळ असा दर राहणार आहे.
                   प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत
अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील लाभार्थ्यांसाठी माहे एप्रिल, मे व जून २०२० या प्रत्येक महिन्यासाठी प्रति सदस्य ५ किलो मोफत तांदुळ ज्या-त्या महिन्यात वाटप करण्यात येणार आहे.
                        शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना
मे व जून 2020 या प्रत्येक महिन्यासाठी प्रति सदस्य ३ किलो गहु व २ किलो तांदुळ असे एकूण ५ किलो धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये गहु ८ रुपये प्रति किलो प्रमाणे व तांदुळ १२ रुपये प्रति किलो प्रमाणे वाटप करण्यात येणार आहे.
                       प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस धारकांना
माहे एप्रिल, मे व जून २०२० दरमहा १ सिलेंडर याप्रमाणे एकूण ३ सिलेंडर मोफत मिळणार आहेत. गॅस सिलेंडरची किंमत ज्या-त्या गॅस धारकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ती रक्कम खात्यातून काढून गॅस कंपनीला द्यायची आहे.

                कृषी सेवा केंद्र, पशुखाद्य दुकाने सुरू ठेवा - 
                                                            खासदार प्रतापराव जाधव
🔴रात्रीचे दूध संकलन बंद करू नका
🔴कृषी फिडरवर रात्रीची लाईन पूर्णक्षमतेने द्यावी
🔴ऑनलाईन रेशन कार्ड नसलेल्यांनाही राशन द्यावे
 बुलडाणा, प्रतिनिधी:-कोरोना विषाणू प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. अशा परिस्थितीतही शेतकरी शेतात कष्ट उपसत आहेत. येत्या खरीप 
हंगामासाठी  तयारी करीत आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्र, पशुखाद्य  दुकान आणि तालुका पातळीवर पाईपलाईन साठी शेतात लागणाऱ्या अवजारांचे हार्डवेअर चे काही प्रमाणात दुकाने उघडण्यात यावेत. यावेळी सोशल डिस्टसिंगचे पालन करण्यात यावे, अशा सूचना  केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आज खासदार प्रतापराव जाधव यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्ससिंग पाळत जिल्हा आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार संजय गायकवाड, कृउबास सभापती जालिंदर बुधवत, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, जिल्हा परिषदेचे सीईओ षन्मुख राजन, अप्पर जिल्हाधिकारी श्री  दुबे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे , जिल्हा पुरवठा अधिकारी  गणेश बेल्लाले , समाज कल्याण अधिकारी श्री. मेरत आदी उपस्थित होते. 
 बाजारपेठा बंद असल्याने शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे सांगत खासदार श्री. जाधव म्हणाले, सद्यस्थितीत फळबागांमध्ये अंगूर तसेच टरबूज, खरबूज आणि कांदा पिकाच्या बाबतीत स्थानिक पातळीवर नियोजन करून स्टॉल लावून विक्री व्यवस्था करावी अथवा पर्यायी उपाययोजना करावी. शिवाय ट्रान्सपोर्ट सुविधा सुद्धा उपलब्ध करून द्यावी. कृषी सेवा केंद्र बंद आहेत. शेतकऱ्यांना येत्या हंगामाला सामोरे जायचे आहे. त्यामुळे कृषी सेवा केंद्र, पशुखाद्य दुकाने आणि शेतातील पाईपलाईन साठी लागणाऱ्या दुकाना पैकी हार्डवेअरची दुकाने देखील काही तासांसाठी करता उघडण्यात यावी किंबहुना तसे शक्य नसल्यास किमान एक दिवसाआड तरी उघडण्यात यावीत. नाफेड मार्फत कापूस आणि तूर खरेदी सुरू करण्यात येत आहे. त्या ठिकाणी मार्केटिंग फेडरेशन ही मुख्य एजन्सी असल्याने स्थानिक पातळीवर खरेदी केंद्र ठिकाणी सनेटायझर व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. अशा सूचना मार्केटिंग फेडरेशनने कराव्यात. दूध हे सध्या महत्त्वाचे असून सकाळी संकलन केंद्र सुरू आहे. मात्र रात्रीचे संकलन केंद्र बंद आहे. 
 ते पुढे म्हणाले, ग्रामीण भागात शेतकऱ्याकडे फ्रीज अथवा दूध थंड ठेवण्यासाठी साधनसुविधा नाहीत. त्यामुळे रात्रीचे संकलन (वाटप नव्हे) केंद्र सुरू ठेवावे.
सर्व प्रकारची कामे बंद असल्याने कामगारांवर आणि गोरगरिबांना रेशनचे धान्य शिवाय दुसरा सध्या आधार नाही. त्यामुळे ज्यांचे राशन कार्ड ऑनलाईन नसेल त्यांनाही धान्य वाटप व्हावे. काही गावात एकाच राशन दुकानदाराकडे दोन ते तीन गावे जोडलेली आहेत. इतर गावातून त्या ठिकाणी धान्य घ्यायला आलेल्या लोकांना विरोध होतो. त्यामुळे त्याच्या गावात जाऊनच ग्रामपंचायतमध्ये काय होईना परंतु धान्य वाटपाची व्यवस्था करण्यात यावी. कुटुंब प्रमुखालाच सध्या तांदूळ मिळत आहेत. मात्र एका घरात चार ते पाच जण असल्याने त्या सगळ्या व्यक्तींना लाभ मिळावा. 
समृद्धी महामार्गाचे काम सुरू ठेवण्यात आले असल्याचे सांगत खासदार म्हणाले, क्रशरच्या व अन्य कामासंबंधी ब्लास्टिंग साहित्य त्यांना आणावे लागते. त्याकरिता वाहनांसाठी विशेष परवानगी देण्यात यावी. नॅशनल हायवेच्या  कामातील ब्रिज अर्थात पूल बांधण्याचे काम जोमाने करण्यात यावे. सध्याही कामे बंद आहेत. मजुरा संबंधीचे अडचणी लक्षात घेता येतील. मात्र आगामी पावसाळ्याच्या आधी काम झाली नाहीत, तर प्रशासनाला कुठलीही मदत गाव खेड्यांमध्ये पोहोचता येणार नाही. या गंभीर बाबीकडे ही त्यांनी लक्ष वेधले. 
     बऱ्याच महानगरांमध्ये दुर्धर आजारावर उपचार घेण्यासाठी जिल्हावाशी गेले आहेत. काहींचे मुलं शिक्षणासाठी आहेत. त्यांच्याकडील राशन, पैसे संपले आहेत. त्यामुळे अशांना प्राधान्याने जिल्ह्यात त्यांच्या घरी सुखरुप आणण्यासाठी परवानगी द्यावी अथवा तशी व्यवस्था जिल्हा प्रशासनाने करावी, अशी मागणीही त्यांनी याप्रसंगी केली. जनधन खात्यामध्ये तसेच वृद्ध, निराधार व अन्य योजनांसाठी पैसे जमा झाले म्हणून बँका समोर गर्दी होत आहे. यात वृद्धांची संख्या मोठी आहे.ही बाब धोक्याची आहे. त्यामुळे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांचे कडून बँक निहाय यादी घ्यावी आणि गाव निहाय अकाउंट नंबरचे वाचन करून दवंडी देत सूचना द्याव्यात. जेणेकरून त्यांचा नंबर असेल त्यांना दिनांकासहित बँकेत बोलवावे. अथवा जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर पैसे घेऊन ग्रामसेवक, तलाठी यांच्यामार्फत गाव निहाय ते पैसे लाभार्थ्यांना देण्यात यावेत अशाही सूचना याप्रसंगी खा.जाधव यांनी केल्या. 
  लॉक डाऊन मध्ये ग्रामीण भागात लोक थेट शेतात राहायला गेले आहेत. सध्या कारखानदारी बंद असल्याने वीज वापर मोठ्या प्रमाणात थांबला आहे. सर प्लस विज सध्या आहे. उन्हाळा दिवस असल्याने गर्मी वाढत आहे. त्यातच शेतात रात्री लाईन बंद असते. ग्रामीण भागातील लोक प्रशासनाला मोठ्या प्रमाणात स्वतःहून सहकार्य करत आहेत. त्यासाठी कृषी फिडर आणि गावठाण फिडर पूर्णक्षमतेने 24 तास वीज पुरवठा करावा. निदान कृषी फिडरवर रात्रीचा पुरवठा बंद करू नये असेही ते म्हणाले.
पोलिसांना मिळाव्यात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मुलभूत सुरक्षा सुविधा
आज पोलीस खंबीर पणे या लढ्यात सामील झाले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत त्यांच्याकडे मास्क, ग्लोज, पीपी ई किट, सनेटायझर, उपलब्ध नाहीत. ही बाब लक्षात घेऊन त्यांना मुलभूत सुरक्षा कवच देण्यासाठी  खासदार निधीमधून निधीदेखील दिला होता. मात्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेमध्ये आरोग्यसेवा पुरविणाऱ्या व्यक्तीसाठीच असा उल्लेख असल्याने अडचण निर्माण झाली आहे. याबाबत स्थानिक डीपीडीसी अथवा अन्य पातळीवर निधी घेऊन पोलीस विभागाला द्यावा. जेणेकरून पोलीस कर्मचाऱ्यांना या सुविधा तातडीने देता येतील.
जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट
यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी उपचारासाठी लागणारे साहित्य, व्यवस्था व औषधसाठ्याची घेतली माहिती.
या बैठकीपूर्वी खासदार यांनी  जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोना  बाधित रुग्ण या दवाखान्यात असून तेथील औषध उपचार याबाबत जाणून घेतले. शिवाय उपचारासाठी लागणारे साहित्य, व्यवस्था व औषधसाठा आणि भविष्यात लागणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयाला वाढीव सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी खासदार निधीमधून देण्यात आलेल्या ३० लक्ष रु. याचे नियोजनबाबत माहिती घेतली. तसेच व्हेंटिलेटर व अन्य सुविधा वाढवण्यात याव्यात असेही जिल्हा शल्य चिकित्सक यांना निर्देशित केले.                                
  कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी  डॉ.बाबासाहेब आंबेडकर             यांची जयंती ऑनलाईन साजरी करा- दीपक डोके

जालना (प्रतीनिधी):-देशातच नव्हे तर जगात कोरोनाने थैमान घातले आहे. प्रत्येक देश कोरोनाला रोखण्यासाठी त्याचे मुळापासून उच्चाटन करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे आणि त्या कामी प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, प्रशासनाला सहकार्य करायचे. त्यामुळे येणारे सण, उत्सव यंदा सार्वजनिक स्तरावर साजरे न करता आपल्या घरातच साजरे करून प्रशासनाला सहकार्य करायचे आहे. यावर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भव्यदिव्य साजरी न करता एकजुटीने ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या ऑनलाईन जयंती
सर्वांनी या जयंतीच्या कार्यक्रमात भाग घेऊन देशाला कोरोना मुक्त करण्यासाठी यंदाची जयंती घरीच साजरी करून प्रशासनाला सहकार्य करावे तसेच जयंतीनिमित्त जमा झालेला निधी गरिबांना द्यावा. जेणे करून हातावर पोट असलेल्या लोकांची चुल पेटती राहिली पाहिजे. हाच संदेश महात्मा जोतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अँड.बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे. या उपक्रमास मोठ्याप्रमाणात ऑनलाइन प्रतिसाद मिळत असून यातून प्रेरणा घेऊन अनेक फेसबुक पेजेस आणि संघटनांनी जयंती ऑनलाईन साजरी करण्यात पुढाकार घेतला आहे.असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी दीपक डोके यांनी केले आहे.
     परिवर्तनवादी विचारांची जयंती साजरी करा - हरीश बोरुडे
बदनापूर प्रतिनिधी :-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती लॉकडउन मुळे व्यापक 
प्रमाणावर साजरी करणे शक्य नाही.त्यामुळे नागरिकांनी आपल्या कुटुंबासोबत विविध परिवर्तनवादी विचारांचे पुस्तके ,ग्रंथ वाचून परिवर्तन विचाराची एक आदर्श जयंती साजरी करावी.देशभरात सध्या कोरोनाचा फैलाव होत असल्यामळें नागरिकांनी घराबाहेर न पडता शासनाच्या सूचनांचे पालन करावे.व जयंतीनिमित्त एका ठिकाणी गर्दी करू नये.आपण सर्वांनी भिमजयंती घरीच साजरी करू. कोरणा वर मात करू .असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुका संघटक हरीश बोरुडे यांनी केले आहे

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...