गुरुवार, ७ मे, २०२०

जालना न्युज

सदर बाजार पोलीसांची कारवाई गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर छापा.



जालना,प्रतिनिधी :- सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास सदर बाजार पोलिसांना माहिती मिळाली की हनुमान घाट येथे नदीच्या कडेला काटेरी झुडपात सार्वजनिक ठिकाणी एक महिला आपल्या फायद्या करिता गावठी हातभट्टीची दारू विक्री करीत आहे अशी माहिती मिळाल्याने, सदरची माहिती वरिष्ठांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागवे पोलीस हेडकॉन्स्टेबल परशुराम पवार कांगणे पोलीस कॉन्स्टेबल अंबादास दांडगे महिला पोलीस कॉन्स्टेबल नागरे असे सदर ठिकाणी जाऊन छापा मारला असता त्याठिकाणी एक बाई दारू पिणाऱ्या ची गर्दी जमुन चोरटी दारू विक्री करत असताना दिसली परंतु पोलिसाचं पथक येताच दारू पिणारे व दारू विक्री करणारी महिला पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेऊन काटेरी झुडपातून पळून गेले तिचे नाव चौकशीतून समोर आले की दारू विक्री करणारी महिला आरोपी लक्ष्मीबाई श्याम गायकवाड वय तीस वर्ष राहणार हनुमान घाट जालना पोलिसांनी तिच्या ताब्यात असलेल्या गावठी हातभट्टीच्या एकूण सहा प्लास्टिक कॅन ज्यामध्ये 90 लिटर हातभट्टीची दारू जिची बाजारमूल्य, सहा हजार तीनशे असलेली पंचा समक्ष जप्त करून जागीच नाश केली आहे, तिच्याविरुद्ध सरकार तर्फे पोलीस हेडकॉन्स्टेबल परशुराम पवार यांनी फिर्याद देऊन तपास पोना वाहुळ हे करीत आहे.



सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री एस चैतन्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री समाधान पवार उपविभागीय पोलिस अधिकारी श्री सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संजय देशमुख  सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नागवे पोलीस हेडकॉन्स्टेबल परशुराम पवार, कांगणे पोलीस कॉन्स्टेबल अंबादास दांडगे महिला पोलीस कॉन्स्टेबल नागरे यांनी केली आहे


मनसेच्या वतीने जालना जिल्हाधिकारी यांना निवेदन.


जालना प्रतिनिधी :- जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने नोंदणीकृत हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी गावोगावी जाऊन करण्यात यावी.जालना जिल्ह्यातील शासनाने हरभऱ्याला 4850 रु प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे.परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये व्यापारी आणि आडत दुकानदार यांच्याकडून सद्या हरभरा 3800 रुपये प्रति क्विंटल ने खरेदी केला जात आहे. यात शेतकऱ्यांचा प्रति क्विंटल 1000 रु तोटा होत आहे. याकडे शासनाच्या कसलेही लक्ष नाही.शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी शासनाने खरेदी केंद्र सुरू केले आहेत परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता ह्या चार दिवसांत हे खरेदी केंद्र सुरू झाली आहेत. खूप उशिराने ही खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांची तोबा गर्दी होत आहे. जालना जिल्ह्यातील या गर्दीमुळे शेतकऱ्यांना कोरोनाचा धोका संभवु शकतो त्यामुळे शासनाने खरेदी केंद्राची सर्व यंत्रणा गावोगावी घेऊन जाऊन गांव निहाय नोंदणीकृत शेतकऱ्यांची खरेदी करावी. अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष जालना प्रकाश सोळंके यांनी जिल्हाधिकारी यांना ईमेल द्वारे निवेदन पाठवले आहे.
                   

आमदार कैलास गोरंट्याल यांचे निवासस्थानी बुद्ध पौर्णिमा साजर करण्यात आली साजर करताना आमदार कैलाश गोरंट्याल व नगराध्यक्ष संगीताताई गोरंट्याल यावेळी उपस्थित नगरसेवक विनोद रत्नपारखी रमेश गोरक्ष व आदी मान्यवर उपस्थित होते

दैठणा .बु. चे सरपंच शत्रुघ्न कणसे यांचा पुढाकार, २ हजार लोकांना मोफत रेशनचा पुरवठा 



परतूर /प्रतिनिधी :- प्रशांत वाकळे
 गत दोन महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊन मुळे ग्रामीण भागातील अनेक शेतमजूर, गोरगरीब कुटुंबाच्या हाताला रोजगार नाही. जवळ असली नसली जमापुंजी महिनाभर पुरली आता पुढे काय ? असा प्रश्न ग्रामीण भागातील शेतमजूर जनतेला पडला आहे. 
शासनाकडून स्वस्त दरात मिळणारे  रेशन या कुटुंबासाठी मोठा आधार आहे, मात्र हे स्वस्त दरातील रेशन विकत घेण्यासाठी सुद्धा पैसा शिल्लक नाही. अशा स्थितीत लोकांची अडचण ओळखून. संकटात लोकांच्या मदतीला धावून जात परतूर तालुक्यातील दैठणा बुद्रुक येथील सरपंच शत्रुघ्न कणसे गावातील सर्व रेशन कार्ड धारकांचे पैसे स्वतःच्या खर्चातून भरून गावकऱ्यांना मोफत रेशन उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये गव्हू,तांदूळ आणि साखर या सामानाचा समावेश आहे.  गावातील २००० लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ झाला आहे. माझे गाव हे माझे कुटुंब असल्याचे मी मानतो, गावाच्या संकटाच्या काळात मदतीला धावून जाणे हा माणुसकी धर्म आहे, तोच माणुसकी धर्म आपण जपत असल्याचे सरपंच शत्रुघ्न कणसे सांगतात. मागील महिन्यात गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी १ किलो साखरेचे मोफत वाटप करण्यात आले होते.



 लॉकडाऊन मध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचारी, पोलीस, किराणा दुकानदार, गिरणी चालक आणि पत्रकार यांना तीन एकरातील मोसंबीचे मोफत वाटप करण्याचा उपक्रम दैठणा बु. येथील सरपंच शत्रुघ्न कणसे हाती घेतला आहे. माजी मंत्री बबनराव लोणीकर व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. सोबतच तालुक्यातील आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि पत्रकार यांना १५०० मास्क, ग्लोज, सनीटायरचे वाटप देखील करण्यात आले आहे.   महिनाभरापासून मोफत शुद्ध फिल्टर पाणी पुरवठा : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी वैयक्तिक स्वच्छता तसेच सामाजिक स्वच्छतेचे आचरण महत्वाचे आहे. पिण्याचे  पाणी अशुद्ध असेल तर त्या माध्यमातून अनेक रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ही गरज ओळखून दैठणा बु ग्रामपंचायतच्या वतीने सुरुवातीला सशुल्क पाणी जार दिले होते. लॉक डाऊन मध्ये लोकांची अडचण ओळखून पाणी जार मोफत वाटप करण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला आहे. याचा मोठा फायदा गावकऱ्यांना झाला असल्याचे काही गावकऱ्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया :- मागील दोन महिन्यापासून कामधंदा बंद आहे. शासनाच्या वतीने स्वस्त दरात रेशन मिळते पण, ते रेशन घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. अशा बिकट परिस्थितीत सरपंच शत्रुघ्न कणसे यांनी मोफत रेशन देण्याचा जो निर्णय घेतला त्यामुळे आम्हाला मोठा. दिलासा मिळाला आहे. आमच्यावरची उपासमारीची वेळ टळली म्हटले तर वावगे ठरणार नाही. – विठ्ठल उमाजी घोडे, ग्रामस्थ दैठणा बु.


अंजानी आई फाऊंडेशनच्या वतीने व IRS Shri Garkal sir (JNV), Assistant Commissioner GST Aurangabad यांचे माध्यमातुन  औरंगाबाद येथील भिमनगर एरीयामध्ये  रेशन कीट वाटप.


औरंगाबाद प्रतिनिधी :- कोरोनावायरस संसर्ग ने देशभर हाहाकार माजवला असुन  लाॅकडाउन मुळे गोर गरीबांचे हाल होत आहेत. औरंगाबाद शहरा मध्ये दुस-या राज्यातुन, जिल्हयातुन  मोल मजुरी साठी व शिक्षणा साठी विद्यार्थी औरंगाबाद शहरा मध्ये येतात. अचानक लाॅकडाउन  मुळे शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे. औरंगाबाद शहरातील सर्वात जास्त  कोरोनाबाधित रुग्ण असणारा एरीया  भिमनगर सील करण्यात आला. अंजानीआई फाउंडेशन च्या औरंगाबाद टिम ला वसमत वरुन फोन आला काही  विद्यार्थी सर्वात जास्त कोरोना बाधित संख्या असणारा भिमनगर या ठिकानी विद्यार्थी अडचणीत आहेत. कोणतीही  संस्था भीती मुळे कोरोणा बाधित क्षेत्रात  धान्य देत नाही या भागात  धान्याची मदत करता येइल का अशी मागणी अंजानी आई फाउंडेशन ला करण्यात आली. कर्तव्यावर असणारे अंजानी आई फाउंडेशन चे PSI बी.एच.किरवले  यानी श्रीमती जयश्री गवई मॅडम (IRS) Deputy Commissioner, GST, Aurangabd, श्री गरकल सर
(IRS) Assistant Commissioner, GST, Aurangabad,श्री धिरज कांबळे सर (IRS)  Assistant Commissioner, GST, Aurangabd यांच्या माध्यमातुन तात्काळ 40 धान्यकिट भिमनगर औरंगाबाद  या ठिकाणी गरजुंना दिले. सामाजिक जबाबदारी स्वीकारुन  कोरोनाबाधित वार्डात स्वत: जाऊन मदत करण्यात आली.
एकीकडे पोलीस अधिकारी, कर्मचारी जीव धोक्यात घालुन  कर्तव्य बजावत आहेत तसेच अंजानी आई फाउंडेशन जालना गरीब , गरजु कुटूंबांना धान्य, फुड पॅकैट  देउन भुक भागवित आहे, सामाजिक कर्तव्य निभावत आहे.अशी माहीती फाउंडेशन च्या विधा जाधव, ज्ञानज्योत संस्था च्या अध्यक्षा ज्योती आडेकर यांनी दिली


जिंकणार आहोत आम्ही कोरोनाविरुद्धचे युद्ध; कारण आमच्या सोबत आहे भगवान बुद्ध
केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या निवासस्थानी शांततेचे दिवे लावून बुद्ध पौर्णिमा साजरी

 

मुंबई,प्रतिनिधी :- नक्षलवाद; दहशतवाद आतंकवाद माओवाद या सर्वांवर भगवान बुद्धांचा शांततेचा अहिंसेचा विचार हाच उपाय आहे. जगात आता कोरोना हजारो लोकांचे जीव घेत आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या शांततेच्या विचारानेच मात करता येईल.असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले. आम्ही जिंकणार आहोत कोरोना विरुद्ध चे युद्ध कारण आमच्या सोबत आहे भगवान गौतम बुद्ध अशी यावेळी शीघ्र कविता ना रामदास आठवले यांनी सादर केली. भगवान गौतम बुद्धांची  2564 वी जयंती ना रामदास आठवले यांच्या संविधान निवासस्थानी आज साजरी झाली. बुद्ध मूर्तीला पुष्प वाहून; त्रिसरण पंचशील बुद्ध वंदना घेऊन तसेच सायंकाळी शांततेचे प्रतिकात्मक दिवे मेणबत्ती लावून बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. 
यावेळी केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या पत्नी  सौ सीमाताई आठवले पुत्र जित आठवले तसेच कुटुंबीय आणि धुमधडाकाफेम अभिनेत्री सुरेखा उर्फ ऐश्वर्या राणे;  रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री अविनाश महातेकर;राष्ट्रीय उपाध्यक्ष  काकासाहेब खंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
 भगवान बुद्धांनी शांती; अहिंसा बहुजन हिताय बहुजन सुखाय चा माणसाला माणसाशी जोडणारा जगात पहिला लोकशाहीचा विज्ञानाचा विचार मांडणारा बौद्ध धम्म जगाला दिला. शांततेतून संयम आणि एकाग्रता येते.शांत विचारामुळे लॉक डाऊन चे नियम संयमाने पाळून आपण कोरोनाला हरवू शकतो. त्यामुळे शांततेचे विचाराचे प्रतीक म्हणून शांततेचे दिवे ; मेणबत्ती लावून आज बुद्ध पौर्णिमा आम्ही साजरी केली असे ना रामदास आठवले म्हणाले.कोरोना ला हरविण्यासाठी घरीच राहा; बाहेर गर्दी करू नका असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे. कोरोनाचे संकट जगातून नष्ट होवो अशी अपेक्षा व्यक्त करीत ना रामदास आठवले यांनी बुद्ध जयंती च्या शुभेच्छा दिल्या  आहेत. 
                 

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...