मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

किनवटमध्ये डीसीएचसी, सीसीसी या दोन रुग्णालय व तपासणी केंद्राची स्थापना
     तपासणीसाठीचा घश्याच्या स्त्रवाचा नमुना घेता येणार
नांदेड(भगवान कांबळे):- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने पन्नास बेडचे डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ केअर सेंटर (डीसीएचसी) व शंभर बेडचे कोव्हीड केअर सेंटर (सीसीसी) उभारण्यात आले असून कोरोना सदृश्य
लक्षणे आढळलेल्या रुग्णास येथे प्रविष्ठ करून त्यांच्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या व घश्याच्या स्त्राव घेऊन चाचणीसाठी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली.जगभर वेगाने पसरणाऱ्या कोरोना (कोव्हीड- 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी. याचाच एक भाग म्हणून  कोरोना नियंत्रणासाठी सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या नेतृत्वात  प्रशासनाच्यावतीने  तयारी करण्यात आली आहे.  उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे सर्व वैद्यकीय साधनसामुग्री वऔषधांसह सुसज्ज पन्नास बेडचे डेडिकेटेड कोव्हीड केअर सेंटर ( डीसीएचसी ) उभारण्यात आले आहे. तहसिलदार नरेंद्र देशमुख हे या केंद्राचे नोडल ऑफिसर अत्यावश्यक सेवा  म्हणून काम पाहणार असून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम धुमाळे वैद्यकीय अधिकारी, नोडल ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर व सर्व कर्मचारी या केंद्रासाठी 24 तास सेवा बजावणार आहेत. एखाद्या नागरिकास ताप, सर्दी, खोकला किंवा श्वासोच्छवासास अडथळा येणे, दम लागणे अशी लक्षणे आढळल्यास त्यांना कोरोनासदृश्य रुग्ण म्हणून येथे भरती करून घेण्यात येणार आहे. त्यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या करून   चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे.किनवट येथील नवीन तहसिल इमारतीत शंभर बेडचे कोव्हीड केअर सेंटर (सीसीसी) उभारण्यात आले आहे. गटविकास अधिकारी सुभाष धनवे हे या केंद्राचे नोडल ऑफिसर म्हणून काम पाहणार असून तालुका आरोग्य अधिकारी, मेडिकल नोडल ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा डॉक्टर व ईतर कर्मचारी या केंद्रासाठी 24 तास सेवा बजावणार आहेत. या केंद्रात कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेली व्यक्ती किंवा परदेशातून तथा रेड झोन असलेल्या परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीस कोणतीही कोरोनासदृश्य लक्षणे नसतील तरीही त्यांना या केंद्रात भरती करण्यात येणार आहे. चौदा दिवस ते येथेच कोरोंटाईन असतील. या कालावधीत दैनंदिन तपासणीअंती काही लक्षणे आढळल्यास त्यांना डेडिकेटेड कोव्हीड केअर सेंटर (डीसीएचसी) मध्ये भरती करण्यात येईल. तेंव्हा नागरिकांनी सतर्क राहून अशा व्यक्तिंना घरातच दडून न राहता सदरील केंद्रांत भरती करण्यास प्रवृत्त करावे. आपण जरी ग्रीन झोनमध्ये असलो तरी 'लॉकडाऊन' च्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

जिल्हा परिषद कन्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे तांदूळ वाटप
धर्माबाद (भगवान कांबळे ):- कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरातील सर्व माध्यमांच्या शाळा (ता. १५) मार्चपासून बंद करण्यात आल्या आहेत. 
मागील पंचवीस  दिवसांपासून शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी सुरक्षितपणे आपापल्या घरी वावरत आहेत.शाळेतील अनेक विद्यार्थ्यांचे पालक मोलमजुरी करून गुजराण करतात. मागील पंचवीस दिवसांपासून सर्व व्यवसायिक शेतीची कामे बंद असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येत आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेतून मध्यान्ह भोजन दिल्या जात असे. त्यामुळे मुलांच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था शाळेमध्येच होत असल्याने पालकांनाही आधार मिळत असतो. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 23 मार्चपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे शालेय पोषण आहारात खंड पडला आहे. शहरी भागातील विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना शाळा स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ वितरित करण्याचे शिक्षण संचालक यांनी 15 एप्रिल रोजी एक पत्र काढून आदेशीत केले होते. त्यानुसार धर्माबादच्या जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत शालेय पोषण आहार योजने अंतर्गत शाळा स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना वितरित करण्यात आले. सर्व विद्यार्थी व पालकांना सुरुवातीस सामाजिक योग्य अंतर ठेवण्याचे व तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधूनच उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली होती. त्याचे सर्वांनी तंतोतंत पालन केले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष लक्ष्मण पांचाळ, पत्रकार तथा समितीचे शिक्षणतज्ञ भगवान कांबळे, नगर सेवक शाळेचे स्वीकृत सदस्य रमेश पाटील बाळापूरकर, सदस्य गंगाप्रसाद रापतवार, सय्यद अहमद अब्दुल, महेंद्र तामटे, सौ. लक्ष्मीबाई आंबेवार, सौ. अजमेर सय्यद कलीम, निर्वाण वाघमारे यांच्यासह मुख्याध्यापक एम. एन. कागेरू, नासा येवतीकर, माधव हिमगिरे, ए. एस. सय्यद या शिक्षकांची उपस्थिती होती.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...