रविवार, ८ मार्च, २०२०

त्या काळात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दगडधोंडे अंगावर झेलले म्हणून आज महिला उच्च पदावर-जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर
    जालना, (प्रतिनिधी)- आज महिला पुरुषांबरोबर खांद्याला खांद्या लावून प्रत्येक क्षेत्रात काम करतांना दिसतात.
याचे श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते. त्यांनी त्या काळामध्ये अत्यंत विपरित परिस्थितीत मुलींना शिक्षण देवून सुज्ञ केले व मुलींसाठी शिक्षणाचे दारे उघडी केली असल्याचे प्रतिपादन जालना जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी बोलतांना केले.
ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृती ज्योत माँ जिजाऊंचे स्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथून सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळ असलेल्या नायगावकडे जाणाया ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले. त्यावेळी अंबेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अविनाश ठाकरे, माजी आमदार तोताराम कायंदे, सिंदखेडचे नगराध्यक्ष सतिश तायडे, जळगाव जामोदच्या नगराध्यक्षा स्वातीताई वाकीकर, स्मृतीज्योती समितीचे प्रमुख दिपक ठाकरे, माजी नगराध्यक्ष देवीदास ठाकरे, संतोष खांडेभराड, संतोष जमधडे, संजय मेहेत्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे आयोजन स्मृती ज्योत समिती सिंदखेड राजा व माळी कर्मचारी महासंघ बुलढाणा यांनी केले. पुढे बोलतांना अंबेकर म्हणाले की, ही ज्योत ज्या-ज्या ठिकाणाहून प्रवास करणार आहे. त्या-त्या ठिकाणी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा विचार नेणार असल्याचे सांगितले. तसेच पुरुषांनी आपली मानसिकता बदलल्यास ५० टक्क्यांने असलेल्या महिला समाजाला खNया अर्थाने पुढे जाता येणार आहे. तसेच बुध्दीमत्तेने महिला या पुरुषांच्या मानाने काकण भर सरसच असतात. परंतु दुर्देवाने समाजात त्यांना त्यांचे कर्तुत्व सिध्द करण्याची पुरेशी संधीच मिळत नाही. शिक्षणाशिवाय कोणत्याही समाजाचा, व्यक्तीचा विकास होऊ शकत नाही. समाजात परिवर्तन होवू शकत नाही, हे त्या काळात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांनी ओळखले व समाजाचा तीव्र विरोध झुगारुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना सुशिक्षित करुन त्यांनी स्त्रीयांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. या थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सावित्री सृष्टी निर्माण करण्यात यावी, या मागणीसाठी दिपक ठाकरे व त्यांचे सहकारी सातत्याने प्रयत्नशिल असल्याचे अंबेकर यांनी सांगितले.
यावेळी माळी महासंघाचे राज्याचे अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व महिला दिनाच्या औचित्याने सर्वांना शुभेच्छा दिल्या.
बहुजन समाज पार्टी च्या आठ पदाधिकारीऱ्या ने दिला राजीनामा.आमची नाराजगी पक्षाच्या नेत्या मायावती यांच्या वर नाही.मात्र त्याच्या हाताखाली कमकरणाऱ्या यक्ती हे मायावती यांच्या विविध बाबीच्या संदर्भात दिशाभूल करत आहे.
          अंबड़ /प्रतिनिधि* : बहुजन समाजवादी पार्टी महाराष्ट्रात वाढवी म्हणून सर्व समाजातील केडर बेसच्या लाकोंना जिल्हाध्यक्षपदी
काम करण्याची संधी मिळावी, असे सांगूनही पक्षात काहिच बदल होते नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आठ पदधिकारी बहुजन समाज पार्टीच्या सदस्यत्वचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजणे त्यांच्याकडे सोपवला असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रा. व्यंकटेश कसबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आम्ही गेल्या 22   वर्षापसुन बहुजन समाजवादी पार्टीसाठी काम करत होतो. आजही बासपसाठी काम करणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आमची नाराजगी पक्षाच्या नेत्या मायावती यांच्या वर नाही. मात्र त्यांच्या हताखाली काम करणाऱ्या व्यक्ति मायावती यांच्या विविध बाबीच्या संदर्भाने दिशाभूल करत आहेत. त्यामुळे आजचा प्रसंग घडला आहे. पक्षाचे धोरण महाराष्ट्रासाठी नसल्याचे दिसून येत आहे.

क्रांतीसिंह बहुउद्देशिय सेवाभावी संस्था दरेगाव च्या वतीने जागतिक महिला दिन साजरा.
जालना (प्रतिनिधी) :- नेहरू युवा केंद्र जालना युवा कार्यक्रम
एव खेळ मंत्रालय भारत सरकार आणि क्रांतिसिंह बहुउद्देशिय सेवाभावी संस्था दरेगाव यांच्या वतीने रामनगर येथे ०८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष विष्णु पिवळ,तालुका सेवाकर्मि सौ उषाताई शिंदे,अयोध्या टेमकर, ग्रामसंघाच्या अध्यक्ष गेदाबाई मोकाटे, मंदाकिनी शेळके ,अनघा मोरे,मीना पांडोले, आदी महिला उपस्थित होत्या.  यावेळी विष्णु पिवळ यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगून जागतिक पातळीवर काम करणाऱ्या महिलांची यशोगाथा सांगून महिलांनी आर्थिक शैक्षणिक, सामाजिक व राजकीय स्तरावर प्रगती केली असून महिलांनी उद्योगिक क्षेत्रात प्रगती करण्याची गरज आहे. असे मत व्यक्त केले.तसेच उषाताई शिंदे यांनी महिलांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यावर चर्चा केली.महिलांनी आपले आरोग्य सांभाळण्याची गरज असून याविषयी बोलके झाले पाहिजे यावेळी अनेक महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अयोध्या टेमकर यांनी केले.

                                सन्मान नारी शक्तीचा
    तालुका ग्रामीण रुग्णालय घनसावंगी येथे महिला दिनानिमित्त सत्काराचा कार्यक्रम आयोजित.
घनसावंगी प्रतिनिधी /(गणेश आठवले) :- भारतीय परंपरेत आदिशक्ती
म्हणून नेहमीच स्ञिया गौरव करण्यात येतो.आज जागतिक महिला दिना निमीत्ताने सर्वस्तरातून महिलांचा सन्मान व्हावा म्हणून, तालुका ग्रामीण रुग्णालय घनसावंगी  येथे सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमामध्ये संगिता राजेंद्र खुळे या महिलेने सकाळी ८ वाजून ४० मिनिटांला  कन्यारत्नास जन्म दिला.बाळाला जन्म दिलेल्या महिलेचा पुष्पगुच्छ देऊन व पेढे वाटून सन्मान करण्यात आला.त्याचबरोबर रुग्णालयातील महिला स्टाफ(नर्स)जे.जे.भोलाने, एम. एम. बेले, एम के नवगिरे यांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.त्या प्रसंगी उपस्थित मान्यवर बीड हॅलो रिपोर्टर चे औरंगाबाद प्रतिनिधी गणेश आठवले हे आवर्जून उपस्थित होते.त्याच बरोबर डी.एल.घायतडक (वंचित बहुजन आघाडी) कार्यकर्ते हेही उपस्थित होते.नरेंद्र जोगड (संपादक- साप्ताहिक प्रभाव प्रतिभा)  यांनीही उपस्थिती दर्शविली . डॉक्टर जी.डी.राठोड,आशिष अंकुश परेकर, अनुसया मगन आठवे आदींची उपस्थिती होती .

   क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला समुपदेशन केंद्रात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा.
                नारी का करो सम्मान,तभी बनेगा देश महान.
अंबड प्रतिनिधी :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला समुपदेशन
केंद्राच्या वतीने अंबड येथील सुरंगे नगर येथे 8 मार्च जागतिक महिला दिन आज दुपारी 2.30 वा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
     यावेळी जिल्हा महिला तक्रार निवारण समितीच्या समुपदेशीका तथा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला समुपदेशन केंद्राच्या संचालिका सौ.अनिता कारके, सौ.संगिता धांडे,सौ.संगिता पाचारे व कार्यक्रमाच्या अध्यक्ष महिला पोलिस कर्मचारी मीनाताई आहेर यांनी सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
उपस्थित सर्व महिलांचे गुलाब पूष्प देवून स्वागत करण्यात आले. यावेळी सुनीता तांबे, संगिता पाचारे, सौ.पटेकरताई यांची भाषणे झाली. सावित्रीमाई फुले, राष्ट्र माता जिजाऊ,महिल्यादेवी होळकर,माता रमाई या महान मातांच्या जिवनावर प्रकाश टाकला.हजारो वर्ष व्यवस्थेने गुलाम केलेल्या स्त्रियांना सुशिक्षित आणि धाडसी करूण सक्षम करण्याचे काम महामातांच्या प्रेरणेमुळे झाले. आज महिला कुठे ही कमी नाहीत त्यांनी स्वत:ला कमी समजू नये. आज महिला शिक्षणामुळे डॉक्टर, वकील,शिक्षक,पोलिस, कलेक्टर, आमदार, खासदार,राष्ट्रपति, पंतप्रधान पदापर्यंत पोहोचल्या आहेत. त्या पूरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात.जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रत्येक महिलांनी आपल्या हक्क आणि अधिकारा प्रती जागृत रहिले पाहिजे, तसेच आपल्या कुटुंबावर विशेषतः मुला-मुलीवर चांगले संस्कार केले पाहिजेत. असे शेवटी आहेर म्हणाल्या.यावेळी सौ.अनिता कारके,सौ संगिता पाचारे, सौ संगिता धांडे, सौ सुनिता तांबे, सौ योगिता राऊत, सौ अनिता जाने, सौ भारती तागड, सौ साधना जाधव, सौ परदेशीताई, आदि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...