बुधवार, १० जून, २०२०

रोजगार हमी योजनेची कामे सुरु ठेवण्याची मागणी


परतूर –प्रतिनिधी इम्रान कुरेशी
      हॅलो रिपोर्टर न्युज
तालुक्यात रोजगार हमी योजनेचे कामे सुरु ठेवण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाचे युवक जालना जिल्हाध्यक्ष अच्युत पाईकराव यांनी तहसीलदार रूपा चित्रक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि लॉकडाऊनच्या काळात मंजुराच्या हाताला काम मिळाले नाही.यामुळे गरिबांच्या घरात अन्न धान्य व संसार चालवण्यासाठी पैसे नाहीत. मंजुराना हाताला कामे मिळावे म्हणून शासन स्तरावर कामे चालू करण्याच्या सांगितले जात असताना ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवकांच्या उदासीन धोरणामुळे व पावसाळा सुरु झाल्याचे करण पुढे करत कामे बंद केले आहेत. जो पर्यंत चांगला पाऊस होत नाही तो पर्यंत रोजगार हमी योजनेचे कामे सुरु करण्याची ठेवण्याची मागणी शेवटी पाईकराव यांनी केली आहे.


शिक्षकांकरिता राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे उपक्रम

पुणे,ब्युरोचीफ :- महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, पश्चिम महाराष्ट्र विभागाचे वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील शासन मान्यताप्राप्त कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षकांसाठी लॉकडाऊन मध्ये भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धेचे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे नाव '  शोध उत्कृष्ट अध्यापकाचा ' असून स्पर्धेला कालावधी हा १० मे २०२० ते १९ जून २०२० पर्यंत आहे.स्पर्धेचे विषय हे वस्तुस्थितीवर आधारित आहेत.यामध्ये  १)कोव्हीड १९ विरुद्ध लढा - मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे नेतृत्व, २)विद्यार्थी, शिक्षक व लॉकडाऊनचा मेळ व ३)कोरोना विरुद्ध दैवी शक्ती - डॉक्टर, पोलीस व अन्य शासकीय कर्मचारी,अधिकारी आदी विषय आहेत. या ऑनलाईन स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्राभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक शिक्षकांस सहभागाबद्दल संघटनेकडून प्रमाणपत्र मिळणार आहे.व विजेत्या शिक्षकांना  आकर्षक बक्षिसे व उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक व स्पर्धेचे संयोजक सुनिलभाऊ जगताप आणि सोलापूर शिक्षक सेनेचे शहराध्यक्ष मुरलीधर कडलासकर यांनी सांगितले.जे शिक्षक स्पर्धेत अद्याप सहभागी झालेले नाहीत त्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. स्पर्धेबद्दल अधिक माहितीसाठी ९०११९०३१०१ या क्रमांकावर संपर्क साधावा.**
     सदर स्पर्धेकरिता आप्पासाहेब पाटील , वल्लभ चौगुले, अंबादास चव्हाण , विश्वनाथ बिराजदार, संतोष साठे , रविंद्र वाघ, एकनाथ आंबले, रणजित बोत्रे,संजय नायडू ,बाळासाहेब पवार, स्वाती वाळके,नीता गुंजिकर, शैला क्षीरसागर,मल्लिकार्जुन डीग्गे,अतुल शेलार, संजय अहिरे,सुखदेव आंबले,राजेंद्र खेडेकर,कल्पना पोतदार आदी  पदाधिकारी मेहनत घेत आहेत.

जिल्हा शल्य चिकित्सक ,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दि. 11 जुन 2020 रोजी साधणार फेसबुकद्वारे जनतेशी संवाद.


जालना,ब्युरोचीफ :- दि. 11 जुन 2020 रोजी सायं. 4-00 ते 4-30 या वेळेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड हे आरोग्य विषयक असलेल्या बाबींची माहिती देण्याबरोबरच जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देणार असुन सायं. 4-30 ते 5-00 या वेळेत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नानासाहेब चव्हाण हे कापुस खरेदी (पणन), महात्मा ज्योतिबा फुले पीककर्ज योजना या विषयावर तर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे हे पीकविमा, पीककर्ज, खरीप हंगाम, पोखरा योजना, खते, बि-बियाणे व कृषि विषयक योजनांची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्या https://www.facebook.com/diojalna या फेसबुक खात्यावरून जनतेशी संवाद साधून माहिती देणार आहेत.

कोरोना हॉटस्पॉट, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी आरोग्य सेतू ॲपचा प्रभावी वापर आवश्यक – आरोग्यमंत्री राजेश टोपे



मुंबई,ब्युरोचीफ :- कोरोना संसर्ग रोखण्याकरिता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, हॉटस्पॉट ओळखण्यासाठी ‘आरोग्यसेतू’ ॲपचा प्रभावी वापर करता येऊ शकतो, यासाठी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास तसेच राज्यातील कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
राज्यात सध्या जे कंटेनमेंट झोन आहेत त्यात अजून वाढ होऊ नये आहे त्यातच प्रभावीपणे क्लस्टर कंटेनमेंट कृतीयोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी हे ॲप महत्त्वाचे काम करू शकते, असे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले. या ॲपसंदर्भात अधिक जाणीवजागृतीची गरज असल्याचे सांगतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी ही मोहिम हाती घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.या ॲपबाबत सामान्यांच्या मनात असलेले गैरसमज दूर करणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यभरात मालेगाव, जळगाव, अकोला दौरे केले त्यात काही भागाचा मृत्यू दर हा राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. शेवटच्या क्षणाला उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. ते कमी करण्यासाठी आणि लवकर निदानासाठी आरोग्यसेतू ॲप महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. सामान्य नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड केले तर त्याबाबत प्रशासनाला आणि आरोग्य अधिकाऱ्यांना वेळीच माहिती मिळू शकेल. लोकांनाही स्वताच्या आरोग्याची काळजी घेता येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी आरोग्य आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव, संचालक डॉ. साधना तायडे, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, अकोला, बुलढाणा, नागपूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी उपस्थित होते.


शिवसेना जिल्हाप्रमुख अंबेकर यांना विधान परिषदेवर संधी द्या संतोष जमधडे यांच्यासह ओबीसी समाजाची मागणी



जालना (प्रतिनिधी):- जालन्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी माळी महासंघ मराठवाडा विभागीय अध्यक्ष संतोष जमधडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, भास्करराव अंबेकर हे विद्यार्थी दसेपासुन सामान्य शिवसैनिक ते नगरसेवक, शहर प्रमुख, नगराध्यक्ष, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख अशा अनेक जबाबदार्‍या त्यांनी शिवसेनेत निष्ठापुर्वक, यशस्वीपणे पार पडल्या असून त्यांना अनेक वेळा विधानसभा निवडणुकीत डावलून सुद्धा त्यांनी शिवसेनेवर कायम निष्ठा ठेवत आजही पक्ष कार्यासाठी तळमळीने स्वतःला वाहून घेतले आहे. त्याचे हे कार्य आणि पक्ष निष्ठा आपणास नाक्खीच ग्यात आहे.
मराठवाडा हा ओबीसी बहुल भाग आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाने या विभागातील सामाजिक रचनेचा विचार करून राज्यसभा आणि विधान परिषदेच्या नियुक्त्या दिल्या आहेत जसे भाजपा राज्यसभेवर भागवत कराड विधान परिषदेवर बीड येथील कराड, कॉग्रेस पक्षाने राज्यसभेवर राजीव सातव, विधान परिषदेवर राजेश राठोड, राष्ट्रवादी पक्ष विधान परिषदेवर धनंजय मुंढे आणि यांना मंत्री पद म्हणजे या मराठवाडा विभागात सर्वच पक्षांनी ओबीसी समीकरण जपण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे आणि त्या पक्षाला त्याचा फायदाही झाला आहे.
         त्यामुळे आपल्या पक्षाने देखील आता सामाजिक समीकरणे जपुन मराठवाडा पुर्ववत आपला बाले किल्ला ठेवण्यासाठी भास्करराव अंबेकर यांना विधान परिषदेवर आमदार म्हणुन नियुक्ती द्यावी कारण महाराष्ट्रात माळी समाज लोकसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्रात नंबर 2 वर असून मराठवाड्यातही ओबीसी मधील मोठा समाज आहे आणि तो आज पर्यंत कायम भास्करराव अंबेकर आणि शिवसेना पक्षाच्या खंबीरपणे पाठीशी आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने एकाही माळी समाजातील एकाही कार्यकर्त्याला विधानसभा निवडणुकीत तिकीट दिले नाही. तरी पण माळी समाज कायम 70 ते 80 टक्के शिवसेनेसोबत राहुन भरगोस मते शिवसेनेच्या पारड्यात टाकली असून दि. 15 जून रोजी विधानपरिषदेच्या 12 जागा रिक्त होत असून शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सर्व माळी समाज व भास्करराव अंबेकर समर्थकांची मागणी आहे. मराठवाड्यातील अभ्यासु, विकास प्रिय, सामन्यातील असामान्य सर्व समावेशक नेतृत्व म्हणुन ओळख असणारे शिवसेना जिल्हाप्रमुख जालना भास्करराव अंबेकर यांना विधान परिषद उमेदवारी देण्यात यावी आणि मराठवाडा शिवसेनेचा बाले किल्ला कायम ठेवावा अशी मराठवाड्यातील शिवसैनिक, माळी समाज, सर्व ओबीसी समाज व अंबेकर  समर्थकांनी अशी मागणी केली आहे.


जळगावात जातीयवाद्यांचा हल्ला,  पोलिसांची भूमिका संशयास्पद,राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात.


जळगाव,ब्युरोचीफ :- राज्यात जातीयवाद्यांना मोकळे रान मिळाले असून रोज कुठेना कुठे अनुसूचित जातीच्या लोकांवर प्राणघातक हल्ले करण्यात येत आहेत. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून भडगाव प्रकरणानंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस आणि गावगुंडांवर गृहमंत्र्यांचे नियंत्रण राहिले नसून कधी नव्हे एवढे हल्ले आघाडी सरकारच्या काळात झाले आहेत. अशी जोरदार टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. 
     भडगावं तालुक्यातील महिंदळ भागात राहणारे दगडू सोनवणे यांच्या कुटुंबीयांवर काही जातीयवादी लोकांनी प्राणघातक हल्ला केला.  बौद्ध वस्तीत घुसून हा हल्ला झाल्याने राज्यात आणखी एक खैरलांजी घडवण्याचा उद्देश होता की काय असा प्रश्न निर्माण होतो. हा हल्ला पूर्वनियोजित करण्यात आला होता. आरोपींच्या हातात लाकडी दांडे, स्टीलचे रॉड असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. हल्ला करताना महिला,वृद्ध व्यक्तींना बेदम मारहाण करण्यात आली. महिलांचे कपडे फाडण्यात आले. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून तो अद्यापही खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. वंचित बहुजन आघाडीने हे प्रकरण उचलून धरल्यावर या हल्ल्यातील सर्व आरोपींना आज अटक करण्यात आली. आरोपींना राजकीय पाठबळ मिळाल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे हल्ल्याच्या चार दिवसानंतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. शिवाय तक्रारदारांवरती दबाव टाकण्यासाठी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे. वंचितच्या हस्तक्षेपानंतर चार दिवसानंतर पोलिसांनी पीडितांचे जबाब नोंदवून घेतले आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचे पोलीस संरक्षण देण्यात आले नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. या हल्लेखोरांना राजकीय पाठबळ मिळत असून राष्ट्रवादीचा गृहमंत्री झाला की राज्यात अनुसूचित जातीच्या लोकांवरील अत्याचार वाढीस लागतात, त्याचे हे ताजे उदाहरण आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केला आहे.

    महिंदळे येथील दगडू सोनवणे यांच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी गावातील गावगुंड अशोक पाटील, अरुण पाटील, अमोल पाटील, पृथ्वीराज पाटील हे आरोपी आहेत. हा हल्ला ७ जून रोजी पूर्वनियोजित करण्यात आला होता. आरोपी हातात दांडके, स्टीलचे रॉड घेऊन आले. जोरजोरात हर हर महादेव अशा आरोळ्या मारत ते आले. यावेळी दगडू सोनवणे यांनी आरोळ्या का मारता? असे विचारले. त्याचा राग मनात धरून व मागील भांडणाच्या कारणामुळे अशोक पाटील या गावगुंडाने जातीवाचक शिवीगाळ सुरू केली आणि हल्ला केला. हातातल्या दांड्याने मारहाण सुरु केली. दगडू सोनवणे, रत्ना खैरनार, प्रगती खैरनार, प्रकाश खैरनार, ध्यानेश्वर खैरनार, वाल्मिकी खैरनार, सोनू सपकाळे यांना जबर मारहाण करण्यात आली. महिलांचे कपडे फाडण्यात आले तर पुरुषांवर स्टीलच्या रॉडने हल्ला केला. उलट ज्यांच्यावर हल्ला झाला त्या अनुसूचीत जातीच्या पिडीतांवरच काउंटर केसेस पोलिसांनी दाखल केल्या आहेत.
     गेल्या काही दिवसात राज्यात अनेक ठिकाणी सामूहिक हल्ले करण्यात आले आहे. पुणे पिंपरी व नागपूर या ठिकणी दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. रत्नागिरी येथे एका तरुणांचा कान कापण्यात आला तर परभणी मध्ये सहा जणांच्या कुटुंबियांवर असाच जीवघेणा हल्ला झाला. त्यातील आरोपी दुसऱ्याच दिवशी जामिनावर सुटले. त्यानंतर नाशिक जिल्यात सहा ठिकणी गावगुंडांनी हल्ला केला. जाणीवपुर्वक हे हल्ले होत असून ठराविक समाजाला लक्ष केले जात आहे. या सर्व प्रकरणात त्रुटी ठेवणे, जामीन सहज मिळावा म्हणून योग्य ती कारवाई न करणे,  फरार आरोपींना अटक करण्यास विलंब लावणे, तक्रारदारांवर दबाव आणणे जेणे करून त्यांनी तक्रारी मागे घेतल्या पाहिजे. खरे गुन्हे दाखल न करता खोट्या तक्रारी दाखल करून घेणे हे अरविंद बनसोड प्रकरणात दिसून आले आहे. बीड मधील केज या ठिकाणी पारधी समाजाच्या  कुटुंबियांवर हल्ला करून तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती, त्यांनीही पोलिसांकडे सुरक्षा मागितली होती, हल्ला होणार याची कल्पना पवार कुटुंबियांना होती, मात्र पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. यातील काही आरोपी अजूनही फरारी असून अनेक आरोपींना तर पोलीस रेकॉर्डवर घेण्यातच आलेले नाही. हा सर्व प्रकार राजकीय दबावाखाली होत असून आघाडी सरकारच्या काळात दलितांवरील हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात इतर घटनांवर उठसुठ प्रतिक्रिया देणारे गृहमंत्री, सामाजिक न्याय मंत्री किंवा जितेंद्र आव्हाड ब्र देखील काढायला तयार नाही. मिटकरी नावाचा आमदार तर नागपूरची घटनाच माहित नसल्याचे सांगून प्रश्न विचारणा-या कार्यकर्त्यांना पाहून घेण्याची धमकी देतो.
त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील हल्ला प्रकरणी अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ , नियम १९९५ मधील कलम १६ नुसार मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली  'राज्य स्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीचे' तत्काळ गठन करण्यात यावे. त्या समितीची आपत्कालीन बैठक तातडीने आयोजित  करावी. महाराष्ट्रातील नागपूर, पिंपरी- चिंचवड, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील सहा घटना, गंगाखेड व रत्नागिरी राज्यातील इतर ठिकाणी झालेल्या  जातीय अत्याचारांच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात याव्यात. सर्व प्रकरणांचा त्वरित तपास करून सर्व खटले जलदगती न्यायालयांत चालवावेत. सर्व अत्याचारग्रस्तांना कायद्यातील तरतुदी प्रमाणे आर्थिक सहाय्य व अन्य मदत करावी. तपास हा सक्षम दर्जाच्या (पोलीस उपअधिक्षक - उप विभागीय पोलीस अधिकारी) यांनीच करावा. विहित मुदतीत गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्यात यावे.जामीनाची तरतूद नसताना आरोपीना जामीन मिळाले आहेत ते रद्द करण्याचा प्रयत्न करण्यात यावा. तसेच अत्याचार झालेल्या पिडीतांवरील काउंटर केस मागे घेण्यात यावेत. अश्या मागण्या वंचित बहुजन आघाडीने केल्या आहेत. असे वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी कळविले आहे.

केंद्रीय पत्रकार संघ (CPJA) औरंगाबाद शहर उपाध्यक्ष श्री.सिध्दांत कांबळे यांच्यी निवड.


औरंगाबाद,ब्युरोचीफ:- औरंगाबाद येथील पत्रकार क्षेत्रात काम करत असलेले बीड प्रसार चे उपसंपादक श्री.सिध्दांत कांबळे कामाची दखल घेऊन केंद्रीय पत्रकार संघ (CPJA) राष्ट्रीय अध्यक्ष मा.संदिप. वि. कासालकर साहेब यांच्या आदेशानुसार व मा.कमलेश मो.गायकवाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथील पत्रकार क्षेत्रात काम करत असलेले बीड प्रसार चे उपसंपादक श्री.सिध्दांत कांबळे यांची केंद्रीय पत्रकार संघ (CPJA) औरंगाबाद शहर उपाध्यक्ष निवड करण्यात आली. व त्यांना पुढील वाटचालीत संघटना व मित्र परिवार तर्फे हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

बीड हँलो रिपोर्टर न्युज

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक कर्ज वाटप करतांनी बँकांनी फेरफार हि अट रद्द करण्याची मनसे च्या वतीने मागणी.

 मा.विभागीय आयुक्त साहेब(कार्यालयऔरंगाबाद) यांच्या कडे निवेदन सादर


जालना,ब्युरोचीफ :- मराठवाड्यातील इतर काही जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी फेरफार नक्कल विना शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्या बाबत बँकांना आदेश दिले आहेत, म्हणून ११ते १६ जुन दरम्यान जिल्हाधिकारी जालना फेसबुक लाईव्ह अधिकृत जालना जिल्ह्यातील जनतेशी संपर्क करणार आहेथ, या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक कर्ज हा विषय मार्गी लागावा, यापूर्वी पिक कर्ज मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी १५ जून अंतिम तारीख दिल्याली आहे, यापूर्वी ते कर्जासाठी ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करून पीक कर्जाची मागणी केली होते, यापैकी अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन पिक कर्ज साठी ऑनलाईन अर्ज केल्यामुळे त्या शेतकऱ्यांना बँक एसएमएस करून बोलून घेत आहे परंतु कर्ज प्रकरणातील बँकेने मागितलेले ७/१२, होल्डिंग,आधार, इतर बँकेच्या सूचनेनुसार महत्त्वाचे कागदपत्र असतांनी फेरफार चे गरजच नाही, म्हणून कागदपत्र यामध्ये फेरफार ची नक्कल काढताना संबंधित शेतकऱ्यांना खूप अडचण येत आहे, म्हणून ही फेरफार अशी जाचक अट वाटत आहे,या फेरफार अटीमुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप खाण्यास खूप विलंब होणार आहे,यामुळे फेरफार नक्कल कर्ज वाटप करताना बँकेने मागणी करून नये,अशा प्रकारचे संबंधित बँकेला आदेश द्यावा करण कोरोना साथीच्या रोगांमुळे अनेक जाग्यावर कागदपत्र काढण्यासाठी अडचणी फेरफार नक्कल काढायला सुद्धा खूप अडचणी येत आहेत, या सगळ्या सगळ्या पूरस्थितीचा विचार करून खरिपाची पेरणी थोड्याच दिवसात सुरू होणार आहे, या  सर्व दृष्टिकोनातून विचार करून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फेरफारची विनाअट बँकेने पीक कर्ज संकट समयी लवकरात लवकर उपलब्ध व्हावे...
 सध्याची परिस्थिती पाहता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फेरफार कल विना अट पीक कर्ज मंजुरी करण्यासाठी बँकांना आदेश देऊन शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध करून व्हावे,  कारण कारण मराठवाड्यातील इतर जिल्हा अधिकाऱ्यांनी यांनी फेरफार नक्कल न घेता शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्या बाबत आदेश दिले आहेत, ह्याच धर्तीवर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज विना फेरफार उपलब्ध करून द्यावे अशी मागणी प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना यांनी  मा.विभागीय आयुक्त साहेब(कार्यालयऔरंगाबाद) यांच्या कडे निवेदन सादर केले आहे.


लोकडाउन काळात बँण्ड पार्टी वर आली उपास मारीची वेळ




बँण्ड पार्टी तर्फे शासनाला मदतीचे साकडे

जालना,ब्युरोचीफ :- संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले असून सर्वत्र लाँकडाऊन सुरू असल्या ने सर्व व्यवसाय बंद होते. लग्न सराईत बँण्ड सिजन बुड्याल्यामुळे बँण्ड व्यवसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
लाँकडाऊन सुरू असल्या ने त्याचयावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या हाताला काम नाही.काम नाही तर पैसा नाही. वर्षेतील चार महिने लग्न सराई असते.या काळात लग्नसोहळात बँण्ड वाजुन वादक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.मात्र यंदा कोरोना संकटामुळे विवाह सोहळा निर्बंध आले होते.त्यामुळे त्यांच्या कडे कामावर आसलेल्या अनेक उपासमारीची वेळ आली आहे.लग्न सराईमध्ये लाँकडाऊन मुळे लग्न सोहळा बंद आसल्याने बँण्ड व्यवसाय इकाकडे बुकिंग साठी दिलेल्या अँडवान्स रक्कम परत चा तागादला लावला जात आहे.शासनाने बँण्ड व्यवसायसिकांना मदत जाहीर करण्यात यावी

अशी मागणी बँण्ड व्यवसायसिकांना वतीने करण्यात येत आहे

प्रतिक्रिया
माझ्या पार्टीत 30 कलाकार आहेत .त्यांना मला त्यांना पगार द्यावा लागतो. त्यांना उचल द्यावी लागते.लोकडाउन मुळे संपूर्ण सिजन गेले. 

लक्ष्मण जाधव

सौराजे म्युझिकल पार्टी अंबड

माझा पारंपरिक व्यवसाय आहे.माझ्या कडे 35 कलाकार आहे.त्यांचा उदरनिर्वाह हा बँड वर अवलंबून आहे.त्यांचायवर आर्थिक संकट कोसळले आहे
*भगवान कांबळे*
न्यु.प्रभात बँण्ड गोंद

यंदा लग्न साराईत बँण्ड चा तारखा व बुकिंग रद्द झाल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. शासनाने आर्थिक मदत करावी.
*ठोंबरे नाना*
करण म्युझिकल पार्टी 
घो.हादगाव


  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...