सोमवार, २२ जून, २०२०

आत्महत्या रोखण्यासाठी सामाजिक दायित्व म्हणून लोकांनी पुढे यावे - धनराज वंजारी


मुंबई,ब्युरोचीफ :- अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी  बिहार मध्ये एक याचिका दाखल करण्यात आली असून त्यात अनेक बॉलिवूड कलाकारांना जबाबदार धरण्यात आले आहे. सुशांतची आत्महत्या ही एक मेंटल व सायकॉलॉजिकल लिंचींग असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या हि त्यात मोडतात. अशा प्रकारे लिंचिंग करणाऱ्यांविरुद्ध सामाजिक दायित्व म्हणून वंचित बहुजन आघाडी एक मोठे आंदोलन करणार असल्याची माहिती वंचितचे उपाध्यक्ष धनराज वंजारी यांनी दिली.
 ्राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. पेरणी केली तर पाऊस नाही, बँका कर्ज द्यायला तयार नाही, बोगस बियाणांची विक्री होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत, सरकार मदत करायला तयार नाही जी मदत मिळते ती अपुरी असते, त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो. परिणामी शेतकऱ्यांचे मानसिक, सामाजिक खच्चीकरण होते व तो आत्महत्या करतो. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातही बिहार मधील  मुजफ्फरपुर या ठिकाणी एक याचिका दाखल करण्यात आली असून सुशांतने आत्महत्या केली नसून त्याच्या आत्महत्येला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार, निर्माते व दिग्दर्शक जबाबदार असल्याचा संशय त्यात व्यक्त करण्यात आला आहे.
     सुशांत प्रकरणात मुंबई मध्ये देखील एक जनहित याचिका दाखल झाली पाहिजे हे आपले सामाजिक दायित्व असून मेंटल लिचिंगवर कायदा करण्याची गरज असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष धनराज वंजारी यांनी मांडले. याबाबत लवकरच एक आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली. 

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना महाबीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी फसवणूक केल्याप्रकरणी महाबीज अधिकाऱ्यांना व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून तत्काळ निलंबित करण्या यावे - प्रकाश सोळंके


जालना,ब्युरोचीफ :- जालना जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची महाबीज कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी महाबीज कंपनीचे अधिकारी श्री देशमुख, व श्री सावंत, जिल्हा कृषी अधिकारी जालना यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे, कारण सध्या खरिपाची पेरणी चालू असतांनी या महाबीज अधिकाऱ्यांनी व संबंधित कृषी विभागाच्या अधिकार्याने संगणमत करून, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, महाबीज कंपनीचे बि बियाणे विक्री होऊ नये म्हणून कंपनीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यानेच कंपनीसोबत गद्दारी केली आहे, कारण खाजगी कंपनीचे बी बियाणे निर्माण करणाऱ्या कंपन्याचा विक्रीचा खप वाढवा म्हणून महाबीज कंपनीच्या  अधिकाऱ्याने आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ५०% शेतकऱ्यांचे महाबीज कंपनीचे बियाणी सोयाबीन पेरणी केल्यानंतर उगवलेच नाही, कारण महाबीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्याने संगणमत करून महाबीज कंपनीची कशी बदनामी करता येईल याचे नियोजन करून कंपनीला बदनाम करण्यासाठी षड्यंत्र नियोजित नियोजन केल्यानंतर या महाबीज कंपनीचे बी बियाणे शेतकरी खरेदी करणार नाही, याचा फायदा खाजगी बी बियाणे निर्माण करणाऱ्या कंपन्याला झाला पाहिजे, हा आर्थिक गैरव्यवहार आहे, तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्याने उगवणशक्ती परीक्षण न करताच सोयाबीन बी बियाणे महाबीज कंपनीला विक्रीसाठी का परवानगी दिली, २०२० च्या खरीप पेरणी मध्ये महाबीज कंपनीने खराब सोयाबीन बी बियाणे शेतकऱ्यांना पुरवठा केल्यामुळे या वर्षी सोयाबीनची उत्पन्ना मध्ये फार मोठे घट होणार आहे, या महाबीज कंपनीच्या अधिकाऱ्यांसी शेतकऱ्यांनी फोनवर संपर्क केला असता उडवाउडवीचे उत्तर देऊन आपले फोन बंद करून करून ठेवले आहेत. बी बियाणे निर्माण करणाऱ्या खाजगी कंपन्या सोबत हात मिळवणी करून महाबीज कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांना बोगस बियाणे उपलब्ध करून देतात, शेतकऱ्यांच्या कष्टाशी मस्करी करणार्‍या कृषी अधिकारी व महाबीज कंपनीच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करावी, करण प्रत्येक वर्षी काही ना काही तरी भेसळयुक्त करून बी बियाणे हे लोक शेतकऱ्यांची पुरवठा करून फसवणूक करीत असतात म्हणून यांना कठोर शिक्षा करून यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना यांनी मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन मार्फत केली आहे.

रांजणी येथे 3 जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन


रांजणी प्रतिनिधीअसलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे भारतीय जैन संघटना, व्यापारी महासंघ व इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रांजणी ग्रामपंचायत कार्यालयात 3 जुलै रोजी आयोजित या रक्तदान शिबिराचे उदघाटन श्री सरस्वती भुवन हायस्कूलचे अध्यक्ष श्री नानासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार असून यशवंत सहकारी सूतगिरणीचे चेअरमन आबासाहेब वरखडे, सरपंच राधाकिसन जाधव व ग्राम विकास अधिकारी शिवाजी चेके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिबिरात रक्तदान करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य कृषिभूषण गौतमभाऊ देशमुख मो. क्रमांक 9850624988, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अशोक ढोबळे मो. क्रमांक 7709141423, इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष असलम कुरेशी मो. क्रमांक 9730231063, व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष भारत देवकर मो. क्रमांक 9420223363 व दिपक वरखडे मो. क्रमांक 9423712950 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन सय्यद जहीर बागवान, फेरोज बागवान, भारत वनगुजरे, दत्ता हालगे, संजय मांडवे, सय्यद अकबर, नजीर कुरेशी, व्यापारी महासंघाचे तालुका सचिव नरेंद्र जोगड आदींनी केले आहे.

वृक्षारोपण करून संगोपन करणे पर्यावरणासाठी प्रत्येकाची जबाबदारी-तहसिलदार नरेंद्र देशमुख


रांजणी प्रतिनिधी/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यात नव्यानेच पदभार स्वीकारलेले तहसीलदार नरेंद्र देशमुख यांच्या उपस्थितीत सोमवारी वृक्षरोपणा बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. निसर्ग संवर्धन निसर्गप्रेमी व समाजभान टीमचे दादासाहेब थेटे यांच्याशी चर्चा करताना त्यांनी यावेळी मत व्यक्त केले.
यावेळी नारायण देवकाते, शिवाजीराव बजाज, हातडीचे सरपंच शिंदे, संदिपान सातपुते, डॉ.गंगाधर धांडगे, महादेव मते, जगताप, पत्रकार गणेश ओझा, अविनाश घोगरे, अशोक कंटुले उपस्थित होते. या बैठकीदरम्यान समाजभान टिमच्या वतीने अंबड तालुक्यात केलेल्या 65 शाळेच्या वृक्षारोपणाची चर्चा करण्यात आली. वृक्षारोपणासाठी पर्यावरण रक्षक चषक स्पर्धाही घेण्यात आल्या. अनेक कुटुंबाकडे समाजभानने एका झाडाची जिम्मेदारी मुलगी म्हणून दिली. त्या वृक्षांचे संगोपन झाले पाहिजे असे सांगून त्यांनी प्रत्येक झाडाचा वाढदिवसही साजरा केला जातो असे थेटे यांनी या बैठकी दरम्यान सांगितले. समाजभान टिमचे सामाजिक मोठे काम असून सध्या  दररोज वृक्षारोपण करण्याकरिता दोन तास श्रम कार्य करत आहे. झाडे उपलब्ध करण्यापासून प्रत्येक गोष्टीचा संघर्ष करावा लागत आहे. सध्या दररोज 25 झाडे लावून पर्यावरण रक्षणासाठी श्रम कार्य करत आहोत 



तहसीलदार देशमुख यांनी सांगितले की समाजभान टिम  सारख्या अशा तालुक्यामध्ये अनेक टिम निर्माण व्हाव्यात व  एकत्र येऊन वृक्षारोपना सारखे सामाजिक कामे करण्याची गरज आहे .त्यांनी यावेळी समाजभान टीमचे कौतुक केले. पुढे देशमुख म्हणाले की पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक वर्षी वृक्षारोपण झाले पाहिजे. गावागावातील शाळा, महाविद्यालय, बाजारपेठा, स्मशानभुमी, सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने घेतली पाहिजे .
आपल्या गावाच्या सौंदर्यात वृक्षरोपणाने आधिक भर पडेल. गावात वृक्षारोपणाचे पालकत्व जे स्वीकारतील त्या गावच्या ग्रामपंचायतीला लवकरच वृक्षाची रोपे दिली जातील व दहा गावांची पहिल्या टप्प्यात निवड करण्यात येईल .या वर्षी वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात येणार असून ते म्हणाले स्वयंस्फूर्तीने ज्या गावातील युवक व ग्रामपंचायत वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होतील त्यांच्यावर वृक्षरोपनाची जिम्मेदारी देण्यात येणार असून पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण करणे हे गावाच्या प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य समजून प्रत्येक माणसाच्या मनात एक झाड लावण्याचा विचार रुजला पाहिजे. तर आपोआप अनेक झाडे रुजतील प्रत्येक माणसाने एक तरी झाड लावण्याचा प्रयत्न करावा. झाडे जगली तरच आपण जगू अशा या समाजभान टीमच्या वतीने चर्चासत्र कार्यक्रमातून सामाजिक संदेश देत  वृक्षरोपणाचे आयोजन करण्यात आले.

रांजणी परिसरात समाधानकारक पाऊस, पाणीटंचाई होणार दूर


रांजणी प्रतिनिधी/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी व परिसरात 10 जून पासून दमदार पाऊस होत असल्याने पाणीटंचाई पासून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रांजणी व परिसरात यावर्षी पावसाळ्यातच्या सुरुवातीलाच दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे परिसरात खरीप पिकांच्या पेरणीला गति आली असली तरी जास्त पावसामुळे सोयाबीनची पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रांजणी येथे या आठवड्यात दोन-तीन वेळेस मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे दुधना नदीला पूर आला होता. यामुळे परिसरातील विहिर व बोअरचे पाणी मोठ्या प्रमाणात वाढले असून नागरिकांची पाणीटंचाईच्या संकटातून सुटका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुधना नदीला दरवर्षी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात पूर येतो. त्यामुळे नागरिकांना जून महिन्यातही पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी जूनमध्येच समाधानकारक पाऊस पडल्यामुळे दुधना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दुधना नदीचे पाणी वाढल्याने वझर, कवठा, करडगाव, चित्रवडगाव, ढोबळेवाडी, रांजणी, बाबई आदी गावांना पाणीटंचाईतून सुटकारा मिळतो. चांगल्या पावसामुळे कापूस व तुरीची 90 टक्के पेरणी झाली असली तरी अधिक पावसामुळे सोयाबीनची पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रांजणी परिसरात तुरीला किडे खात असल्याने शेतकरी चिंतेत

रांजणी प्रतिनिधी/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी व परिसरात तुरीच्या पिकाला किडे खात असल्याने शेतकरी वर्गात चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषि विभागाने शेतक-यांना मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.घनसावंगी तालुक्यातील रांजणी व परिसरात यावर्षी सुरुवातीपासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी वर्गात उत्साह निर्माण झाला होता. परिसरात दमदार पाऊस होत असल्याने शेतकरी वर्ग खरीप पिकांच्या पेरणीत मग्न झालेला दिसत आहे. रांजणी परिसरात कापूस व तुरीची जवळपास शंभर टक्के पेरणी झालेली आहे. मात्र जास्त पावसामुळे सोयाबीनची पेरणी लांबणीवर पडली आहे. रांजणी परिसरात कापूस व तुरीची पेरणी वेळेवर झाल्याने कापूस उगवला आहे. परंतु तुरीच्या पिकाला उगवण्यापूर्वीच किडे खात आहेत. काही शेतक-यांनी तुरीची लावणी दोन ते तीन वेळेस करूनही या पिकाला जमिनीच्या वर येण्यापूर्वी किडे खाऊन नष्ट करत आहेत. त्यामुळे वारंवार तुरीची लावणी करुन शेतकरी वर्ग हैरान झालेला दिसत आहे. त्यामुळे कृषि विभागाच्या वतीने शेतक-यांना मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.

ॲन्टीजन टेस्टींग,  टेलिएक्सरे तसेच ॲन्टीबॉडीज टेस्टींग आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कोरोनाबाधितांवर उपचार करा जिल्ह्यात एकाही कोरोना बाधिताचा मत्यू होणार नाही, याची दक्षता -- पालकमंत्री राजेश टोपे



जालना,ब्युरोचीफ :- जालना जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असुन ही अतिशय चिंतेची बाब आहे.  जिल्ह्यातील रुग्णांसाठी आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असुन ॲन्टीजन टेस्टींग,  टेलिक्सरे तसेच ॲन्टीबॉडीज टेस्टींग या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात यावेत.  जिल्ह्यात एकाही कोरोना बाधिताचा मत्यू होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री टोपे बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री नार्वेकर, डॉ. जगताप आदींची उपस्थिती होती.पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या उपचारासाठी आरोग्याच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असुन केवळ अर्ध्या तासामध्ये रुग्णाचा अहवाल देणाऱ्या ॲन्टीजन्ट या तंत्रज्ञानाबरोबरच टेलिएक्सरे ही सुविधाही जालना जिल्ह्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली असुन या तंत्रज्ञानाचा  प्रभावीपणे वापर करण्यात यावा.  तसेच ॲन्टीबॉडीज टेस्टींगसुद्धा करण्याचे निर्देश देत कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू होणार नाही याची, आरोग्य विभागाने दक्षता घेण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले.कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला भाग हा कंन्टेन्टमेंट झोन म्हणून घोषित करुन या भागातुन एकही नागरिक विनाकारण घराबाहेर पडणार नाही, याची पोलीस विभागाने दक्षता घ्यावी. या भागात नियम अधिक कडकपणे लागू करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस विभागाला यावेळी दिल्या.तालुका आरोग्य अधिकारी तसेच आशा वर्कर्स यांनी पॉलीऑक्सीमीटरचा वापर करुन घरोघरी जाऊन मधुमेह, ऱ्हदयरोग असे आजार असलेल्या वयोवृद्ध व्यक्ती व ज्यांना सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणे आहे अशा व्यक्तींचे जलदगतीने सर्व्हेक्षण करण्यात येऊन आवश्यकतेनुसार संस्थात्मक अलगीकरण करण्याबरोबरच वेळप्रसंगी अशा व्यक्तींना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार सुरु करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले.शहरामध्ये झोपडपट्टी भागामध्ये राहणारे नागरिक एकाच शौचालयाचा वापर करतात.  या शौचालयाच्या माध्यमातुनसुद्धा कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती असल्याने शौचालये नियमितपणे स्वच्छ करण्याचे निर्देश देत हायपोक्लोराईड द्रव्याने निर्जंतुकीकरणाची कार्यवाही नगरपालिकेने करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी केल्या.  कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत जनमानसांमध्ये जनजागृती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत  कोरोनासंदर्भात छोटछोटे व्हिडीओ, कार्टुन्सची निर्मिती करुन समाजमाध्यमे, विविध वाहिन्या, वृत्तपत्रे याद्वारे जनमानसांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.  

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...