बुधवार, २५ मार्च, २०२०

जीवनावश्यक वस्तूची चढ्या भावाने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे
जालना, प्रतिनिधी:-जिल्ह्यातील बरेचसे 
जीवनावश्यक वस्तूचे व किराणा मालाची दुकाने बंद असलेबाबत व जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने विक्री करत असलेबाबत (विशेषतः भाजीपाला, कांदे , बटाटे) याबाबत तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. सर्व घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांनी  आपले जीवनावश्यक वस्तू व किराणा मालाचे दुकान तात्काळ उघडे ठेवावेत व गरजू ग्राहकांना जीवनावश्यक वस्तू योग्य दराने पुरवठा करण्यात यावा. कोणीही जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला व कांदे बटाटे जादा दराने विक्री करू नये. अन्यथा सदर व्यापाऱ्यांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 व जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार प्रतिबंध आणि सुरळीत पुरवठा अधिनियम 1980 मधील तरतुदीनुसार साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्या संबंधीत व्यापारी,दुकानदार , व्यक्ती व संस्था यांच्याविरुद्ध  फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. सर्व तहसीलदार यांनी आपल्या तालुक्यातील जीवनावश्यक वस्तूंचे घाऊक व किरकोळ दुकाने चालू/ उघडी आहेत का? याची खात्री करावी तसेच कोणतीही जीवनावश्यक वस्तू अथवा भाजीपाला, कांदे, बटाटा यांची चढ्या दराने विक्री होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी दिल्या आहेत.

          जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही
कोरोनो विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक                          उपाययोजना नागरिकांची काळजी घ्यावी
जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती
जालना, प्रतिनिधी :- कोरोनो विषाणुचा
प्रादुर्भाव होऊ नये यादृष्टीकोनातुन जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. जालना जिल्ह्यामध्ये एकूण 59 रुग्णांना रुग्णालयात दाखल केले होते. त्याीपैकी 57 रुग्णां चे स्वॅब घेण्याजत येऊन नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याभपैकी 42 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असुन 12 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.  आतापर्यंत 44 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असुन त्यांना घरीच अलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे. 
दि. 25 मार्च रोजी एकुण 15 रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल आहेत. राज्यातुन व इतर राज्यातुन आलेल्या 212 नागरिकांची वैद्यकीय पथकामार्फत तपासणी करुन लक्षणे असणाऱ्यांवर उपचार करुन स्वत:च्या घरात अलगीकरण करण्याच्या सुचना देण्यात आल्या असुन जिल्ह्यात कोरोना विषाणुचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याची माहिती  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के.राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी   डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली आहे.
औरंगाबाद-जालना जिल्ह्याच्या सीमेवर वरुडी या ठिकाणी चेकपोस्ट स्थापन करण्यात आले असुन या पोस्टच्या माध्यमातुन 24 तास येणाऱ्या वाहनांवर नजर ठेऊन तपासणी करण्यात येत आहे.
जालना जिल्ह्यात एकुण 15 संस्थांची अलगीकरणासाठी निवड करण्यात आली असुन त्या ठिकाणी 1 हजार 539 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागात 49 शीघ्र प्रतिसाद पथके, 208 आरोग्य पथके व शहरी भागातही आरोग्य पथके स्थापन करण्यात आली असुन या पथकांमार्फत देशातुन, बाधित भागातुन आलेल्या सर्व प्रवाशांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.  ज्यांना तीव्र लक्षणे दिसुन येतात अशा रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये भरती करण्यात येत आहे.
 घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत असुन आरोग्य पथकामार्फत उपचार करण्यात येत आहेत. जनतेने काळजी घ्यावी. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे.वैयक्तिक स्वच्छता राखावी.  कोरोना विषाणुची लक्षणे जाणवताच नजिकच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करुन घ्यावी, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के.राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


हातावर कमावणा - या वंचित घटकांचा कोरोना संसर्ग आजारामुळे बुडालेल्या रोजगाराची भरपाई वस्तुरूपाने ( धान्य व किराणा ) किंवा आर्थिक धनादेशाद्वारे शासकीय मदत त्वरित द्यावी. - आयु. वैभव सदाफुले
रिपब्लिकन सेना ठाणे च्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन
मुंबई (ठाणे) प्रतिनिधी :- नाका कामगार , फेरीवाले , शेतमजूर , भाजीविक्रेते . महीला घरकामगार महीला . गवंडी रंगारी . रिक्षा चालक , चर्मउद्योग - गटई कामगार , आदिवासी समाजातील मोलमजुरी करणारे , वीटभट्टी कामगार इ . हातावर कमावणा - या वंचित घटकांचा कोरोना संसर्ग आजारामुळे बुडालेल्या रोजगाराची भरपाई वस्तुरूपाने ( धान्य किराणा ) किंवा आर्थिक धनादेशाद्वारे शासकीय मदत त्वरित द्यावी.कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव रोखण्याकरिता जमावबंदी , बाजारपेठ बंद , कामधंदे बंद , रोजगार बंद घरीच बसा या काळजी घेणाऱ्या प्रशासन व सरकारची निर्णयक भूमिका योग्य व रास्त आहे . परंतु यामुळे स्थानिक माणसांचा रोजगार बुडाला , कुटूंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे , वरील विषयातील सर्व वंचित घटकांना आपला दैनंदिन रोजगार बुडवून घरीच थांबावे लागत आहे , याबाबत सरकार व प्रशासनाने कुठलीच उपाय योजना न करणे हे मानवी हक्क अधिकाराच्या विरोधात आहे . त्यामूळे अशा घटकांना वस्तुरूपाने अन्नधान्य वाटप किंवा धनादेशाद्वारे त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी . त्याकरिता बदलापूर अंबरनाथ ठाणे जिल्ह्यातील अशा घटकांचे तातडीने सर्वेक्षण करून त्वरित मदत जाहीर करुन त्यांचे जीवनमान पूर्वपदावर आणण्यास सहकार्य करावे . अशी मागणी रिपब्लिकन सेना ठाणे आयु. वैभव सदाफुले यांच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदना मार्फत केली आहे.


नेट परीक्षेच्या तोंडावर कोरोनाचा धुमाकूळ; परीक्षा वेळेवर                                             होण्याबाबत संभ्रम
         3 मे रोजी नियोजित परीक्षा अभ्यासक्रमसुद्धा 
                              अपूर्ण राहिल्याने चिंता
नांदेड (भगवान कांबळे) :-वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना नीट (NEET) प्रवेश 
 परीक्षा देणे अनिवार्य आहे. नीट परीक्षेत संपादन केलेल्या गुणांच्या आधारे वैद्यक अभ्यासक्रमातील प्रवेश निश्चित केले जातात. परीक्षेला महिना शिल्लक असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्याने सदर परीक्षा वेळेवर होणार की नाही, असा संभ्रम विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.नीट परीक्षा ही सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशनच्या (सीबीएसई)अंतर्गत आयोजित करण्यात येते. एनसीआरटीच्या अभ्यासक्रमावर आधारित नीट परीक्षा आहे. परीक्षांचे आयोजन करणे, निकाल तयार करणे, मेरिट यादी तयार करणे ही कामे सीबीएसईच्या माध्यमातून केली जातात. २०२० ची परीक्षा ३ मे रोजी होणार असल्याचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरलेले आहेत. परंतु परीक्षेला दीड महिना शिल्लक असताना कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्याच्या उपाययोजना म्हणून राज्यातील जवळपास सर्वच महाविद्यालये, खासगी कोचिंग क्लासेस बंद करण्यात आली. त्यातच दहावी बोर्डाचे पेपरची पुढे ढकलण्यात आले आहेत. मात्र, राज्यातून जवळपास साडेतीन लाख विद्यार्थी ज्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत, त्या नीट परीक्षेबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे लाखो कुटुंबामध्ये कोरोनाबरोबर नीट परीक्षेचीही चर्चा सुरू आहे.विद्यार्थी-पालकांची मागणी कोरोना पार्श्वभूमीवर सरकारने  १४ मार्च रोजी शाळा महाविद्यालयांना सुट्या जाहीर केल्या होत्या़ त्या सुट्टयाचे सर्व स्तरावरुन स्वागत झाले असले तरी मे महिन्यात येऊ घातलेल्या नीट परीक्षेसाठी महाराष्ट्रातून जवळपास साडेतीन  लाख विद्यार्थी बसणार आहेत. देशातील सर्वात मोठी परीक्षा असलेल्याने मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रभावित झाले असून संबंधित मंत्रालयाने तथा विभागाने यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. सदर परीक्षा पुढे ढकलून हजारो विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी नीट परीक्षार्थी विद्यार्थी, पालक व शिक्षकानी केली आहे.अभ्यासक्रम अपूर्णच; विद्यार्थी चिंतेत नीट परीक्षेसाठी ११ वी आणि १२ वी या दोन्ही वर्षांचा अभ्यासक्रम असून विद्यार्थी दोन वर्ष या वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेसाठी तयारी करत असतात. सदर परीक्षेसाठी एनसीइआरटी अभासक्रम असून त्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने खाजगी शिकवणीची मदत घेत तयारी करतात. पण कोरोनामुळे ओढवलेलले संकट त्यात शाळा महाविद्यालयांनासह खाजगी क्लासेसला दिलेल्या सुट्ट्यांमुळे पुरेशी तयारी न झाल्याने विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने परीक्षा पूढे ढकलण्याची गरज आहे. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अधिक नुकसान होईल १४ मार्चपासून १४ एप्रिल या काळात  काही शहरी भागातील विद्यार्थ्यांनी इंटरनेट वा मोबाईलच्या सहाय्याने थोडीफार तयारी केली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आॅनलाइन सुविधेअभावी तयारी न करता आल्याने त्यांच्यावर अन्याय होणार आहे. परिणामी ग्रामीण भागातील निकाल घसरून ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकारने नीट परीक्षा पूढे ढकलून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी अशी मागणी आयआयबीचे संचालक दशरथ पाटील यांनी केली. आयआयबीने आॅनलाइन सराव परीक्षा व व्हिडिओ लेक्चर च्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून सुट्ट्यांच्या काळात तयारी करून घेतली असली तरी ग्रामीण भागातील ७५ ते ८० टक्के विद्यार्थी यापासून वंचित राहिले असल्याचे सांगितले. तसेच परीक्षा पूढे  ढकलल्यास विद्यार्थ्यांना तयारीसाठी वेळ मिळाल्याने मोठा दिलासा मिळेल, अशी खात्री दशरथ पाटील यांनी व्यक्त केली.


कोरोनातून वाचला परंतु भूकबळी मेला...
बंद काळातील हातावरील मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना किमान १०००० हजार रुपये अर्थ सहाय्य
द्या- अँड.संदीप ताजणे
बहुजन समाज पार्टी च्या वतीने मागणी. मुख्यमंत्री महोदयांना निवेदन
जालना प्रतिनिधी :-फुले ,शाहु, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात असे होवू नये म्हणून ज्यांचा ऊदरनिर्वाह दैनंदिन कष्टावर आधारित आहे़ अशा कष्टकरी असंघटीत ( शेतमजूर, बांधकाम करणारे, रिक्षावाले, टक्सीवाले, भटकंती करणारे)मजुरांना
लॉकडाऊनच्या कालावधीत दहा हजार रुपये द्यावेत अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष संदीप ताजणे यांनी मुख्यमंत्री ऊध्दवजी ठाकरे साहेब यांच्याकडे केली आहे. अधिक माहिती अशी की,राज्य सरकार तथा सरकारने ही २१ दिवसा पर्यंत संपूर्ण देशा सह राज्यात लॉक डाऊन घोशीत केले आहे .आपन राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या स्तरावर कोरोना  संसर्गाला रोखण्यासाठी उपाय - योजना आखल्या आहे या राज्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी भूषणावह असुन त्या तंतोतंत राबविल्यास कोरोनाच्या विरोधातील या लढाईमधे आपणास नक्कीच विजय प्राप्त करता रोईल . मात्र ज्या लोकांना आपल्या घरात राहण्याचे आदेश केले आहेत.त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह दररोज काम केल्याशिवाय शक्य नाही आशा कामगार शेतमजूर, हातगाडीवाले बिगारी, टॅक्सीवाले,रिक्षावाले, बांधकाम कामगार, यांच्यासह असंघटित सबंधित क्षेत्रातले असलेली सर्व मजूर पुढील एकवीस दिवसापर्यंत उपासमारीची परिस्थिती ओडल्याशिवाय राहणार नाही. कोरोनाने वाचला आणि भुकेने मेला अशी परिस्थिती आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात येऊ नये.याकरिता वरील सर्व हातावर पोट भरणाऱ्या मजुरांना त्यांच्या कुटुंबांना शासनाने १०,००० हजार रुपये मानधन लॉक डाऊन काळात द्यावे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही व तसेच शासकीय धान्य, वितरण प्रणाली मार्फत वाटायचे धान्य प्रत्येकाच्या घरी पोचल्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी बहुजन समाज पार्टी च्या वतिने या निवेदनात केली आहे.

   बाजारातील गर्दी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाचा नविनऊपाय
जालना/ प्रतिनिधी:- कोरोणाचा विषाणूचा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसाचा लाॕक डाऊन संपूर्ण देशामध्ये लागू केल्यानंतर राज्य सरकार व जालना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जालना शहरातील सर्व नागरिकांना आपापल्या घरातच राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तरीपण जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सूट दिलेली आहे म्हणून बरेच नागरिक अशा वस्तू खरेदीसाठी बाहेर निघत आहेत व गर्दी करताना दिसून येत आहेत. म्हणून जालना शहरातील लतीफ शहा बाजार येथे काही जागरूक नागरिकांनी व प्रतिष्ठित नागरिकांनी मिळून पोलीस प्रशासनासमोर काही मुद्दे मांडले असता त्यातून असा मार्ग काढण्यात आला आहे की, येथील लतिफ शहा बाजार येथील जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने उघडी आहेत परंतु त्यावर गर्दी होऊ नये म्हणून सकाळी ६:०० (सहा) ते दुपारी १२:०० (बारा) वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ५:००(पाच) वाजल्यापासून ते ७:३० (साडेसात) वाजल्या पर्यंत ह्या जीवनावश्यक वस्तूंची गर्दी न करता नागरिकांनी सोशल डिस्टन्स चे भान ठेवून व कोरोना विषाणू बाबतच्या सर्व सूचनांचे पालन करून ह्या वेळेतच खरेदी करावी असे ठरवण्यात आले आहे.यावेळेस साह्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार साहेब, हेडकॉन्स्टेबल कैलाश जवळे, नाईक कॉन्स्टेबल रमेश राठोड, पो.खरात तसेच  अख्तर लिडर, उस्मान नेता, आयुब खान साहब, नगरसेवक अमीर पाशा ई. उपस्थित होते.
जालना जिल्ह्यात बंदनापुर तालुक्यातील उज्जैनपुरी ग्रामस्थांनी                  कुंपण टाकून गावचा रस्ता केला बंद.
बदनापूर प्रतिनिधी:-कोरोनाची दहशत ही जगभर पसरली आहे.जालना जिल्ह्यात बंदनापुर तालुक्यातील
उज्जैनपुरी येथे येत्या दोन दिवसांत येऊन ठेपलेली यात्रा अखेर रोकडोबा महाराज यात्रा एक मताने ठराव पास करुन रद्द करण्यात आली आहे.बदनापुर तालुक्यातील उज्जैनपुरी ग्रामस्थांनी कुंपण टाकून गावचा रस्ता बंद केला आहे.  बाहेरच्या लोकांना गावात बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे गावातील लोकांनी बाहेर जाण्यास आणि बाहेरील व्यक्तींनी आत येण्यास मज्जाव केला आहे.कोरोना पार्श्वभूमीवर उज्जैनपुरीत बाहेरुन येणार्यास केली गाव बंदी... एक मताने ठराव पास करून केली गाव बंदी. रोकडोबा महाराज यात्रा रद्द करुन  गावकऱ्यांकडून बंदी केली कोरोना व्हायरस पार्श्वभूमीवर उज्जैनपुरी गावात बाहेरून कुणीही येनार नाही गावातून बाहेर जायचे नाही रोज गावात दवंडी पिठवली जात आहे.. नियमांचे उल्लंघन केल्यास कार्यवाई करण्यात येईल, याप्रकारे ग्रामसेवक सरपंच गावकरी मंडळी रोज त्याचा परिने कोरोना जन जागृती  करून राहून गाव बंदी केली जात आहे. या गावांत रोकडोबा महाराज यात्रा निमित्त पुणे मुंबई या ठिकाणी वरुन भाविक दर्शनासाठी येतात कोरोनाचा पार्श्वभूमी भाविक गावात येऊ नाही यासाठी गाव बंदी केली आहे  असे सरपंच कैलास शिदे जगनाथ शिदे  विष्णू शिदे मलका र्मालकर्जुन गालट बाबासाहेब शिदे  भिका जाधव बाबुराव शिंदे प्रदीप मुळे सुरेश मुळे  यासह   गावकऱ्यांनी सांगितले आहे.



        वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आव्हान.
बदनापूर प्रतिनिधी :- सध्या संपूर्ण जगभरात
 कोरोना या जीवघेण्या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असून धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था, व गर्दीची ठिकाणे बंद केली जात आहेत.याच धर्तीवर कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बदनापूर तालुक्यातील सर्व जनतेला आव्हान करण्यात येत आहे की सध्या जगभर कोरणा व्ह्यारस ने जगभर धुमाकूळ घातलाय व आपल्या देशात पण कोरणा व्हायरस चे रुग्ण आढळले आहेत.तरी आपण सर्वांनी आपली आणि परिवाराची काळजी घ्यावी .व देशाचे पंतप्रधान यांच्या आज्ञाचे पालन करावे . कुणीही घराबाहेर जाऊ नये येत्या २१ दिवस आपण घरातच राहावे .असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुका संघटक हरीश बोर्डे यांनी केले आहे.


         बदनापूर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आव्हान.
बदनापूर प्रतिनिधी :- सध्या संपूर्ण जगभरात कोरोना या जीवघेण्या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असून धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था, व गर्दीची ठिकाणे बंद केली जात आहेत.याच धर्तीवर कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बदनापूर तालुक्यातील सर्व जनतेला आव्हान करण्यात येत आहे की सध्या जगभर कोरणा व्ह्यारस ने जगभर धुमाकूळ घातलाय व आपल्या देशात पण कोरणा व्हायरस चे रुग्ण आढळले आहेत.तरी आपण सर्वांनी आपली आणि परिवाराची काळजी घ्यावी .व देशाचे पंतप्रधान यांच्या आज्ञाचे पालन करावे . कुणीही घराबाहेर जाऊ नये येत्या २१ दिवस आपण घरातच राहावे .असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुका संघटक हरीश बोर्डे यांनी केले आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...