बुधवार, १३ मे, २०२०

मजुरांच्या हाताला काम देऊन अर्थचक्र गतीमान करण्यासाठी जालना जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील कारखाने सुरु करावेत - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आवाहन



जालना,प्रतिनिधी :- जिल्ह्यातील मजुरांना रोजगार मिळून अर्थचक्र गतीमान होण्याच्यायादृष्टीने जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील कारखाने सोशल डिस्टंन्स व आवश्यक ते नियम पाळुन सुरु करावेत असे आवाहन करत उद्योग सुरु करण्यासाठी प्रशासनामार्फत संपुर्ण सहकार्य करण्यात येत असुन विनाकारण कोणावरही गुन्हा नोंद होणार नसल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी कळविले आहे.
            कोरोना विषाणुच्या अनुषंगाने राज्य शासनाने लॉकडाऊन घोषित केले आहे. या संदर्भात लॉकडाऊनचे पालन करत जालना जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणाऱ्या आस्थापना, दुकाने, तसेच इतर बाबींना मर्यादेच्या अधिन राहून परवानगी दिली आहे. जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम मिळावे यादृष्टीकोनातुन ग्रामीण व शहरी भागातील औद्योगिक वसाहतीमधील कारखाने सुरु करण्यास यापूर्वीच परवानगी दिली असुन कारखानदारांनी सोशल डिस्टन्सचे नियम पाळुन  कारखाने सुरु करावेत.  मजुरांना कोरोना विषाणुची बाधा होऊ नये यासाठी सुरक्षिततेच्यादृष्टीने कारखान्यांमध्ये मजुरांसाठी मास्क, साबण, सॅनिटायजर आदी साहित्य उपलब्ध करुन द्यावे. मजुरांची वेळा्वेळी डॉक्टरांमार्फत तपासनी करून घ्यावी. मजुरांचे समुपदेशन करावे.  विषाणूबाधा अधिक प्रमाणात झाल्यास नाईलाजास्तव काम बंद करावे लागेल. मजुरांच्या हाताला काम देऊन अर्थचक्र अधिक गतीमान करण्यासाठी कारखाने सुरु करण्याचे आवाहन करत यामध्ये काही अडचण आल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा,असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी केले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासोबतच दिला जातोय पौष्टीक आहार.


जालना,प्रतिनिधी :- जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य ते औषधोपचार करण्याबरोबरच या रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढून रुग्ण लवकर बरे व्हावेत यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या सुचनेनुसार या रुग्णांना पौष्टीक आहारसुद्धा देण्यात येत असल्याची माहिती आहारतज्ज्ञ श्रीमती व्ही.व्ही.पिंगळे यांनी दिली आहे.जालना येथील जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.  या रुग्णांना आवश्यक त्या औषधोपचाराबरोबरच त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढविणे आवश्यक असल्याने या रुग्णांसाठी संतुलित आहाराचा दिनक्रम ठरविण्यात आला आहे.  रुग्णांना दोन वेळेत वरण, भात, भाजी, पोळी याबरोबरच रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यामध्ये मदत करणारे उकडलेले अंडे, गुळ, शेंगदाणे, सोयाबीन वडी, दुध याबरोबरच प्रोटीनचा भरपुर समावेश असलेल्या थ्रेप्टीन बिस्कीटांचाही या रुग्णांच्या आहारामध्ये समावेश करण्यात आला आहे.तसेच ज्यांना कोरोना संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांनासुद्धा याच प्रकारचा संतुलित व पौष्टीक आहार देण्यात येत असल्याची माहिती श्रीमती पिंगळे यांनी दिली.

महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत कापूस खरेदी केंद्र सुरू करा - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर


परतुर /प्रतिनिधी:- प्रशांत वाकळे

येत्या पंधरा दिवसानंतर शेतकरी पेरणी साठी सज्ज झालेला असेल अशावेळी कापूस विक्री झालेली नसेल तर शेतकऱ्यावर बी बियाणे खते कीटकनाशके इत्यादी खरेदी करण्यासाठी सावकाराकडे जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही त्यामुळे महाराष्ट्र सरकारने कापूस खरेदी करण्यासाठी सरकारच्या अखत्यारीत असणारी सर्व कापूस खरेदी केंद्र सुरू करा अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे कें

केंद्र सरकारने पणन महासंघाच्या वतीने सीसीआय मार्फत शेतकऱ्यांची कापूस खरेदी सुरू केली असली तरीदेखील सीसीआय अंतर्गत कापुस खरेदी केंद्र हे तालुक्याला एका ठिकाणी आहे. तालुक्‍यात साधारणता शंभरपेक्षा अधिक गावे आहेत त्यामुळे सीसीआयचा कापूस खरेदी करण्यासाठी प्रचंड वेळ लागतो आहे सी सी आय अंतर्गत खरेदी केंद्रावर एका दिवसात केवळ 35 ते 40 शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जात आहे आणि नोंदणी मात्र सरासरी 2500 ते 3000 शेतकऱ्यांनी केलेली आहे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात 5473 शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केली आहे हा आकडा लक्षात घेता सद्यस्थितीतील गतीने कापूस खरेदी सुरू राहिली तर आणखी दोन ते तीन महिने सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी लागू शकतात असेही लोणीकर यांनी  मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस  कृषि मंत्री, सहकार व पणनमंत्री यांना दिलेल्या पात्रात म्हटले आहे 

दिवसभरात कमीत कमी दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करता येईल अशी व्यवस्था करावी. कापूस खरेदी करत असताना एफएक्यू किंवा नॉन एफएक्यू अशी विभागणी न करता सरसकट कापूस खरेदी करण्यात यावा त्यासाठी आवश्यक असणारे ग्रेडर किंवा लागणारे मनुष्यबळ तात्काळ उपलब्ध करून द्यावे जेणेकरून पेरणीपूर्वी शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करता येईल अशी व्यवस्था करण्यात यावी. लवकरात लवकर कापूस खरेदी करण्यासाठी कापूस खरेदी केंद्र वाढवणे हा एकमेव पर्याय असून शासन लवकरात लवकर याबाबत निर्णय घेईल अशी अपेक्षा करतो असेही लोणीकर यांनी पत्रात म्हटले आहे

तालुका स्तरावर विलगीकरण कक्ष उभारण्याची मागणी


परतुर,प्रतिनिधी /प्रशांत वाकळे :- कोरोना परिस्थिती मध्ये बाहे राज्यातुन,जिल्हातुन गावाकडे येणाऱ्या नागरीकांसाठी तालूकास्तरावर विलगीकरण कक्ष उभारण्यात यावा असी मागणी सरपंच संघटनेच्या वतीने उपविभागीय अधीकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली .बाहेर जिल्हातुन नागरिक आप आपल्या गावी येत आहे.तर कोनी हे   नाशिक मुबई ओरंगाबाद पुणे जिल्हातुन येत आहे हे जिल्हे रेड झोन मध्ये आहे त्यामुळे नागरिकांमध्थे भितीचे वातावरण निर्मान झाले आहे जे बाहेर जिल्हातुन किंवा राज्यातुन येत आहे ते ग्रामपंचायत ने तयार केलेल्या विलगीकरण कक्षात थांबत नाही शाशनाने दीलेल्या नियमांचे पालन करत नसल्यामुळे गावातील नागरीकांमध्ये एक घबराटीचे वातावर निर्माण झाले त्यामुळे प्रशाशनाने तालुकास्तरावर विलगीकरण कक्ष उभारून  बाहेरून आलेल्या नागरिकांना 14 दिवस विलगिकरण कक्षात ठेवुन मग त्याची तपासणी करून त्याना आपल्या गावी पाठवावे जेने करून गावातील नागरिकांच्या मनातील शंका ही दूर होईल ग्रामीण भागात प्रतिबंधक समिती स्थापण करण्यात आली आहे पण काम करण्यास कोणीही तयार नाही या सर्व परिस्तीतीचा भार सध्दा सरपंच यांच्या वर येवुन ठेपला आहे  स्थापन केलेल्या समितीमध्ये सरपंचाचे स्थान व नियत्रण ठेवण्याचे अधिकार नसल्याने ग्रामपंचायत पातळीवर सरपंच या नात्याने अनेक अडचणी निर्मान होत आहे म्हणुन संबधित स्थापण समिती व पोलीस प्रशाशन यांना आदेशीत करावे.परतुर तालुक्यातील सर्व सरपंच कोरोनाचा सामणा करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे सर्व परिस्थीती पाहता कोरोना विषानुचा प्रार्दुरभाव ग्रामीण भागात झाल्यास सरपंच किंवा ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही यांची नोंद संबंधीत अधीकाऱ्यानी घ्यावीकोरोनाचा शिरकाव जर ग्रामीण भागात झाला तर रोकने शक्य नाही अशा ईशारा शेवटी देण्यात आला यावेळीसरपंच संघटनेचे उपध्यक्ष शत्रुघ्न कनसे,ता सचीवगोपाल मटल,बाबासाहेब गाडगे,संपत टकले,ओम बोरकर,बापुराव दुगाणे हे उपस्तीत होते.

सोशल डिस्टन्स ठेवत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत नवदांपत्य विवाह बंधनात.


परतूर,प्रतिनिधी :- इम्रान कुरेशी

लॉकडाऊनच्या काळात गर्दी करण्यास मनाई असल्याने विवाह सोहळा करणाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली असून अडचन निर्माण झाली मात्र ठरलेले लग्न आणखी पुढे ढकलने शक्य नसल्याने परतुर तालुक्यातील वाटुर येथे आज मंगळवारी १२ ठरलेल्या दिवशी माक्सचा वापर करुन तसेच सोशल डिस्टन्स ठेवत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शेतात विवाह संपन्न झाला परतुर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते माणिकराव आढे यांचे चिरंजीव शुभम व उखळी शिवनगर(ता.जालना)येथील रोहिदास राठोड यांची कन्या आश्विनी यांचा शुभ विवाह मोठ्या थाटात करण्याचे ठरले होते.परंतु, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे वधू व वरा कडील मंडळींनी आपसात चर्चा करून आज हा विवाह वर पिता माणिकराव आढे यांच्या शेतात लॉकडाऊनचे सर्व‌ नियमांचे शोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून नवरदेव व नवरीसाठी माक्स चा वापर करुन संपन्न झाला

सोशल मीडिया वर नव दाम्पंत्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे

माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर व राहुल लोणीकर यांनी नव दाम्पंत्याना फोन करून शुभेच्छा दिल्या…

आय.जे.ए. च्या परतूर तालुका अध्यक्षपदी इम्रान कुरेशी*


जालना,प्रतिनिधी :- इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या परतूर तालुका अध्यक्षपदी मराठवाडा केसरी व आवाज महाराष्ट्र वेब न्यूजचे प्रतिनिधी इम्रान कुरैशी यांची नियुक्ती जिल्हाअध्यक्ष असलम कुरेशी यांनी केली आहे.इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सिराज अहमद कुरेशी व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतीश मधुकरराव महामुनी यांच्या सहमतीने जिल्हा अध्यक्ष असलम कुरेशी यांनी ही नियुक्ती केली.इम्रान कुरैशी यांना दिलेल्या नियुक्ती पत्रित म्हटले आहे की इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनमध्ये ग्रामीण व लेकर शहराच्या पत्रकारांना संघटनेशी जोड़ून संघटना मजबूत करण्याचे कार्य करावे. तसेच पत्रकारावर होणा-या अन्याया विरोधात आवाज उठवण्यासाठी. सदैव तत्पर रहावे. इम्रान कुरैशी यांच्या नियुक्तीबद्दल तरंग कांबळे (हॅलो रिपोर्टर), नजीर कुरैशी (लोकमत), शाहादेव मोरे (शासन आपल्या दारी), रामेश्वर उबाळे (आत्ताच एक्सप्रेस), चंद्रकांत हकदार (हॅलो रिपोर्टर), मुनीर खान पठाण (पोलीस नवरंग), आर्या कांबळे (शासन आपल्या दारी), सुधाकर जाधव (MKN मराठी), सय्यद वाजेद (राज्यवार्ता), सय्यद अकबर (दिव्यमराठी), पांडूरंग शेजुळ (गाव माझा) आदींनी त्यांचे अभिनंदन केले.


महाराष्ट्र राज्य चे नगर विकास मंत्री तनपूरे साहेब यांच्या सोबत आमदार कैलास गोरीयंटल मा नगर अध्यक्ष बबलू चौधरी राष्टवादी चे शहर अध्यक्ष नंदकिशोर जांगडे काँग्रेस चे शहर अध्यक्ष शेख महेमूद राजेन्द्र जाधव राम सावंत राजेन्द्र राख अरुण मगरे राज स्वामी विजय कांबळे

लॉकडाऊनमुळे गावातच अडकलेल्या मुंबईच्या लोकांना मास्क व सॅनेटायझर व जाण्याची परवानगी मिळवून देऊन मुंबईला रवाना केले

 

परतुर,प्रतिनिधी/प्रशांत वाकळे
तालुक्यातील दैठणा खु या गावी मुंबईवरून  काही कुटुंबे लग्नकार्यासाठी व इतर कामानिमित्त आले असता कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे त्याना मुंबई परत जाता आले नाही  त्यामुळे त्याना गावातच रहावे लागले  त्यातच मुस्लिम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना होता त्याना आपल्या घरी जाण्याची ओढ लागली होती आणि लॉकडाऊन वाढत जात होता मात्र 45 दिवसानंतर आता सरकारने काही नियम तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या लोकांना आपल्या गावी परत जाण्यासाठी सरकारने काही अटी आणि शर्ती सोयी उपलब्ध केल्या मात्र याचा लाभ घेण्यासाठी गावात सोयी उपलब्ध नव्हत्या कुठे जाऊन परवाना काढावे ही एक चिंता पडली होती पण याच गावात राहणारा सामाजिक कार्यकर्ता कैलास भदर्गे या समाज कार्यकर्त्यांनी पुढे येऊन अडकलेल्या लोकांसाठी जाण्यासाठी पास काडून देण्याचे काम केले व मेडिकल प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मदत केली आणि हे काम त्यांनी विनामूल्य एक हात मदतीचा म्हणून हे काम करून दिले, शासनाच्या नियमाप्रमाणे व टप्याटप्याने ज्या ,ज्या लोकांचे प्रमाणपत्र व जाण्याची पास तयार झाली त्या त्या लोकांना गावातून मुंबईकडे पाठवण्यात येत आहे व मुंबई कडे जाणारे लोकांना मोफत मास्क व सॅनेटाईजर भेट म्हणून या कार्यकर्त्यांनी दिले आहे ज्या लोकांना मुंबई कडे जाण्याची कागदपत्रे व जाण्याचा परवाना काडून देऊन मदत केली त्या सर्व कुटुंबियांनी कैलास भदर्गे या समाज कार्यकर्त्याचे आभार मानले त्यावेळी बोलताना असे कार्य समाजात  सर्वत्र जणांनी केले पाहिजे एकमेकांना संकटकाळात गरजू लोकांना  मदत करून महामारीच्या या संकटातुन वाचवण्याचा प्रयत्न  केला पाहिजे म्हणून समाजात एक आदर्श निर्माण व्हावा यामुळेच हे पाउल उचलले असे समाजकार्यकर्ता  कैलास भदर्गे यांनी मत व्यक्त केले

लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासन दिव्यांग वृध्द निराधार यांचे वाली होतील काय? - चंपत डाकोरे पाटिल कुंचेलीकर


नांदेड प्रतिनिधी :- ज्या दिव्यांग बांधवाना चालता येत नाहि, जगात काय चाले ते दिसत नाहि, जगातील काही  ऐकु येत नाहि दिव्यांची हक्क मिळावा म्हणुन  बोलता येत नाहि पण देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान देऊन अनेक लोकप्रतिनिधी यांना सर्वोच्च पदावर मानसन्मान खासदार आमदार सर्व  पदासाठी मते देऊन मोठे केले पण सतेची खुर्ची मिळताच सर्व सामान्य दिनदुबळ्या दिव्यांग, वृध्द निराधार यांच्या कडे कोणताही लोकप्रतिनिधी चे लक्ष दिसत नाहि. 

        अशा जागतिक करोना संकटकाळी पालकमंत्री, खासदार, आमदार, जी.प. अध्यक्ष, सर्व सभापती जी. प. सदस्य, प. स. सदस्य सर्व कमिटीचे अध्यक्ष यांनी जे मदत ज्या दिव्यांग. वृध्द निराधार याना करणे गरजेचे असताना आज घडीला उपेक्षित समाजाला मदत करण्याऐवजी आपले कार्यकर्ते संभाळून ठेवण्यासाठी मदत कमी फोटो काढून प्रसिध्दी जास्त असा  प्रकार  पाहायला मिळत आहे. 

मते घेताना जशी चुरस लागते दिव्यांग आहे त्यांना चालता येत नाहि गाडीवर घेऊन या मते करुन घरी सोडा व ज्यांना दिसत नाहि त्यांचे मतदान विश्वासु व्यक्तीकडून करुन सतेत जाताना दिव्यांग वृध्द निराधार यांची आठवण होते पण अशा महामारी संकटकाळी लोकप्रतिनिधीना का? आठवण येत नाहि असा सवाल डाकोरे पाटिल यांनी केले 

       सर्व सामान्य जनतेसारखे जीवन स्शबळावर जगता यावे या ऊध्देशाने शासनाने दिव्यांग हक्क कायदा 2016 य्या नियमानुसार ग्रामपंचायत,  नगरपंचायत नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हापरिषद महानगरपालिका येथील दिव्यांग राखिव 5 टक्के स्वनिधीे निधि अधिक चोदावा वित विकास निधि हा दिव्यांग कायदा 2016 व शासन निर्णय 1 ते 6 निर्णय व मा ऊपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब पंचायत विभाग जिल्हा परिषद नांदेड  यांचे 27 वेळा लेखी आदेश व वारंवार आदेश देऊनहि दिव्याग बांधवाना त्यांचा हक्क व न्याय का मिळत नाहि? वरिष्ठाचे आदेश कनिष्ठ का मानत नाहीत ?

आदेशाची अंमलबजावणी न करणार्‍या अधिकारी यांच्या वर कार्यवाही का केलि जात नाही? 

अशा संकटकाळी दिव्यांग निधी पाच टक्के सर्व स्थानिक पातळीवर वाटप करून न्याय मिळावा म्हणुन अनेक दिव्यांग संघटना व दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यानी सर्व गटविकास अधिकारी, समाजकल्याण अधिकारी. मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हाअधिकारी  दिव्यांग आयुक्त पुणे. सामाजिक न्याय मंञी,  मुख्यमंत्री यांना आपले सरकार पोर्टलवर निवेदन देऊन  व वर्तमानपत्रात.आँनलाईन बातम्या चॅनलवर प्रसारित करून सुध्दा नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी केंव्हा प्रशासन दखल घेतली नाहि पण हिंगोली चे खासदार यांनी दखल घेऊन प्रशासन दिव्यांग निधी  देण्याचे आदेश दिले नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी का दखल घेत नाहीत? दिव्यांग हक्क मिळावा म्हणून नांदेड जिल्ह्यात प्रशासनास जागे करण्यासाठी 58 अनेक आंदोलन केले गेले पण लोकप्रतिनिधी आंदोलनाची दखल  का घेतली नाहि?  अशा प्रतिनिधीला मतदान वेळीच आठवण येते काय?  

        अशा संकटकाळी दिव्यांग वृध्द निराधार याना खासदार, आमदार त्यांचा दिव्यांग निधी व स्थानिक निधीचा हक्क देऊन लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दिव्यांगाचे वाली होतील काय असा सवाल  दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी  प्रसिद्ध पञकाद्वारे दिला .

परतूर नगर परिषदेचा काळा बाजार वर्ग (4)च्या फायरमान कर्मचाऱ्याला स्वछता निरीक्षक
परतूर प्रतिनिधी/इम्रान कुरेशी
    परतूर नगर परिषदेचा काळा बाजार फायरमन रवी सुधाकर देशपांडे हे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असतांना बे कायदेशीर लालचिपोटी जाणून बोजुन कार्यालयीन अधीक्षक बी एस चव्हाण यांनी स्वतःच्या पदाचा गैर वापर करून नगर परिषद व जनतेची दिशा भूल केली आहे व तसेच फायरमन रवी देशपांडे यांच्या कडे कोणतीच स्वछता निरीक्षक हे पदवी नसतांना व वर्ग (4 )चे कर्मचारी असतांना शासनाच्या नियमाप्रमाणे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ही पदविका देता येत नाही तरी पण लालचिपोटी बि. एस चव्हाण यांनी आपल्या पदाचा दूर उपयोग करून शासनाच्या ताळु वरची मलई खाण्याचा काम बी. एस चव्हाण यांनी केले आहे..

व तसेच काही दिवसांपूर्वी चव्हाण यांनी परतूर नगर परिषदेचे नामंतर विभाग प्रमुख असून त्याचा गैर वापर करून कोरे नामंतर आदेश देण्याचा काम केले होते व त्या नंतर त्याचे हे सर्व काही प्रकरण गांव माझा व आवाज महाराष्ट्र ह्या चॅनल ला बातमी आली होती व तक्रार दार यांना काही राजकीय पक्ष नेते यांनी दबाव टाकून हे प्रकरण दाबण्यात आले होते
परतूर नगर परिषदे मध्ये वर्ग 2 चे व  वर्ग 3 चे पुरासे अधिकारी असताना सुद्धा चव्हाण यांनी जाणून बुजून लालचिपोटी संगमत करून अत्यावश्यक सेवेतील फायरमन कर्मचारी ची नियुक्ती केली मिळाले ल्या माहिती अनुसार काही वर्ग 3 च्या कर्मचारी उपस्थित व पुराशे संख्या बळ असताना त्याला कोणतेही पद न देता वर्ग 4 च्या कर्मचारी रवी देशपांडे यांना हे पद देण्यात आले आहे व शासनच्या नियमानुसार वर्ग 3 च्या कर्मचारी यांना कायम तोंडी सौरूपी देता येते 
असल्या बे जबाब दार शासनाच्या नियम डावलून आपल्या पदाचा गैर वापर करून असल्या नियुक्ती करणाऱ्या कार्यालयीन अधीक्षक बी. एस चव्हाण यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...