गुरुवार, ३० एप्रिल, २०२०


नांदेड च्या पहिला कोरोना बाधीत रुग्णाचा अहवाल निगेटीव्ह तरीही मृत्यूने गाठलेच
नांदेडमधील ६४ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान अंत
नांदेड( भगवान कांबळे) :  जवळपास महिनाभर कोरोनामुक्त असलेल्या नांदेड शहरात  पिरबुऱ्हाणनगर येथील ६४ वर्षीय नागरिक कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. या बाधित नागरिकाला इतरही विविध आजार होते. या इतर गंभीर आजाराने या रुग्णाचा पिच्छा सोडला नाही. कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही गुरुवारी दुपारी दीड वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्च चिकित्सक डॉ़ निळकंठ भोसीकर यांनी सांगण्यात आले.
या ६४ वर्षीय रुग्णाच्या माध्यमातून कोरोनाने नांदेडमध्ये शिरकाव केला होता. त्यानंतर  पिरबु-हाणनगर परिसर प्रशासनाने पुर्णत: सील करीत तीन कि.मी. परिसर कंटेनमेन्ट झोन म्हणून घोषित केला होता. २०० आरोग्य कर्मचा-या मार्फत ३ कि.मी. परिसरातील ५० ते ६० हजार नागरिकांच्या आरोग्याची तपासणीही सुरु करण्यात आली.  

कोणताही प्रवास न केलेल्या या ६४ वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग नेमका कोणापासून झाला याचा शोध लावण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे होते. कोरोना बाधित व्यक्तीचे कुटुंबीय सदर व्यक्ती गेल्या दोन महिन्यापासून घरामध्येच असल्याचे सांगत होते. या बाधितास मधुमेह, अस्थमा आदी आजार होते. या आजाराचे उपचार  केले जात होते. मागील आठ दिवसात त्यांनी शहरातील पिरबु-हाणनगर येथे आणि सहयोग नगर येथील एका रुग्णालयात उपचारही घेतले होते.  त्यानंतर प्रकृती बिघडल्याने ते पुन्हा खाजगी रुग्णालयात गेले होते. मात्र, त्यांना सदर खाजगी रुग्णालयाने शासकिय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार २० एप्रिल रोजी ते नांदेड येथील शासकिय रुग्णालयात दाखल झाले. येथे त्यांचा तातडीने स्वॅब घेण्यात आला. याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर  सदर व्यक्ती   कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले होते.  त्यानंतर सदर पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घरातील जवळपास १४ व्यक्तींना प्रशासनाच्या वतीने क्वारंटाईन करण्यात आले होते.  त्यानंतर या सर्वांचे स्वॅब तपासणी अहवालही निगेटीव्ह आले. पाठोपाठ या रुग्णाचाही पहिला अहवाल निगेटीव्ह आल्याने नांदेडकरांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र इतर आजाराशी झुंज देत असतानाच गुरुवारी दुपारी या ६४ वर्षीय व्यक्तीचे उपचारादरम्यान निधन झाले.


      कालावधी लॉकडाऊनचा… मासळी उत्पादनाचा…!
       लॉकडाऊन कालावधीत 85.64 क्विंटल उत्पादन
शारिरीक अंतराच्या नियमाचे पालन करीत केली मासेमारी
मत्स्यव्यवसाय विकास विभागाने दिल्या 72 पासेस

बुलडाणा,प्रतिनिधी :-दि. 30 : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. शारिरीक अंतर पाळण्याच्या नियमांची वैयक्तिक आयुष्यातही अंमलबजावणी होत आहे. कोरोनाला थोपविण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे अनेक व्यवसाय बंद झाले. त्यामध्ये मासेमारी व्यवसायाचाही समावेश होता. मात्र मत्स्यव्यवसाय विभागाने लॉकडाऊनमधील नियमांचे पालन करीत मच्छिमार सहकारी संस्थांना मासेमारी करण्याची परवानगी दिली. या निर्णयाचा सकारात्मक परिणाम झाला असून कालावधी जरी लॉकडाऊनचा असला तरी मासळी उत्पादनाचा असल्याचा प्रत्यय त्यामुळे येत आहे.बुलडाणा जिल्ह्यात  27 मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी 30 एप्रिल 2020 पर्यंत  तलाव अथवा जलाशयांच्या ठिकाणी मासेमारी करून 85.46 क्विंटल मत्स्योत्पादन घेतले आहे. यावेळी मच्छिमारांनी लॉकडाऊनमधील पाळावयाच्या नियमांचे पालन केले आहे. उत्पादित केलेल्या मासळीची विक्रीही करण्यात आली आहे. तसेच मत्स्यव्यवसाय विभागाच्या जिल्हा कार्यालयाने मासळी पकडणे, मासळीची वाहतूक करणे व विक्री करण्यासाठी 72 पासेस दिल्या आहेत. त्यामुळे मासेमारी करताना मच्छिमार संस्थांना सहजता आली.  लॉकडाऊन कालावधीत 23 मार्च ते आज 30 एप्रिल 2020 पर्यंत जिल्ह्यातील एकूण 100 तलाव अथवा जलाशयांमध्ये मच्छीमार सहकारी संस्था ठेकेदारांपैकी 27 मच्छिमार सहकारी संस्थांनी मासळीचे उत्पादन केले आहे.लॉकडाऊनच्या कालावधीत मासेमारी उत्पादन, वाहतूक व विक्री सुरू असल्यामुळे रोजगाररही उपलब्ध झाले आहेत. मत्स्यव्यवसाय विभागाने केलेल्या कार्यवाहीमुळे रोजगार उपलब्ध होवून मासळीचे उत्पादनही घेण्यात आले. असा दुहेरी उद्देश यशस्वी  झाला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनानेही घेतलेले महत्वाचे निर्णयही कारणीभूत ठरले आहे. मासेमारी करताना तलाव, जलाशयांजवळ शारिरीक अंतर, तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधण्यात आला. तसेच दाटीवाटीने गर्दी न करता मासे विक्री करण्यात आली.

असे झाले तलाव निहाय मासळीचे उत्पादन जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते आज 30 एप्रिल पर्यंत विविध तलावांमधून मासळीचे सहकारी मच्छीमार संस्थांनी घेतलेले उत्पादन पुढीलप्रमाणे आहे : मांडवा ता. सिं.राजा : 2.20 क्विंटल, कोराडी ता. मेहकर :  2.53, धनवटपूर ता. मेहकर :  2.77, धानोरी ता. चिखली  :  1.10, लव्हाळा ता. मेहकर : 0.80 क्विं, नळगंगा ता. मोताळा : 12 , दहीद ता. बुलडाणा : 1, पलढग ता. मोताळा : 1.50, व्याघ्रा ता. मोताळा : 1,  धामणगांव बढे ता. मोताळा :  4, पिंप्री गवळी ता. खामगांव : 3.59, गारडगांव ता. खामगांव : 3.50, कंडारी  ता. नांदुरा : 4.50, लांजुड ता. खामगांव : 3.63, पिंपळगांव नाथ ता. मोताळा : 3, येळगांव ता. बुलडाणा : 10, धामणगांव देशमुख  ता. मोताळा : 3, गंधारी ता. लोणार : 1.17, शिवणी जाट ता. लोणार : 0.70, पिंपळनेर ता. लोणार 2.50, झरी ता. बुलडाणा : 3.50, टाकळी ता. खामगांव : 4.90, बोरजवळा ता. खामगांव : 4.10, ब्राम्हणवाडा ता. चिखली : 3, किन्ही मोहदरी ता. चिखली : 1, राजुरा ता. जळगांव जामोद :  3 आणि खळेगांव ता. लोणार : 1.65 क्विंटल उत्पादन घेण्यात आले आहे.  अशाप्रकारे एकूण 85.64 क्विंटल मासळी उत्पादन झाले आहे.
                                                            


  आमदार कैलास गोरंट्याल यांच्या वतीने अन्नछत्र सेवा सुरू.
                  गोर गरीबांसाठी कांग्रेस पार्टी सदैव 
            जनतेच्या सेवेसाठी उभी - कैलास गोरंट्याल


जालना,प्रतिनिधी:-कोरोना महा मारिने जगात थैमान घातल्यामुळे सर्वत्र लोक डाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत गरीब लोकांना  हातावरील मजुरांना घराच्या बाहेर पडणे मुश्कील झाले आहे हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे अशा परिस्थितीत आमदार कैलास गोरंट्याल यांनी पुढाकार घेऊन अन्नछत्रसेवा सुरू केली आहे.राज्यात कोरोना या संसंर्गजन्य आजाराच्या पार्श्‍वभुमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग व्यवसायासह दैनंदिन कामकाज बंद पडलेले आहेत. त्यामुळे दररोज मोलमजुरी करून आपल्यासह कुटूंबाचा उदनिर्वाह चालविणार्‍या कामगार, मजुर, छोटे-छोटे व्यवसायीक अत्यंत अडचणीत सापडले आहेत. अशा सर्व गरजु लोकांना अन्नाचा पुरवठा करण्यासाठी जालन्याचे आ.कैलास गोरंट्याल आणि नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल यांनी पुढाकार घेत मातोश्री कै. भुदेवी किसनराव गोरंट्याल अन्नछत्रास  सोमवार पासून प्रारंभ केला आहे.मंगळबाजार भागातील मोतीबंगला परिसरात या उपक्रमाचा शुभारंभ आ. कैलास गोरंट्याल यांच्या प्रमुख उपस्थितीत जालन्याचे उद्योजक श्री. नरेंद्र अग्रवाल यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी जालना शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राम सावंत, नगरसेवक महाविर ढक्का, जगदिश भरतिया, रमेश गौरक्षक, संजय भगत, योगेश भोरे, डॉ. विशाल धानुरे, गणेश चौधरी, गोपाल चित्राल, किशोर गरदास,विनोद यादव , योगेश पाटील, दीपक जाधव , पांडुरंग शिंदे , आदी टीम अहोरात्र मेहनत घेऊन करत आहे.
याप्रसंगी बोलतांना आ. गोरंट्याल म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर प्रांरभी राज्यशासनाने लागू केलेली संचारबंदी आणि त्यानंतर केंद्र शासनाने लॉकडाऊनचे दिलेले आदेश यामुळे जालना शहरातील विविध उद्योग आणि कारखाने बंद पडले असून बांधकामासह छोटे व्यवसाय देखील बंद पडलेले आहे. त्यामुळे दररोज मोल मजुरी करून आपला आणि कुटूंबाचा उदनिर्वाह भागविणार्‍या गोर-गरीबांसमोर दररोजच्या अन्नपाण्याचा प्रश्‍न कठीण होऊन बसला आहे. मोबाईल व्हॅनची सुद्धा सुविधा देण्यात आली आहे यामुळे लागेल तेथे जेवण त्वरित पोहचण्याची सुविधा केली जाते.रोज 2 हजार ते अडीच हजार डब्बे देण्यात येणार असल्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.
आपण संचारबंदी, लॉकडाऊन कालावधीत शहरातील प्रत्येक भागात गोर-गरीब कुटूंबाना नगरसेवक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून धान्य वाटपासह जालना शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे तयार अन्नाचे पाकीटे वाटप करून गरजुंची भुक भागविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू येत्या 3 मे पर्यंत लॉकडाऊनचे आदेश असल्यामुळे गरीब कुटूंबासमोरील अन्नधान्याचे संकट अधिकच बिकट असल्याने आपल्या मातोश्री कै. श्रीमती भुदेवी किसनराव गोरंट्याल अन्नछत्राच्या माध्यमातून गरीबांच्या अन्नाची गरज भागविण्याचा प्रयत्न केला जात असून या अन्नछत्राच्या माध्यमातून दररोज अडीच हजार अन्नाचे पाकीट नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शहरातील गरजुपर्यंत पोहचविले जाणार असल्याचे सांगून आ. गोरंट्याल म्हणाले की, जालना शहराच्या बायपास रस्त्यावरून पाई जाणार्‍या लोकांची अन्नपाण्याची व्यवस्था करण्याच्या lसुचना देखील आ. गोरंटयाल यांनी उपस्थित नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना केला आहेत.

एनएबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळा असलेले स्वारातीम हे भारतातील पहिले विद्यापीठ - पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण

नांदेड (भगवान कांबळे):-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे नव्यानेच कोरोना नमुना स्वॅब तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आलेली आहे. या प्रयोगशाळेत एनएबीएल (नॅशनलअॅक्रेडीयशन बोर्ड ऑफ टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज) मूल्यांकन होऊन मिळवणारे हे भारतातील पहिलेच अकृषी विद्यापीठ आहे. या त्यांच्या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले आणि प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ.गजानन झोरे यांच्यासह त्यांच्या सर्व टीमचे मी अभिनंदन करतो, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.
त्यांनी आज दि.२९ एप्रिल रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील कोरोना स्वॅब नमुना तपासणी प्रयोगशाळेस भेट देऊन प्रयोगशाळेची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत आ.अमरनाथ राजूरकर, आ.मोहनराव हंबर्डे, कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे, नवोपक्रम, नवसंशोधन आणि सहकार्य मंडळाचे संचालक डॉ.राजाराम माने, प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ.गजानन झोरे, डॉ.शैलेश वाढेर, डॉ.दीपक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.कोणत्याही प्रयोगशाळेसाठी एनएबीएलची मान्यता असणे ही आवश्यक बाब आहे. हे मूल्यांकन आणि मान्यतेचा काळ हा कमीत कमी सहा महिन्याचा असतो, पण विद्यापीठाच्या या प्रयोगशाळेतील समितीतर्फे फक्त तीन आठवड्यात ही मान्यता मिळविली आहे. या समितीचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ.गजानन झोरे, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ प्रो.संजय मोरे, डॉ.सुप्रिया यमेकर, डॉ.शैलेश वाढेर, डॉ.मनमोहन बजाज, संदीप काळे यांची प्रमुख भूमिका होती.दि.२५ आणि २६ एप्रिल रोजी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या शाळेचे मूल्यांकन दिल्ली येथील समितीमार्फत करण्यात आले.त्यामुळे या दोन दिवसात या प्रयोगशाळेमध्ये कोरोना स्वॅब नमुने तपासण्यात आलेले नाहीत.नांदेड येथील कोरोना स्वॅबचे नमुने यापूर्वी पुणे आणि औरंगाबाद येथे तपासणीसाठी जात होते.त्यावेळी दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधी अहवाल येण्यासाठी लागत असे. ना.अशोकराव चव्हाण,विद्यापीठाचेकुलगुरू डॉ.उद्धव भोसले, डॉ.गजाननझोरे यांच्या संकल्पनेतून आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी अगदी तीन आठवड्यात या प्रयोगशाळेची उभारणी झाली. सद्या दररोज सरासरी १००च्यावर हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांमधून कोरोना स्वॅबचे नमुने येत आहेत. नमुने कमी असल्यामुळे सध्या मॅन्युअल पद्धतीने काम चालू आहे. एक शिफ्ट ही सहा ते सात तासांची असते. त्यामध्ये जास्तीत जास्त २५० नमुन्याची तपासणी करण्यात येते. दुपारी बारा वाजेपर्यंत आलेल्या नमुन्यांचा अहवाल संध्याकाळी सात वाजेपर्यंत देता येतो. दुपारनंतर आलेल्या नमुन्यांचा अहवाल हा दुसऱ्या दिवशी देण्यात येतो, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी या वेळी स्पष्ट केले आहे.
या प्रयोगशाळेमध्ये विद्यापीठातील जैवतंत्रशास्त्र संकुलातील पीएच.डी. आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी सामाजिक बांधिलकी म्हणून आणि स्वच्छेने काम करीत आहेत. यामध्ये व्यंकटेश जाधव, डॉ.सुजाता इंगळे, मनोज रामपुरी, पियुष वालुकर, नेहा भुरे, काजल भोसले, आनंद पवार, दिशा बसवे यांचा समावेश आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...