गुरुवार, १६ जानेवारी, २०२०

सावित्री बाई फुले यांची जयंती व बालिका दिन मोठय़ा उत्साहात मानेवाडी जि.प.प्रा.शाळा येथे साजरा :- पांडुरंग आवारे-पाटील
बीड.(प्रतीनिधी)दि.3/01/ रोजी सकाळी 9.45 वाजता जि.प.प्रा.शाळा.मानेवाडी.ता.जि.बीड येथे जि.प.प्रा.शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
व चावडी वाचन घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शिवसंग्राम युवा नेते मा.पांडुरंग आवारे-पाटील होते व प्रमुख अतिथी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मा.अनुरध माने हे होते. सावित्रीबाई फुले यांचे कार्य व महिला शिक्षणांची चळवळ या विषयी पांडुरंग आवारेंनी यांनी मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या भाषणातून मुलींना जगू द्या आणि शिकू दया हे सावित्रीबाईचे विचार समाजा पर्यंत पोहोचवले व महिला म्हनजे दोन्ही घराचा ऊदघार करणारी माऊली आहे तिचे रक्षण हेच आपले कर्तव्य असे स्पष्ट केले.व सावञीबाई फुले यांच्या जयंती निमीत्त सर्व विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना आवारेंनी शुभेच्छा दिल्या यावेळी समाजसेवक मा. डिंगाबर (तात्या) आवारे,मा.सरपंच पोपट माने,साहेबराव माने,दत्ता माने,अंकुश माने,संदिपान माने,बाबु इंगोले,महादेव माने व अन्य मानेवाडी ग्रामस्थ,शिक्षणप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.शाळेचे मुख्यध्यापक श्री जाधव सर यांनी पांडुरंग आवारे पाटील यांचे कवतूक करून व उपस्थितांचे आभार व्यक्त केले आणि कार्यक्रमाची सांगता चावडी वाचनाने करण्यात आली.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...