शनिवार, २५ एप्रिल, २०२०

नांदेडमध्ये 'कोरोना व्हायरस' आला कोठून ? पहिल्या रुग्णाच्या 'सोर्स'चा शोध लागेना

आरोग्य  यंत्रणेसह प्रशासनही चक्रावले,पोलिसी पद्धतीने होणार तपास

नांदेड (भगवान कांबळे):- नांदेडमध्ये सापडलेल्या पहिल्या  कोरोनाच्या  रुग्णाला  हा  संसर्ग  नेमका  कुठून  झाला  याचा  शोध 72  तासानंतरही  लागला  नाही. परिणामी  आरोग्य  यंत्रणेसह प्रशासनही चक्रावले  आहे.नांदेडमध्ये  बुधवारी  पीरबुरहाननगर भागात एक 64 वर्षीय  व्यक्तीला  कोरोना झाल्याचे उघड़ झाले.  ही  बाब  समजताच महीनाभरापासून 
कोरोनाची  तटबंदी  करणाऱ्या  प्रशासनाला मोठा  धक्का  बसला. पीरबुरहाननगर परिसराला  कन्टेनमेंट झोन  म्हणून  घोषीत केल्यानंतर  पोलीस व  आरोग्य  विभागाने 3 किमी चा  परिसर आपल्या  ताब्यात  घेतला. कोरोना रुग्णाचे  जवळपास 14 कुटुंबीय आणि  संपर्कातील इतर 30 ते 35 जणांना विलगीकरण केले. त्यांचे  स्वॅबही  घेण्यात  आले. व 'त्या' कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील 38 नातेवाईकांचे अहवाल निगेटिव्ह ही आला आहे . सदर रुग्णाला  कोरोनाची  लागण  नेमकी  कुठून  झाली  हा प्रश्न  मात्र  अद्यापही  अनुत्तरीतच आहे. कोरोना बाधित व्यक्ति हा  दोन महिन्यांपासून घरातच असल्याचे सांगत आहेत. सदर रुग्णावर  2 खाजगी रुग्णालयात 8 दिवसांपूर्वी उपचार करण्यात  आले  होते. ते  दोन्ही  रुग्णालय  सील  करण्यात आले आहेत. त्या  रुग्णालयाच्या  डॉक्टरलाही क्वारंटाइन केले आहे. एकूणच नांदेडच्या त्या  पहिल्या कोरोना  रुग्णाला लागण नेमकी  कुठून  झाली  याचा शोध घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे. विशेष म्हणजे  पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनीही आता पोलिसी पद्धतीने माहिती  घेतली जाईल  असे ते स्पष्ट  केले आहे  .शहरातील  इतर भागात कोरोना पसरु नये यासाठी महापालिका युद्धपातळीवर उपाययोजना करत असल्याचेही  स्पष्ट केले. दरम्यान, शहरातील भाग्यनगर भागही सील करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
परजिल्ह्यात अडकुन पडलेल्या ऊसतोड कामगारांना जिल्ह्यात प्रवेश सुरु



आजपर्यंत 862 ऊसतोड कामगार जालना जिल्ह्यात दाखल

जालना, प्रतिनिधी:-  लॉकडाऊनमुळे परजिल्ह्यात अडकुन पडलेल्या ऊसतोड कामगारांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येत असुन दि. 25 एप्रिल, 2020 पर्यंत एकुण 862 ऊसतोड कामागारांना जिल्ह्यामध्ये आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.बदनापुर तालुक्यामध्ये बीड येथुन 11 व पुणे येथुन 28 एकुण 39 कामगार, परतुर तालुक्यात सांगली येथुन 51 व कोल्हापुर 37 एकुण 88 कामगार, मंठा तालुक्यात सांगली-72 कोल्हापुर 19, व सातारा येथुन 6 असे एकुण 97 कामगार, घनसावंगी तालुक्यात सांगली-63, कोल्हापुर-43 व सातारा-85 असे एकुण 191 कामगार, तर अंबड तालुक्यात बीड-25,पुणे-17,  सांगली 113, कोल्हापुर-83, सातारा-133, सोलापुर-49 व लातुर येथुन 02 असे एकुण 422 कामगार दाखल झाले आहेत.सध्या सामान रुग्णालय, जालनायेथे दु:खीनगर येथील कोरोनाग्रस्त 65 वर्षीय महिलेची प्रकृती गंभीर आहे.  तसेच  जिल्ह्यात कोरोनाच्या एकुण 892 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 95 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 571 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 22 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 768 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने -00 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 02 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 730, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 103, एकुण प्रलंबित नमुने-29 तर एकुण 476 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 10, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 315 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 08, सध्या अलगीकरण  केलेल्या व्यक्ती -271, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-17, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 00, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 95, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 149 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 271 एवढी झाली असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना – 48, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह-41, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-18, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-14, पोलीस प्रशिक्षण केंद्र-99, मंठा येथे 13 तर गुरुगणेश भवन, जालना येथे 38 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 367 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 62 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 455 वाहने जप्त मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 59 हजार असा एकुण 2 लाख 85 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 


आनंदवार्ता : बुलडाणा जिल्ह्याचे कोरोनामुक्तीकडे ‘चवथे पाऊल..’!
चिखली, दे.राजा व मलकापूर येथील रूग्ण झाले बरे
टाळ्यांच्या निनादात रुग्णांना सोडले घरी
बुलडाणा, प्रतिनिधी:-कोरोनाचा संसर्ग जगभर वेगाने वाढत आहे. भारतातही काही हॉट स्पॉट क्षेत्रात विषाणूने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. जिल्ह्यातही विषाणूने आपला संसर्ग दाखवित 21 रूग्ण आपल्या कवेत घेतले. मात्र जिल्ह्यातील परिस्थिती प्रशासनाच्या अथक प्रयत्नाने नियंत्रणात येत आहे. 
कोरोनाला मर्यादेत ठेवण्यात प्रशासन विविध उपाययोजना अंमलात आणत आहे. जिल्ह्याचे कोरोनामुक्तीकडे आता चवथे यशस्वी पाऊल पडले आहे.  ठणठणीत बरे झाल्याने व कोरोना निगेटीव्ह अहवाल इाल्यामुळे जिल्ह्यातील तीन रूग्णांना आज कोविड रूग्णालयातून सुटी देण्यात आली.जिल्ह्यात चिखली येथे तीन,  चितोडा ता. खामगांव येथे दोन, शेगांव येथे तीन, देऊळगांव राजा येथे दोन,  सिंदखेड राजा येथे एक, मलकापूर येथे चार आणि बुलडाणा येथे सहा कोरोनाबाधीत रूग्ण आढळले होते. त्यापैकी आतापर्यंत बुलडाणा येथील चार, शेगांव येथील तीन, चितोडा ता. खामगांव येथील दोन, चिखली येथील एक आणि दे.राजा येथील एक कोरोनाबाधीत रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. त्यामध्ये आज तीन रूग्णांची भर पडली आहे. आज चिखली येथील एक,  दे.राजा येथील एक आणि मलकापूर येथील एक अशाप्रकारे तीन रूग्ण बरे होवून स्वगृही परतले आहेत. अशाप्रकारे एकूण 14 रूग्ण बरे झालेले आहे.प्रशासनाने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या. कन्टेन्टमेंट झोन, अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई, गर्दी कमी करण्यासाठी योजलेले उपाय यामुळे जिल्हा कोरोनामुक्तीकडे अग्रेसर आहे.  आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे आज तीन रूग्णांचे दुसरे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. त्यांना आनंदाने जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील – भुजबळ,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या रूग्णांचे स्वागत केले.  शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारादरम्यान संबंधित रुग्णांचे दाखल केल्यापासून 14 व 15 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन्ही तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने सदर रुग्णांना डिस्जार्ज देण्यात आला आहे.  त्यांच्यावर उपचार करणारे सिस्टर्स व ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवित त्यांना प्रोत्साहित केले. कोरोना बाधीत रूग्णांनी आपण कोरोनामुक्त्‍ झाल्याबद्दल प्रशासनाने आभार मानेल. खरच.. आमच्यासाठी सर्व प्रशासनाने खूप मेहनत घेतली, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत.कोरोना निगेटीव्ह रूग्णांना जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी डिस्जार्ज पेपर दिला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना त्यांच्या  घरी सोडण्यात आले. या तीन रूग्णांमुळे जिल्ह्यात कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 14 झाली आहे. जिल्ह्यात कोविड -19 आजाराने 21 रूग्ण बाधीत होते. त्यापैकी एकाचा 28 मार्च रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर 17 एप्रिल रोजी तीन, 20 एप्रिल रोजी पाच, 23 एप्रिल रोजी तीन व आज 25 एप्रिल रोजी पुन्हा 3 रूग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. आता 6 रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या कोरोनाबाधीत रूग्णांना तपासणी अहवालानंतर कोरोना संसर्ग वार्डात दाखल करुन या सर्वांवर उपचार करण्यात आले.  तसेच शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या रुग्णांवर तसेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात तपासणी, उपचार करण्यात आले. कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तींचे दोन्ही स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पहिला व दुसरा तपासणी रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. दोन्ही अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर बाधीत रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले.कोरोनाच्या या जीवघेण्या आजारातून वाचलेल्या सर्व कोरोना निगेटीव्ह रूग्णांचे चेहरे आनंदीत होते. सर्व मनोमन आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्सेस यांचे आभार मानत होते. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी अजूनही लॉकडाऊनचे पालन करावे, घरातून विनाकारण बाहेर पडू नये. सर्वांनी मास्क किंवा स्वच्छ हात रूमाल चेहऱ्यावर ठेवावा. अनावश्यक बाहेर  न पडता घरातच रहावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने  करण्यात आले आहे.                                                                                                                                                       

अंबड़ तालुक्यातील किंनगांव येथे २८ वर्षीय युवकाचा विहिरीत पडूंन मृत्यु

       जनवरांना पाणी पाजत असता विहिरीत गेला तोल

अंबड़ /अरविंद शिरगोळे : अंबड़ तालुक्यातील किंनगांव येथील २८ वर्षीय युवकाचा विहिरीत पडूंन मृत्यु झाल्याची घटना काल दिनांक 24 एप्रिल रोजी घडली. 
या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंबड तालुक्यातील  किनगाव  येथील युवक कृष्णा भाऊसाहेब तारडे वय २८ वर्ष हा शुक्रवार रोजी दुपारी १२.४५ वाजेच्यां सुमारास जनवरांना पाणी पाजण्यासाठी विहरीवर गेला असता त्याचा तोल जाऊन विहिरीत पडला यावेळी जवळपास कोनी नसल्याने पाण्यात बुड़ुन त्याचा दुर्दैवी  मुत्यु झाला असून त्यांचेकडे दुधाचे ८ ते ९ जनावरे असल्याने तो  दुधाचा व्यवसाय करत होता. याबाबत अंबड पोलिसात त्याचे नातेवाईक रावसाहेब तारडे यांच्या तक्रारीवरून ई .डी.दाखल करण्यात आली असून मयताचे पी.एम. उपजिल्हारुग्णालय अंबड येथे करून सदर बॉडी पो. कॉ . वनवे यांनी त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिली असून सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल रंगनाथ सोनुने यांच्याकडे देण्यात आला आहे .मयत हा कुटुंबप्रमुख असल्याने त्याच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या पश्र्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ, बहिन असा मोठा परिवार आहे. सदर घटनेमुळे गावत हळचळ व्यक्त केली जात आहे.
        अंबड़ शहरात दुर्दैवी घटना 22 वर्षीय युवकाचा मृत्यू
सय्यद जावेद सय्यद बशीर याच्या परिवरावर दुःखाचा डोंगर कोसळला
अंबड़ / अरविंद शिरगोळे : विहिरीत पडूंन 22 वर्षीय युवकाचा मृत्यू परिवरावर उभे राहिले मोठे संगट याबत अशी माहिती की सय्यद जावेद सय्यद  बशीर वय 22 रा. 
सिरसळा ता परळी जिल्हा बिड हल्ली मुक्काम जालना-बिड रोडवरील फेडरेशन, मोसंबी मार्केट जवळील विहिरीत पाणी शेंदित असता युवकाचा तोल जाऊन दुर्दैवी अंत झाला. सय्यद जावेद सय्यद  बशीर हा मागील दोन महिन्यापासुन  तो व त्याचे कुटुंब फेडरेशन जवळ वस्तवेये होते. सय्यद हा आपल्या कुटुंब सह जीवन जगण्यासाठी गावोगावी जाऊन सर्कशिचा खेळ करुण आपले पोट भरत असत जावेद हा कुटुंबातील एकमेव कमावता व्यक्ति मोठा मुलगा गेल्याने सय्यद च्या  कुटुंबांनवर दुःखा चा डोंगर कोसला मागील बऱ्याच महिन्यापासुन लॉकडाऊन असल्यामुळे असल्याने सय्यद त्याच्या कुटुंबासह झोपडीत राहून  आपले जीवन चरित्र चलावत असे जावेद यांच्या पश्र्चात आई, दोन भाऊ व दोन बहिनी असा परिवार आहे

             अल्पभूधारक शेतकऱ्यांना खते व बी-बियाणे 
                    मोफत द्या – बाबासाहेब कोलते

स्वातंत्र्य सैनिक पाल्य समितीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब कोलते यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी


जालना,(प्रतिनिधी):- कोरोना व्हायरस चा फटका हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जास्तीचा बसला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी व दिलासा देण्यासाठी 
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना खते व बी-बियाणे मोफत देण्याची मागणी स्वातंत्र्य सैनिक पाल्य समितीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब कोलते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात बाबासाहेब कोलते यांनी म्हटले आहे की संपूर्ण भारतात कोरोना व्हायरसचा फटका सर्वानाच बसत असला तरी ग्रामीण भागातील अल्पभूधारक व मोठ्या शेतकरी वर्गाचे फार मोठे नुकसान झाले आहे, त्यामध्ये ग्रामीण भागातील काही शेतकरी कष्टकरी कुटुंब हातावर पोट भरून जगणारे आहेत. कोविड-१९ या महामारी विरोधात लॉकडाऊन मध्ये शेतकऱ्यांनी सक्रीय सहभाग घेतला आहे परंतु गेल्या काही दिवसापासून लॉकडाऊन असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची यंत्रणा ठप्प झाली आहे.आज रोजी काही शेतकऱ्यांकडे कापूस, मका, तूर हरभरा गहू घरामध्ये पडलेला आहे, लॉकडाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांचा मालाला शेतकऱ्यांच्या मनासारखा भाव मिळत नाही त्यामुळे आता जून जुले मध्ये खरीपाची पेरणी सुरु होणार आहे आगामी खरिपाच्या पेरणीसाठी तयारी कशी करावी हा बिकट प्रश्न ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसमोर पडला आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ मजुरांना काम मिळावे म्हणून रोजगार हमी योजनेची कामे मजुरांमार्फत करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह मजुरांना दिलासा देणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी गावागावात प्रशासनाने रोजगार हमीची कामे सुरु करावी शेतकऱ्यांचा शेतीमाल हा लॉकडाऊन मुळे घरातच पडून असल्यामुळे शेतकऱ्यांना मदत म्हणून व शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढणेसाठी महाराष्ट्र शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना व अन्य शेती धारकांना शेतकऱ्यांना शासनाने मोफत खते व बियाणे कृषी कार्यालयाकडून वाटप करावे व आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी बाबासाहेब कोलते यांनी केली आहे

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...