शुक्रवार, ५ जून, २०२०

*                        अंबड शहर व परिसरातील बांधकाम कामगाराचा रोजगारांचा मोठा प्रश्न*
                                                        वाळूचा लिलाव करण्यात यावा





*अंबड/प्रतिनिधी* : अंबड तालुक्यातील बांधकाम कामगारांच्या हाताला काम नसल्यामुळे बांधकाम कामगाराचा रोजगारांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे व  कोरोनाच्या विषाणूमुळे तर जगभरात खळबळ उडाली आहे. जे संकट महाराष्ट्र व देशात आल्यामुळे मजूर मागील 3 महिन्यापासून घरीच भूक बळी पडत आहे. त्यामुळे बांधकाम कामगार च्या हातला काम नसल्यामुळे वाळुचा लिलाव करण्यात यावा. अशी मागणी  बांधकाम  कामगार अंबड शहर परिसरातील कामगार वासियांनी तहसील कार्यालयात निवेदनाद्वारे केली बांधकाम कामगार निवेदन   देतानी.अर्जुन राऊत, ईश्वर पिराणे, विक्रम भागवत, नईम मिर्झा, पाराजी संसारे, दत्ता लांडे, विष्णू देवकर ,व काही कामगार तहसील कार्यालय अंबड येथे दिले तर कहिनी सोशल डिस्टन्स पालन करून घरी राहुन बांधकाम कामगारांनी पाठिंबा दिला.
नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपविभागीय अधिकारी अंबड यांच्या आदेशाने मे. भारत क्लास स्टोअर्स दुकान सील.




अंबड/प्रतिनिधी : अंबड शहरातील मे. भारत क्लास स्टोअर्स यांना मा .जिल्हाधिकारी जालना यांनी त्यांच्या प्रतिबंधक आदेश दिनांक 31 /5/2020 हे सर्व दुकाने व व्यापारी अस्थापना यांना सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची मुभा दिली आहे.असा व्यवसाय करताना लॉक डाऊन मध्ये  टप्याटप्याने बाबाचा मार्गदर्शन सूचना मार्गदर्शन सूचना निर्गमित केले आहेत covid-19 व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक सूचना निर्गमित केले आहेत आणि या सूचनांमध्ये दुकानदाराने ग्राहकांमध्ये किमान सहा फूट अंतर सुरक्षित करावे आणि दुकानात एकाच वेळी पाच पेक्षा अधिक व्यक्ती जमणार नाही याची दक्षता घ्यावी असे नमूद केले आहे कामाचे ठिकाणी सामाजिक अंतर ठेवणे वारंवार संपर्काची साधने जसे की हँडल्स कॅश काऊंटर इत्यादी सतत  सॅनिटाइझ करणे आणि सर्व कर्मचारी ग्राहक यांनी थर्मल स्कॅनिंग करणे या बाबी सुचित केले आहेत कार्यालयात आयोजित बैठकीत या माध्यमातून याबाबत सर्व संबंधितांना पूर्ण कल्पना दिली गेली आहे म्हणून एकंदरीत covid-19 प्रभाव रोखण्यासाठी दुकानदार व्यवसायिक अस्थापना यांनी उपरोक्त सर्व दक्षता घेणे क्रमप्राप्त ठरते माननीय तहसीलदार अंबड यांना अहवाल दिनांक 2/6 /2020 व पंचनामा दि 1/6/2020 होणार हे स्पष्ट होते की मे.भारत क्लॉथ स्टोअर अंबड या व्यवसायिक स्थापना मध्ये covid-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियम व मार्गदर्शक सूचना यांची कोणतेही पालन होत नाही तसेच मोठ्या प्रमाणात जमाव जमवून सामाजिक अंतर मास्क घालणे , स्वच्छता पाळणे इत्यादी नियमाचे पालन होत नसल्याने स्पष्ट होते तसेच अतिशय धोकादायक पद्धतीने ग्राहक कर्मचारी मालक व्यवस्थापक हे एकमेकांना  खेटून,स्पर्श करून आपले व्यवहार करत होते त्यामुळे  अंबड शहर व परिसरातील  covid-19 प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रोखण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची पायमल्ली करून आपल्या व्यवसायिक फायद्यासाठी समाजाचे स्वास्थ्य धोक्यात आल्याचे आहे व याला अटकाव घालण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना आवश्यक असल्याने माझे मत झाले तर खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहेत मे.भारत  स्टोअर्स अंबड या व्यावसायिक स्थापनेत या आदेशाच्या दिनांकापासून व्यवसाय करण्यास मज्जाव करण्यात येत आहे पुढे असेही आदेशित करण्यात येत आहे की मे. भारत क्लॉथ स्टोअर्स अंबड यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंबून करण्यासाठी त्यांचा सखोल आराखडा सादर केल्यानंतर व असा आराखडा पालन करण्याबाबत खात्री झाल्यानंतर त्यांना व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात येईल व भविष्यात पुन्हा असे उल्लंघन आढळून आल्यास नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यातबाबत दुकाने व आस्थापना परवाना नगर परिषद अंबड यांना सूचित  करण्यात येईल असे निश्चित केली आहे मा.उपविभागीय अधिकारी अंबड श्री .शशिकांत हादगळ यांच्या आदेशाने नायब तहसीलदार दांडगे साहेब मंडळ अधिकारी शिवाजी गाडेकर साहेब, तलाठी सतीश  देशपांडे पोलीस कॉन्स्टेबल डोईफोडे यांनी पंचनामा करून मे. भारत क्लास स्टोअर्स अंबड या दुकानाला दि .३/६/२०२० रोजी सायंकाळी सील लावून बंद केली आहे.

   गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या लाभासाठी कृषि विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन.

   जालना,ब्युरोचीफ :- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सन 2015-16 पासुन राबविण्यात येत आहे. सन 2019-2020 मध्ये योजनेची व्यात्ती वाढवुन जिल्हयातील सर्व वहितीधारक शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणुन नोंद नसलेले कोणताही एक सदस्य (आई–वडील ,शेतकऱ्यांची पती/पत्नी मुलगा व अविवाहित मुलगी) या पैकी कोणताही एक व्यक्ती असे 10 ते 75 वयोगटातील एकुण दोन जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

       शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या कुंटुबातील सदस्य यांचा अपघाती मृत्यू अथवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येते.
         वहितीधारक शेतकऱ्यांच्या अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याचा दुर्देवी मुत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास त्यांनी संबधित तालुका कृषी अधिकारी ,कृषि पर्यवेक्षक अथवा कृषि सहाय्यक यांचेकडे त्वरित संपर्क करावा. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना दिनांक 10 डिसेंबर, 2019 ते 09 डिसेंबर 2020 या कालावधीकरिता असून या योजनेचे शासन निर्णय व मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासनाच्या maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे जिल्हा अधीषक कृषि अधिकारी, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 
जिल्ह्यात पाच व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर दहा रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज – जिल्हा शल्य चिकित्सक
  


जालना,ब्युरोचीफ :- जिल्हा सामान्य रुग्णालयातुन जालना शहरातील सहा, जालना तालुक्यातील बेथलाम येथील एक, हिवरा काबली ता. जाफ्राबाद येथील एक, हनवतखेडा ता. मंठा येथील एक, पिरगैबवाडी ता. घनसावंगी येथील एक अशा एकुण दहा कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करुन व त्या सर्वांच्या दुस-या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच दि. 5  जुन 2020 रोजी  पाच व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
पॉझिटिव्ह सापडलेल्या व्यक्तींमध्ये जालना शहरातील मोदीखाना येथील 41 वर्षीय पुरूष,18 वर्षीय पुरुष, 15 वर्षीय पुरुष, खाजगी हॉस्पीटल मधील 44 वर्षीय पुरुष, जालना तालूक्यातील जामखेड येथील 60 वर्षीय महिला असे एकुण जालना शहरातील एकुण 5 व्यक्तींचा समावेश असल्याचे  जिल्हा शल्य चिकित्सकांनी  कळविले आहे.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण -2824 असुन सध्या रुग्णालयात -67 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती -1127, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या - 54 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -3011, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने – 05 ,असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -174 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -2767, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-369, एकुण प्रलंबित नमुने -66, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1055,14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 21, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती – 952, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-95, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -513,विलगीकरण कक्षात  भरतीसाठी पाठविलेले संशयीत–05,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 67,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -19,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-10, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या -81,  सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या- 89 (+ एक रेफर औरंगाबाद), पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 5661 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 03 एवढी आहे. 
            कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 513  व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-29,                    डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-25,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -34, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-37, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -212 कस्तुरबा गांधी बालिका वसतीगृह परतुर  -37, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-08, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद- 01, राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी,जाफ्राबाद-00 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड-15 शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-25, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे –36 अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी -08, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल इमारत क्र.2-02, मॉडेल स्कुल मंठा-18, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -26 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 158 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 755 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 819 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली   3 लाख 10 हजार 230 असा एकुण 3 लाख 37  हजार  38 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
                               जिल्ह्यातील कंन्टेन्टमेंट झोनमध्ये नियमांचे काटेकारपणे पालन व्हावे
                         कंन्टेन्टमेंट झोनमधुन एकही व्यक्ती विनाकारण बाहेर पडणार नाही याची दक्षता घ्या
                                               जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे निर्देश.



जालना,ब्युरोचीफ :- जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असुन जालना शहरामध्ये 83 कोरोना बाधित रुग्ण आहेत. ही अतिशय चिंतेची बाब असुन कोरोनाचे संक्रमण होऊ नये यादृष्टीकोनातुन जिल्ह्यातील 38 कंन्टेन्टमेंट झोनमध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.  तसेच या झोनमधुन एकही व्यक्ती विनाकारण बाहेर पडणार नाही, यासाठी पोलीस विभागाने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले.
        कोरोनाविषाणुच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे बोलत होते.
        यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, उप विभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी श्री कडले, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, श्री लोहकरे  यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
        जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या कमी होती.  परंतू परराज्य, परजिल्ह्यातुन अनेक व्यक्ती जिल्ह्यात दाखल झाल्या असुन लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्याने नागरिकांचा वावरही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.  कंटेन्टमेंट झोन म्हणून घोषित केलेल्या भागात हायरिस्क व लोरिस्क सहवासितांचा काटेकोरपणे शोध घेण्यात यावा. कंन्टेन्टमेंट झोनचे सुक्ष्मपणे रेखांकन करण्याबरोबरच या झोनचा कालावधी 28 दिवसांपर्यंत ठेवण्यात यावा.  प्रत्येक कंन्टेन्टमेंट झोनमध्ये येण्या व जाण्यासाठी असलेले सर्व मार्ग बंद करण्यात येऊन येण्या व जाण्यासाठी एकच मार्ग तयार करण्यात यावा. या भागामध्ये असलेल्या नागरिकांना आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा घरपोहोच करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात येऊन या भागातील एकही व्यक्ती विनाकारण रस्त्यावर फिरणार नाही, याची सर्व संबंधितांनी दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी  श्री बिनवडे यांनी यावेळी दिले.
        कंन्टेन्टमेंट झोनमध्ये नायब तहसिलदार, पोलीस निरीक्षक, नगर पालिका, जिल्हा परिषद तसेच स्वयंसेवी संस्था यांचा समावेश असलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकाची नेमणुक करण्यात येऊन या पथकामार्फत निर्बंधाची कडक अंमलबजावणी होण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी.  या भागामध्ये मधुमेह, रक्तदाब यासह इतर आजार असलेले व्यक्ती, गर्भवती महिला, लहान बालके, वयोवृद्ध असलेल्या व्यक्तींची विशेष काळजी घेण्यात यावी.  तसेच होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींनी घरातच राहणे अनिवार्य असुन होमक्वारंटाईन केले असतानासुद्धा बाहेर कोणी फिरताना आढळल्यास अशा व्यक्तींवर कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिले.
        जीवनावश्यक तसेच ईतर आवश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे.  प्रत्येक दुकानामध्ये सामाजिक अंतराचे पालन करणे अत्यंत आवश्यक असुन या ठिकाणी सॅनिटायजर, मास्क यासारख्या बाबींचेही पालन करणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी सामाजिक अंतराचे तसेच प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचनांचे पालन होताना दिसणार नाही, अशा ठिकाणी कडक कारवाई करण्यात यावी.  तसेच मार्केटमध्ये होणारी वाहनांची गर्दी टाळण्यासाठी मार्केटबाहेर पार्कींगची व्यवस्था करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

जालना जिल्ह्यातुन कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतू नागरिकांनीही कोरोनाला अटकाव करण्यासाठी सामाजिक अंतर, सॅनिटायजर, मास्कचा वापर तसेच आवश्यकता असेल त्याचवेळी घराबाहेर पडावे.  अन्यथा आपल्या घरातच रहावे. प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी केले.
*केंद्र सरकारची झोळी रिकामी; नवीन योजनांना वर्षभर कात्री*
***********************
हॅलो रिपोर्टर वृत्तसेवा
प्रतिनिधी *नांदेड*
*संजुकुमार गायकवाड*

कोरोना रोखण्यासाठी केंद्र सरकारने दोन महिन्यांहून अधिक काळ लॉकडाउन केला खरा परंतु, आता आर्थिक पातळीवर या लॉकडाउनमुळे सरकार गलितगात्र झाले आहे. महसुली उत्पन्नासह इतर सर्वच बाबींबमध्ये आलेल्या तुटीमुळे सरकारने आता बचतीचा मध्यमवर्गी बाणा स्वीकारला आहे.  सरकारने नवीन योजनांवर खर्च करण्याचे आता थांबवले आहे.

*अर्थ विभागाने आज जाहीर केलेल्या आदेशानुसार, पुढील एक वर्षापर्यंत सर्व नव्या योजनांवरील खर्च थांबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या नव्या योजनांवरील खर्चालाही कात्री लावली जाणार आहे. केंद्र सरकारने नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी बहुतांश मंत्रालयांना जास्तीतजास्त 20 टक्के खर्च करण्याचे आदेश दिले होते. यात 31 विभागांना 20 टक्के तर 52 विभागांना 15 टक्के खर्च करण्याची  परवानगी देण्यात आली होती.*

लॉकडाउनमुळे महसूली उत्पन्न आटल्याने केंद्र सरकारची कोंडी झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून नव्या योजनांवरील खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘पीएम गरीब कल्याण’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेतील घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठीच फक्त आता निधी मिळणार आहे. लॉकडाउन आणि कोरोनावरील उपाययोजनांमुळे खर्चात वाढ झाल्यानंतर राज्यांनी केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

             हजारो वंचितांचा तो झाला आधार  सरकारी पाठपुरवठा करून गावोगावी पाठविले मजूर.




औरंगाबाद,ब्युरोचीफ :- लॉकडाऊनच्या काळात राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या हजारो मजुरांना मदत करून त्यांना त्यांच्या गावी पाठवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या या कार्यकर्त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. औरंगाबाद येथे राहणारा अनिल इंगळे हा कार्यकर्ता हजारो मजुरांचा आधार झाला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते आज पर्यंत या कार्यकर्त्यांने बुलढाण्यातील मौजे जनुना, पोस्ट गुम्मी या ठिकाणी राहणारा आणि औरंगाबाद मधुन वंचित बहुजन आघाडीचे काम करणारा अनिल इंगळे लॉकडाऊनच्या काळात पक्षातर्फे गरीब मजुरांना मदत करावी, या हेतूने कामाला लागला. मात्र लोकांना काय मदत करावी, हा प्रश्न त्याच्यापुढे होता. ग्रामीण भागात राहून धान्य,मास्क याचे वाटप परिस्थिती अभावी करता येणे शक्य नव्हते. म्हणून त्याने इतर राज्यातून महाराष्ट्रात आणि  महाराष्ट्रातून इतर राज्यात जाण्यासाठी लागणाऱ्या ई पासचे (परवाना पत्र) काम हाती घेतले. सर्वप्रथम त्याने राज्यभर आपले फोन नंबर शेअर करून ज्यांना आपल्या गावी जायचे आहे, अश्या लोकांनी आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. त्यानंतर काही तासातच त्याच्याकडे लोकांचे कागदपत्रे व्हाट्सअपवर येऊ लागले. आलेली माहिती घेऊन अनिलने त्यांचे फॉर्म भरण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे अडीच महिन्यात सुमारे ३ हजार लोकांचे फॉर्म त्याने भरले आणि त्यांना ई पास मिळवून दिले. ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले, अशा लोकांसाठी त्याने संबंधीत  जिल्यांच्या विभागाला मेल करून त्याची माहिती घेऊन हे फॉर्म परत नव्याने भरून त्यांना ई पास मिळवून दिले. अनिल मुळे हजारो मजूर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात,दिल्ली या राज्यातील आपल्या घरी सुखरूप पोहचले असून त्यांनी फोन करून अनिलचे आभार मानले आहे. तर इतर राज्यातूनही हजारो मजूर महाराष्ट्रात अनिलमुळे परत आले आहेत. संकट काळात हजारो वंचितांच्या मदतीला धावणारा हा वंचित खऱ्या अर्थाने लोकांचा आधार झाला. वंचित बहुजन आघाडीकडून त्याच्या कार्याला सलाम, आपणही त्याच्या कार्याचे कौतुक करू शकता, तसेच ई पास साठी ८२०८८२१०४४, ९७३०६२८०२८, ८४८५०३२११ या क्रमांकावर आपण संपर्क साधून मदत घेऊ शकता. वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी ही माहिती दिली.
आपले काम चालूच ठेवले असून घरी परतलेल्या अनेक मजुरांनी फोन करून त्याचे आभार मानले आहे.
*उदगीर खरीप हंगामासाठी 6 हजार 880 टन खत उपलब्ध*
 *क्रूषी विभाग*: सोयाबीन  बियाणांची उगवण क्षमता  तपासावी,
*उदगीर*: ता 4 (जिवन भोसले )
मान्सुनपुर्व  पावसामुळे शेतकर्यांना  दिलासा  मिळाला आहे,  त्यामुळे शेतकरी खरीप हंगामाची तयारी करीत आहेत दरम्यानं , बाजारपेठेतील क्रुषी सेवा केंद्रा वर शेतकर्यांची  रिघ लागल्याचे  दिसुन येत आहे , उदगीर तालुक्या साठी 6 हजार 880 टन रासायनिक खत उपलब्ध झाले आहे . तालूक्यातील शेतकरी खरिपाची  तयारी करित आहेत दरम्यान, मानसुनपुर्व पाऊस झाल्याने शेतकरी  हंगाप पुर्व काम आटोपत आहेत.बाजारपेठेत थ्री -बियाणे, खतांची , चैकशी करत आसल्याचे पाहण्यास मिळत आहे . ऊदगीर तालुक्यातील 7 हजार 600 टन रासायनिक  खताची  मागनी  नोंदविन्यात आली होती,  त्या पैकी  7 हजार 483 टन ऊपलब्ध करुन देण्यास शासनाणे मान्यता  दिली आहे,या पैकी  आतापर्यंत  6 हजार  880 टन खत साठा  उपलब्ध  झाला आहे,. सध्या  तालुक्यातील खताचा पुरेसा  साठा आहे. यंदा खरिपाच्या  कालावधीत लाँकडाऊन असले तरी  खतांचा  तुटवडा जानवनार ऩाही
दरम्यान सोयाबिन बियाणांची  मुबलक उपलब्धता काही दिवसात होनार आहे. तत्पुर्वी  पेरनी करावी लागली तर शेतकर्यांणी  स्वत: कडील ब्यानाचा वापर करावा   मात्र  त्या पुर्वी त्याची   उगवन क्षमता  तपासुन पहावी , दरम्यान  गावा गावा मधुन क्रुषी  विभागाच्या वतिने बियाणे उगवनीसंदर्भात  प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आहे .
 खते व बियाणांची क्रत्रिम   टंचाई  निर्माण करुन जादा दराणे  विक्री करणार्यावर  क्रूषी विभागाचे लक्ष आहे  तक्रार आल्या स कारवाई केली जाईल असे  पंचायत समितीचे अधिकारी  यशपाल सातपूते यांनी सांगीतले.
 यंदाच्या  खरिप बियाणे व खतांचा तुटवडा  जानावनार नाही . महाबिजकडे 7 हजार 96 क्वींटल  सोयाबिनच्या बियाणांची मागणी  करण्यात आली आहे . बियाणांची उगवन क्षमता तपासुन घ्यावी  असे  आवाहन  पंचायत समीतीचे  क्रुषी  अधिकारी  यशपाल सातपुते यांनी  सांगीतले...

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...