शुक्रवार, १९ जून, २०२०

झोरे यांना उप अभियंता पदाचा पदभार देण्यास जि.प.प्रशासनाकडून टाळाटाळ.झोरे हे ओबीसी प्रवर्गातील असल्याने त्यांना डावलले जाते - चंद्रकांत कारके



जालना / प्रतिनिधी :- जिल्हा परिषद प्रशासनात रिक्त पदाच्या पदोन्नती मध्ये सद्या मनमानी कारभार सुरू असुन जेष्ठता यादी डावलुन उप अभियंता पदाचे अतिरिक्त पदभार राजकीय दबावा पोटी दिल्या जात असल्याने व झोरे हे ओबीसी प्रवर्गातील असल्याने त्यांना डावलले जात आहे असा आरोप करत या जि.प.च्या सर्व मनमानी कारभाराची वरीष्ठा मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील नेते तथा बहुजन भारत पार्टी चे महासचिव चंद्रकांतजी कारके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
        पुढे श्री कारके म्हणाले की, श्री.टि.डी.झोरे हे उच्च विद्या विभूषित बी.ई. ऐवजी एम.ई. उच्च शिक्षीत शाखा अभियंता असून यांची उप अभियंता पदाची सर्व शौक्षणिक पात्रता परिपुर्ण आहे.श्री. झोरे यांनी तसा विनंती अर्ज ही जालना जिल्हा परिषद प्रशासनाला कालमर्यादेच्या आत केला होता. मात्र राजकीय दबावा पोटी जाणीवपूर्वक त्यांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून वेळोवेळी डावलले जात आहे. तेव्हा त्यांना जातीची आडकाठी न टाकता जेष्ठता यादी प्रमाणे उप अभियंता पदाचा तात्काळ पदभार देण्यात यावा. नसता जिल्हा परिषद प्रशासनाच्या रिक्त पद भरती प्रक्रियेच्या मनमानी कारभाराची मा. विभागीय आयुक्तांकडून तसेच मंत्रालयीन मा. सचिवांकडून चौकशीची मागणी करण्यात येईल. असे सांगत येणाऱ्या काळात सर्व ओबीसी .एस्सी. अभियंत्यांना सोबत घेऊन त्यांच्या हक्क व अधिकारासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शेवटी चंद्रकांतजी कारके यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

भारतीय जवानांना अखिल भारतीय सेनेच्या वतीने श्रद्धांजली


जालना,ब्युरोचीफ :- भारत-चीन सीमेवरील गवलान येथे चीनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना गुरूवारी (ता.१८) जालना शहरात अखिल भारतीय सेनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
   गांधी चमन येथे हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी बोलताना अखिल भारतीय सेनेचे जालना जिल्हा संपर्कप्रमुख गणेश चांदोडे म्हणाले की, चीन भारताच्या सीमेवर कुरापती काढत आहे.कोरोनाचा जगभरात फैलाव करणाऱ्या चीनची जगभरात बदनामी होत आहे.भारतीय नागरिक चीनच्या वस्तुवर बहिष्कार घालत आहे.यामुळे चीनचे पित्त खवळले आहे.यामुळे चीनी सैनिकांनी भारतीय सेनेच्या जवानांवर हल्ला केला,यात २०जवान शहीद झाले आहेत.प्रत्येक भारतीय नागरिकाने चीनी वस्तूवर बहिष्कार टाकावा व चीनी वस्तूंची होळी केली तरच ती आपल्या भारतीय शहीद जवानांना खरी श्रद्धांजली ठरेल.
   यावेळी अखिल भारतीय सेनेच्या जालना शहराध्यक्ष नंदा पवार, अखिल भारतीय सेनेचे जुना जालना विभाग प्रमुख अमोल रत्नपारखे , आदींची उपस्थिती होती.

नाभिक समाजासाठी ॲड प्रकाश आंबेडकर यांचा पुढाकार!


           जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट; दुकाने न उघडू दिल्यास  आंदोलनाचा इशारा


अकोला,ब्युरोचीफ :- सध्या लॉकडाउनच्या काळात अनेकांचे व्यवसाय व रोजगार बंद पडले आहे. नाभिक समाजाला त्याची सर्वात जास्त झळ पोहचत आहे. सध्या जवळपास सर्वच दुकानांना उघडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे परंतु केशकर्तनालय, ब्युटिपार्लर यांना मात्र परवानगी देण्यात आली नाही. यामुळे अकोला जिल्ह्यातील नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. या अनुषंगाने आज वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांनी नाभिक समाजाच्या प्रतिनिधी सोबत जिल्हाधिकारी यांची भेट घेउन जिल्ह्यातील केशकर्तनालय ब्युटी पार्लर  सुरू करण्यासाठी चर्चा केली. यावेळी पिंप्री चिंचवड महानगरपालिकेने केशकर्तनालाय सुरू करण्याचा दिलेल्या परवानगीच्या धरतीवर अकोला जिल्ह्यातीलही सर्व केशकर्तनालय व ब्युटि पार्लर उघडण्याची परवानगी द्यावी असे सुचविले.
नाभिक समाज या लॉकडाउनमुळे  विपन्नावस्थेत आला असून अकोट येथे उपासमारी व आर्थिक विवंचनेतून आत्महत्या देखील झाली आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. सदर समस्येतून बाहेर पडण्यासाठी नाभिक समाजाला तात्काळ दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी, तसेच तोपर्यंत नाभिक समाजातील लोकांना मोफत अन्नधान्य व आर्थिक मदत करावी  अशी आग्रही भुमिका ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडली. अन्यथा लवकरच नाभिक समाज रस्त्यावर उतरून व्यवसाय करतील असा इशारा त्यांनी दिला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या आठ दिवसात यावर निर्णय घेण्यासंदर्भात मान्य केले. तसेच  याप्रसंगी बाळापूरमधील करोनाग्रस्त भागातील आरोग्य तपासणी करिता  वंचीततर्फे डॉक्टर उपलब्ध करून देण्याचा मानस ऍड बाळासाहेब आंबेडकर व्यक्त केला. ज्याचे जिल्हाधिकारी यांनी स्वागत केले.
याप्रसंगी प्रदेश प्रवक्ता डॉ धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख डॉ प्रसन्नजित गवई, युवा नेता पराग गवई, नाभिक समाजाचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर इंदुरकर, प्रशांत भातखडे, गजानन ओलोकार, संतोष पंडित, हरीहर पळसकर, गजानन येवतकर उपस्थित होते.


चीन देशाची मस्ती उतरविण्यासाठी हिंदुस्तानचे जवान सज्ज-माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर



भाजपाकडून चीन देशातील वस्तूची होळी करून व्यक्त केला निषेध 

जालना (प्रतिनिधी) :- चीन देशाची मस्ती उतरविण्यासाठी हिंदुस्तानचे जवान सज्ज झाले असून पाकिस्तान प्रमाणें चीन ला धडा शिकविल्याशिवाय हिंदुस्तानचे जवान शांत बसणार नसून भारतीययांनी आपल्या घरातील चीनी वस्तूची होळी करण्याचे आवाहन माजी मंत्री तथा भाजपा नेते आ.बबनराव लोणीकर यांनी भाजपा जिल्हा कार्यालयासमोर चीन देशाचा निषेध व्यक्त करताना व्यक्त केला.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष राजेश राऊत, जिल्हा उपाध्यक्ष तथा उपसभापती भास्करराव पाटील दानवे, माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, जिल्हा सरचिटणीस बद्रीनाथ पठाडे, माजी शहराध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलीये, वीरेंद्र धोका, अतिक खान, बाबासाहेब कोलते, नारायण पवार, रवींद्र अग्रवाल, सचिन जाधव, अमोल कारंजेकर, सुभाष सले, सुनील पवार, संजय डोंगरे, प्रशांत आढावे, मोतीराम बेराड, दत्ता जाधव, संदीप भोसले, विठ्ठल नरवडे, तलरेजा आदि उपस्थित होते.  
शासनाच्या नियमाचे व सोशल डीस्टीगचे पालन करून यावेळी चीन विरोधी घोषणा देण्यात आल्या यावेळी बोलताना आ.लोणीकर म्हणाले की, चीन सैनिकांनी आपल्या भारत देशाचे अगोदर २० सैनिक शहीद केले त्याचा बदला म्हणून भारतीय नवजवानांनी ४३ चीनी सैनिकांना ठार केले पाकिस्तान प्रमाणे चीनची मस्ती उतरविण्यासाठी भारताचे जवान सज्ज झाले असून यापुढे चीन देशाचे साहित्य मोबाईल व टेप रेकॉर्ड, टीव्ही व इतर साहित्याचा भारतीयांनी वापर न करता त्याची होळी करावी. भारतातील सर्व समाज बांधवांनी चीनी वस्तूवर यापुढे बहिष्कार टाकावा, चीन ने कोरोना सारखी महामारी जगभर पोहचवून संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था संकटात आणली आहे, यापूर्वी पाकिस्ताननी भारतावर हल्ला केला होता त्याला प्रतिउत्तर म्हणून पाकिस्तानला खंबीरपने धडा शिकविला त्याच प्रमाणे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीन ला धडा शिकाविल्याशिवाय राहणार नाही. चीन ला माज आणि मस्ती चढल्यामुळे त्याची मस्ती भारतीय सैनिक उतरविल्याशिवाय राहणार नाही असे हि माजी मंत्री आ.लोणीकर म्हणाले.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...