शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

*💥व्यापारी प्रतिष्ठाने बंद तर जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सुविधा असणार सुरू - मुख्याधिकारी वायकोस💥*

चिखली,प्रतिनिधी:- संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जिल्हा हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे.त्या पार्श्वभूमीवर चिखली नगरपालिकाद्वारा दिनांक १४ एप्रिल ते १६ एप्रिल पर्यंत मेडिकल व दवाखाने वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊन चा कालावधी वाढवल्याने व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्हाधिकारी डॉ.सुमन चंद्रा यांच्या आदेशांव्यये शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने पुढील आदेशापावतो बंद राहतील असे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी कळविले आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून उपाय योजना करण्यात आले असून त्यानुसार शहरातील जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारे व्यापारी यांनी आपल्या ग्राहकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी त्यांना घरपोच सेवा देण्याचे सांगितलेले आहे.म्हणजे किराणा दुकान,भुसार माल ,दूध,भाजीपाला विक्री सुरू राहणार असून या दुकानदारांनी घरपोच सेवा देणे अनिवार्य करण्यात आले. त्यासाठी ग्राहकांनी आपल्या नेहमीच्या व्यावसायिकाकडे फोन अथवा व्हाट्सएपच्या माध्यमातून आपल्या मालाची नोंदणी करावी, संबधित दुकानदार यांनी तो माल ग्राहकांना घरपोच द्यावा मात्र त्यासाठी दुकानदाराने आपली प्रतिष्ठाने उघडी ठेऊन माल विक्री करू नये अथवा दुकानात गर्दी जमवू नये. तसेच नेमून दिलेल्या भाजी विक्रेत्यांनी सुद्धा आपल्या ग्राहकांना घरपोच सुविधा देने अनिवार्य आहे. कोणत्याही ही परिस्थितीत दुकान उघडून भाजी विक्री करू नये. शासनाने लावून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे सांगितले असून नियमांचे उल्लंनघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ही स्पष्ट केले. तसेच लवकरच न.प. प्रशासन द्वारे प्रत्येक प्रभागासाठी समनव्यक म्हणून न.प. कर्मचाऱ्याची नेमणूक सुद्धा करण्यात येणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी न.प. च्या मदत केंद्राशी संपर्क साधण्याचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी सांगितले आहे.


महाराष्ट्रमध्ये  सार्वजनिक श्री भगवान परशुराम जन्मोत्सव 2020               निमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द- सुरेश मुळे                       
                     दिपोत्सव म्हणून साजरा करुया...           
जालना,प्रतिनिधी :- दरवर्षी भगवान परशुराम सार्वजनिक जन्मोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.  परंतु यावर्षी कोरोना या महामारीमुळे यंदाची 
श्री भगवान परशुराम जन्मोत्सव 2020 व सर्व कार्यक्रम यावर्षी रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामंत्री सुरेश मुळे यांनी दिली. यावेळी बोलताना श्री. मुळे म्हणाले की, प्रत्येकाने रविवार दिनांक ,२६ एप्रिल, 2020 रोजी सायंकाळी ७.३० वाजता  आपल्या घरोघरी *"दिप प्रज्वलन"* करून श्री भगवान परशुराम जन्मोत्सव मोठ्या आपल्या घरी उत्साहात साजरा करायचा आहे. या करिता श्री भगवान परशुराम प्रतिमेचे पूजन करावे व ११,२१ किंवा ५१  *दिप प्रज्वलन* करून *"जन्मोत्सव"* साजरा करावा व शक्यतो जन्मोत्सवात होणारा खर्च  (निधी )कोरोनाग्रस्त मुख्यमंत्री सहायता निधीस व गरजुवतांना देण्यात यावा,नम्र विनंती असे आवाहन मालिराम शर्मा  (यवतमाळ) , सुरेश मुळे (जालना), श्रीकांत कुलकर्णी (नांदेड ), अनिल मुळे (औरंगाबाद ), अंकित काणे ( पुणे), काकासाहेब कुलकर्णी  (सोलापूर),   ॲड सुनील पुराणकार (चंद्रपूर ), आनंद दवे (पुणे ), मकरंद कुलकर्णी (कोल्हापूर ), ॲड सुहास वैद्य ( धुळे ),  उदय जोशी (नंदुरबार), श्रीकृष्ण पंडित  (रत्नागिरी ), विनायक महाराज फुलंब्रीकर (जालना) धनंजय कुलकर्णी (केज ), सचिन वाडे (औरंगाबाद,), निलेश कुलकर्णी, अशोक वाघ (जळगाव),  महाराष्ट्र श्री भगवान परशुराम प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रदेश वतीने करण्यात केले आहे.


कोरोनाबाधित महिलेच्या स्वॅबचा अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटीव्ह
जालना,प्रतिनिधी :- सध्या सामान्य रुग्णालय, जालना येथे उपचार घेत असलेल्या दु:खीनगर येथील कोरोनाबाधित 65 वर्षीय महिलेचा स्वॅब दुसऱ्यांदा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.जालना 
जिल्ह्यात कोरोनाच्या एकुण 558 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 86 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 366 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 08 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 445 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने 01 (पॉझटीव्ह असलेल्या महिलेच्या दुसऱ्या तपासणीचा अहवाल) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 01 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 429, रिजेक्टेड नमुने-03, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 78, एकुण प्रलंबित नमुने-11 तर एकुण 280 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 11, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 103 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 07, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-00, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 17, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 86, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 67 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच नागरिकांकडून लॉकडाऊनचे उल्लंघन होऊ नये यादृष्टीकोनातुन चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जालना शहरातील दु:खीनगर, गांधीचमन, आनंदनगर, नुतन वसाहत परिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातुन शिघ्रकृती दल व दंगा नियंत्रण पोलीस पथकाच्या जवानांनी पथसंचलन केले. तसेच लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 232 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 15 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 15 वाहने जप्त करण्याबरोबरच 26 हजार 808 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.


      नवीन बोअरवेल घेणे, बोअरवेल दुरुस्तीसाठी वापरण्यात 
          येणारे यंत्र व वाहनांना काम करण्यास परवानगी
जालना, प्रतिनिधी:- जालना जिल्ह्यातील ग्रामीण, नागरी क्षेत्राजवळील भागांमध्ये शेती व पिण्याच्या 
पाण्याचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी नवीन बोअरवेल घेणे, बोअरवेल दुरुस्ती व यासाठी वापरण्यात येणारे यंत्र व वाहनांचा अत्यावश्यक बाब म्हणून  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रवींद्र बिनवडे यांनी एका आदेशाद्वारे काम करण्यास परवानगी दिली आहे.


           3 मेपर्यंत जिल्ह्यातील मद्यविक्रीचे व्यवहार बंद
जालना, प्रतिनिधी :- जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,
जालना रवींद्र बिनवडे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील कलम 142 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करत जालना जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ देशी आणि विदेशी मद्य विक्री अनुज्ञप्तीचे व्यवहार     दि. 3 मे, 2020 पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्ती धारकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.


          आवश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी 
                           मास्क वापरणे बंधनकारक.
जालना,प्रतिनिधी:- साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसुचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार प्राप्त अधिकाराचा वापर
करत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रवींद्र बिनवडे यांनी कोवीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्या सर्व नागरिकांना तीन लेअर मास्क, साधा मास्क, होममेड कॉटन मास्क, हातरुमाल आदीचा वापर तोंड व नाक व्यवस्थित झाकले जाईल अशा पद्धतीने वापरणे बंधनकारक केले आहे.आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 आणि भा.द.वि. 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असल्याचे समजुन कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...