मंगळवार, १६ जून, २०२०

भाजयुमोच्या आवाहनाला परतुरकरांचा उत्स्पूर्त प्रतिसाद महाराष्ट्रात रक्त तुटवडा निर्माण होउ देणार नाही-माजी मंत्री बबनराव लोणीकर


परतुर -(प्रतिनिधि) इम्रान कुरेशी
****************************
हॅलो रिपोर्टर न्युज
परतुररात दि.१३-०६-२०२० रोजी ४०१ रक्तदात्यांचे रक्तदान राज्यात कोरोनासाथीचा प्रादुभाव वेगाने वाढत असून अश्या या गंभीर परिस्थिति मधे महाराष्ट्रात कुठेही रक्ताचा तुटवडा निर्माण होउ देणार नाही असे प्रतिपादन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले
    ते परतुर येथील भाजयुमो च्या वतीने मराठवाडा रक्तदान संयोजक राहुल लोणीकर यांनी देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कुल येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते
    ते पुढे बोलताना म्हणाले की, राहुल लोणीकर व त्यांच्या टीम ने परतुर आणि मंठा मंडळामधे २००० च्या वर विक्रमी रक्तदान करुण घेतले असून मराठवाड़ाभर युवा मोर्च्याच्या माध्यमातून  रक्तदान संयोजक म्हणून राहुल लोणीकर यांच्यावर रक्तदानाची जबाबदारी आहे मला निश्चितपनाने खात्री असून युवा मोर्च्याच्या माध्यमातून मराठवाडा तसेच राज्यात कुठेही रक्त तुटवडा निर्माण होणार नाही.
     भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामधे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जनसामन्याच्या मदतीसाठी भाजपा तत्पर असल्याचे ते म्हणाले.
      पुढे बोलताना ते म्हनाले की, केंद्रातील मोदी सरकारने कोरोना संकटाच्या काळात संकटावर मात करण्यासाठी वीस लाख कोटीचे पॅकेज देऊन देशातील व राज्यातील जनतेला दिलासा देण्याचे काम केले असल्याचे ते म्हणाले
   पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकरीसन्मान योजनेतील शेतकऱ्यांना आर्थिक मदत, जनधन योजनेतील खात्यावर थेट रक्कम, महिलांना मोफत गॅस या सह मोफत धान्य इत्यांदि सह अनेक योजना राबवत सर्वस्तरातील जनतेला दिलासा देण्याचे काम केले आहे.
     या वेळी रक्तदान शिबिराची पहानी करत युवा मोर्च्याच्या या उपक्रमाची स्तुति केली.

*नागरिकांचा उस्पूर्त प्रतिसाद*
         सकाळी ९ वाजता सुरु झालेल्या रक्तदान शिबिरामधे परतुर शहर व परिसरातील नागरिकांनी सोशल डिस्टन चे पालन करत रक्तदान केले
*रक्तदानात महिलांचा ही सहभाग*
     आज सपन्न झालेल्या या शिबिरामधे महिलांनी ही सहभाग नोंदवत  देश हिताच्या या कार्यास हातभार लावला
*मुस्लिम बांधवांचा रक्तदानात मोठा सहभाग*
  भाजयूमो च्या या रक्तदान शिबिरामधे  शहरासह परिसरातील मुस्लिम बांधवाणी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत रक्तदान शिबिरात  सहभाग नोंदवला
*या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी रफिक कुरेशी, रमेश भापकर, संपत टकले, सुबोध चव्हाण, प्रवीण सातोनकर,शत्रगुण कणसे, अशोक बरकुले, संदीप बाहेकर, रोहन आकात, प्रकाश चव्हाण, कृष्णा अरगडे,प्रशांत बोनगे, राजेंद्र मूंदडा, बंडू मानवतकर, नदीम शेख, रमेश आढाव, दत्ता बिल्हारे, प्रदीप कादे, अभिषेक सोलंके, गणेश सोलंके, बंडू भुंबर, नितिन जोगदंड, विष्णु मचाले, शुभम कोठारे, मलिक कुरैशी, शाकेर क़ायमखानी, सोनू अग्रवाल,ज्ञानेश्वर जईद, संतोष हिवाळे,विशाल कदम, राज सोलंके,मधुकर घनवट, रमेशराव चव्हाण यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.
या प्रसंगी रामप्रसाद थोरात,भगवान मोरे, दया काटे, बालाजी सांगूले, संभाजी खवल, ओम सेठ मोर, पद्माकर कवडे, रामेश्वर तनपुरे, जितु आन्ना अंभूरे, डॉ.नवल, डॉ.सय्यद,डॉ.घुगे डॉ.स्वप्निल मंत्री,यांची उपस्थिती होती.
रक्तसंचयासाठी जनकल्याण रक्तपेढ़ीचे शिवराज जाधव व सहकारी त्याच बरोबर नांदेड़ येथील गुरु गोविंदसिंग रक्तपेढ़ी नांदेड़, न्यू लाइफ रक्तपेढ़ी परभणी यांनी सहकार्य केले.


जालना शहरामध्ये सामाजिक अंतराचे पालन न केल्यामुळे 89 व्यक्तींवर कारवाई सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या 50 व्यक्तींकडून 28 हजार 900 रुपयांचा दंड वसुल - जिल्हा पोलीस प्रशासनाची माहिती.


जालना,ब्युरोचीफ :- जालना शहरामध्ये विविध ठिकाणी दुकानांमध्ये व बँकासमोर सामाजिक अंतराचे पालन न केल्यामुळे पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने संयुक्तरित्या कारवाई करत 89 व्यक्तींवर कलम 188 व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करत सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्या 50 व्यक्तींवर कारवाई करुन 28 हजार 900 रुपयांचा दंड वसुल केला असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.जालना शहरातील नवामोंढा भागात सामाजिक अंतराचे पालन करणाऱ्या दोन दुकानांवर तर गरीबशह बाजार व साईनाथ नगर परिसरातील दोन मेन्स पार्लवर ग्राहकांची गर्दी केल्याने तसेच सामाजिक अंतराचे पालन न केल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे.  महाराष्ट्र दारुबंदी कायद्याप्रमाणे जालना तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात येऊन 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहितीही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक अंतराचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा, विनाकारण घराबाहेर पडू नये, जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही पोलीस विभागामार्फत करण्यात आले आहे.


लॉकडाऊनच्या काळात जिल्हा पुरवठा विभागामार्फत 36 हजार 594 मे. टन धान्याचे वाटप शिवभोजन येाजनेच्या माध्यमातुन 1 लाखापेक्षा अधिक थाळया वितरित -  जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बसेय्यै यांची माहिती.


जालना,ब्युरोचीफ :- लॉकडाऊनच्या काळात समाजातील प्रत्येक गोरगरीबाला धान्य मिळावे यासाठी शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा पुरवठा विभागामार्फत एप्रिल ते जुन या कालावधीत गहू, तांदुळ, साखर, दाळी एकुण 36 हजार 594 मे. टन अन्नधान्याचे वाटप तर शिवभोजन योजनेच्या माध्यमातुन 1 लाख 2 हजार 770 लाभार्थ्यांना शिवभोजन थाळ्या वितरित करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसेय्ये यांनी दिली.
जिल्हा पुरवठा विभागासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसेय्ये यांनी तर शैक्षणिक संदर्भात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कैलास दातखीळ व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती आशा गरुड यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातुन फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
पुरवठा विभागासंदर्भात माहिती देताना श्रीमती बसेय्यै म्हणाल्या, जालना जिल्ह्यात विविध योजनांच्या माध्यमातुन रेशनकार्ड धारकांना 1280 स्वस्तधान्य दुकानांमार्फत धान्य वितरणाचे काम करण्यात येते. अंत्योदय अन्न योजनेंतर्गत 2 रुपये दराने गहु, 3 रुपये दराने तांदुळ तर 20 रुपये किलोप्रमाणे साखरेचे वाटप करण्यात येत असुन एप्रिल ते जुन दरम्यान 3 हजार 921 मे.टन धान्याचे वाटप करण्यात आले आहे. प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेंतर्गत 2 रुपये किलोदराने गहू, 3 रुपये दराने तांदुळ वितरित करण्यात येत असुन आतापर्यंत 15 हजार 493 मे. टन धान्याचे वाटप करण्यात आले आहे.  प्रधानमंत्री गरीबकल्याण योजनेंतर्गत एप्रिल ते जुन दरम्यान लाभार्थ्यांना प्रतीव्यक्ती 5 किलो तांदुळ व प्रतीकार्ड एक किलो चना अथवा तुरदाळ अशा पद्धतीने एकुण 15 हजार 30 मे.टन धान्याचे वाटप करण्यात आले आहे.  एपीएल शेतकरी लाभार्थी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 1 हजार 745 मे. टन धान्याचे वाटप करण्यात आले. एपीएल केशरी योजनेंतर्गत मे व जुन महिन्यात 8 रुपये किलो दराने गहू व 12 रुपये किलो प्रमाणे तांदुळ अशा पद्धतीने 405 मे. टन धान्याचे वितरण करण्यात आले आहे तर आत्मनिर्भर योजनेंतर्गत विस्थापित मजुर व विनाशिधापत्रिकाधारकांना 5 किलो प्रती तांदुळ व १ किलो प्रती कुटूंब मोफत अख्खाचना वाटप सुरु करण्यात येत असुन उज्वला गॅस योजनेंतर्गत एकुण 77 हजार 385 लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडरचे वाटप करण्यात आले असल्याची माहितीही श्रीमती बसेय्ये यांनी यावेळी दिली. समाजातील एकही व्यक्ती भुकेले राहू नये यादृष्टीकोनातुन सुरु करण्यात आलेले शिवभोजन केंद्रामार्फतही मोठ्या प्रमाणात शिवभोजन थाळयांचे वाटप करण्यात आले असल्याचे सांगत जालना जिल्ह्यातील एकुण 15 शिवभोजन केंद्राच्या माध्यमातुन दरदिवशी 1 हजार 500 प्रमाणे लॉकडाऊनच्या काळात एकुण 1 लाख 2 हजार 770 गोरगरीबांना केवळ पाच  रुपयांमध्ये शिवभोजन उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहितीही श्रीमती बसेय्ये यांनी यावेळी दिली. 
शासनाकडून मास्‍क व सॅनिटायजर या वस्तुंचा जीवनावश्यक वस्तुंमध्ये समावेश केल्यामुळे तसेच कोव्हीड19 च्या काळात या वस्तुंचा तुटवडा भासु नये यासाठी या वस्तुंचा काळाबाजार करणाऱ्यावर प्रशासनामार्फत कडक कारवाई करण्यात येत आहे.  जालना जिल्ह्यात आतापर्यंत 19 हजार 200 मास्क तसेच 730 नग सॅनिटायजरच्या बाटल्या जप्त करण्यात येऊन दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. तसेच लॉकडाऊनच्या काळात दोन स्वस्तधान्य दुकानांवा परवाना रद्द तर सहा दुकानांचा परवाना निलंबित करण्याबरोबरच 38 रास्तभाव दुकानाची अनामत रक्कम जप्त करुन 25 स्वस्तधान्य दुकानदारांना नोटीसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती सांगत नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी यावेळी दिली. शिक्षण विभागासंदर्भात माहिती देताना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कैलास दातखीळ म्हणाले, शालेय शिक्षण विभागाकडून टप्प्या-टप्प्याने शाळा सुरु करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या असुन पहिल्या पंधरवड्यात शाळा व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित करुन गावात, आपल्या भागात कोणाला कोरोनाची बाधा झाली आहे काय, कंन्टेन्टमेंट झोन आहे काय याबाबत चर्चा करावयाची आहे.  त्यानंतरच शाळा सुरु करण्याचा निर्णय घ्यावयाचा आहे.  प्रत्येक शाळांमध्ये निर्जंतुकीकरणाची कारवाई करण्यात यावी, अशी  माहितीही त्यांनी यावेळी दिली. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती आशा गरुड यांनीही शाळा सुरु करण्याच्यादृष्टीने उपयुक्त अशी माहिती देत नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.


लक्ष्मी कॉटेक्स जिनिंग सामनगाव येथे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते सी.सी. आय. कापुस खरेदी केंद्राचा शुभारंभ संपन्न


जालना,ब्युरोचीफ :- सामनगाव ता. जालना येथील लक्ष्मी कॉटेक्स जिनिंग येथे  नवीन  सी.सी. आय. कापुस खरेदी केंद्राचा शुभारंभ राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.या केंद्रावर जालना व घनसावंगी तालुक्यातील ऑनलाईन नोंदणीप्रमाणे शेतक-यांचा कापुस घेतला जाईल. यामुळे कापुस उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जालना जिल्ह्यातील शेतक-यांचा घरात कापुस विक्रीविना शिल्लक राहणार नाही, यासाठी आपण पुर्णपणे प्रयत्न करणार असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी आमदार कैलास गोरंट्याल, शिक्षण आरोग्य सभापती  कल्याणराव सपाटे, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, मार्केट कमिटीचे संचालक बाबा मोरे,मार्केट कमिटी अंबडचे चेअरमन सतिश होंडे, डॉ. निसार देशमुख, मार्केट कमिटी सचिव जालना श्री. इंगळे, लक्ष्मी कॉटेक्स जिनिंगचे संचालक संजय राठी, रमेश राठी, श्री. वरखडे, शरद तनपुरे, श्री. ठाकरे, अनिल खंडागळे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात अठरा व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर चौदा रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज - जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती


जालना,ब्युरोचीफ :- जिल्हा सामान्य रुग्णालयातुन यावलपिंप्री  ता. घनसावंगी येथील -2, काद्राबाद जालना येथील 1, बालाजीगल्ली आफसा मस्जिद जालना -1, राजेगाव ता. घनसावंगी–2, पांगरा ता. घनसावंगी – 3, पारडगाव ता. घनसावंगी– 1, नानसी ता.मंठा– 2, आकणी ता.मंठा -2 असे एकुण 14 कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दि. 16 जुन 2020 जालना शहरातील गुडलागल्ली परिसरातील 4, संभाजीनगर जालना – 1, काद्राबाद  - 3, खरपुडी ता. जालना 1, राज्य राखीव पोलीस दलातील – 02 जवान, बालाजीनगर, जालना येथील 01, गोलमस्जिद, काद्राबाद जालना येथील 01, जाफ्राबाद शहरातील नगर पंचायत परिसरातील -1 व आंबेडकरनगर परिसरातील – 1, भोकरदन शहरातील – 3 अशा एकुण 18 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण – 3466 असुन सध्या रुग्णालयात -83, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती -1298, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–73, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -4041, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने – 18 ,असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -309, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -3716, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-399, एकुण प्रलंबित नमुने -12, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1207.
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती–23, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती –1108, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-22, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-441, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत–12,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 83, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -133, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-14, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या -185,  सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या- 108, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या -08, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 8643, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 08 एवढी आहे. 
कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण -441 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये : संत रामदास वसतीगृह जालना –39,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह, जालना-23,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह,जालना -36,शासकीय मुलींचे वसतीगृह मोतीबाग जालना-38, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -191,हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद- 08, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -08, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड – 42, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे –02, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी -23, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -14, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद-11, डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र.02 भोकरदन -06 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 169 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 808 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 825 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 3 लाख 33 हजार 430 असा एकुण 3 लाख 60 हजार 238 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी नागरिकासह,व्यावसायिकांनो सामाजिक अंतराचे पालन करा - जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांचे आवाहन.


सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करणार


जालना,ब्युरोचीफ :- जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जवळपास 300 एवढी झाली असुन बाधितांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे.  ही अतिशय गंभीर व चिंतेची बाब असुन कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सामाजिक अंतराचे पालन करण्याबरोबरच प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी केले आहे.जालन्यामध्ये आजघडीला दुकांनामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे.  त्याचबरोबर अनेक दुकानदार सामाजिक अंतराचे तसेच प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे.सामाजिक अंतराचे, प्रशासनाच्या सुचनांचे  पालन न करणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्याबरोबरच दुकान सील करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगत  जालना शहरामध्ये काही ठिकाणी दुकानदारांवर कारवाई करुन त्यांची दुकाने सील करण्यात आले असल्याचेही जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी यावेळी दिली.

विराज जगतापच्या मारेकर्‍यांना फाशी द्या - संघर्ष शांती मोर्चा


जालना (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड पुणे येथे विराज जगताप यांची जातीय द्वेशातुन निर्घूणपणे हत्या करणार्‍या आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी व सोशल मिडीयाच्या माध्यमातुन दोन समाजात तेड निर्माण करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी जालना येथील संघर्ष शांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.
 महाराष्ट्रामध्ये दिवसागनीक जातीयवाद वाढत आहे. गुंडावर कायद्याचा वचक राहीलेला नाही. बौध्दांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार वाढत आहेत. बौध्द तरुण विराज जगताप याला प्रेम प्रकरणानून जिवे मारण्यात आलेे आहे.  नागपुर यथील अरविंद बनसोडे यांची सुध्दा हत्या करण्यात आलेली आहे. या प्रकरातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच या प्रकरणाला समोर करुन अनेक समाज कंटकांनी मोठ्या प्रमाणात दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य केले आहे. तसेच महापुरुषांची नावे घेऊन त्यांचा अवमान केला आहे. अशा समाज कंटकांवर तात्कळ गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी. अशी मागणीही संघर्ष शांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी ब्रम्हानंद चव्हाण, गणेश रत्नपारखे, अ‍ॅड. शिवाजी अदमाने, सुभाष गाडगे, आण्णासाहेब चित्तेकर, सुधाकर निकाळजे, रोहीदास गंगातिवरे, एन.डी. गायकवाड, संदीप खरात, विलाम रत्नपारखे, कपील खरात, रवि खरात, कैलास रत्नपारखे, संदीप रत्नपारखे, राहुल खरात, संदीप साबळे, सुनिल रत्नपारखे, राज रत्नपारखे, सचिन कांबळे, दिपक दांडगे यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...