मंगळवार, १२ मे, २०२०

भाजीपाला आणि हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणामध्ये बदनापूर शहरासहित आजूबाजू परिसरात मागणी...



भाजीविक्रेता विक्रेता युवकांनी लॉकडाऊनच्या  सुरुवातीपासून करतोय शहरातील नागरिकांच्या घरपोच सेवा...


कोई धंदा छोटा नही होता/ धंदे से बडा कोई धर्म होता.. (कैलास खैरे )

बदनापूर प्रतिनिधी :- बदनापूर शहरात राहणारा भाजी विक्राता कैलास खैरे  सर्वसामान्य कुटुंबात  राहणारा युवक याने लॉकडाऊनच्या सुरवातीपासून सोशल दिस्टर्शन ठेवून आपला व्यवसाय करत आहे. शहरातील वासियांना रोज ताजा भाजीपाला प्राप्त करून देतोय विशेष म्हणजे तो ऑर्डरनुसार प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन घरपोच सेवा देत आहे व्यवसाय मध्ये पारदर्शकता पणाने योग्य तो भाव शहरवासियांना परवडेल अशाच किमतीमध्ये भाजीपाला विक्री करतो. तसेच चांगल्या प्रकारे त्याच्या भाजीपाला आणि हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणामध्ये शहरातून मागणी येते त्याचप्रमाणे शहराच्या आजूबाजूच्या खेडेगावात जाऊन ऑर्डर प्रमाणे भाजीपाला हापूस आंबे पोहोच करतो.या युवकाने कोणतेही नोकरीच्या शोधात न लागता बेरोजगार म्हणून घरी बसून कारण दाखवायच आयुष्याला दोष द्यायचा आशा  गोष्टीला धुडकावून लावून  थेट आपली भूमिका या व्यवसायात उतरविली आणि छोट्या भांडवला  पासून मोठा भांडवल व्यवसाय कसा उभा राहील याकडे त्याची ओढ आहे.विशेष म्हणजे व्यवसायात जिद्द आणि कष्ट आणि प्रामाणिक पणा असला की कोणताही व्यवसाय

 न परवडणारा असु शकत नाही.  फक्त तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवला की नक्कीच कोणत्याही व्यक्तीला आपलंस करून घ्यायला वेळ लागत नाही हे ताज उदाहरण कैलास खैरे या तरुणाने बघितले लक्षात येते.आज कालच्या सुशिक्षित तरुणाईला कैलास खैरे यांच्याकडून आदर्श घेण्यासारखं नक्कीच आहे.

राज्य राखीव पोलीस दलाचा जवान व परिचारिकेच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह


जालना,प्रतिनिधी :- राज्य राखीव बलगट क्र. ३ येथील एका जवानाच्या स्वॅबचा तसेच आनंदनगर, नुतन वसाहत परिसरात राहणाऱ्या व जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या परिचारिकेच्या स्वॅबचा अहवाल आज दि. 11 मे, 2020 रोजी पॉझिटीव्ह आला असुन कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या सहवासितांची माहिती घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.


            दि. 10 मे रोजी रंगनाथनगर, पाण्याची टाकी परिसर,जालना येथील महिला कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनामार्फत खबरदारीची उपाययोजना म्हणुन पाच तालुकास्तरीय आरोग्य पथकाने परिसरातील 124 कुटूंबातील699 नागरिकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण केले. या कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कातील ३ हायरिस्क तसेच कानडगाव ता.अंबड येथील दोन कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कातील पाच हायरिस्क व्यक्तींच्या स्वॅबचे अहवाल तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असुन त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.
            जिल्ह्यात एकुण 1376 व्यक्ती संशयित असुन सध्यारुग्णालयात 31 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्याव्यक्तींची संख्या 810 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणीकेलेली संख्या 78 एवढी तर एकुण तपासणी केलेल्याव्यक्तींची संख्या 1222 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने-02 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 13 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1127, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यातआलेल्या नमुन्यांची संख्या 240, एकुण प्रलंबित नमुने-78 तरएकुण 779 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींचीसंख्या 24, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींचीसंख्या 595 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांचीसंख्या 01, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-283, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेलेसंशयित-10, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या31, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या02, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या268 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढीआहे.  
        जालना जिल्ह्यातुन इतर राज्यात जाण्यासाठी आजपर्यंत उत्तरप्रदेश-4140,बिहार-2681,मध्यप्रदेश-898, राजस्थान-658, पश्चिम बंगाल- 424, यासह उर्वरीत 14 राज्यातील एकुण -10118 तर जालना जिल्ह्यातुन महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 3352 अशा एकुण 13470 नागरीकांना पास उपलब्ध  करुन देण्यात आले आहेत.
आजपर्यंत जालना जिल्ह्यात इतर राज्यातुन 84 व राज्याच्या इतर जिल्ह्यातुन 1596 असे एकुण-1680 नागरीक दाखल झाले आहेत. या सर्वाना 14 दिवस होम क्वांरटाईन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातुन  आजपर्यंत             बिहार-20,आंध्रप्रदेश-46,ओरिसा-83,मध्यप्रदेश-687,छत्तीसगड-08,उत्तर प्रदेश- 1317,झारखंड -03,राजस्थान-59, तेलंगणा- 2 असे एकुण 2225 नागरीकांना परराज्यात पाठविण्यात आले आहेत.कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 283 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुनयामध्ये मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-15, मोतीबागयेथील शासकीय मुलींचे वसतीगृह-28, पोलीस प्रशिक्षणकेंद्र-90, मॉडेल स्कुल, अंबा रोड, परतुर-27, जिजाऊ इंग्लिशस्कुल जाफ्राबाद-15, हिंदुस्थान मंगलकार्यालय,जाफ्राबाद-06, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, भोकरदन-23,डॉ. बाबासाहेब आंबेडकरभवन इमारत क्र. 1-64, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड-6, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे 9 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.
     लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 524 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 87 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 571 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 81 हजार 300 असा एकुण 3 लाख 8 हजार 108 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

जाफराबाद तालुक्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसासह गाराचा वर्षाव


जाफ्रबाद,प्रतिनिधी :- जाफराबाद तालुक्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसासह  गाराचा वर्षाव तालुक्यातील काही  ठिकाणी पावसा सह  गारी पडल्याने शेतकरी चिंतेत पडले आहे. तालुक्यातील नळविहीरा खामखेडा आळंद बोरखेडी हिवरा काबली सावरगाव गोंदणखेडा याआसपास सर्व परीसरात गारीचा चक्री वादळासह  गारपिटीमुळे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी  या परिसरात सर्वात जास्त प्रमाणात सेड नेट घेत असतात  ह्या सर्व सेड चे खाली पडुन नुकसान झाले आहे. या परिसरात  फळ बागांचे सुध्दा जास्त प्रमाणात नुकसीन दिसुन आले आहे. मका बाजारा आंबा दाळींब  सेड नेट फळ बागांचे मोट्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
      एकीकडे कोरोना विषयी मोट्या प्रमाणात शेतकऱ्यांना भीतीने वातावरण पसरले आहे तर दुसरीकडे हे चक्र वादळासह गारपिटीमुळे नुकसान दिसुन येत आहे.
      लहान मुलांना जसे वाढवतो तसे ह्या मांलाना  शेतकरी राजा जिव लावत असतो पण मात्र काही छणातच  होत्याचे नव्हते झाले. या सर्व पिकांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी पंचनामे करावे अशी मागणी  शेतकरी सरसकट पंचनामे करावे अशी मागणी करत आहेत.

*औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील सौंदलगाव येथील घटना*


रुग्णवाहिकाचा दुचाकीला मागून धडक; एकाचा मृत्यू.

अंबड/प्रतिनिधी : प्रेत घेऊन जाणाऱ्या भरभर धाव रुग्णवाहिकेला दुचाकीला मागून धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना दिनांक ११ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील सौंदलगाव येथील देविदास रामदास खोमणे वय ४५ आपल्या गावावरून दुचाकीवर वडीगोद्री गावाकडे जात असताना एम.एच २० ए.क्यू ७९३१ पाठीमागून संभाजीनगर हुन बीड कड़े प्रेत घेऊन जाणारी रुग्णवाहिका क्रमांक एम.एच १६ बी.सी ००७२ या रुग्णवाहिका ने जोराची धडक दिल्याने देविदास खोमणे गंभीररीत्या जखमी झाल्याने वडीगोदरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले परंतु रस्त्याने मरण पावले असून प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. धडक दिल्याने रुग्णवाहिका ग्रामस्थांनी गोंदी पोलिस ठाण्याच्या स्वाधीन केले. घटनास्थळी गोंदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे व पोलीस कर्मचारी यांनी येऊन घटनास्थळी पाहणी केली व घटनास्थळी पंचनामा करून वाहिका ताब्यात घेऊन. रुग्णवाहिका मधील प्रेत दुसऱ्या गाडीत पाठवण्यात आले.

*अंबड- जालना रोडवरील न्यु.सुखसागर हॉटेलवर अंबड पोलीसांचा छापा, अंबड पोलीसांची धडाकेबाज कारवाई

*

27 बिअरचे बॉक्ससह एक स्कुटी असा एकूण 86 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त

हाँटेल मालक किरण भरतराव खरात यांच्यासह अन्य 3 जणावर गुन्हा दाखल.


अंबड/अरविंद शिरगोळे*: अंबड मधील जालना रोड बीड वरील असलेल्या सुखसागर हाँटेल वर अंबड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी काल दि.11 मे रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास न्यु.सुखसागर हॉटेलवर मोठ्या फौजफाट्यासह धाड मारली. यावेळी स्कुटी (क्र एमएच 21, बी.डी.- 0804) हीच्या मदतीने आनंदसागर बिअर बार & रेस्टॉरंट येथुन बिअर बॉक्सची अवैध रित्या वाहतूक करुन न्यु.सुखसागर हॉटेल & बारच्या पाठीमागे टिन पत्र्याचे शेड मध्ये साठवणुक केली जात होती.*हाँटेल मालक किरण भरतराव खरात यांच्या अंबडमध्ये सुखसागर हॉटेल,न्यु.सुखसागर हॉटेल & बार व आनंदसागर बिअर बार अशा तिन हाँटेल आहेत. तसेच किरण खरात हे भाजपा युवा मोर्चाचे जालना जिल्हाध्यक्ष सुध्दा आहेत. हाँटेल मालक किरण भरतराव खरात यांच्यासह अन्य 3 जणावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधीक्षक एस.चैतन्य,पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सि.डी.शेवगण यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्यासह स.पो.नि.संतोष घोडके,पो.उप.नि.सुग्रीव चाटे, शैलेश शेजुळ, जमादार वंदन पवार,संतोष कड, संदिप पाटील,लहाणे आदींनी कामगिरी बजावली आहे.


  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...