मंगळवार, ९ जून, २०२०

जिल्ह्यात चौदा व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर तीन रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती



जालना,ब्युरोचीफ :- जिल्हा सामान्य रुग्णालयातुन मठपिंपळगांव ता. अंबड येथील 40 वर्षीय एक महिला, धावडा ता. भोकरदन येथील 29 वर्षीय एक पुरुष, गोलावाडी- गणेश नगर ता. जालना येथील 40 वर्षीय एक महिला असे एकुण 03 कोरोनाबाधित रुग्णावर यशस्वी उपचार करुन व त्या सर्वांच्या दुस-या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.  तसेच दि. 9 जुन 2020 रोजी चौदा  व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
पॉझिटिव्ह सापडलेल्या व्यक्तींमध्ये  जालना शहरातील बालाजीनगर येथील -5, मोदीखाना येथील – 2,  गुडलागल्ली येथील -1, सरस्वती मंदीर परिसरातील – 3, बेथल ता. जालना येथील -2, सोनपिंपळगाव ता. अंबड येथील -1 असे एकुण 14 व्यक्तींचा समावेश आहे.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण -3043असुन सध्या रुग्णालयात -87 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती -1203, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या - 28 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -3252 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने – 14 ,असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -219 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -2991, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-373, एकुण प्रलंबित नमुने -38, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1111,
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 71, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती – 1005, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -04, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -508, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत–18,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 87, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -18, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-03, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या -125,  सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या- 84, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या -05,  पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 6318 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 05 एवढी आहे. 
कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 508 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-20,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -35 मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-24, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -208, कस्तुरबा गांधी बालिका वसतीगृह परतुर  -10, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-17, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-15, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे –42, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी -24, मॉडेल स्कुल मंठा-41,कस्तुरबा गांधी बालिका वसतीगृह मंठा- 15, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -02, मॉडेल स्कुल अंबा रोड परतुर – 22, पंचगंगा मंगल कार्यालय जाफ्राबाद-33 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 160 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 766 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 825 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 3 लाख 32 हजार 630 असा एकुण 3 लाख 59 हजार  438 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येते मुंबईहून आलेले 'ते' नऊ जण निगेटिव्ह



सिरसदेवी/शाम अडागळे :- गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येतील मूळ रहिवासी असलेला कोरोना पॉझिटिव्ह  रूग्ण हा काहिदीवसापूर्वी मुबईहून थेट बीडमध्ये आला होता त्याच्या सोबत सिरसदेवी येतील मुळ रहिवाशी नऊ जण आले होते हे सर्व एकाच  खाजगी वाहना मध्ये आले  त्या वाहना मध्ये पंधरा ते सोळा जण होते त्या पैकी तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह होते  एक सिरसदेवी तर दोघे बीड तालुक्यातील बेलापुरी येतील होते ईतर जे नऊ जण होते त्यांचे स्वयाब तपासणीसाठी पाठवले असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत त्यामुळे सिरसदेवी गावातील व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्या पॉझिटिव्ह रुग्णामुळे सिरसदेवी गाव हे अनिश्चित कालावधीसाठी जिल्हाधीकारी राहुल रेखावार साहेबांनी सिरसदेवी गाव हे कडेकोट बंद ठेवण्यात आले होते.सदरील नऊ लोकांची स्वयाब निगेटिव्ह आल्यानंतर लोकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले परंतु यापुढे लोकांनीं सतर्क राहावे जर बाहेर जिल्ह्यातुन कोणाचे पाहुणे आले असतील किंवा येणार आहेत .तर ग्रामपंचायतला कळवावे असे आव्हान रवींद्र गाडे (सरपंच) यांनी केले आहे.


पोलिसांची भूमिका संशयास्पद अरविंद बनसोड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा प्रकाश आंबेडकर

   

पुणे,ब्युरोचीफ :- अरविंद बनसोड याची हत्या झाली असून पोलिसांमार्फत ही आत्महत्या असल्याचे जाणीवपूर्वक पसरवले जात आहे. त्यामुळे हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) कडे देण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
        नागपूर, थंडीपवनी येथे अरविंद  बनसोड याची हत्या करण्यात आली होती. 27 मे रोजी झालेल्या या हत्याप्रकरणी पोलिसांनी राजकीय दबावापोटी आत्महत्येचा गुन्हा दाखल करून घेतला. कारण आरोपी मिथिलेस उमरकर हा गृहमंत्र्यांचा नातेवाईक आहे म्हणून हे प्रकरण दडपण्यात येत असल्याचा आरोप बनसोड यांच्या नातेवाईकांनी केला आहे. घटना घडली त्यावेळेस मयत अरविंद बनसोड याचा मित्र गजानन राऊत हा घटनास्थळी उपस्थित होता. त्याच्या समोर आरोपींनी बनसोड याला जबर मारहाण केली आणि नंतर त्यांनीच बनसोडला कीटकनाशक पाजले, प्रकरण हाताबाहेर गेल्याचे समजताच आरोपींनी कोणालाही न विचारता, बनसोडला स्वतःच्या गाडीत टाकून हॉस्पिटलमध्ये नेले, त्यापूर्वीच बनसोडचा मृत्यू झाला होता, अशी माहिती राऊत याने पोलिसांना दिली. मात्र पोलीस याबाबत कायदेशीर कारवाई करायला तयार नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. अशी माहिती वंचितचे राज्य  प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.


11 ते 16 जुन दरम्यान अधिकाऱ्यांनी जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधावा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश जारी.



जालना,ब्युरोचीफ :- जनतेच्या मनात असलेल्या प्रश्नांचे निराकरण व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी नुकताच फेसबुकलाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. या फेसबुक लाईव्हला जनतेने उत्स्फुर्त असा प्रतिसाद दिला.  जनतेच्या मनामध्ये आरोग्य, कृषी,पाणीटंचाई, गौणखनिज, दुष्काळी अनुदान, पीककर्ज, रोजगार हमी योजना, पुरवठा, शाळा असे अनेक प्रश्न असुन या प्रश्नांचे उत्तर त्यांना मिळावे यासाठी दि. 11 ते 16 जुन 2020 दरम्यान सायंकाळी  4-00 ते 5-00 दरम्यान सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी फेसबुकलाईव्हद्वारे जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जारी केले आहेत. ज्या प्रश्नांची उत्तरे वेळेअभावी फेसबुकलाईव्हद्वारे देणे शक्य होणार नाही, अशी उत्तरे लेखी स्वरुपात जनतेला देण्यात यावीत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशामध्ये नमूद केले आहे.
दि. 11 जुन  2020 रोजी सायं. 4-00 ते 4-30 या वेळेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड हे आरोग्य विषयक असलेल्या बाबींची माहिती देण्याबरोबरच जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देणार असुन सायं. 4-30 ते 5-00 या वेळेत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नानासाहेब चव्हाण हे कापुस खरेदी (पणन), महात्मा ज्योतिबा फुले पीककर्ज योजना या विषयावर तर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे हे पीकविमा, पीककर्ज, खरीप हंगाम, पोखरा योजना, खते, बि-बियाणे व कृषि विषयक योजनांची माहिती देतील.
दि. 12 जुन रोजी ग्रामीण आरोग्य व प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपचाराबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. विवेक खतगावकर हे सायं.4-00 ते 4-30 या दरम्यान जनतेशी संवाद साधतील तर सायं 4-30 ते 5-00 या वेळेत अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे हे गौणखनिज तक्रार तसेच विविध परवानग्याबाबत माहिती देतील.
दि. 13 जुन रोजी ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता श्री. डाकोरे हे सायं. 4-00 ते 4-30 दरम्यान पाणीटंचाई व उपाययोजना या विषयावर नागरिकांशी संवाद साधतील तर सायं. 4-30 ते 5-00 दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड हे पीएम किसान, दुष्काळी अनुदान, ई-फेरफार या विषयावर माहिती देऊन जनतेनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतील.
दि.15 जुन रोजी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेशी संबंधित माहिती देण्याबरोबरच जनतेशी उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर हे संवाद साधणार असुन सायं. 4-30 ते 5-00 या वेळेत उपजिल्हाधिकारी भुसंपादन गणेश निऱ्हाळी हे भुसंपादन बाबीविषयक माहिती देतील.
दि. 16 जुन रोजी पुरवठा विषयक बाबींची माहिती सायं. 4-00 ते 4-30 दरम्यान जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसैय्ये या देणार असुन जिल्ह्यातील शाळा सुरु करणे तसेच त्याअनुषंगाने असलेल्या प्रश्नांची उत्तरे शिक्षणाधिकारी प्राथमिक कैलास दातखीळ व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शोभा गरुड या 4-30 ते 5-00 या वेळेत देणार आहेत.
दि. 11 ते 16 जुन, 2020 दरम्यान जिल्हयातील विविध अधिकाऱ्यांचा हा फेसबुक लाईव्ह संवाद जनतेला  https://www.facebook.com/diojalna या फेसबुक पेजवर सर्वांना साधता येणार असुन जनतेने त्यांचे प्रश्न, असलेल्या शंका सर्व संबंधित अधिकाऱ्यांना विचारुन निरसन करुन घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.


चिखली मातंग समाज बँड संघटना नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा चिखली मातंग समाजाच्यावतीने केला सत्कार..


चिखली,ब्युरोचीफ :- चिखली तालुका मातंग समाजाच्या वतीने मातंग समाज बँड पथक,संचालक व वाजंत्री कलाकार यांच्या कल्याणासाठी, न्याय हक्कासाठी चिखली तालुका व शहर मातंग समाज बँड संघटनेच्या शाखा गठीत करून नियुक्त्या जाहीर केल्या. या संघटनेचे नवनियुक्त चिखली तालुका मातंग समाज बँड संघटनेचे अध्यक्ष नितीन साळवे ,उपाध्यक्ष रामदास कांबळे, चिखली शहर अध्यक्ष प्रवीण कांबळे, उपशहर अध्यक्ष सुभाष कांबळे, शहर सचिव सचिन कांबळे, कोषाध्यक्ष रमेश घाडगे, सल्लागार भारत साळवे,रमेश साळवे,सदस्य शेषराव साळवे, नामदेव ढगे, शांताराम यंगड,नितीन कांबळे आहे. तरी या नवनियुक्त संघटनेचे पदाधिकारी यांचा सत्कार आज.दि.०९जून रोजी चिखली येथील पंचायत समितीच्या भवनात पार पडला. छोटेखानी या कार्यक्रमाचे अध्यक्ष  अंकुशराव तायडे,तर प्रमुख पाहुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजानन पवार, पत्रकार छोटु कांबळे उपस्थित होते. हा कार्यक्रम सुरक्षित अंतर ठेवून पार पडला.

अंबड मध्ये कोरणा बाधितांची रुग्ण संख्या आता 11 वर आंबेडकरांची धाकधूक वाढली असून मोठी खळबळ




65 वर्षीय व्यक्तीचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त त्याच्या संपर्कातील सात व्यक्ती क्वारंटाईन


अंबड/प्रतिनिधी : शहरातील नाईकवाडी मोहल्ला वंजार गल्ली परिसरातील पुन्हा एका 65 वर्षीय व्यक्तीचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्याने आंबेडकरांची धाकधूक वाढली असून मोठी खळबळ उडाली आहे संबंधित रुग्णांच्या संपर्कात असलेल्या सात व्यक्तींना तातडीने करून टाईप करण्यात आले असून शहरातील बाधितांची रुग्ण संख्या आता अकरा वर गेले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की अंबड शहरातील नाईकवाडी मोहल्ला वंजार गल्ली चा एकच परिसर असून या परिसरातील काही दिवसांपूर्वी पाच रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने सदर परिसर हा कंटेनमेंट झोनमध्ये प्रशासनाकडून घोषित करण्यात आल्याने आंबेडकरांच्या चिंतेची बाब होऊन मोठी खळबळ उडाली होती परंतु तीन दिवसापूर्वी निगेटिव प्राप्त झालेल्या चार रुग्णांना अंबड येथील कोरोना covid-19 सेंटर मधून उपविभागीय दंडाधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार राजू शिंदे, अंबड नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर घोलप, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.तलवाडकर, समाज कल्याण विभागाचे सूननगत, डॉक्टर्स, नर्स व अन्य कर्मचारी यांच्या उपस्थित पूर्ण वर्षाव करून सुट्टी देण्यात आल्याने शहरातील नागरिक समाधान झाले होते. शहरातील नागरिकांची चिंता दूर होते ना होत तर दिनांक 6 जून रोजी अन्य बाहेरील जिल्ह्यातून ये जा करून आलेल्या अथवा कोरोना बाधितांच्या संपर्कातील कोणताही इतिहास नसलेल्या एका 65 वर्षीय व्यक्तीस खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने तो अंबड शहरातील एका मोठ्या नामांकित खाजगी दवाखान्यात दिनांक 1 जून रोजी उपचारासाठी दाखल होऊन घरी गेला. सदर खाजगी दवाखान्याचे नाव आणखी गुपित असून त्याबद्दल अधिक माहिती मिळू शकली नाही 2 दिवस घरीच उपचार घेतल्यानंतरही फरक न पडल्याने तो तक दवाखान्यात पुन्हा 3 जून रोजी गेला असता डॉक्टरांनी त्याचा एक्स-रे काढून उपचार करण्याचा प्रयत्न केला मात्र फरक न पडल्याने त्या जालना येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जालना जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या लाळेचे नमुने घेऊन तपासण्यासाठी लॅबला पाठवल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला सदर रुग्णाच्या संपर्कात आलेले सात व्यक्तींना तात्काळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुला-मुलींचे वस्तीग्रह अंबड येथे असलेल्या कोरोना covid-19 सेंटर येथे क्वारंटाईन करण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली असून आंबेडकरांच्या चिंतेत वाढ झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. उपविभागीय दंडाधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार राजू शिंदे, अंबड नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर घोलप,पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.तलवाडकर, डॉ.दयानंद पाठक, डॉ.मयूर साडेगावकर , नगरपरिषद कर्मचारी तसेच  अंबड पोलीस स्टेशन कर्मचारी यांनी तात्काळ सदरील परिसरातील पाहणी करून भेट दिली.


चिंचाच्या झाडाकडे व्यापारांनीं फिरवली पाट सिरसदेवी परिसरातील चित्र





सिरसदेवी/ शाम अडागळे :- कोरोनाचे संकट शेतकरी यांच्या पथ्यावर पडले असून सिरसदेवी परिसरातील चिंचेच्या झाडाकडे यंदा व्यपारांनी पाठ फिरवली आहे यंदा हंगामात चिंचेची झाडे फुलांनी बहरली असल्याने शेतकरी यांना आर्थिक आधार ठरणारी यंदा मृगजवळ ठरण्याची आहे. शेतकरी यांच्या शेतात बांधावरील चिंचेच्या झाडाला चिंचा खूप आहेत त्यांना मोठा आर्थिक फायदा होत असल्याचे शेतकरी सलग पद्धतीने लागवड केली आहे. दुष्काळ असो अथवा अतिवृष्टी ही बांधावरील चिंचा व लागवड केलेल्या चिंचेच्या फळबागा शेतकऱ्यांना मोठा आधार असून यंदाच्या हंगामात मात्र चिंचेचे झाड फुलांनी भरून येऊन ही कोरोनाच्या संकटामुळे चिंचेच्या झाडाला चिंचा मोठया प्रमाणात आहेत दरवर्षी चिंचेच्या फळांच्या उत्पादनासाठी व्यापारी साधारनपणे वैशाखी अमावश्याला झाडांच्या फुलांच्या बहारातच व्यापारी सौदा करतात . बहरात चिंचेच झाड असताना व्यापरांना कमी पैसात मिळतात  फळांच्या सात तेआठ महिनेपूर्वी शेतकरी यांना ऐन आखाडात पैसे मिळत असल्याने  शेतकरी व व्यापारी दोघांचेही भागते शेतकरी यांना पेरणीच्या पूर्वतयारीसाठी आर्थिक मदत होते कोरोनामुळे यंदाच्या हंगामात मालही विक्री करता आला नाही व वाढलेल्या तापमानामुळे चिंचेची गुणवत्ता ढासळली आहे .यामुळे चिंचेची दर कमी होण्याची शक्यता आहे .

दर वाढ झालेल्या बी बियाणांच्या किमती शासनाने कमी कराव्यात-महात्मा ब्रिगेड सतीश राऊत याची मागणी.




परतूर /प्रतिनिधी:- मागील वर्षी  परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. या मुळे सोयाबीन बियाणाची प्रत खालवली आहे. याची झळ आता आगामी खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांना  सोसावी लागत आहे. सोयाबीन चे बियाणे कि्वंटल मागे एक हजार रूपये पेक्षा अधिक महागले आहे. प्रामुख्याने महाबीजच्या बियाणाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा  सुर उमटत आहे. सोयाबीन बियाणाची 30 किलोची बॕग मागील हंगामात 1890रुपये पर्यत विकली जात होती. परंतु  यंदा तीच बॕग 360 रू. ने महाग झालेली आहे. ही दरवाढ शेतकऱ्यांना  परवडणारी नाही.
अशा परिस्थितीमध्ये शासनाने ही दरवाढ कमी करावी किंवा बी बियाण्यांच्या बाबतीत शासनाने शेतकऱ्यांसाठी पॅकेजची घोषणा करावी कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॕकडाऊन मुळे शेतकऱ्यांचे सुध्दा नुकसान झालेले आहे.
सध्या मागील काही महिन्यांपासून  लॉक डाऊन मुळे शेतकरीवर्ग सुद्धा  हवालदिल झालेला आहे.  शेतकऱ्यांच्या शेतीमाला वर सुध्दा लॉकडाउनचा परिणाम झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये  शेतकऱ्यांना अधिक महाग किंवा अधिक  चढ्या भावाने  बी बियाणे  विकत घेणे परवडण्यासारखे नाही. म्हणून  शासनास  निवेदन आहे की आपण याकडे लक्ष घालून शेतकऱ्यांसाठी  उपाययोजना कराव्यात. अशी मागणी महात्मा ब्रिगेडचे परतुर तालुका अध्यक्ष सतिश राऊत यांनी केली आहे.




मोसंबी व लिंबाच्या झाडावर किड्यांचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत


घनसावंगी प्रतिनिधी/असलम कुरेशी :- घनसावंगी तालुक्यातील रांजणी व परिसरात मोसंबी व लिंबाच्या झाडावर सोमवारच्या रात्री पासून विचित्र किडे दिसत असून हे किडे संपूर्ण झाडाचा पाला खात आहेत. त्यामुळे मोसंबी व लिंबाची झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

यासंदर्भात अशोक ढोबळे यांनी सांगितले की त्यांचा शेतात मोसंबीची 500 झाडे आहेत. मोसंबीचे उत्पादन वाढावे म्हणून त्यांनी या पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च केलेला आहे. सध्या या झाडांना मोसंबी लागत आहे. परंतु या झाडावर विचित्र प्रकारच्या किड्यांनी हल्ला केल्यामुळे ही झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमोल देशमुख यांनी सांगितले की हे किडे रात्री अंधार पडल्यावर झाडावर हल्ला चढवतात आणि संपूर्ण झाडाचा पाला खात असल्याने अख्खे झाड नष्ट होत आहे. सोमवारच्या रात्री या किड्यांनी अशोक ढोबळे यांच्या 50 ते 60 झाडांचा पाला खाऊन नष्ट केले आहे. तसेच अमोल देशमुख यांच्या शेतातील जवळपास 200 झाडांचा पाला खाल्ला. आधीच शेतकरी लाॅकडाऊन, अवकाळी पाऊस व गारपिटीचा सामना करून हैरान झालेला असताना या किड्यांनी शेतक-यांची झोप उडवली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता असल्याने कृषि विभागाने शेतक-यांना मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे. मोसंबीच्या झाडांचे नुकसान होत असल्याने रांजणी परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


अंबड शहरातील राशन दुकानदाराचा मनमानी कारभार ; गोरगरिबांचे होताहेत हाल

ज्यांच्याकडे राशन कार्ड त्यानांच स्वस्त धान्य !


अंबड शहरातील राशन दुकानदाराचा मनमानी कारभार ; गोरगरिबांचे होताहेत हाल


जालना,प्रतिनिधी :- ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही व राशन कार्ड आँनलाईन नाही  त्यांना राशन दुकानदार राशन देत नसल्याने लॉक डाऊन मध्ये गोरगरीब कुटुंबांची उपासमार होत आहे. प्रशासनाकडून राशन दुकादारां च्या मनमानीला चाप लागेल का, असा सवाल उपस्थित होत आहे.संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले असून गरीबांना हाताला काम नाही.काम नाही तर पैसा नाही. यामुळे मोलमजुरी करणाऱ्या शेकडो गरीब लोकावर उपासमारीची वेळ आली आहे.या काळात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना मोफत तांदूळ मिळाल्याने मोठा आधार मिळाला आहे. त्याचबरोबर मे महिन्यात डाळीचे वाटप करण्यात आले. मात्र असे असलेल तरी अंबड परिसरातील अनेक गावात राशन कार्ड नसल्याने धान्यापासून वंचित असलेले दिसून येत आहे. सध्या सर्वत्र कोरोनाने संकट ओढवले आहे. ज्यांचे राशन कार्डमध्ये नाव नाही त्यांना राशन दुकानदार राशन देत नाहीत.राशन दुकादारांचा मनमानी कारभार सुरू आहे.

  शासनाच्या वतीने प्राधान्य कुटुंब तसेच शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत तांदूळ व डाळी चे मोफत वाटप करण्यात येत आहेत .त्यात अंतर्गत लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वाटप सुद्धा करण्यात आले आहे .त्यानंतर आता ह्या मे महिन्यात अंत्पोदय व प्राधान्य गटातील कार्ड धारकांना प्रति कार्ड एक किलो मोफत डाळीचे वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार अंबड शहरात काही राशन दुकानदार गहू किंवा तांदूळ कमी देत आहेत.  रेशन कार्ड नसलेले व रेशन कार्ड ऑनलाइन असलेल्या नागरिकांना धान्य मिळत नसल्याचे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे रेशन कार्ड नसलेले व रेशन कार्ड ऑनलाईन असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ न मिळाल्याने धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.  ज्यांना राशन कार्ड नाही त्यांना देऊन  व रेशन कार्ड ऑनलाइन केलेले नाही त्यांचे रेशन कार्ड ऑनलाइन करून रखडलेले प्रश्न दूर करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान, याबाबत येथील स्वस्त धान्य दुकानदार श्री. बिडकर यांना विचारले असता ते म्हणाले,ज्याचे  राशन कार्ड आँनलाईन आहे त्यांना राशन देणार आहे.ज्यांच्याकडे  राशन कार्ड नाही ते ऑनलाईन पण नाही  त्यांना राशन देता येत नाही.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...