रविवार, १९ एप्रिल, २०२०


*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी*
*कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता**-- गृहमंत्री अनिल देशमुख*
*जालना, ब्युरो चीफ*  –  जालना जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढू नये.
यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देत कोरोनाविरुद्धची ही लढाई जिंकण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोना तसेच कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना गृहमंत्री श्री देशमुख बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसेय्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदींची उपस्थिती होती.गृहमंत्री श्री देशमुख म्हणाले,  देशासह राज्यावर कोरोना विषाणुची आपत्ती कोसळली आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन व प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. जालना जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणुमुळे केवळ एक महिला बाधित आहे.  परंतू जिल्ह्यात या विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये यादृष्टीकोनातुन जिल्हा प्रशासनाने योग्य ती दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.गरजूंना स्वस्तधान्य दुकानाच्या माध्यमातुन वेळेत पुरेसे धान्य उपलब्ध होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याबरोबरच ज्यांच्या रेशनकार्ड नाही अशा व्यक्तींनासुद्धा धान्य उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात यावे. लॉकडाऊनच्या काळामध्ये जालना जिल्ह्यामध्ये अडकून पडलेल्या पराज्यातील मजुर तसेच विद्यार्थ्यांच्या जेवणाची व राहण्याची जिल्हा प्रशासनाने अत्यंत चांगली व्यवस्था केल्याने गृहमंत्र्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्यात कोरोना विषाणुच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपायोजनांची माहिती दिली. तर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी मंत्री महोदयांना दिली.


औरंगाबादचे डीएचओ डॉ. गीते यांच्या कारमध्ये विदेशी दारूसह                           06 लाख रुपये सापडले !
जिल्हा बंदीचे केले उल्लंघन ; बदनापूर जवळ चेक पोस्टवर पोलिसांनी पकडले
जालना,प्रतिनिधी :- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेली जिल्हाबंदी मोडीत काढत चक्क कारमध्ये विदेशी दारू आणि सात लाख रुपयांची रोख  रक्कम घेऊन 
जालन्याकडे निघालेल्या औरंगाबाद येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांना  बदनापूर तालुक्यातील वरुडी चेकपोस्टवर पकडण्यात आले. त्यांच्या विरुद्ध विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर l जिल्हा बंदी करण्यात आलेली आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने तेथील कोणत्याही वाहनांना जालना जिल्ह्यात विनापरवानगी येता येत नाही. शनिवारी  ( दि.१८) औरंगाबाद येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते हे त्यांच्या ( एम.एच.२० सी. यू. ०३५३ )  महागड्या इर्टीका कारमध्ये विदेशी दारू आणि ६ लाख ७० हजार रुपये रोख रक्कम सोबत घेऊन  जालन्याकडे त्यांच्या मूळगावी बुलढाणा जिल्ह्यात लोणारकडे निघाले होते. त्यांच्या कारवर महाराष्ट्र शासन लिहिलेले होते.जालना जिल्ह्याच्या सीमेवर बदनापूर तालुक्यातील वरुडीनाक्यावर त्यांची गाडी पोलिसांनी अडवून तिची तपासणी केली.यावेळी गाडीत रोख 6 लाख 70 हजार रुपये, 6 हजार रुपये किंमतीची दारू आढळून आली.रोख रक्कम, दारू व 6 लाख रुपये किंमतीची कार, असा एकूण 12 लाख 76 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी बदनापूर पोलिसांनी डॉ. अमोल गीते यांच्याविरुद्ध राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005चे 51 (ब), महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या 65 (अ) (ई) आणि भादंवि. 188 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र व शिवसेना-युवासेना पक्षाच्या वतीने कोरोना पार्श्वभूमीवर अन्न धान्याचे २८०० किट व ९००० कुटुंबना कांदा व बटाटेचे किट वाटप करुण मानुसकीचे नाते जपले.
प्रतिनिधी |नाशिक आजचा चौदावा दिवस दि १८/४/२०२० प्रभाग क्र 9 शिवाजीनगर,जिजामाता कॉलनी, साई बाबा गार्डन,महाराणा प्रताप चौक,विठाई चौक,स्वामी समर्थ केंद्र परिसर, श्रीकृष्ण मंदिर परिसर,जुने दत्त मंदिर परिसर, सप्तशृंगी नगर परिसर, शनि मंदिर परिसर,शिव शक्ति चौक,अभ्यासिका परिसर,धर्माजी कॉलनी, श्रमिकनगर भाग माळी कॉलनी, स्वामी समर्थ केंद्र परिसर, कालिका मंदिर, विट्ठल रुक्मिणी मंदिर, छत्रपति संभाजी नगर कॉलनी, अभ्यासिका
 परिसर, गणेश मंदिर, शनि चौक, तुळजा भवानी मंदिर परिसर, आय टी आय कॉलनी तसेच इतर परिसरात देखील आता पर्यंत २८०० किट गरीब व गरजू कुटुंबांना

दैनंदिन जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.त्यामध्ये प्रामुख्याने तांदूळ,गव्हाचे पीठ,तेल,मीठ,साखर,हळद,मिरची,अंगाची साबण,मसूर दाळ,मसाला,बिस्कीट इ.चे वाटप करण्यात आले. तसेच २० टन कांदे आणी 10 टन बटाटे यांचेही वाटप करण्यात आले.हे सर्व किट घरोघरी जाऊन देण्यात आले व शाषणाने दिलेल्या सर्व नियम पाळून ही मदत करण्यात आली.
        यावेळी करण गायकर यांनी मानवता हाच सर्वात मोठा धर्मं आहे त्यापेक्षा कोणती जात धर्मं व्यक्ति मोठी नाही त्यामुळे समाजातील दानशुर व्यक्तिनी  सरळ हाताने पुढे येऊन गरजूवंतांना मदत करावी तसेच
      आपण घरात थांबुन आपले कुटुंब आपला परिसर,जिल्हा,राष्ट्र  कोरोनापासून सुरक्षित ठेवु शकतो . आपण सुरक्षित तर आपला परिवार व देश सुरक्षित राहील ही लढाई आपण घराच्या बाहेर नाही तर घरात थांबुनच जिंकू शकतो पोलिस व शासकीय यंत्रणेला आपण सहकार्य करावे असे आवाहन देखील करण गायकर यांनी केले आहे.

            यावेळी  छावा क्रांतिवीर सेनचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर,सामाजिक कार्यकर्त्या सविता गायकर,शिवसेनेचे प्रमोद जाधव, कैलास आण्णा गायकर, समाधान गायकर, युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदें,गिरीश आहेर,अविनाश गायकर,युवासेना उप महानगर प्रमुख सचिन निकम,प्रितेश पाटील,किरण बोरसे,वैभव दळवी, अनिल वाघचौरे, रवी भांबिरंगे ,रोहित कांडेकर, रोहन सपकाळ, भाऊ कदम, छगन भले, यांनी अथक परिश्रम घेतले.



===========================°°°°=°°°°°========================================

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...