रविवार, २ ऑगस्ट, २०२०


पत्रकारांना हेतुपुरस्सरपणे गुन्ह्यात अडकावणाऱ्या पोलीस अधिकारी व प्रदुषण महामंडळ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा - शीतल करदेकर


जालना/प्रतिनिधी :- जालना येथील दैनिक गोकुळनीतीचे संपादक अर्पण गोयल, दैनिक तात्काळ राज्यवार्ताचे संपादक भरत मानकर यांचेसह चार पत्रकारांवर आकसाने गुन्हे दाखल केल्याबद्दल जालन्यासह राज्यभरातील पत्रकारांनी या कृत्याचा कठोर निषेध केला आहे.
हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील अत्याचार आहे आणि ज्यांनी हे चुकीचे कृत्य केले आहे त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच जालन्यातील प्रदुषण तातडीने थांबवावे अशी आग्रही मागणी नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे  यांचेकडे केली आहे.
              याबाबत सविस्तर वृत्त असे की जालना येथील संपादक गोयल व मानकर  दि.२८ जुलै २०२० रोजी प्रदूषण महामंडळाच्या कार्यालयात जालना येथील वाढत्या प्रदूषणासंदर्भात माहिती घेण्यासाठी गेले असता तेथील अधिकारी सौ. योगिनी अविनाश बाळंके यांनी पत्रकारांना वेळ न देता कुठलीच माहिती उपलब्ध करून न देता उलट कार्यलयातील सेक्युरिटी मार्फत एका आठवड्या नंतर येऊन माहिती घेऊन जाण्याचा सल्ला दिला.वारंवार जालना येथील एमायडीसीमुळे प्रदुषण वाढते आहे. अनेकदा याबाबत  प्रदुषण महामंडळ अधिकार्‍यांचे लक्षात आणून दिले. बातम्या लिहिल्या याचा राग सौ. योगिनी अविनाश बाळंके यांचे मनात होताच. त्यामुळे उडवाउडवीची उत्तरे देणे, आपले कर्तव्य नीट न बजावणे, पत्रकारांना अपमानकारक वागणूक देणे आणि जे चुकीचं काम करतोय याबाबत जराही अपराधी भावना नसणे अशी मनमानी करण्याच्या त्यांच्या वागणुकीची तक्रार करण्यासाठी अर्पण गोयल आणि भरत मानकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे गेले असता त्यांची लेखी कैफियत निवासी जिल्हाधिकारी  मा. निवृत्ती गायकवाड यांच्याकडे मांडण्याचे सांगण्यात आले. त्यांनी पत्रकाराचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांनी दिलेल्या तातडीने प्रदूषण अधिकारी सौ. योगिनी अविनाश बाळंके यांना मोबाईलवर कॉल करून पत्रकारांना माहिती देण्याचे सांगितले शिवाय त्या औरंगाबाद येथून अप-डाऊन करीत असल्याने त्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देखील देण्यात आले. प्रदूषण नियंत्रण अधिकारी सौ. योगिनी अविनाश बाळंके यांच्या औद्योगिक वसाहत कार्यक्षेत्रात प्रदूषण वाढले असल्याने याबाबत कुठलीच कारवाई ही होत नसल्याने सौ. बाळंके यांची लेखी तक्रार दि.२९ जुलै २०२० रोजी प्रदूषण महामंडळ विभागीय कार्यालय औरंगाबाद येथील कार्यालयात करण्यात आली होती. याबाबतची बातमी दैनिक गोकुळनीती आणि दैनिक तात्काळ राज्यवार्ता यांनी छापली होती. याशिवाय प्रदूषणच्या बाबतीत पर्यावरण मंत्री ना. अदित्य ठाकरे यांना देखील तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी या सर्व गोष्टीचा राग मनात धरून प्रदूषण अधिकारी सौ. योगिनी अविनाश बाळंके यांनी चंदनझिरा पोलिस ठाण्यात हेतुपुरस्सरपणे  दैनिक गोकुळनीतीचे संपादक अर्पण गोयल, दैनिक तात्काळ राज्यवार्ताचे संपादक भरत मानकर, प्रदूषण महामंडळाच्या कार्यलयात कधीच पाय न ठेणारे पत्रकार विष्णु कदम यांनी बातमी लिहिली यासाठी आणि विष्णु कदम त्यांचे मित्र नीलकंठ कुलकर्णी जे नेहमी त्यांच्या सोबत राहतात त्यांचे नावाने गुन्हा नोंदवण्यात आला.
चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कौठाळे यांनी देखील त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या अट्टल गुन्हेगारांना कधीच पकडले नाही परंतु पत्रकार गुन्हेगार असल्याप्रमाणे कुठली ही चौकशी न करता  गुन्हा नोंदविला खरं तर पत्रकार सुरक्षा कायद्याखाली एसीपी दर्जाच्या अधिकार्‍यांनी ही चौकशी करुन, मग गुन्हा दाखल करने आवश्यक होते. मात्र केवळ 'आधी माहिती द्या, मग इतर काम करा' असं म्हटलं  तर सरकारी कामात अडथळा निर्माण होतो का ?   हा मोठा प्रश्न या कार्यतत्पर अधिका-याच्या कार्यशैलीवर निर्माण झाला आहे. पत्रकारांनी बातमीसाठी माहिती विचारणे हा जर गुन्हा ठरत असेल तर भविष्यात शासकीय कार्यलयात जाण्यापुर्वी पत्रकारांना संबंधित पोलिस ठाण्यात अर्ज देऊन  पोलिस संरक्षणं आणि सोबत साक्षीदार  घेऊन जावे लागेल. प्रदूषण महामंडळच्या अधिकारी सौ. योगिनी अविनाश बाळंके  जालना येथे कार्यरत झाल्या पासून आजपर्यंत त्यांच्या कार्याचा आढावा  घेतल्यास सर्व सत्य बाहेर येईल. मा. मुख्यमंत्री महोदयांनी याची गंभीरपणे दखल घेऊन पत्रकारांना न्याय मिळवून द्यावा प्रदूषण नियंत्रण  महामंडळच्या अधिकारी सौ. योगिनी अविनाश बाळंके व चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कौठाळे यांचेवर कठोर कारवाई    करण्यात यावी अशी मागणी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आली आहे. पत्रकारांवर गुन्हे व अटक केल्यानंतर तरी जालन्यातील वाढते प्रदुषण  नियंत्रणात येईल का ? हा सवाल आहेच.हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील अत्याचार आहे आणि हे आता थांबायला हवेच अशी ही आग्रहाची मागणी करदेकर यांनी पत्राद्वारे करण्यात आलीआहे. एनयुजे महाराष्ट्र नेहमीच सक्षम समाजासाठी व पत्रकारांच्या सन्मानासाठी काम करीत असून यासाठी याची प्रत मा.गृहमंत्री अनिल देशमुख, मा.पर्यावरण मंत्री, आदित्य ठाकरे,मा. सदस्य सचिव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना पाठवण्यात आली आहे अशी माहिती एनयुजे महाराष्ट्र कोषाध्यक्ष वैशाली आहेर यांनी दिली आहे


जिल्ह्यात 66 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह 49 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती.



जालना,ब्युरो चीफ :- जालना शहरातील  गोपाळपुरा -1, रहेमान गंज -1, जालना शहर -1, प्रयागनगर -1, संभाजीनगर -3, मंगळबाजार -1, सारथी कॉलनी -2, गोपिकिशन  नगर -3, माणिकनगर -1, अग्रसेन नगर -1, जवाहर बाग -2, ख्रिस्ती कॅम्प -2, कन्हैयानगर -9, खरपुडी -1, पोलास गल्ली  -1, लक्ष्मीनारायणपुरा -1,संभाजीनगर -2, आझाद मैदान -1, कालीकुर्ती -3, पोस्ट ऑफिस -1, जमुनानगर -1, केदारखेडा -1, पारध बु. -1,गोकुळ -1, हडपसावरगाव -3, अकोला -4, अशा एकुण 49 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील  संभाजीनगर -1, जांगडे नगर -1, दुर्गामाता रोड -1, आर.पी. रोड -1, भाग्यनगर -1, सोनल नगर -1, इसार गार्डन -1, मधुबन कॉलनी -1, सकलेचा नगर -1, समर्थनगर -3, डबलजीन -2, रामनगर -1, प्रितीसुधानगर -2, धोका मिल -1, हमालपुरा -1, रामनगर पोलीस कॉलनी -1, बालाजी गल्ली परतुर -4, मोंढा परतुर -2, खतीब मोहल्ला परतुर -1, जिजाऊ नगर परतुर -1, साठे सावंगी ता. अंबड -2, शनिवार पेठ देऊळगाव राजा -1, सिव्हिल कॉलनी देऊळगाव राजा -1, पाचनवडगाव -1, म्हसला ता. परतुर -1, कोठी -2, गणेशनगर बदनापूर -1, गोंदी -1, अंबड शहर -8, खंडोबा मंदिर भोकरदन -4, प्रसादगल्ली भोकरदन -1, जाफ्राबादरोड भोकरदन -5, परदेशी गल्ली भोकरदन -4, देऊगावराजा -2, भातगेडा ता. घनसावंगी -1,सुरगीनगर अंबड -1, नवा मोंढा परतुर -1, गोधी मोहल्ला बदनापूर -1 अशा एकुण 66 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 अशा एकुण 66  व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.  
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-7593असुन  सध्या रुग्णालयात-515 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2890, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-65 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-13482 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-50, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-66 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-2335 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-10944, रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-440 एकुण प्रलंबित नमुने-114, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2399.
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-38, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2387, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-00 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-431,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-36, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-515,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-115,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-49, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1555, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-707 (19 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-25654 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-73 एवढी आहे.
 सुरगी नगर अंबड येथील रहिवाशी असलेल्या 55  वर्षीय पुरुष रुग्णास हृदयविकाराचा झटाका आल्यामुळे व न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि.31 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना  दि. 1 ऑगस्ट  2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 2 ऑगस्ट 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 
आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 431 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना-72, जे.ई. एस. मुलींचे वसतिगृह-25, जे. ई. एस. मुलांचे वसतिगृह- 8, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक-44, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक-12,  राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक-11,राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक-58, संत रामदास हॉस्टेल -17,   पोलीस प्रशिक्षण केंद्र -4,गुरु गणेश भवन-6, केजीबीव्ही परतुर -17,मॉडेल स्कुल, मंठा-14, केजीबीव्ही मंठा-15, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-40,शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-31, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -7,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी -19, शासकीय मुलींचे वसतिगृह, भोकरदन-17,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -10, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद-4,
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत  201 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, 880 वाहने जप्त, 1059 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आ. पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड 1 लाख 7 हजार,मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 7 लाख 87 हजार 230 असा एकुण 9 लाख 21 हजार  38 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

                                               

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार.


साश्रु नयनांनी दिला अखेरचा निरोप.



जालना,ब्यूरो चीफ :- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे  यांचे दि 1 ऑगस्ट रोजी रात्री दीर्घ आजाराने मुंबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दि. 2 ऑगस्ट रोजी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पार्थिवास मुखाग्नी दिला.
शारदाताई टोपे यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. कोरोनाच्या अनुषंगाने  कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये सामाजिक अंतराचे पालन करत अत्यंत कमी व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रसंगी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार संजय जाधव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार सर्वश्री कैलास गोरंट्याल, संतोष दानवे, नारायण कुचे, अंबादास दानवे, संदीप क्षीरसागर,बालाजी कल्याणकर, गुलाबराव देवकर, राजेश राठोड, कल्याणराव काळे, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, चंद्रकांत दानवे, शिवाजीराव चोथे प्रकाश गजभिये, बदामराव पंडित, राजेश विटेकर, ए.जे. बोराडे, पंडितराव भुतेकर, मनोज मरकड, महेबुब शेख, कल्याणराव सपाटे, नानाभाऊ उगले आदींची उपस्थिती होती. 
यावेळी टोपे परिवारातील मनिषाताई टोपे, वर्षाताई देसाई, संग्राम देसाई, बाळासाहेब पवळ, उत्तम पवार, सतीष टोपे, शरद टोपे, संजय टोपे, अमोल टोपे, ॲड संभाजी टोपे, गणेश टोपे, दीपक टोपे, सुरज टोपे, संदीप टोपे, भैय्या टोपे यांनी शारदाताई टोपे यांना साश्रु नयनांनी अखेरचा निरोप दिला.
गेल्या पन्नास वर्षामध्ये माझ्या आईने एका शब्दानेही कोणाला न दुखावता सर्वांना प्रेमच दिले. संपुर्ण आयुष्यामध्ये आईने कुठल्याही गोष्टीची कधीच अपेक्षा केली नाही.  माझ्या जडणघडणीमध्ये वडीलांबरोबरच आईचाही मोठा वाटा होता. निखळ व निरपेक्ष प्रेमाच्या झऱ्याला आज मी मुकलो असल्याची भावना राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी व्यक्त केली.
शारदाताई अंकुशराव टोपे यांच्या निधनामुळे टोपे परिवारावर मोठे संकट कोसळले आहे.  केवळ टोपे परिवारच नव्हे तर संपुर्ण परिसरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजेश टोपे हे संपुर्ण महाराष्ट्राला कोरोनामधुन सावरण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. त्यांना आधार देणाऱ्या शारदाताई यांच्या निधनामुळे कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.  टोपे परिवारास हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो तसेच त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असल्याची भावना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केली.
संयमी, अभ्यासु वृत्ती असलेल्या राजेश टोपे यांच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा असलेल्या शारदाताई अंकुशराव टोपे यांच्या निधनामुळे राजेश टोपे हे आईच्या प्रेमापासुन पोरके झाल्याने आपणास तीव्र दु:ख झाले असुन टोपे कुटूंबियांना हे दु:ख सावरण्याची ईश्वर शक्ती देवो अशा शब्दात  राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी खासदार संजय जाधव, आमदार संतोष दानवे, आमदार कैलास गोरंट्याल, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार यांनी पाठवलेल्या शोक संदेशाचे यावेळी सर्वांसमक्ष वाचन करण्यात आले.  
तत्पुर्वी शारदाताई अंकुशराव टोपे यांचे पार्थिव त्यांचे मुळ गाव असलेल्या पाथरवाला येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.  यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनीही तेथे जाऊन श्रद्धांजली अर्पण केली.


  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...