मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

परतूर नगर परिषदेने शहरात गर्दीच्या ठिकाणी हात धुण्यासाठी नळ आणि सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करावी-प्रकाश सोळंके

परतूर /प्रतिनिधी-सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा फैलाव जोमाने होत आहे.नागरिकांनी घरात बसावे, घराबाहेर पडू नये असे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे.तरी पण आवश्यक कामासाठी नागरिक घराबाहेर पडत असल्याने रस्त्यावर गर्दी दिसून येत आहे त्यामुळे नगर पालिका प्रशासनाने शहरात नागरिकांना हात धुण्यासाठी नळ आणि सॅनिटायझर ची 
 उपलब्ध करून द्यावी याकरिता मनसे चे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी आज दि.२८ रोजी नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील आष्टी रेल्वे गेट,साईबाबा मंदिर चौक, पारडगाव रोड,आंबा रोड या रस्त्याने बाहेर गावची वाहने आणि लोक शहरात प्रवेश करतात.या ठिकाणी हात धुण्यासाठी पाण्याचे नळ आणि सॅनिटायझर ची सोय करण्यात आली तर येणारे नागरिक हात धुवूनच शहरात प्रवेश करतील.त्यामुळे स्वच्छता राहून कोरोना विषाणूचा संसर्ग टाळता येण्यास मदत होईल.तसेच महादेव मंदिर चौक,बाजार समिती मैदान (मोंढा) आणि इतर गर्दीच्या ठिकाणी अशी हात धुण्यासाठी सोय करण्यात यावी जेणे करून कोरोनाचा फैलाव होणार नाही.तरी,नगर पालिका प्रशासनाने तात्काळ परतूर शहरात गर्दीच्या ठिकाणी हात धुण्यासाठी पाणी, सॅनिटायझर उपलब्ध करून या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना कराव्यात.
धर्माबाद तालुक्यात ब-याच दिवसांपासून वडाफोन/ आयडिया  कंपनी ची सेवा विस्कळीत असल्याने  नागरिकांचा जीव मेटाकुटीस

र्माबाद (भगवान कांबळे ) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण नागरिकांची स्थिती बंदिस्तसारखी झाल्यामुळे आधीच नागरिकांचा जीव मेटाकुटीस आला आहे.अशा परिस्थितीत नागरिकांना घरात सवडीचा वेळ असल्याने फोनवरून मित्र-मैत्रिणी नातेवाईक इष्टमित्रांसह संपर्क साधून सर्वांचे कुशलता विचारणे कोणी आजारी असल्यास त्याची विचारपूस करणे आणि आपण जवळ नसलो तरी एकमेकांच्या सुख,दुःखात सहभागी आहोत याची जाणीव करून देण्यासाठी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून वार्तालाप करणे महत्त्वाचे असते.एवढेच  नाही तर आता 4 G इंटरनेट सेवेद्वारे घरातील सर्व सदस्यांना मनोरंजनासाठी स्मार्टफोन हाच महत्वाचा दुवा आहे. स्मार्टफोन द्वारेच मनोरंजन सोबतच विद्यार्थ्यांना अनेक शाळांमधील शिक्षकगण ऑनलाइन पद्धतीने इंटरनेट द्वारे शिक्षण देत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सिमेवर आसले पोलिस कर्मचारी तेथे काम करीत आहेत व त्यांच्या कडील माहिती व इतर वरिष्ठांनी 

पाठवली माहिती लवकर समजत नसल्याने धर्माबाद चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सन्नगले हे आयडीया व वडाफोन कंपनी वर नाराजगी व्यक्त करित केली आहे.  राज्य सिमेच्या परिसरात वडाफोन /आयडिया कंपनी ची सेवा कधी सुरू कधी बंद कधी नेटवर्क कमी  जास्त होत आहे . दोन मिनिटांसाठी जरी लाईन गेली तरी बरेच तास मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद राहणे,  कधी पावर प्लांट बंद पडणे, वरून डिझेल मिळत नसल्याची तक्रार, इत्यादी शेकडो कारणांमुळे वारंवार येथील दोन्ही कंपनीची सेवा बंदच राहत आहे .
कोरोनाच्या आपत्तीमध्ये लॉकडाऊनच्या काळातही  वडाफोन आयडिया कंपनी च्या टॉवर्सची मोबाईल आणि 4G इंटरनेट सेवा सतत बंद चालू होत असल्यामुळे  ग्राहकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. वरिष्ठ  अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन वारंवार बीएसएनएलची सेवा बंद पडण्याचे प्रकार थांबवावे अशी मागणी त्रस्त ग्राहक करीत आहेत.

         लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीनंतर निघाला तोडगा
पेट्रोल पंपावर पोलीस नियुक्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

जालना (प्रतिनिधी):- लाॅकडाऊन काळात प्रशासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या नियमावलीमुळे पेट्रोलपंप चालकांची मात्र इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली आहे. त्यातच प्रशासनाकडून वेगवेगळ्या ठिकाणी वाहनधारकांना पास दिल्या जात असल्याने तसेच प्रशासन व पोलीस यांच्यात
योग्य समन्वय नसल्याने अनेक पेट्रोलपंप चालकांचा गोंधळ उडाला होता. मात्र लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीनंतर अखेर जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी प्रत्येक पेट्रोल पंपावर एक पोलीस नियुक्त करण्याचे आश्वासन दिल्याने पंपचालकांना दिलासा मिळेला आहे.लाॅक डाऊन काळात प्रशासनाने पेट्रोलपंप चालकांसाठी वेळोवेळी नियमावली जाहीर केली आहे. यात अत्यावश्यक सेवेत येणारी वाहने, पास दिलेली वाहने व शेतकरी यांना वेळोवेळी इंधन पुरवठा करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यात पेट्रोल पंप सुरु ठेवण्याची वेळही प्रशासनाने ठरवून दिली आहे. परंतु अनेक ठिकाणी कमी कामगारावर पेट्रोल पंपाचे कामकाज सुरु असुन इंधन भरण्यासाठी येणाऱ्या वाहनाधारकांचे पास बघुन इंधन देणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे. तर काही ठिकाणी पोलीसांकडून नाहक त्रास होत असल्याच्या तक्रारी देखील पेट्रोलपंप चालकांनी केल्या आहेत.हाच तक्रारींचा पाढा घेऊन पेट्रोल पंप असोसिएशनचे प्रतिनिधी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार कैलास गोरंट्याल व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे गेले होते. त्यांच्या सर्व समस्या त्यांनी या लोक प्रतिनिधींना सांगीतल्यानंतर अखेर पेट्रोल पंप चालक व प्रशासन यांच्यात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, आमदार कैलास गोरंट्याल व माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी मध्यस्ती करुन सुवर्ण मध्य काढण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांना दिल्या. यानंतर जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी सोमवारी (ता.27) पंपावर पास तपासणीसाठी पोलीस नियुक्त करण्याचे आश्वासन दिले अशी माहिती विरेन पटेल यांनी दिली. त्यामुळे सत्यनारायण तोतला, बंडुभाऊ मिश्रीकोटकर, इंद्रसेठ तवरावाला, विरेन पटेल, दिलीप मोरे या शिष्टमंडळाच्या मागणीला अखेर यश आले आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...