बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०

पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य करणार -शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
मुंबई, / प्रतिनिधी :- राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावी इयत्तेत मराठी भाषा हा विषय शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून अनिवार्य करण्यात येणार आहे. यासंदर्भातील विधेयक विधानसभेत मंजूरीसाठी मराठी भाषा दिनानिमित्त मांडण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली.
आज राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याबाबत सदस्य मंगेश कुडाळकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारला. त्यास उत्तर देताना मंत्री श्रीमती गायकवाड बोलत होत्या. यावेळी  सदस्य सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, सुनील प्रभु, आशिष शेलार, भास्कर जाधव यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.मंत्री श्रीमती गायकवाड म्हणाल्या, सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याबाबतचे विधेयक उच्च सभागृहात मांडले जाणार असून, मराठी भाषा दिनानिमित्त ते विधानसभेत उद्या मंजूरीसाठी मांडण्यात येणार आहे. राज्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी, केंद्रीय, आंतरराष्ट्रीय या सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असून, ज्या शाळा या नियमाची अंमलबजावणी करणार नाही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, प्राथमिक आणि माध्यमिक अशा वर्गवारीत टप्प्याटप्प्याने या मराठी भाषा सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री गायकवाड यांनी दिली.त्याचबरोबर, ज्या खाजगी शाळा शैक्षणिक शुल्काबाबत नियम पाळत नाहीत अथवा गरजेपेक्षा जास्त शुल्क वापरतात अशा शाळांबाबत तक्रारी आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी उपस्थित उपप्रश्नास दिली.
                 सावता परिषदेच्या मराठवाडा विभाग 
              उपाध्यक्षपदी विष्णूभाऊ पुंड यांची निवड.
जालना/प्रतिनिधी :- सावता परिषदेच्या मराठवाडा विभाग उपाध्यक्षपदी अंबड येथील विष्णुभाऊ पुंड यांची निवड करण्यात आली.
 सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या सुचनेनुसार प्रदेश महासचिव मयुर वैद्य यांनी ही निवड एका नियुक्तीपत्राव्दारे केली.  तसेच मराठवाडा विभाग संघटकपदी गणेश वाघमारे (जालना), महिला आघाडी जालना जिल्हाध्यक्षपदी सौ. सुषमा खरात, युवक आघाडी जालना जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

हरीनाम हे मानव जीवनाचे उध्दार करणारे नाम आहे- ह.भ.प
बद्रीनाथ महाराज यज्ञेकर जोशी
सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी):-भगवंताच्या नाम चिंतनाने मोह,मध,मत्सर, या सर्व गोष्टीचा नाश होतो तसेच मानव जीवनाचा उध्दार होतो असे प्रतिपादन रामनगर येथील बाल कीर्तनकार बद्रीनाथ महाराज यज्ञेकर-जोशी यांनी मौजपुरी येथे सुरू असलेल्या 
 अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी पहिल्या दिवशी कीर्तन रुपी सेवेत केले.किर्तनरुपी सेवेसाठी घेतलेल्या ज्ञानदेव राय यांचा अभंग रामकृष्ण नामे हे दोनी साजिरे हृदय मंदिरी स्मरा कारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा रुदय जिव्हाळा श्रीमूर्ती राया या अभनगवर पुढे निरुपम करताना ते म्हणाले की एकदा मनुष्य मोह पाश्यात अडकला गेला की त्याला काही कळत नाही त्याचप्रमाणे मद्यपान केलेला माणूस मद्यपान केल्यानंतर आपले श्रेष्ठत्व व स्थान विसरून जातो पण मद्याची नशा ही काही काळापुरती मर्यादित असते पण मोहाची नशा ही जन्मोजन्मी उतरत नाही त्याच बरोबर ज्ञानी मनुष्य मोहपाश्या अज्ञानी होतो सदाचारी हा दुराचारी होतो अशा मोहतून जर सुटका करायची असेल तर भगवंतांचे नामसमरण जीवनात केले पाहिजे त्याचबरोबर तारुण्य हे माणसाला नको त्या गोष्टीकडे घेऊन जात जाते तेव्हा तरुणपणात भगवंताचे नामचिंतन करणे आवश्यक आहे आपुलिया आपण करा सोडवणं या अभंगतील उकतीप्रमाणे आपली जर दुःखातून सोडवणं करावयाची असेल तर ते आपणच सोडवू शकतो कीर्तन श्रवणासाठी मौजपुरी सह पंचक्रोशीतील भाविक भक्ताची मोठ्या प्रमाणात उपस्तीती होती
                                          दुःखद वार्ता
अंबड (प्रतिंनीधी) :- अंबड येथील आंबेडकर नगर येथील रहिवासी
बबनराव खरात वय 67 वर्ष,रा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर
यांचे अल्पशा आजाराने आज दि.26/02/20  रोजी दुःखद निधन झाले आहे. आयु.सुनिल बबनराव खरात,अनिल बबनराव खरात,किशोर बबनराव खरात,राहुल बबनराव खरात,राजु बबनराव खरात यांचे ते वडील होते,व आयु.मती ज्योतीताई खरात यांचे ते सासरे  होते.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...