मंगळवार, ३१ मार्च, २०२०

कोरोना हॉस्पीटल तातडीने कार्यान्वित करावे
                       - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर

                जालना, प्रतिनिधी- विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी आज दि. 31 मार्च रोजी सामान्य रुग्णालय, परिसरात तयार होत असलेल्या कोरोना हॉस्पीटल तयारीची पाहणी करत कोरोना हॉस्पीटल तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश देत कोरोना संदर्भातील प्रतिबंधात्मक उपयायोजनांचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला.
याप्रसंगी  जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे , मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अपर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर  राठोड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदी उपस्थित होते.
    कोरोना विषाणुचा (कोव्हीड – 19) प्रादुर्भाव  रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि.13 मार्च 2020 पासुन लागु करण्यात आलेला असुन दि.1 मार्च 2020 नंतर परदेश प्रवासावरुन आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी व आवश्यकतेनुसार अलगीकरण किंवा विलगीकरण करणे अत्यावश्यक आहे.  जिल्ह्यातील नागरिकांनी  परदेशात प्रवास केल्याची माहिती प्रशासनास देऊन स्वत:ची व आपल्या कुटुंबियांची तपासणी सामान्य रुगणालय, जालना येथे करुन घ्यावी. यासाठी जिल्हास्तरावर मुख्य  कार्यकारी अधिकारी यांना समन्वय अधिकारी  म्हणुन नेमणुक केली असून त्यांच्या अधिनस्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांना त्यांचा सहाय्यक अधिकारी नेमणुक करण्यात आली आहे. मागील एक महिन्यात  आपण जर कोरोनाग्रस्त  अथवा इतर देशातुन, इतर राज्यातुन, इतर शहरातुन किंवा इतर जिल्ह्यातुन जालना जिल्ह्यात आला असला तरी आपली माहिती  जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्र. 02482-223132  या क्रमांकावर कळवावे. जे नागरीक अशी माहिती लपवितील त्यांच्या विरुध्द साथरोग प्रतिबंध कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.
    जालना जिल्ह्यामध्ये दि. 31 मार्च, 2020  रोजी 2 रुग्ण नव्याने दाखल झाले आहे. एकुण 89 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होते. त्यापैकी 87 रुग्णांचे स्कॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 83 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आले  आहेत. आजरोजी 11 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
     रुग्णालयातुन डिस्चार्ज झालेल्या तसेच परदेशी प्रवासाचे पुर्व इतिहास  असणा-या सर्व व्यक्तींचे घरी अलगीकरण करण्यात आलेले आहे. आजपर्यंत 113 परदेश प्रवास केलेल्या व्यक्तींपैकी 111 व्यक्तींचे  घरीच अलगीकरण करण्याल आलेले आहे.  तसेच इतर शहरे व राज्यातुन आपलेल्या 11 हाजर 31 व्यक्तींची  तपासणी करुन त्यांचे घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. संस्थेत अलगीकरण केलेल्या सहवासितांची (Contact) संख्या 71 असुन  संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह येथे 49, मुलींचे शासकीय वसतीगृह 6 व अंजता ब्लॉक पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे 16जणांना दाखल करण्यात आलेले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...