शुक्रवार, १२ जून, २०२०

प्रशासक नेमण्याऐवजी आहे त्या सरपंच, सदस्यांना मुदत वाढ द्यावी -  अमोल पांढरे, सरपंच




सांगली,ब्युरोचीफ :- मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यासाठी सरकारी पातळीवर हालचाली सुरू आहेत. मात्र अशा ग्रामपंचायतींवर प्रशासक न नेमता, जे सध्या ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनाच मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी कुडनूरचे सरपंच अमोल पांढरे यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, गावचा कारभार कसा करायचा याचे संपूर्ण ज्ञान सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांना असतो. मात्र प्रशासकांना यासंदर्भातील कोणतीही माहिती नसते. तसेच गावातील सण-समारंभ, यात्रा, उरुस, गावातील चाली-रिती रुढी-परंपरा, संकेत, धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रम यासह गावगाड्यातील संपूर्ण माहिती ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य यांनाच असू शकते. बाहेरून आलेल्या माणसाला या संदर्भातील माहिती असू शकत नाही. त्यामुळे प्रशासक नेमून गावची थट्टा करण्याऐवजी, विकासकामांना खिळ घालण्याऐवजी, मंजूर झालेल्या विकासकामांना आळा घालण्याऐवजी जे सध्या अतिशय चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. अशा सरपंचांना व सदस्यांनाच मुदत वाढ देण्यात यावी, असेही त्यांनी म्हंटले आहे. लॉकडाऊनच्या काळात जिवावर उदार होवून सरपंच व सदस्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे काम केले आहे. गावची काळजी घेतली आहे. त्याशिवाय आपली गावे कोरोनाच्या संसर्गापासून अलिप्त ठेवण्यात त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय करू नये. गावचे ऐक्य, सामाजिक-राजकीय शांतता, सलोखा, कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्याचे काम या सरपंच व सदस्यांनी केले आहे. आणि हे काम सरपंच आणि सदस्यच अत्यंत चांगल्या प्रकारे करू शकतात हे त्यांनी सर्व जगाला दाखवून दिले आहे. वेळप्रसंगी पदरमोड करून त्यांनी या आपत्तीला तोंड दिले आहे. त्यामुळे सरकारने त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा.
लॉकडाऊनमुळे शेवटच्या टप्प्यात त्यांना गावची विकासकामे प्रभावीपणे करता आली नाहीत. मात्र लॉकडाऊन संपताच रेंगाळलेली सर्व विकासकामे मार्गी लावण्याचे नियोजनही त्यांनी केले आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने सध्या असलेल्या सरपंच आणि सदस्यांनाच यापुढेही निवडणुका जाहीर होईपर्यंत काम करण्याची संधी द्यावी. आणि गावातील विकासकामे मार्गी लावावीत असेही पांढरे यांनी म्हटले आहे.
त्याशिवाय जर या सरपंच आणि सदस्यांना संधी दिली गेली नाही तर वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.


राज्यात परत लॉकडाऊन लावून दुकाने बंद करण्याच्या बातम्या चुकीच्या- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

स्वयंशिस्त मात्र पाळावीच लागेल, गर्दी करणे आरोग्याला अपायकारक




मुंबई,ब्युरोचीफ :- काही समाज माध्यमांमध्ये, वाहिन्यांवर महाराष्ट्रात परत एकदा लॉकडाऊन लावून सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. असा कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही. अशा बातम्या जनतेत संभ्रम निर्माण करीत असून शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
आपण राज्यात अर्थचक्राला गती देत आहोत. आपले व्यवहार हळूहळू सुरु करीत आहोत. पण लॉकडाऊन उठवतो आहोत याचा अर्थ एकदम गर्दी करणे आणि सुरक्षित अंतराच्या, स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे बरोबर नाही. बाहेर पडल्यावर कायम चेहऱ्याला मास्क लावणे, साबणाने, जंतूनाशकाने हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम आता आपल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवावे लागतील. याची सवय होईस्तोवर त्रास होईल पण ही जीवनपद्धती सर्वांनी स्वत:च्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यासाठीच अंगिकारावी लागेल. स्वयंशिस्त ही पाळावीच लागणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच जनतेत संभ्रम निर्माण करणाऱ्या आणि गैरसमज, अफवा पसरविणाऱ्या पसरविणाऱ्या बातम्या किंवा पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा असल्याने त्या प्रसारित करू नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.


कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 7 लाख व्यक्तींचे सर्वेक्षण पुर्ण
जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रामध्ये फिव्हर क्लिनिक सुरु
           फेसबुकलाईव्हमध्ये जिल्हा आरोग्य                                   अधिकाऱ्यांची माहिती




जालना,ब्युरोचीफ :- जालना जिल्ह्यात कोरोना विषाणुच्या अनुषंगाने आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय अधिकारी, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, ग्रामसेवक यांच्यामार्फत ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आहेत काय याची तपासणी करण्यासाठी जिल्हयातील जवळपास 3 लाख कुटूंबातील 7 लक्ष व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये फिव्हर क्लिनिक सुरु करण्यात आले असुन ताप, सर्दी, खोकला अशी कुठलीही लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांशी संवाद साधताना केले.
आज दि. 12 जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य तसेच गौणखनिज या विषयावर अधिकाऱ्यांनी जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा,  अतिरिक्त जिल्हा आरोग्य  अधिकारी डॉ. संतोष कडले, तहसिलदार श्री पडघन आदींची उपस्थिती होती.
यावेळी माहिती देताना डॉ. खतगावकर म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये 218 उपकेंद्र, 41 प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुर्वेदीक, तसेच युनानी दवाखान्यामध्ये फिव्हर क्लिनिकची सुरुवात करण्यात आली.  जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य व उपकेंद्रांना थर्मल गन, पल्स ऑक्सीमीटर, नेब्युलाईजरचा पुरवठा करण्यात आला.  जिल्ह्यातील 985 गावामध्ये अँटीकोरोना फोर्सची स्थापना करण्यात येऊन याफोर्सच्या माध्यमातुन ग्रामीण पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे.  परराज्य अथवा परजिल्ह्यातुन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवण्यात येत असुन या व्यक्तींची वैद्यकीय पथकामार्फत तपासणी करण्यात येऊन त्यांना होमक्वारंटाईन, संस्थात्मक अलगीकरणाची कार्यवाही करण्यात असल्याचे सांगत आजपर्यंत जालना जिल्ह्यामध्ये 81 हजार व्यक्ती दाखल झाल्या आहेत.  तसेच परजिल्हा व परराज्यातील जे व्यक्ती जालना जिल्ह्यात अडकुन पडले होते अशा सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात आली असल्याची माहितीही श्री. खतगावकर यांनी यावेळी दिली.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांच्या पुढकाराने जालना जिल्ह्यातील जनतेला वैद्यकीय सेवा अधिक चांगल्या प्रमाणात देण्यासाठी दवाखान्यामध्ये रिक्त असणारी पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्यात आली असुन वैद्यकीय अधीक्षक, नर्सेस आदी 187 रिक्त पदे भरण्यात आली आहेत. 
संशयित रुग्णांच्या लाळेचे अहवाल आजघडीला तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठवावे लागत आहेत.  राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातुन जालना येथे आरटीपीसीआर लॅबला मंजुरी मिळाली असुन ही लॅब येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये कार्यान्वित करण्याच्यादृष्टीने काम करण्यात येत आहे.   नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे.  गर्दीच्या अथवा सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन, मास्कचा, सॅनिटायजरचा वापर करण्याबरोबरच प्रशासनामार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करण्याबरोबरच आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड करावे.  नागरिकांसाठी 24 तास हेल्पलाईन सुरु करण्यात आली असुन 223132, 1075, 104 अथवा 6366783101 या क्रमांकावर माहितीसाठी नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करत नागरिकांनी आरोग्य विषयक विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यात असलेल्या 50 वर्षावरील व्यक्ती ज्यांना मधुमेह, किडनीचे आजार, ऱ्हदयरोग, टी.बी. एचआयव्ही अशा व्यक्तींचा सर्वे करण्यात येणार असुन त्यांची तपासणी करण्यात येणार असुन कोव्हीड विषाणुची बाधा झालेल्या व्यक्तींना आरोग्याच्या सेवा देण्यासाठी सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात आले आहे.
जिल्ह्यात नॉनकोव्हीड रुग्णांनाही आरोग्याच्या सेवा देण्यासाठी काम करण्यात येत असुन जालना जिल्ह्यामध्ये               1 हजार 100 क्षयरुग्ण, 2 हजार 500 एचआयव्ही, तसेच 134 कुष्ठरोगाचे रुग्ण असुन अशा सर्व रुग्णांना घरपोहोच औषधी पुरवण्याचे काम आरोग्य विभागामार्फत करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
गौणखनिज संदर्भात माहिती देताना अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे म्हणाले जिल्ह्यात असलेल्या वाळुघाटाचा ई-लिलाव करण्याची कार्यवाही प्रशासनामार्फत सुरु असुन या घाटांचा लिलाव होताच सर्वसामान्यांना वाळुचा पुरवठा होईल. जालना जिल्ह्यात अवैध वाळु उत्खनन व वाहतुक करणाऱ्यांवर पोलीस तसेच महसुल विभागामार्फत कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगत गतवर्षात अवैध वाळुची वाहतुक करणाऱ्या 263 वाहनधारकांकडून अडीच कोटी रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे तर चालु वर्षात 40 वाहनांवर दंडात्मक कारवाईबरोबरच गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.  जालना जिल्ह्यात कोणीही वाळुचे अवेधरित्या उत्खनन अथवा वाहतुक करत असेल तर अशा व्यक्तींची माहिती जिल्हा प्रशासनास देण्याचे आवाहन करत जनतेच्या प्रश्नांची त्यांनी उत्तरेही दिली.


 जिल्ह्यात सात व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह
  तर चार रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन                                         डिस्चार्ज.
              जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती.



जालना,ब्युरोचीफ :- जिल्हा सामान्य रुग्णालयातुन  जालना शहरातील व्यंकटेश नगर येथील 33 वर्षीय पुरुष, मोदीखाना परिसरातील 76 वर्षीय महिला, 23 वर्षीय पुरुष व 38 वर्षीय महिला  असे एकुण 4 कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करुन व त्या सर्वांच्या दुस-या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.  तसेच दि. 12 जुन 2020 रोजी 7 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. पॉझिटिव्ह सापडलेल्या व्यक्तींमध्ये  राज्य राखीव पोलीस बल गट क्रं 3 चा एक जवान, अंबड शहरातील नाईकवाडी मोहल्ला परिसरातील 5, जालना शहरातील जयनगर परिसरातील 1 अशा एकुण 7 व्यक्तींचा समावेश आहे.जालना शहरातील शंकर नगर परिसरातील रहिवाशी असलेला 42 वर्षीय पुरुष दि. 5 जुन 2020 रोजी फुप्फुसाचा जंतुसंसर्ग व ह्रदयाचा आजार असल्या कारणाने त्याला जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्यावस्थ परिस्थितीत आय.सी.यु. मध्ये दाखल करण्यात आले होते. संबंधिताच्या स्वॅबचा अहवाल दि. 6 जुन 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. उपचार सुरु असतांनाच त्यांचा मृत्यु दि. 11 जुन 2020 रोजी झाल्याची  माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण - 3237 असुन सध्या रुग्णालयात -74, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती -1239, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या – 147, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -3688, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने – 07 ,असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -255, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -3271, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-381, एकुण प्रलंबित नमुने -158, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1157,14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 08, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती – 1047, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -18, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -576, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत–10,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 74, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -42, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-04, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या -149,  सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या- 93, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या -05,  पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 7704, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 08 एवढी आहे.  कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 576 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास वसतीगृह जालना – 28, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-25,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -23, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-38, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -305, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-12, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड- 28, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे –08, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी -21, मॉडेल स्कुल मंठा-39,कस्तुरबा गांधी बालिका वसतीगृह मंठा- 15, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -01, , पंचगंगा मंगल कार्यालय जाफ्राबाद-33 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 167 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 792 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 825 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली   3 लाख 32 हजार 630 असा एकुण 3 लाख 59 हजार  438 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


अल्प भूधारक शेतकऱ्यांना  मोफत बियाणे वाटप करा- दीपक डोके



वचित बहुजन आघाडीची मागणी

जालना,प्रतिनिधी :- अकोला जिल्हा परिषद मार्फत अल्प भूधारक शेतकऱ्यांना मोफत बीयाणे वाटपाचा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून नियमितपणे राबविल्या जात आहे,याच धर्तीवर जालना जिल्हा परिषदने  अल्प भूधारक शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटपाचा उपक्रम राबविण्यात यावा. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.गेल्या ३ महिन्यांपासून सुरू असलेले कोरोना महामारीचे संकट व लॉक डाऊनमुळे अल्प भूधारक शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे. एप्रिल व मे महिन्यात अल्प भूधारक शेतकऱ्यांनी उसनवारी करून शेतातील नांगरणी सारखी मशागतीची कामे उरकून घेतली आहेत. मात्र आता त्याच्याकडे खरिपाची पेरणी करण्यासाठी खते,बीयाणे खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे सर्व अल्प भूधारक शेतकऱ्यांना जिल्हा परिषद मार्फत  मोफत बियाणे वाटपाचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात यावा अशी मागणी  निवेदनाद्वारे भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष दीपक डोके,अशोक खरात, अकबर इनामदार, विष्णु खरात, दिपक घोरपडे, विनोद दांडगे, अँड.कैलास रत्नपारखे, सचिन कांबळे, कैलास रत्नपारखे,अर्जुन जाधव, राजेंद्र खरात, संतोष आढाव, गौतम वाघमारे, भैय्यासाहेब पारखे,  सचिन पट्टेकर आदींनी केले आहे.

आय.जे.ए. च्या कोषाध्यक्ष पदी सतीष सोनकांबळे, प्रसिद्धी प्रमुख पदी मुमताज अन्सारी



परतूर प्रतिनिधी/इम्रान कुरेशी

*हॅलो रिपोर्टर न्युज*
इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या परतूर तालुका कोषेध्यक्ष पदी शासन आपल्या दारीचे परतूर तालुका प्रतिनिधी सतिष सोनकांबळे व प्रसिद्धी प्रमुख पदी उज्वल महाराष्ट्रचे प्रतिनिधी मुमताज अन्सारी यांची नियुक्ती जिल्हाअध्यक्ष असलम कुरेशी यांनी केली आहे.
इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सिराज अहमद कुरेशी व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतीश मधुकरराव महामुनी यांच्या सहमतीने जिल्हाध्यक्ष असलम कुरेशी यांनी ही नियुक्ती केली.
सोनकांबळे व अन्सारी यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनमध्ये ग्रामीण व शहराच्या पत्रकारांना संघटनेशी जोड़ून संघटना मजबूत करण्याचे कार्य करावे. तसेच पत्रकारावर होणा-या अन्याया विरोधात आवाज उठवण्यासाठी सदैव तत्पर रहावे. सतिष सोनकांबळे व मुमताज अन्सारी यांच्या नियुक्तीबद्दल सहादेव मोरे (संपादक शासन आपल्या दारी)मोहन सोळंके (सकाळ) आनंद आढे (बंजारा लाईव्ह रिपोर्टर), प्रभाकर प्रधान (मराठवाडा साथी), गणेश आगलावे (देशोन्नती), राहुल आवटे (सी.एन.आय. महाराष्ट्र रिपोर्टर), जनार्धन जाधव (दैनिक मराठवाडा साथी), सतिश पवार (लोकप्रश्न), अंगद मुंढे (आताच एक्सप्रेस), इमरान कुरेशी (मराठवाडा केसरी) भरत सवणे (दै आनंदनगरी), मुनीर खान पठाण (पोलिस नवरंग), सैय्यद अकबर ( दिव्य मराठी), सैय्यद वाजिद ( राज्यवार्ता), नजीर कुरेशी (लोकमत), तरंग कांबळे (हैलो रिपोर्टर), ऊद्धव डोळस (आनंद नगरी), पांडूरंग शेजुळ (गाव माझा) आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...