गुरुवार, २६ मार्च, २०२०

जनतेच्या कोरोना संदर्भात अडचणी सोडविण्यासाठी जालना पेालीस दलाची हेल्पलाईन  कार्यरत.
जालना प्रतिनिधी :-कोरोना चा प्रादुर्भाव 
थांबविण्यासाठी संपुर्ण देशात 21 दिवसा करीता लॉकडाऊन  करण्यात आलेला आहे.  या कालावधीत अत्यावश्यक सेवा  व अत्यावश्यक वस्तुच्या आस्थापना चालु राहणार आहेत. कोणासही विनाकारण  घराबाहेर  निघण्यास बंदी  घालण्यात आलेली आहे.  ज्या नागरीकांनी काही अडचण, मदत हवी असल्यास किंवा काही आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास मदतीसाठी जालना जिल्हा  पोलीस दलातर्फे हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. नागरिकांच्या  अडचणीसाठी किंवा ज्यांना जिल्ह्याबाहेर जायचे, घराबाहेर निघायचे असल्यास त्यांनी खालील क्रमांकावर कॉल करुन आपली अडचण  सांगावी, त्यांची अडचण सोडविण्यात येणार आहे. त्यांना जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी कारण संयुक्तीकअसल्यास परवानगीचे पत्र त्यांचे मोबाईल क्रमांक व्हॉटस् ॲपद्वारे पाठविण्यात येईल.      
   हेल्पलाईन क्रमांक-1 (+ 91 9356720079), हेल्पलाईन क्रमांक- 2  (+ 91 9356722691), नियंत्रण कक्ष लँड लाईन क्रमांक- (02482-225100),नियंत्रण कक्ष लँड लाईन क्रमांक- (02482-224833), नियंत्रण कक्ष लँड लाईन क्रमांक- (100).  या हेल्पलाईन सेंटरच्या प्रमुख – सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती किर्ती पाटील, पोलीस उपनिरीक्षक  सखु राठोड यांना नेमण्यात आलेले आहे.


पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये कोरोना मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे   -- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आवाहन
          जालना प्रतिनिधी:-जिल्ह्यामध्ये दि. 23 मार्च 2020 पासुन फौजदारी प्रक्रिया 1973 चे कलम 144  अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये 5 पेक्षा जास्त लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमु नये, अथवा कोणत्याही रस्त्यावर गल्लोगल्ली आदी ठिकाणी थांबु नये.  शक्यतो घरीच थांबावे, अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे व प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.जिल्ह्यातील किराणा मालाच्या दुकाना पुर्णवेळ सुरु राहतील. त्यासाठी नागरिकांनी गर्दी करण्याची काहीही आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तु जसे फळे, भाजीपाला, दुध, अंडी, मांस इ. च्या दुकाने व  आस्थापना नेहमीप्रमाणे सुरु असल्याने नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. आवश्यक बाबी विनाकारण गरजेपेक्षा जास्त खरेदी करु नये अथवा त्याचा साठा करुन ठेवू नये, जेणे करुन जीवनाश्यक वस्तुंचा तुटवडा निर्माण होणार नाही. शासकीय कर्मचारी  नागरीकांनी घाबरुन जाऊ नये, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभाग आपल्या सोबत असुन कारोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जनतेने सहकार्य करावे. प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीताविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याचा ईशाराही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी दिला आहे.
जनतेला कोणत्याही प्रकारच्या शंका अथवा काही विचारणा करावयाची असल्यास जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे 02482-223132 या क्रमांकावर फोन करावा.  मागील एक महिन्यात, आपण जर कोरोनाग्रस्त देशातुन आलेला असाल किंवा इतर जिल्ह्यातुन जालना जिल्ह्यात आला असला तर http://ezee.app/covid19jalna या लिंकवर जाऊन आपली संपुर्णपणे खरी माहिती भरावी. जेणेकरुन आपल्याला योग्य ती मदत करु शकु.
जालना जिल्ह्यामध्ये दि. 26 मार्च 2020 रोजी 1 रुग्ण नव्याने दाखल झाला आहे. आतापर्यंत एकुण 60 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होते. त्यापैकी 58 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 52 रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आले आहेत व त्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज रोजी 7 रुग्ण  विलगीकरण कक्षात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
रुग्णालयातुन डिस्चार्ज झालेल्या तसेच परदेशी प्रवासाचे पुर्व इतिहास असणा-या सर्व व्यक्तींचे घरी अलगीकरण करण्यात आलेले आहे. आजपर्यंत एकुण 104 परदेश प्रवास केलेल्या व्यक्तींपैकी 97 व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आलेले आहे. तसेच इतर शहरे व राज्यातुन आलेल्या 212 व्यक्तींचे तपासणी अंती घरीच अलगीकरण करण्यात  आले आहे. या सोबतच जालना जिल्ह्यामध्ये एकुण 15 संस्था अलगीकरणा

       कोरोनामुळे अंगुर उत्पादन शेतकरी हवालदिल
शाम गिराम (सिंधीकाळेगाव) :- जगभरात माजलेला कोरवणाच्या हहकाराचा परिणाम हा द्राक्ष बागावरही
झालेला दिसून येत आहे.
गेल्या तीन ते चार वर्षपासून ओला दुष्काळ कोरडा, दुष्काळ, गारपीट,अवकाळी आदी संकटामुले सर्वच शेतकरी हे मेटाकुटीला आलेले आहेत त्याचबरोबर रामनगर परिसरात मुबलक पाणी असलेल्या शेतकऱ्यांनी गेल्या तीन वर्षपूरवी द्राक्ष बागेची लागवड केलीली आहे व रक्ताचे पाणी करून त्यांनी आपल्या द्राक्ष बागा जगवल्या आहेत.त्यांना वेळो वेळी फवारणी,छाटणी, डिपिंग, या सर्व गोष्टीवर लागवडीपासून तर अंगुर येईपर्यंत लाखो रुपयांचा खर्च कलेला आहे.शेतकरयांच्या द्राक्ष बागा या द्राक्षांने लोम्बकळून गेल्या आहेत रामनगर सह परिसरातील बहुतांश शेतकरीही हे आपले द्राक्ष व्यापाऱ्याला न देता स्वतःच आपले द्राक्ष परिसरात असलेल्या छोट्या मोठ्या बाजार पेठेत विक्रीसाठी नेतात परंतु कोरोनामुळे जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बँड करण्यात आले असून द्राक्ष विक्री करावी कोठे हा प्रश्न शेककर्यांना भेडसावत आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याच्या मार्गावर आहे कारण द्राक्ष तोडण्यास सुरवात नाही केली तर द्राक्ष ची गळ ही आपोआप सुरू होऊन नासाडी होनार आहे शेतकऱ्यांनी चार वर्षपासून केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले जात आहे
.....
प्रतिक्रिया :- गेल्या तीन वर्षपासून गारपीट अवकाळी एवढ्या परिस्तिथीतीत बागेला वेळेवर औषध फवारणी,छाटणी, डिपिंग यावर लागवडीपासून ते आतापर्यंत लाखों रुपयांचा खर्च करण्यात आला आहे तरी द्राक्ष काढणीला आले असून विक्रीसाठी पर्याय उपलब्ध नसून तीन वरसपासून केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले जाणार आहे.
               ज्ञानेश्वर सोनुने.द्राक्ष उत्पादक शेतकरी रामनगर

जिल्हाधिकाऱ्यांचा दारूबंदीचा आदेश झुगारून धर्माबाद  तालुक्‍यातील पाटोदा (खु) येथे  अवैध देशी व विदेशी दारुचा साठा जप्त
धर्माबाद (भगवान कांबळे):-माननीय जिल्हाधिकारी व महाराष्ट्र शासनाच्या  देशी व विदेशी बिअर बार परमिट रूम बंदीचे आदेश असताना धर्माबाद तालुक्यातील पाटोदा
खुर्द येथे अवैधरित्या  दारूची विक्री होत असलेली माहिती वर कार्यवाही  करण्याची कामगिरी कुंडलवाडी पोलीस स्टेशन ने केली आहे.पण जिल्ह्यामध्ये ,महाराष्ट्रात ,देशात कोरोना व्हायरस ने थैमान  घातले असून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी सरकार पोलिस कायदा व्यवस्थेच्या पालनासाठी  डोळ्यात तेल घालून हे कार्य करत असताना दुसरीकडे शासनाने बंद केलेल्या देशी दारूचा साठा करत चढ्‍या  भावाने विक्री  करणारे पाटोदा खुर्द येथे हा साठा सापडला आहे छुपी विक्री करत असल्याची माहिती कुंडलवाडी पोलिस स्टेशनचे एएसआय इंगळे पाटील यांना मिळाली
कुंडलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मांते यांच्या मार्गदर्शनाखाली इंगळे पाटील यांच्या पथकांनी धाडसी कारवाई केली
अवैध माल  संपूर्ण जप्त केला असून आरोपी पकडला असून गुन्‍हा नंबर 34/2020 कलम 65 ई नुसार कुंडलवाडी पोलिसात गुन्‍हा नोंद झाल्याची माहिती इंगळे पाटील यांनी दिली आहे
एकीकडे संपूर्ण जिल्ह्यामध्ये संचारबंदी असताना अशा पद्धतींच्या घटना घडत असताना अतिरिक्त ताण पोलिसावर येत आहे
नागरिकांनी जागरूक राहून वेळोवेळी होत असलेल्या अवैध धंद्‍यासंबधी  संबंधित जवळच्‍या पोलिस स्टेशनला कळवावी असे आव्हान धर्माबाद उपविभागीय पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांनी केले आहे.
पोलिस जमादार बाप सोबत असताना आरोग्य सहाय्यीकेला पोलिसांकडून बेदम मारहाण.

हिंगोली.  :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. बुधवारी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सहाय्यीका म्हणून कर्तव्य पार पाडून वडील पोलिस जमादार यांच्यासोबत घराकडे जात असताना नांदेड नाक्यावर या दोघांचे काही ऐकून घेण्यापूर्वीच पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडित महिला कर्मचाऱ्यांनी केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत प्रियंका राठोड ह्या आरोग्य सहाय्यीका म्हणून काम करतात. मस्तानशहा नगर येथे कोरोना बाबत सर्वेक्षण करून गोरेगाव ठाण्यांतर्गत कनेरगाव नाका पोलीस चौकी येथे कर्तव्यावर असलेले वडील पोलिस जमादार साहेबराव राठोड यांच्यासोबत बांगर नगरला आपल्या घरी जात असतात, नांदेड नाका येथे संचारबंदी कामी बंदोबस्तावर असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे यांनी त्या दोघांचे म्हणणे ऐकून न घेता, ओळखपत्र न पाहता, आम्ही आरोग्य कर्मचारी आहोत, वडील पोलिस जमादार आहेत हे सांगूनही मारहाण केली, असा आरोप आरोग्य सहाय्यीका प्रियांका राठोड यांनी केला आहे.
त्यांच्यावर हिंगोली येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून डोक्याला चार टाके पडले आहेत. विशेष म्हणजे संबंधित आरोग्य कर्मचारी ह्या कॅन्सर पीडित असल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिले आहे.
समाजासाठी काम करून मारहाण – पीडित महिला कर्मचारी
मी कोरोना बाबत मस्तानशाहा नगर येथून सर्वे करून वडिलांसोबत घरी जात असताना नांदेड नाका येथे मला मारहान 
करण्यात आली. आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांचे काय ? पोलिसांकडून अशाप्रकारे अन्याय होत असेल तर आम्ही सर्व आरोग्य कर्मचारी काम थांबू.

माझ्या मुलीला जनावरासारखा मारलं – वडील साहेबराव राठोड ( पोलीस जमादार)
मी गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत कनेरगाव नाका येथे 
 जिल्हा सीमा बंदीचा बंदोबस्त करू हिंगोली येथे शुगर च्या गोळ्या  घेण्यासाठी आलो होतो. आरोग्य सेवेत असलेल्या माझ्या मुलींने मला फोन केल्यामुळे तिला घेऊन घरी जाताना असतांना नांदेड नाका येथे आमचे म्हणणे ऐकून घेण्यापूर्वी पुंडगे मॅडम यांनी माझ्यामुलीला बेदम मारहाण केली जनावराला एवढे मारत नाहीत. परत त्यांनीच माझ्या मुलीचा अपघात झाला म्हणून आरोग्य अधिकाऱ्याला माहिती दिली आहे.
चक्कर आली म्हणून दवाखान्यात नेले – सपोनि पुंडगे
चक्कर आली म्हणून दवाखान्यात नेले – सपोनि पुंडगे
माझ्या सह अन्य पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर वर होते. त्या दोघांना विचारपूस करण्यासाठी गेला असता संबंधित महिला चक्कर आल्याने खाली पडली त्यामुळे तिच्या डोक्याला मार लागला त्यानंतर आम्ही तिला घेऊन हिंगोली येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. संबंधित आरोग्य कर्मचारी महिलेला कोणतीही मारहाण केली नाही.
संचारबंदी लागू केलेली असतांना काही कारण नसताना विनाकारण रस्त्यावर, अंबड पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल.
         पहिला लाठीचा प्रसाद मग नागरिकांचा प्रतिसाद
अंबड़/प्रतिनिधि : अरविंद शिरगोळे :कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासनाने देशभरात संचारबंदी
लागू केलेली असतांना काही एक कारण नसताना विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना चांगलेच महागात पडले असून पाच जणांविरुद्ध अंबड पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर कारवाई आज दि.26 मार्च रोजी सकाळी 09.45 ते 11.30 वाजेच्या दरम्यान करण्यात आलेली आहे.
सध्या कोरोना विषाणू संदर्भात संपूर्ण देशासह महाराष्ट्र मध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली असून कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासन आपल्या परीने योग्य ते निर्णय घेत आहे. त्यातच जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीचा आदेश देखील संपूर्ण जालना जिल्हयाला देण्यात आला आहे. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडण्याची मुभा शासनाने दिलेली आहे. मात्र अंबड शहरातील काही लोक विनाकारण बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे अंबड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी आपल्या फौजफाट्यासह शहरांमध्ये पाई पेट्रोलिंग करत असताना त्यांना काहीएक कारण नसताना विनाकारण रस्त्यावर फिरणारे बापू गोरख शिंदे वय 27 वर्ष रा.हस्तपोखरी हा सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास इंदिरानगर अंबड येथे फिरताना मिळुन आल्याने त्यास पकडण्यात आले. त्यानंतर हबीब मोहल्ला अंबड येथे शेख समीर शेख नजीर या.अरब मोहल्ला अंबड यास 10.15 वाजेच्या सुमारास पकडण्यात आले. त्यानंतर पोलिसांचा ताफा हा 11.30 वाजेच्या सुमारास नगर परिषद अंबड समोर पोहोचला असतात तेथे मालिकसिंग तेजसिंग लोधी वय 49 वर्ष, आशिष नामदेव रामगोपाल दोन्ही रा.कंजई ता.गोटेगाव जि.नसिंहपुर राज्य मध्यप्रदेश व बोलाराम प्रताप राठोड वय 38 वर्ष रा.सोनकपिंपळगांव ता.अंबड हे काही कारण नसताना विनाकारण फिरतांना मिळून आल्याने त्या तिघांना ही पकडण्यात आले आहे. वरिल पाचही जणांना पोलीस ठाणे अंबड येथे नेण्यात आले व त्यांच्याविरुद्ध कलम 188,34 भा.द.वि. प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


 पोलिस उपविभागीय अधिकारी (डी. वाय. एस.पी ) मा.खिरडकर              साहेब यांच्या वतीने जालना नागरीकांस अवाहन.
जालना/प्रतिनिधी:- जगभरात कोरोना संसर्गानं 
 थैमान घातलं आहे. मागील 22 तारखेपासून आपण जे पोलिस प्रशासनाला सहकार्य करत आहात त्याबद्दल सर्वांचे खूप आभार. मा.पंतप्रधान, मा.मुख्यमंत्री, मा. जिल्हा अधिकारी,मा. पोलीस अधीक्षक साहेब यांच्या वतीने आपणा सर्वांना आवाहन केलेले आहे की, 21 दिवसांचे संपूर्ण देशामध्ये लाॕक डाऊन झालेले आहे. परंतु नागरिकांना घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. सर्व नागरिकांना पुन्हा आवाहन आहे की आपल्याला अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा कारण अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. त्यासाठी कोणीही विनाकारण दुकानांच्या समोर गर्दी करू नये. अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडताना चेहर्‍यावर मास्क लावुनच बाहेर पडावे.तसेच किराणा दुकानदार, भाजीविक्रेते,मेडिकल स्टोअर्स इत्यादींनी सुद्धा स्वतः मास्क लावावे व नागरिकांना प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सेवा पुरवावी. नागरिकांनी गरज नसताना शहराबाहेर पडू नये तसेच प्रशासनाला सहकार्य करावे.स्वतःची काळजी,परिवाराची काळजी,पर्यायाने शहराची,राज्याची व देशाची काळजी करावी.कुणाला जर सर्दी,ताप,खोकला सारखा त्रास जाणवत असेल तर त्यांनी सामान्य रुग्णालयात उपचार घ्यावे. तसेच पोलीस प्रशासनाकडून वारंवार आपणांस सुचना देण्यात येत आहेत,त्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे.अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा,नाहीतर आपण आपल्या घरातच राहावे.जेणेकरून आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही,तसेच पोलिसांवर ताण वाढणार नाही याची काळजी घ्यावी. वरील सर्व गोष्टीचे आपण काटेकोरपणाने पालन करावे व पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे पोलिस विभागीय अधिकारी (डी. वाय. एस.पी ) मा. खिरडकर साहेब यांच्या वतीने जालना नागरीकांस आवाहन करण्यात आले आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...