रविवार, २२ मार्च, २०२०

बुलढाणा जिल्ह्यातील शहरी भागात आजपासून जमावबंदीचे आदेश जीवनाश्यक वस्तूची दुकाने वगळता जिल्ह्यातील व इतर सर्व दुकाने बंद पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकाच ठिकाणी जमाव करता येणार नाही.
बुलढाणा /प्रतिनिधी :-राज्यात  कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांसह सर्व शहरी भागात आजपासून ते 31 मार्च 2020 चे मध्यरात्रीपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले असून 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एका ठिकाणी जमाव करता येणार नसल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले आहेत.
नोवेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच या विषाणूचा संसर्ग होवून जीवित हानी होवू नये, या दृष्टीने जिल्हा प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. आजपासून जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांसह सर्व शहरी भागात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकाच ठिकाणी जमाव करता येणार नाही.किराणा, अन्नधान्य, फळे व भाजीपाला, दुध, औषधे, दूरसंचार, विद्युत, पिण्याचे पाणी विक्री करणारी दुकाने, बँक व पेट्रोलपंप आदी जीवनावश्यक सेवा वगळता संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने 100  टक्के बंद राहतील. शासकीय व निमशासकीय कार्यालयात केवळ 5 टक्के कर्मचाऱ्यांवर कामकाज चालेल. जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद राहतील. आवश्यकता नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच होम क्वारंटाईनमध्ये असणारे हातावर शिक्का असणारे व्यक्ती यांनी 15 दिवस घराबाहेर पडू नये. तसेच कोणत्याही व्यक्तीने अफवा, अपप्रचार व भिती निर्माण होईल अशी प्रतिक्रीया व्हॉट्सॲप, ट्विटर व फेसबुक आदी कोणत्याही पद्धतीने प्रसारीत करू नये, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले आहेत. या आदेशांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

                 कलम 144 नुसार यावर असणार मनाई
जिल्ह्यातील खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व प्रकारचे कार्यक्रम, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण, उत्सव, उरूस, जत्रा, मनोरंजनाचे कायर्क्रम, क्रीडा व इतर सर्व स्पर्धा. कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलने, मोर्चे, देशातंर्गत व परदेशी सहली. दुकाने, सेवा, आस्थापना, उपहारगृहे, खाद्यगृहे, खानावळ, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब, पब, क्रिडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा व संग्रहालये. खाजगी ट्रॅव्हल्स, बसेस, राज्य परिवहन महामंडळ बसेस, रूग्ण व अत्यावश्यक सेवेची वाहने सोडून अन्य व्यावसायिक वाहने. सर्व धार्मिक स्थळे भाविकांकरीता बंद राहतील, परंतु नित्य पुजा अर्चा 5 पेक्षा कमी व्यक्तींद्वारे सुरू राहील.

              कलम 144 यांना लागू असणार नाही
शासकीय / निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम / आस्थापना, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रूगणालये, पॅथॉलॉजी लॅबोरटरी, सर्व प्रकारचे वैद्यकीय दवाखाने, नर्सिंग कॉलेज, बँक, एटीएम व वित्तीय संस्था, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी. शासकीय धान्य गोदाम, शासकीय स्वस्त धान्य दुकाने, अत्यावश्यक किराणा सामान, जिवनावश्यक वस्तू विक्रीची ठिकाणे, दुध, भाजीपाला व फळे विक्रेते, औषधालय, दवाखाने, औषधी कंपन्या, रूग्णवाहिका, पाच पेक्षा कमी व्यक्ती एकावेळी उपस्थित राहतील असे जनावरांचे खाद्य व औषधे विक्री ठिकाण. प्रसारमाध्यमांशी संबंधीत व्यक्ती, पत्रकार तसेच प्रसार माध्यमांचे कार्यालये, पोस्ट ऑफीसेस, टेलिफोन, इंटरनेट सेवा देणारे कर्मचारी, विद्युत व उर्जा तथा पेट्रोलीयम विभागाचे कर्मचारी, पिण्याचे पाणी पुरवठा कर्मचारी. जिवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणारी वाहने (ट्रक), शासकीय / निमशासकीय कर्तव्यावर असणारे व 5 टक्के उपस्थितीचे आदेश असणारे अधिकारी / कर्मचारी.

              कोणाशी चार हात करण्यास धर्माबाद थांबलं
             धर्माबाद मधून जनता कर्फ्यू ला मोठा प्रतिसाद
धर्माबाद प्रतिनिधी (भगवान कांबळे):- कोरोना व्हायरसचा
प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार धर्माबाद  मधील जनतेने  रविवारी  जनता कर्फ्यूमध्ये उस्फुर्त सहभाग नोंदवत रविवार घरातच राहणे पसंत केले.दर रविवारी बाजार राहतो त्यामुळे गर्दीने खचाखच असणाऱ्या  मुख्य पानसरे चौक नेहरू .चौक व मूख्य रस्त्यावर आज भयाण शांतता पाहयला मिळाली.धर्माबाद शहरात व तालुक्यात 357 जण मुंबई पुणे  हैद्राबाद येथील कंपन्या मध्ये काम करण्यासाठी गेलेले नागरीक आप आपल्या गावी परत आले. व 9 जण बाहेर देशावरून माय देशी परतले व त्यांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने धर्माबाद तालुक्यातील नागरीकाला दिलासा मिळाला आहे.  मागील पंधरा दिवसांपासून कोरोना व्हायरस च्या प्रसारामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. सदर कोव्हीड 19 व्हायरस रोखण्यासाठी प्रत्येक जण आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. शासनाने सूचित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे.  धर्माबाद  शहरातील बहुतांश प्रतिष्ठाने दुकाने शनिवारी दूपारपासूनच बंद होती. दरम्यान रविवारी 100% धर्माबाद  बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले.शहरातील पानसरे  चौक,  बसस्थानक- रेल्वेस्थानक, फूलेनगर, शिवाजीनगर, सराफा रोड आदी ठिकाणांवर आज शुकशुकाट पाहायला मिळाला धर्माबाद  शहरातील व्यापाऱ्यांनी शनिवार सह रविवार बाजारपेठ 100% बंद ठेवले आहे. त्यामुळे सलग दोन दिवस पहिल्यांदा धर्माबाद  शहर व परिसरात अघोषित संचारबंदी सदृश्य चित्र पाहायला मिळेल. रविवारी शहरात विनाकारण रस्त्याने फिरणार्‍या तरुणांना समज देण्याचे कामही पोलिसांनी केले. शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता व जनतेनी पूर्ण सहकार्य केले व पोलिसांचा तगडा बंदोबस्त धर्माबाद उपविभागीय  पोलिस अधिकारी मा.सूनील पाटील साहेब यांच्या आदेशानुसार धर्माबाद पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सोहन माच्छरे साहेब यांनी तेलंगाणा बाॅर्डर सह शहरातील चौका चौकात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. व उपविभागीय पोलीस अधिकारी सूनील पाटील  माछरे साहेब तहसिलदार शिंदे साहेब यांचे फिरतं पथक तालुक्यात व शहरात फिरत होते. यात पोलिस प्रशासनाचे सर्व कर्मचारी उन्हात उभे आहेत  म्हणुन पोलिस बांधवांना जनतेनी लिंबू शरबत  पाणी नाश्ता आसे आणि परिने अनून देऊन सोय केली व माछरे साहेब यांनी सर्वांना सुरूची जेवण दिले. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सन्नगले सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक  उजगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक कराड साहेब व सर्व पोलिस कर्मचारी बांधवांनी आप आपली भूमिका चोख बजावले त्याबद्दल पोलिस प्रशासनाचे तहसिल प्रशासनाचे ग्रामीण रूग्णालयातील डाक्टर   व नगर परिषद चे सर्व जनते कडुन स्वागत होत आहे.
                                जिल्ह्यात कलम 144 लागू  
      "जनता कर्फ्यू " 23 मार्चच्या सकाळी पाच वाजेपर्यंत वाढ.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना व दुकाने 31 मार्च पर्यंत बंद
       जालना प्रतिनिधी :- शासना करोना विषाणूचा (कोव्हीड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करून
खंड १,३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.  जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात (कोव्हीड १९) नियंत्रण आणण्यासाठी व त्यांच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. जालना जिल्ह्यात सर्व प्रकारचे दुकाने, हॉटेल, धाबे, परमिट रूम, बेकरी, स्वीट मार्ट, चाट भांडार, इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. महाराष्‍ट्र शासनाने महाराष्‍ट्र कोव्‍हीड १९ उपाययोजना नियम, २०२० लागू केले आहे.
        महाराष्‍ट्र राज्याचे मुख्यमंत्री  निर्देशाने जालना जिल्‍हयातील महाराष्‍ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळ च्‍या सर्व बसेस व खाजगी बससेवा आज दिनांक २२ मार्च २०२० रोजी रात्री १२.०० पासुन ते दिनांक ३१ मार्च २०२० रोजी पर्यंत बंद करण्‍यात येत आहे. आणि संदर्भ क्र. ६ अन्‍वये रविवार, दिनांक २२ मार्च २०२० रोजी पाळण्‍यात आलेला "जनता कर्फ्यू", मा.मुख्‍यमंत्री यांचे निर्देशान्‍वये दिनांक २३ मार्च २०२० रोजी सकाळी ०५.०० वाजेपर्यंत लागू राहील.
          जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहीता १९७३ चे कलम १४४ नुसार संपुर्ण जालना जिल्ह्यातील क्षेत्रात ०५ किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तींना एकत्र जमण्‍यास दिनांक २३ मार्च २०२० रोजी सकाळी ०५.०० वाजेपासुन ते दिनांक ३१ मार्च २०२० रोजीपर्यंत प्रतिबंध करीत आहे. तसेच प्रतिबंधात्‍मक आदेश खालील १ ते १० बाबीस लागू होणार नाहीत.  शासकीय / निमशासकीय कार्यालये (अत्‍यावश्‍यक सेवा वगळता इतर कार्यालये ५% कर्मचारी सह), सर्व बँका व वित्‍तीय  सेवा व तद्संबंधीत आस्‍थापना, अन्न, दुध, फळे व भाजीपाला, किराणा पुरविणा-या आस्थापना, दवाखाने, वैद्यकीय केंद्र व औषधी दुकाने व तद्संबंधीत आस्‍थापना, प्रसार माध्यमे, मिडिया व तद्संबंधीत आस्‍थापना,दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणा-या आस्थापना, मोबाईल कंपनी टॉवर व तद्संबंधीत आस्‍थापना,विद्युत पुरवठा, ऑईल व पेट्रोलिअम व उर्जा संसाधने व तद्संबंधीत आस्‍थापना,पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणा-या आस्थपाना, वरील सर्व अत्यावश्यक सेवा देणा-या संबंधातील आय. टी. आणि आय.टी.ई.एस. आस्थापना,. वरील सर्व अत्‍यावश्‍यक सेवा संबंधीत वस्‍तु आणि मनुष्‍यबळ, वाहतूक करणा-या ट्रक/वाहन (आवश्‍यक स्‍टीकर लावलेले), जालना जिल्‍हयातील उर्वरीत सर्व आस्‍थापना व दुकाने दिनांक ३१ मार्च २०२० पर्यंत बंद करणे बाबत आदेशीत करीत आहे.
       पोलीस अधिक्षक, जालना यांनी वर नमुद १ ते १० बाबीशी संबंधीत वाहतुक वगळता इतर सर्व प्रकारच्‍या वाहनास जिल्‍हयाच्‍या हद्दीत येण्‍यास प्रतिबंध करुन परत पाठवावे. या जिल्‍हयातील सर्व धार्मिक स्‍थळे, जनतेसाठी बंद राहतील परंतू सदरील धार्मिक स्‍थळी दैनंदीन प्रार्थना सुरु राहतील. त्‍याचप्रमाणे जिवनावश्‍यक वस्‍तुंची अवैध साठेबाजी व काळाबाजारी होणार नाही याची दक्षता पोलीस विभाग, पुरवठा विभाग आणि अन्‍न व औषध प्रशासन विभाग यांनी घ्‍यावी. तसेच करोना विषाणू च्‍या प्रतिबंधात्‍मक उपाययोजना संदर्भात घरात अलगीकरण केलेल्‍या व्‍यक्‍तीं व त्‍यांच्‍या संपर्कात आलेल्‍या सर्व व्‍यक्‍ती यांचे वैद्यकिय निरीक्षण काटेकोरपणे करण्‍याची आणि त्‍यांना इतरांपासुन विलग ठेवण्‍याची तसेच घरात अलगीकरण केलेल्‍या संशयी‍त रुग्‍णाच्‍या हातावरील शिक्‍के १४ दिवस राहतील याची खात्री जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक व जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी,जि.प.जालना यांनी करावी.अ आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था, अथवा समूह आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ तसेच भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार निक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्‍यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी आदेशानुसार कळविले आहे.


                                        (  छाया शाम गिराम सिंधीकाळेगाव )
 सिंधीकाळेगाव. (प्रतिनिधी) :- कोरोणा चा प्रादुर्भाव रोखण्या साठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यु चे अावाहण केले होते .  त्याला ग्रामीन, भागात सूद्धा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दररोज सूसाट वाहणारा जालना नांदेड हायवेवर रविवारी अशा प्रकारे शुकशुकाट दिसून आला.

                                                                     

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...