गुरुवार, ११ जून, २०२०

सचिन साठे यांना विधान परिषदेवर घ्या नसता, येणाऱ्या निवडणुकीत पुरोगामी विचारांची स्वतंत्र राजकीय ताकद उभी करू - चंद्रकांत कारके



जालना,ब्युरोचीफ :- राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत मा.सचिनभाऊ साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहुन मातंग समाजा सहित इतर बहुजन समाजाची मते NCP ला मिळवून दिली, त्यात साठे यांच्या भाषणाने निर्णायक मतांचा फायदा होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बरीच आमदार निवडून आली. तेव्हा मा.सचिनभाऊ साठे यांना NCP च्या कोट्यातून विधान परिषदेवर  येणात यावे असे प्रतिपादन बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय महासचिव तथा आंबेडकरी चळवळीतील नेते चंद्रकांत कारके यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. पुढे श्री. कारके म्हणाले की, फुले-शाहु-आंबेडकर-आण्णाभाऊ यांच्या पुरोगामी विचारांची महाराष्ट्र राज्याला गरज आहे. भाजप सारख्या मनुवादी सरकारने देशातील ब-याच राज्यात सत्ता हात्तगत करून भारता सारख्या लोकशाही राष्ट्राची वाट लावली आहे असा आरोप करत, आण्णाभाऊ यांचे नाव घेऊन अनेकांनी मंत्रीपदे मिळवली आहेत मात्र आजही त्यांचे कुटुंब राजकीय सत्तेपासून उपेक्षित आहे हे दुर्देवी बाब आहे, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे नातू मा.सचिन साठे यांचे 2010 पासून आज पर्यंतचे समाजकार्य पहाता त्यांना NCP च्या कोट्यातून विधान परिषदेवर देण्यात यावे, नसता आगामी निवडणुकीत आम्ही सर्व पक्ष संघटनेला सोबत घेऊन स्वतंत्र पुरोगामी विचारांची राजकीय ताकद उभी करू असे शेवटी पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत कारके हे म्हणाले.

बेजबाबदार पोलिसांवर कारवाई करावी,एकत्र येऊन लढा देऊ सुजात आंबेडकर



पुणे,ब्युरोचीफ :-  राज्यात दलितांवरील हल्ल्यात वाढ होत असून हल्लेखोरांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने अशा हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे, त्याला पोलिसही जबाबदार असून त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवानेते सुजात आंबेडकर यांनी केली आहे.*
विराज जगताप याच्या हत्येप्रकरणी अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांनी विराजच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले, राज्यात मागासवर्गीयांवर हल्ल्याचे प्रमाण वाढत असून पोलीस तातडीने कारवाई करीत नाही. त्यामुळे पोलिसांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कुठल्याही प्रकारची चौकशी न करता अरविंद बनसोड प्रकरणात पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल करून घेतला. या प्रकरणात आरोपी हे गृहमंत्र्यांचे नातेवाईक असल्याने पोलीस दबावाखाली काम करीत आहेत. तर विराज जगताप प्रकरणात हल्ला झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत तो बोलू शकत होता तरीही पोलिसांनी त्याचा जबाब घेतला नाही. भाजपच्या काळात या समाजावर दडपशाही होती.  मात्र आघाडी काळात त्यात काहीच सुधारणा झाली नाही. हल्ल्याचे प्रमाण वाढतच आहे. सर्व प्रकरणात मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार, सामाजिक संघटना, वंचित बहुजन आघाडी यांनी आवाज उठवल्यानंतर कारवाई करण्यात आली. अशी माहिती सुजात आंबेडकर यांनी दिली. हल्लेखोरांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने हल्लेखोरांवर  कारवाई केली जात नाही, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पूर्ण ताकदीने, संयमाने पुढे जाऊन लढा द्यायचा आहे, असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी केले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली. 

 तृतीयपंथीयांसाठी मोलाची कामगिरी करणार - दिशा शेख


मुंबई,ब्युरोचीफ :- तृतीयपंथीयांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक गोष्टींसाठी आपण काम करणार असून, भविष्यात अनेक जबाबदार्‍या पार पाडायच्या आहेत. त्यासाठी मी राज्य सरकारचे आभार मानते, अशा शब्दात तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या नवनियुक्त सदस्या दिशा पिंकी शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 


 राज्य सरकारने तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाची घोषणा केली. त्याच्या सदस्यपदी दिशा पिंकी शेख यांची नियुक्ती केल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे राज्यभरातून दिशा शेख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे. दिशा शेख सध्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या असून त्या देशातील पहिल्या तृतीयपंथी कवयित्री आहेत. अतिशय संघर्षमय जीवनातून वाटचाल करीत त्यांनी हे शिखर गाठले आहे. येवला येथे जन्मलेल्या दिशा शेख सध्या श्रीरामपूर अहमदनगर या ठिकाणी राहतात. आठवडा बाजारात पैसे कमविणे आणि कविता करणे हा त्यांच्या जीवनाचा दैनंदिन भाग होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या दिशा शेख खऱ्या अर्थाने शोषित, वंचितांना न्याय देण्यासाठी राजकारणाकडे वळल्या.  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिशा शेख यांची नियुक्ती प्रवक्ते पदी  केली. चांगल्या वक्त्या,अभ्यासु मार्गदर्शन करणाऱ्या दिशा शेख यांचा सामाजिक ओढा पाहता राज्य सरकारने तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती केली. भविष्यात आपण तृतीयपंथीयांसाठी आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक विषयांवर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मंडळावर गौरी सावंत, सलमा खान यांची देखील नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला शिकायला मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.

 

जिल्ह्यात 26 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर तीन  रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज - जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती.




जालना,ब्युरोचीफ :- जिल्हा सामान्य रुग्णालयातुन पिंपळगांव ता. जालना येथील 35 वर्षीय पुरुष, बदनापुर येथील 60 वर्षीय महिला, बदनापुर येथील 10 वर्षीय  मुलगा असे एकुण 3 कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करुन व त्या सर्वांच्या दुस-या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.  तसेच दि. 11 जुन 2020 रोजी 26 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. पॉझिटिव्ह सापडलेल्या व्यक्तींमध्ये   जाफ्राबाद शहरातील आदर्श नगर येथील 07, किल्ला परिसरातील 11, राजेगांव ता. घनसावंगी येथील 01, पारडगांव ता. घनसावंगी येथील 01, जालना शहरातील पोलीस कॉर्टर येथील 02, गुडला गल्ली परिसरातील 02, लक्कडकोट परिसरातील 01 तसेच नानक निवास येथील 01, अशा एकुण 26 व्यक्तींचा समावेश आहे.

                                                                          मदिना चौक अंबड परिसरातील रहिवाशी असलेल्या 65 वर्षीय पुरुष दि. 4 जुन 2020 रोजी हृदयाचा आजार, उच्च रक्तदाबाचा त्रास व न्युमोनिया असल्या कारणाने त्याला जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्यावस्थ परिस्थितीत आय.सी. यु. मध्ये दाखल करण्यात आले होते. संबंधिताच्या स्वॅबचा अहवाल दि. 5 जुन 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. उपचार सुरु असतांनाच त्यांचा मृत्यु दि. 11 जुन 2020 रोजी झाल्याची  माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण - 3211 असुन सध्या रुग्णालयात -76, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती -1229, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या – 149, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -3540, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने – 26 ,असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -248, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -3130, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-380, एकुण प्रलंबित नमुने -158, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1147,
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 17, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती – 1038, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -112, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -600, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत–13,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 75, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -22, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-03, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या -145,  सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या- 91, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या -05,  पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 6628 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 07 एवढी आहे. 
कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 600 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास वसतीगृह जालना – 11, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-25,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -29, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-38, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -305, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-17, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-28,, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे –39, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी -20, मॉडेल स्कुल मंठा-39,कस्तुरबा गांधी बालिका वसतीगृह मंठा- 15, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -01, , पंचगंगा मंगल कार्यालय जाफ्राबाद-33 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 167 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 786 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 825 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली   3 लाख 32 हजार 630 असा एकुण 3 लाख 59 हजार  438 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


  आरोग्य, कृषी व पणन या विषयावर अधिकाऱ्यांनी           साधला जनतेशी फेसबुकलाईव्हद्वारे संवाद.





जालना,ब्युरोचीफ :- जनतेच्या मनातील असलेले प्रश्न, शंका यांचे निरसन व्हावे यादृष्टीकोनातुन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या संकल्पनेतुन सुरु करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा जनतेशी फेसबुक लाईव्ह संवाद या उपक्रमांतर्गत आज दि. 11 जुन रोजी आरोग्य, कृषी व पणन या विषयावर अधिकाऱ्यांनी जनतेशी फेसबुकलाईव्हद्वारे संवाद साधत जनतेनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातून झालेल्या या फेसबुक लाईव्ह प्रसंगी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांची उपस्थिती होती.

            आरोग्य या विषयावर जनतेशी संवाद साधताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड म्हणाले, जालना जिल्ह्यात कोव्हीड बाधितांना त्वरेने उपचार मिळावेत यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे तसेच जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या पुढाकारातुन कोव्हीड हॉस्पीटलची उभारणी करण्यात आली. तसेच शहरातील विवेकानंद हॉस्पीटल, मिशन हॉस्पीटल, दीपक हॉस्पीटल, वेदप्रकाश आयुर्वेदीक महाविद्यालय, गुरुगणेश होमिओपॅथिक, वरुडी येथील दवाखान्यांमध्ये कोव्हीड बाधितांवर उपचारासाठी खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत.  त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यामध्ये कोव्हीड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली असुन या ठिकाणी सुमारे 1 हजार 700 खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. एप्रिल महिन्यामध्ये जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या अत्यंत कमी होती.  परंतू परराज्य, परजिल्ह्यातुन आलेल्या व्यक्तींमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या सहवासितांचा शोध घेऊन त्यांचे विलगीकरण करणे तसेच त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.  कोव्हीडबाधितांना आवश्यक ते औषधोपचार करण्याबरोबरच त्यांची प्रतिकार शक्ती वाढून हे रुग्ण लवकर बरे व्हावेत यासाठी रुग्णांना पौष्टीक आहारही देण्यात येत असल्याची माहितीही डॉ. राठोड यांनी यावेळी दिली.

            संशयित रुग्णांच्या लाळेचे अहवाल आजघडीला तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठवावे लागत आहेत.  राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातुन जालना येथे आरटीपीसीआर लॅबला मंजुरी मिळाली असुन ही लॅब येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये कार्या‍न्वित करण्याच्यादृष्टीने काम करण्यात येत आहे.  ही लॅब सुरु झाल्यास लाळेचे अहवाल जालना येथेच तपासता येणार असुन अहवाल केवळ 6 ते 12 तासांमध्ये उपलब्ध होणार असल्याने रुग्णांवर उपचार करणे सोईचे होणार आहे.  नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे.  गर्दीच्या अथवा सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन, मास्कचा, सॅनिटायजरचा वापर करण्याबरोबरच प्रशासनामार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन करत नागरिकांनी आरोग्य विषयक विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी यावेळी दिली.

            कापुस खरेदी (पणन) या विषयावर नागरिकांशी संवाद साधताना उपजिल्हा निबंधक नानासाहेब चव्हाण म्हणाले,  जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेला कापूस पडून न राहता प्रत्येकाचा कापुस खरेदी होण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या आदेशानुसार ज्या शेतकऱ्याकडे कापुस आहे त्याची पहिली छाननी करण्यात आली.  दुसरी छाननीही करण्यात येत असुन ती 15 जुन रोजी पुर्ण होणार आहे.

            जिल्ह्यात सीसीआरचे सात तर कॉटन फेडरेशनचे दोन अशा एकुण  9 केंद्राच्या माध्यमातुन जिल्ह्यात कापसाची खरेदी करण्यात येत आहे.  जिल्ह्यातील 14 जिनिंगच्या माध्यमातुन कापसाची खरेदी होत असुन आजपर्यंत 1 लाख 64 हजार 871 क्विंटल कापसाची खरेदी ही ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे.  जिल्ह्यात असलेल्या जिनिंग तातडीने सुरु करण्याचे निर्देश प्रशासनामार्फत देण्यात आले होते. ज्यांनी जिनिंग सुरु केल्या नाहीत अशांना नोटीसा बजावण्याबरोबरच कारवाईही करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

            प्रत्येक गरजु शेतकऱ्याला पीककर्ज उपलब्ध करुन देण्याच्या सुचना जिल्ह्यातील सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत. बँकांतील कर्मचारी परठिकाणाहुन अपडाऊन करत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचे प्रवासाचे रद्द करण्यात आले असुन  असे कोणी कर्मचारी अपडाऊन करत असल्यास त्याची माहिती देण्याचे आवाहनही श्री.चव्हाण यांनी केले.

            कृषीविषयक माहिती देताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री शिंदे म्हणाले, जालना जिल्ह्यात खरीपाचे           5 लाख 32 हजार हेक्टर क्षेत्र असुन यावर सोयाबीन, मका, कापूस, तुर पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सोयाबीनची उगवण क्षमता तपासणी करण्यात आली असुन 17 हजार क्विंटल सोयाबीन तर 11 लाख कापुस बियाणाचे पाकिटे उपलब्ध आहेत.  1 लाख 55 हजार मे.टन रासायनिक खत उपलब्ध असुन 75 मे. टन खताची विक्रीही करण्यात आली आहे.  शेतकऱ्यांना खताचा तुटवडा भासणार नाही, याचे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगत फळपीकयोजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, सामुहिक शेततळे योजना, शेतीशाळा या योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी यावेळी दिली.


    अनुसूचित जमातीतील कुटुंबांना शिधापत्रिका काढण्यासाठी येणारा खर्च न्यूक्लिअस बजेट योजनेतून

आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांची माहिती.




मुंबई,ब्युरोचीफ :- शिधापत्रिका (रेशनकार्ड) नसलेल्या अनुसूचित जमातीमधील आदिवासी, पारधी समाजातील कुटुंबांना शिधापत्रिका काढण्यासाठी येणारे शुल्क आता आदिवासी विकास विभागाच्या न्यूक्लिअस बजेट योजनेतून करण्यात येणार आहे. तसेच शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांच्या याद्या तयार करणे, कागदपत्रे तयार करणे आदी खर्चही यातून होणार असल्यामुळे शिधापत्रिका नसलेल्या अनुसूचित जमातीतील कुटुंबांना शिधापत्रिका मिळणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी यांनी दिली.
रेशनकार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अथवा आर्थिक कारणांमुळे अनुसूचित जमाती व पारधी समाजातील कुटुंबांना अडचणी येत होत्या. सध्याच्या कोविडमुळे निर्माण झालेल्या काळात शिधापत्रिका नसल्यामुळे अशा कुटुंबांना अन्नधान्य पुरवठा करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे अनुसूचित जमाती व पारधी समाजातील कुटुंबांना शिधापत्रिका काढण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत मदत करण्यात येत आहे. तसेच ही शिधापत्रिका काढण्यासाठी येणारा खर्च आदिवासी विकास विभागाच्या न्यूक्लिअस बजेट योजनेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांच्या याद्या तयार करणे, त्या कुटुंबांचे आवश्यक कागपदत्रे तयार करणे, शिधापत्रिकासाठी आवश्यक शुल्क आदीचा खर्चही प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत या योजनेतून करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे अनुसूचित जमाती, पारधी समाजातील कुटुंबांना शिधापत्रिका मिळणार आहेत. शिधापत्रिका मिळाल्यामुळे या कुटुंबांना विविध योजनेतून अन्नधान्य पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असून लॉकडाऊन काळात कोणतेही कुटुंब अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, असा विश्वास आदिवासी विकास मंत्री अॅड. पाडवी यांनी व्यक्त केला.


रामनगर येथे रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद


कार्यक्रममाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना आयोजक माजी आमदार अरविंद चव्हाण   छायाचिञ(श्याम गिराम)

सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) :- जालना तालुक्यातील रामनगर येथील अजितदादा पवार कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त बदनापूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा जालना जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मा. आ.श्री.अरविंदराव चव्हाण यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला.यावेळी 101 जणांनी रक्तदान केले.तसेच कोरोना प्रतिबंधक असनीक-३० औषध व मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्रदेश प्रदेश सरचिटणीस बळीराम कडपे ,जिल्हा परिषद सदस्य जयमंगल जाधव,राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब वाकुळणीकर संजय काळबांडे एकबाल पाशा, शहा आलमखान दिलीप भुतेकर, कैलास मदन, पांडुरंग ज-हाड,धैर्यशील चव्हाण,मुकेशच चव्हाण, राजेश पवार,पदमाकर हांडे,उमेश मोहिते,राजेश छबुराव पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


कोरोनाविरुद्धचा लढा सुरूच! ‘गर्दी टाळा-शिस्त पाळा’- मुख्यमंत्र्यांचे राज्यातील जनतेला आवाहन.


मुंबई,ब्युरोचीफ :- कोरोनाविरुद्धचा आपला लढा संपलेला नाही तो सुरुच आहे, त्यामुळे आपल्याला सावध राहून कोरोनासोबत जगावे लागेल, कुठेही घाई गडबड करून किंवा गर्दी करून चालणार नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना गर्दी टाळण्याचे आणि कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे पुढे म्हणाले की,  लॉकडाऊन जसे टप्प्याटप्प्याने लावले तसेच ते टप्प्याटप्प्याने  आपण हटवत आहोत, कोरोनासोबत जगतांना आपल्याला सावधानता बाळगायची आहेच, मास्क लावणे, हात धुत राहणे यासारख्या  सवयी अंगी बाळगायच्याच आहेत, गर्दी करायची नाही, झुंडीने फिरायचे नाही.  संकट अजून टळलेले नाही. कोरोनाविरुद्धचा आपला लढा संपलेला नाही. सावध राहून अर्थचक्र सुरु करतांना सर्व नियमांचे पालन करूनच आपल्याला काम करावयाचे आहे. मिशन बिगिन अगेन अंतर्गत आपण काही नियम शिथिल केले असता  पहिल्या दिवशी गर्दी झालेली दिसली. असे करू नका,  सकाळी पाच ते सायंकाळी ७ पर्यंत फिरायला जाण्याची, व्यायाम करण्याची मुभा दिली ती आरोग्यासाठी, गर्दी करून आरोग्य बिघडवण्यासाठी नाही हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

राज्यातील जनतेवर विश्वास
सर्व सांगून आणि काळजी घेऊनही परिस्थिती हाताबाहेर जातांना दिसली, ती जीवघेणी होतांना दिसली तर पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल, पण राज्य सरकार जे काही निर्णय घेत आहे ते जनतेच्या हिताचेच आहेत याची कल्पना जनतेला असल्याने राज्यातील नागरिक ती वेळ येऊ देणार नाहीत. शिस्त पाळून शासनाला सहकार्य करतील,  त्याबद्दल मला विश्वास वाटतो असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. अत्यावश्यक सेवेतील, जीवनावश्यक काम करणाऱ्या लोकांसाठी लोकल सुरु करण्याची मागणी केंद्र शासनाकडे केल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.



अनुसूचित जातीच्या बांधवांवरील अन्याय, अत्याचार अजिबात सहन केले जाणार नाहीत

दोषींविरुद्ध कडक कारवाईचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश



मुंबई,ब्युरोचीफ :-राज्यात अनुसूचित जातीच्या बांधवांवर होणारे अन्याय, अत्याचार कोणत्याही परिस्थितीत अजिबात सहन केले जाणार नाहीत, महाराष्ट्र शासन या बांधवांच्या पाठीशी असून अशा प्रकारच्या गुन्ह्यातील  दोषींविरुद्ध तात्काळ व कडक कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा सांगणारे आपले राज्य असून या राज्यात गोरगरीब, अनुसूचित जाती व नवबौद्ध बांधवांवर अन्याय अत्याचार होता कामा नये. राज्यात काही ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यातील दोषींविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस विभागाला दिले असल्याचे गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांनी सांगितले.
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सांगवी पोलीस ठाण्यातंर्गत दोन-तीन दिवसांपूर्वी एका मुलाला मारहाण झाली, त्यात तो मयत झाला. या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी पकडले असून पुढील कारवाई सुरू आहे.तसेच नरखेड तालुक्यातील पिंपळधरा येथील अरविंद बनसोड या तरूणाच्या मृत्यूची चौकशी देखील पारदर्शी व निःपक्षपातीपणे करण्यात येईल. त्यासंबंधातील निर्देशही गृहमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता हा तपास उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याकडे  दिला असल्याचे असल्याचेही गृहमंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २१व्या वर्धापन दिननिर्मित परतूर येथे आज भव्य रक्तदान शिबीर


परतूर प्रतिनिधी/इम्रान कुरेशी

हॅलो रिपोर्टर न्युज
परतूर :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त परतूर येथील लाल बहादूर शास्त्री वरिष्ठ महाविद्यालयात आज दि.११ जून रोजी सकाळी १० ते दुपारी२ च्या दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल भैया आकात यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी शहरातील व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी कार्यकर्त्यांनी रक्तदान करून राष्ट्र कार्यास हातभार लावण्याचे आव्हान राष्ट्रवादी युवक कांग्रेस चे जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती कपिल भैया आकात यांनी केले, अंकुश शिंदे, राखे नाना,योगेश बरकुले, अशोक साखळकर, कैलास मुळे,कैलास शिंदे इतर उपस्थित होते


  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...