मंगळवार, २४ मार्च, २०२०

        कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी उपलब्ध                    मनुष्यबळाची सेवा जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिग्रहीत
                     जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांचे आदेश
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये जिल्हाधिकारी यांना अधिकार
बुलडाणा, प्रतिनिधी: कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. या उपाययोजना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यातील उपलब्ध मनुष्यबळाची सेवा अधिग्रहीत करता येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील डॉक्टर्स, व्यक्ती/ समुह, संस्था / प्राधिकरणे आदीमधील उपलब्ध असलेली सेवा, साधनसामुग्री, अधिकारी / कर्मचारी, उपलब्ध मनुष्यबळ यांची सेवा कोरोना विषाणूचा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आली आहे. उपरोक्त नमूद सेवा अधिग्रहीत केलेल्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेशीत केल्यास तातडीने उपस्थित व्हावे व अनुपालन करण्यात यावे. तसा अहवालही जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील विविध कलमान्वये शिक्षा प्रस्तावित करण्यात येवून भारतीय दंडसंहीता 1860 मधील कलम 188 नुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी आदेशान्वये कळविले आहे.      
उमरीकरांना दिलासा; हैदराबाद येथून परतलेल्या तरुणाचा अहवाल निगेटिव्ह आला
नांदेड (भगवान कांबळे ) : हैदराबाद येथून आलेल्या वीस वर्षीय  तरूणाचा कोरोनाविषयीचा रिपोर्ट निगेटिव्ह
आलेला आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. एन. आय. भोसीकर यांनी उमरी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.  शंकर चव्हाण यांच्याशी फोनवरून ही माहिती दिली. पुणे येथून  या संशयित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे त्यांनी  सांगितले . असे असले तरीही या तरुणास आणखी काही दिवस उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात आयसोलेशन  वॉर्डांमध्ये निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे . त्यानंतर दोन आठवडे त्याला होम कोरोन्टाईल केले जाईल .  कारण सात ते पंधरा दिवसानंतर या साथीच्या रुग्णाचा आजार जाणवू  शकतो . त्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.  कोरोना  सारख्या महाभयंकर साथीने तब्बल दोन आठवड्यानंतर   अनेक देशांमध्ये थैमान घातल्याचे दिसून आले.  त्यामुळे आपल्याला पुढील काही दिवस  त्याबाबत अत्यंत सतर्क राहून काम  करावे लागेल.  त्यामुळे नागरिकांनी आरोग्य खात्याला सहकार्य करावे.  बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात राहू नये,त्यांच्यासाठी राहण्याची वेगळी व्यवस्था करावी.  कुणीही घराच्या बाहेर पडू नये .  नेहमी हात स्वच्छ धुवावेत. बाहेरच्या लोकांशी संपर्कात येऊ नये. पुढचे दोन आठवडे सर्व नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यासाठी सर्वांनी गांभीर्याने घ्यावे.   असे आवाहन डॉक्टरांनी केले.
सिरसमार्ग तरटेवाडी व काळेवाडी वतीने गावातील सर्व सुजाण ग्रामस्थ यांना जाहीर आवाहन
शिरसमार्ग प्रतिनिधी :- कोरोना या महाभयावह
रोगाने जगाला विळखा घातला आहे तरी या संकटाच्या विरोधातील सर्व ग्रामस्थांनी मी स्वतःचा रक्षक स्वतःच या भावनेने  आपली व आपल्या आप्तस्वकीय व परिसरातील लोकांची काळजी घेऊ या.. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनौपचारिक सल्ले, संदेश देण्यापेक्षा प्रत्येकाने आपण या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका व कर्तव्य पार पाडूया...तसेच गावातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या  किराना दुकानदार, भाजीपाला विक्रेते, दूध संकलन व दुध पुरवठा करणारे दूध व्यावसायिक या सर्वांनी आपली एक जबाबदारी व सामाजिक जाणिव म्हणून कोणत्याही प्रकारचे नित्कृष्ठ दर्जाचे पदार्थ विक्री करू नयेत व कोणत्याही प्रकारची दरवाढ करू नये आणि विशेष करून तंबाखू व तत्सम पदार्थ विक्री करू नये कोणीही खाऊन कुठे रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी पचकण थुंकून घान करू नये  कोणतेही गैरकृत्या  करणार नाही संचार बंदी चे काटेकठोरपणे पालन होईल  याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. मागिल पंधरा दिवसांत गावात बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या व्यक्ती यांनी स्वतः घरात इतरांच्या पासून वेगळे राहावे सर्दी खोकला ताप घशात खवखवणे स्वसनास  त्रास  इ.लक्षणे आढळल्यास सिरसमार्ग येथील शासकिय दवाखान्यात डॉक्टरांना दाखवून घ्या. विनाकारण घाबरू नका.अफवा पसरवू नका.
 आपण सर्वांनी प्रशासन, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत यांना सहकार्यकरा आणि आपण आपल्या  गावात एकही कोरोनाचा रुग्ण होणार नाही अशी शपथ घेऊया.  ग्रामपंचायतीसह प्रशासनाला   सहकार्य करावे..
एक लढा मानव जातीच्या अस्तित्वासाठी ...एक लढा कोरोना नावाच महासंकट गाडण्यासाठी...
     असे आव्हान बाबासाहेब कुडके ग्राम विकास अधिकारी,ग्रामपंचायत कार्यालय शिरसमार्ग अशोक डरफे तलाठी सजा सिरसमार्ग यांनी केले आहे.


कोरोनोचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमु नये परदेश अथवा ईतर जिल्ह्यातुन आलेल्या नागरिकांनी प्रशासनास माहिती द्यावी - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे
जालना, प्रतिनिधी :- कोरोनो विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये यादृष्टीकोनातुन जिल्हा प्रशासन सर्वतोपरी
जालना जिल्‍यामध्‍ये एकूण ५० रुग्‍ण विलगीकरण कक्षात दाखल होते. त्‍यापैकी ४७ रुग्‍णांचे स्‍वॅब घेण्‍यात आले आहेत. त्‍यापैकी २६ रुग्‍णांचे अहवाल प्राप्‍त झाले असून ते निगेटिव्‍ह आले आहेत. त्‍या २६ रुग्‍णांना डिर्स्‍चार्ज देण्‍यात आला आहे. आजरोजी २४ रुग्‍ण विलगीकरण कक्षात दाखल असून त्‍यांची प्रकृती स्थिर आहे. दिनांक २४ मार्च, २०२० रोजी ३ रुग्‍ण नव्‍याने दाखल झाले आहेत.
 प्रतिबंधात्मक उपाययोजना करत असुन या विषाणुचे संक्रमण होऊ नये यासाठी पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमु नये. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा आपल्या घरीच रहावे व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.जिल्‍हयातील किराणा मालाच्‍या दुकाना पुर्णवेळ सुरु राहणार असुन त्‍यासाठी नागरीकांनी गर्दी करण्‍याची काहीही आवश्‍यकता नाही.  जिल्‍हयामध्‍ये दिनांक 23 मार्च, 2020 पासुन फौजदारी प्रक्रिया संहीता १९७३ चे कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्‍मक आदेश जारी करण्यात आलेले असुन कोणत्‍याही परिस्थितीत पाचपेक्षा अधिक लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमु नये, अथवा कोणत्‍याही रस्‍त्‍यावर, गल्‍लोगल्ली थांबु नये. नागरिकांनी  शक्‍यतो आपल्या घरीच थांबावे. अत्‍यंत आवश्‍यक असेल त्यावेळीच घराबाहेर पडावे व प्रशासनाच्‍या आदेशाची अंमलबजावणी करावी. प्रशासनाचे आदेश न पाळणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्‍यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.   कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी  जिल्‍हा प्रशासनाने एकूण १२ कोटी ६० लक्ष रुपयांची तरतूद केली आहे.  नागरीकांनी घाबरुन जाऊ नये, जिल्‍हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्‍य विभाग आपल्‍या सोबत आहे. नागरिकांना कुठल्याही प्रकारच्‍या शंका अथवा काही विचारणा करावयाची असल्‍यास त्यांनी जिल्‍हा नियंत्रण कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालय, जालना येथे ०२४८२-२२३१३२ या क्रमांकावर संपर्क साधावा.   जालना जिल्‍हयातील नगर परिषदेच्‍या वतीने करोना विषाणूच्‍या पार्श्‍वभूमीवर टॅक्‍टरद्वारे फवारणी करण्यात येत असुन शहरामध्‍ये स्‍वच्‍छता व धुरीकरणसुध्‍दा करण्‍यात येत आहे.  मागील एक महिन्यात  आपण जर कोरोनाग्रस्त देशातून आलेले असाल अथवा इतर जिल्ह्यातून जालना जिल्ह्यात आला असला तर http://ezee.app/covid19jalna या लिंकवरु जाऊन संपूर्णपणे खरी माहिती फॉर्ममध्ये भरावी. जेणेकरून प्रशासनामार्फत जनतेला योग्य ती मदत करता येईल.
विभागीय आयुक्तांनी घेतला व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आढावा
आज दिनांक २४ मार्च, २०२० रोजी दुपारी २ वाजता विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांनी औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मुख्य  कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधुन करोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी करावयाच्‍या उपाययोजनाच्‍या अनुषंगाने करण्‍यात येणा-या कार्यवाही बाबत आढावा घेतला यावेळी विभागीय आयुक्तांनी जिल्‍हयात कलम १४४ व संचारबंदीच्या अनुषंगाने उपस्थितांना मार्गदर्शक सुचना केल्या

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...