रविवार, २६ एप्रिल, २०२०


घनसांवगी तालुक्यातील ढाकेफळ येथील भूमिहीन मजूर विधवा अपंग  70 गरजूंना राशन किट वाटप

सामाजिक कार्यकर्ते संदीप येडे व कपिल सरोदे यांचा पुढाकार

घनसांवगी,प्रतिनिधी :- जगामध्ये कोरोना ने थैमान माजल्यामुळे  सध्या जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण भारतात लॉक
डाऊन सुरू आहे .अशा परिस्थितीत संपूर्ण भारत बंद आहे.अशा परिस्थितीमध्ये हातावरील मजुरांना बाहेर निघणे शक्य नाही त्यांच्या हाताला काम नाही त्यांची उपासमार होत असल्यामुळे घनसां वगी तालुक्यातील ढाकेफळ येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप येडे व कपिल सरोदे या दानशूरांनी पुढाकार करून भूमिहीन मजूर विधवा अपंग अशा कुटुंबांना राशन किट वाटप केली.


    अन्नधान्याच्या तक्रारींच्या निरसनासाठी भरारी पथक गठित

जालना,प्रतिनिधी:- स्वस्तधान्य दुकानदारांबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याअनुषंगाने अन्नधान्याबाबत होणाऱ्य गैरव्यवहाराबाबतच्या 
या पथकाचे प्रमुख म्हणुन संतोष बनकर, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी यांची नियुक्ती केली असुन त्यांचा भ्रमणध्वनी क्र. 9689001149, सदस्य म्हणून तपासणी अधिकारी  पी.सी. उघडे-9422226748, पुरवठा निरीक्षक जी.एस. मोरे-9763740430, पुरवठा निरीक्षक आर.एम. निहाळ-9422721526 यांचा समावेश असल्याचे आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहेत क्रारींचे निरसन करण्यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथक गठित करण्यात आले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसैय्ये यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.


दु:खीनगर व शिरोडा येथील महिलांच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह

  जालना,प्रतिनिधी:- जालना शहरातील दु:खी नगर येथील 65 वर्षीय महिला व शिरोडा ता. परतुर येथील 39 वर्षीय महिलांचे शेवटचे दोन स्वॅब (24 तास अंतराचे) निगेटीव्ह आले असुन दु:खीनगर येथील कोरोनाग्रस्त महिलेची 
प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.जिल्ह्यात एकुण 916  व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 93 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 595 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 25 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 793 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने -00 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 02 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 757, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 104, एकुण प्रलंबित नमुने-27 तर एकुण 502 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 02, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 317 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 02, सध्या अलगीकरण  केलेल्या व्यक्ती -273, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-24, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 93, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 24, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 151 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 273 एवढी झाली असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना – 48, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह-41, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-18, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-14, पोलीस प्रशिक्षण केंद्र-101, मंठा येथे 13 तर गुरुगणेश भवन, जालना येथे 38 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 386 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 62 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 461 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 59 हजार 400 असा एकुण 2 लाख 86 हजार 208 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे परजिल्ह्यात अडकुन पडलेल्या ऊसतोड कामगारांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येत असुन दि. 25 एप्रिल, 2020 रोजी बदनापुर तालुक्यामध्ये बीड येथुन 11 व पुणे येथुन 28 एकुण 39 कामगार, परतुर तालुक्यात सांगली येथुन 51 व कोल्हापुर 37 एकुण 88 कामगार, मंठा तालुक्यात सांगली-72 कोल्हापुर 19, व सातारा येथुन 6 असे एकुण 97 कामगार, घनसावंगी तालुक्यात सांगली-63, कोल्हापुर-43 व सातारा-85 असे एकुण 191 कामगार, तर अंबड तालुक्यात बीड-25, पुणे-17,  सांगली 113, कोल्हापुर-83, सातारा-133, सोलापुर-49 व लातुर येथुन 02 असे एकुण 422 कामगार दाखल झाले आहेत.


महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन.


जालना,प्रतिनिधी :- महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात तहसिलदार संतोष बनकर यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी माहिती सहाय्यक अमोल महाजन, श्रीमती आर.आर. महाजन,श्रीमती संपदा कुलकर्णी, श्रीमती छाया कुलकर्णी आदींनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


धामनगांव प्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करून आरोपींना तात्काळ अटक करा- दीपक डोके
                                                  
जालना (प्रतिनिधी) :- बदनापूर तालुक्यातील धामणगाव येथे लॉकडाउन चा फायदा घेऊन जमीनीवर अतिक्रमण करुन बौद्ध तरुणांना गावातील गावगुंडांनी  बेदम मारहाण केली, ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न केला, 
धामणगाव शिवारात शासनाने मागासवर्गीयांना महारहडुळ 12 एकर जमीन पोट भरण्यासाठी दिलेली आहे. त्यावर गावातल्या  जातीयवादि गावगुंडांनी अतिक्रमण  केले आहे. जमीन कसत असलेले  तरुण जाब विचारायला गेले असता त्यांना बेदम मारहाण  करून अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला आहे. सदरिल प्रकरणी पिडीतांनी तक्रार देऊन 10 दिवस झाले तरी कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, तरी पोलिस प्रशासनाने  तात्काळ संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हा पदाधिकारी दीपक डोके, अशोक खरात,अकबर इनामदार, विष्णु खरात, दिपक घोरपडे, अँड.कैलास रत्नपारखे,प्रकाश मगरे, संतोष शेळके, रविराज वाहुळ, सुरेंद्र तुपे,न्यानेश्वर बोबडे, राहुल तुपे,हरिष बोर्डे, सचिन पट्टेकर यांनी केले आहे.



वाहेगाव सातारा ग्रामपंचायतच्या वतीने पंधराशे मास्क व पाचशे सेनिटायजर वाटप
परतुर,प्रतिनिधी/प्रशांत वाकळे :- वाहेगाव सातारा येथील ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामविकास अधिकारी दडमल साहेब यांच्या हस्ते पंधराशे मास्क व पाचशे सेनिटायजर चे वाटप  करण्यात आले.परतुर तालुक्यातील वाहेगाव 
सातारा गावातील नागरिकांना मास्क व सेनिटायजर वापरा विषयी माहीती देण्यात आली.व तसेच गावातील तरुणांनी कोरोना विषयी जनजागृती करण्यासाठी एक टिम तयार करण्यात आली व ती टीम दिवस रात्र गावास पाहारा देण्याचे काम करत आहे. कोरोना विरुध्दच्या लढाईमध्ये मोलाची भुमीका बजावत आहे.कोरोणा पासुन स्वताच्या संरक्षणासाठी ग्रामपंचायतच्या वतीने सोसल डिस्टिंगचे पालन करत मास्क व सेनिटायजर चे वाटप करण्यात आले.यावेळी ग्रामविकास अधिकारी दडमल,सरपंच अमोल काटे,उपसरपंच रोहन वाघमारे,मा.सरपंच औंकार काटे,सुनिल काटे,सुहाष वाघमारे,विनोद वाघमारे,अगणवाडी सेवीका,आशा कार्यकर्ते आणि गावातील नागरिक ऊपस्तीत होते.

शहरातील 25 हजार पेक्षा अधिक कुटूंबापर्यंत धान्य पुरवठा करून           गोरंट्याल दाम्पत्याने जोपासली सामाजिक बांधीलकी
धान्याची गरज असलेल्या कुटूंबांसाठी मोबाईल पथक नियुक्त; गरजुंनी संपर्क साधल्यास पथक करणार मदत -- आ. कैलास गोरंट्याल

जालना,(प्रतिनिधी):-कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन कालावधीत जालना शहरातील 25 हजार पेक्षा अधिक गोर-गरीब आणि गरजु कुटूंबापर्यंत अन्न धान्याच्या माध्यमातून मदतीचा हात देत जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल आणि नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंटयाल यांनी गोरंट्याल परिवाराच्या सामाजिक कार्याची बांधिलकी जोपासण्याची परंपरा कायम राखली आहे. दरम्यान अन्नधान्या संदर्भात गरजु कुटूंबापर्यंत मदत पोहचविण्यासाठी आमदार गोरंट्याल यांनी मोबाईल पथक नियुक्त केले असून या पथकातील सदस्य गरजु कुटूंबांना धान्यासह शिजवलेले अन्न पोहचवून त्यांची भुक भागविण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्रासह संपुर्ण देशभरात कोरोना या संसंर्गजन्य आजाराने गेल्या दोन महिण्यापासून थैमान घातले असून या पार्श्‍वभुमीवर प्रथम राज्यशासनाने राज्यात 24 ते 31 मार्च या कालावधीत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यशासनाच्या या निर्णया पाठोपाठ केंद्र शासनाने देखील दि. 25 मार्च पासून देशभरात लॉकडाऊनचे आदेश दिलेले असून या आदेशात पुढे वाढ करून दि. 3 मे पर्यंत लॉकडाऊनचे आदेश कायम ठेवले आहे. त्यामुळे दररोज मोलमजुरी करून आपला आणि कुटूंबीयांचा उदरनिर्वाह भागवणार्‍या कामगारांसह मजुरांची मोठी कुचंबना झाली असून काम नसल्यामुळे रोजंदारी बुडत असतांना दुसरीकडे अन्नधान्याचा देखील प्रश्‍न निर्माण झाल्यामुळे जालना शहरातील हजारो कुटूंब आणि या कुटूंबातील सदस्यांवर उपासमारीची वेळ येवून ठेपली होती. कै. किसनराव गोरंट्याल यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्याचा वारसा लाभलेले जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल आणि नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल या दाम्पत्याने गोरंट्याल परिवाराच्या सामाजिक कार्याची ही परंपरा लॉकडाऊन कालावधीत कायम राखत जालना शहरातील गोर-गरीब व गरजु असलेल्या 25 हजार पेक्षा अधिक कुटूंबांना अन्नधान्यासह शिजवलेल्या अन्नाचा पुरवठा करून संकटकाळी मदतीचा हात पुढे केला आहे. दि. 09 एप्रिल रोजी आ. कैलास गोरंट्याल यांचा वाढदिवस असल्याने सर्व कार्यक्रमांना फाटा देत आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आ. गोरंट्याल यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी शहरातील गरजु कुटूंबापर्यंत जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. जालना शहर व जिल्हा काँग्रेस तर्फे जालना शहरातील गरजु कुटूंबांना पुरीभाजी, पुलाव आदी शिजवलेले अन्न पुरवुन त्यांची भुक भागविण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय जालना नगर पालिकेतील स्वच्छता विभागाचे कर्मचारी कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर आपल्या जीवाची पर्वा न करता दररोज साफ-सफाईच्या कामासाठी कार्यरत असल्यामुळे या कार्याची दखल घेवून गोरंट्याल परिवाराच्या वतीने सर्व स्वच्छता कर्मचार्‍यांना दररोज नाष्टा पुरविण्याचे काम केले जात आहे. शहरातील गरजु कुटूंबांची धान्याची गरज लक्षात घेवून आ. गोरंट्याल यांनी एक मोबाईल पथक नियुक्त केले असून शहरातील कोणत्याही भागातून आ. गोरंट्याल यांना अन्नधान्याबाबत मागणी झाल्यास या मोबाईल पथकातील सदस्यांच्या माध्यमातून गरजु कुटूंबापर्यंत धान्य पुरवठा करून त्यांची अडचण दुर करण्याचा प्रयत्न प्राधान्य क्रमाने केली जात आहे.शहरातील ज्या भागातील गरजु कुटूंबांना अन्नधान्याची अडचण असेल अशा कुटूंबातील सदस्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांशी संपर्क साधून त्यांच्यापर्यंत आपल्या अडचणी मांडल्यास या बाबत निश्‍चीतपणे दखल घेवून गरजवंतापर्यंत धान्य पुरवठा करण्याचे काम करण्यात येईल अशी ग्वाही आ. कैलास गोरंट्याल व नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल यांनी दिली आहे.
आजपासून कै. भुदेवी गोरंट्याल अन्नछत्रास प्रारंभ
जालना शहरातील सामाजिक चळवळीत आपले वडील कै. किसनराव गोरंट्याल आणि मातोश्री कै. भुदेवी गोरंट्याल यांनी सातत्याने सहभाग नोंदवून अडचणीच्या काळात गोर-गरीब कुटूंबीयांना मदत करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याचा वारसा गोरंट्याल परिवाराने अखंडपणे सुरूच ठेवला असून कोरोना या संसंर्गजन्य आजाराच्या पार्श्‍वभुमीवर देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जालना शहरातील हजारो कुटूंब आणि या कुटूंबातील सदस्यांना अन्नधान्यासह शिजविलेल्या अन्नाचा पुरवठा करण्यासाठी गोरंट्याल दाम्पत्याने पुढाकार घेतला आहे. गरीब लोकांची भुक भागविण्यासाठी मातोश्री कै. भुदेवी किसनराव गोरंट्याल अन्नछत्रास उद्या दि. 27 एप्रिल सोमवार पासून शहरात प्रारंभ करण्यात येत असून या अन्नछत्राच्या माध्यमातून दररोज किमान 2500 हजार लोकांपर्यंत शिजविलेले अन्न पुरविण्यात येणार असल्याची माहिती आ. गोरंट्याल यांनी दिली आहे. चपाती-भाजी, पुरी-भाजी, पुलाव अशा पद्धतीने दररोज वेगवेगळे शिजविलेले अन्न पुरवून गरजु लोकांच्या पोटाची भुक भागविण्याचा प्रयत्न सर्व नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
          पोलीसांना शरबत पाजून साजरा केला वाढदिवस
               ग्रीष्मा नखाते हिचा कौतुकास्पद ऊपक्रम


 जालना,प्रतिनिधी :- लाॕक डाऊनच्या  काळात पोलिस कर्मचाऱ्यांना रणरणत्या उन्हात कर्तव्य बजावणे लागत आहे. जेथे आहे तेथेच दिवस दिवसभर लोकांची काळजी
घेण्यासाठी उभे राहावे लागत आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे अंगरक्षक श्री वर्मा साहेब यांची भासी ग्रीष्मा नखाते हिने आपल्या वाढदिवसानिमित्त गांधीचमन येथे पोलिस कर्मचार्‍यांना शरबत वाटप केले. सध्या पोलिस प्रशासनातील कर्मचारी नागरिकांचे अहोरात्र काळजी घेण्याचे काम करीत आहेत. अशातच आपण सुद्धा छोटीशी मदत किंवा काळजी घेतली पाहिजे, या हेतूने ग्रीष्मा नखाते हिने पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या वाढदिवसानिमित्त सरबत वाटप केले.या वेळी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांच्यासोबत शेळके साहेब, पाटोळे साहेब, ढिलपे साहेब, इत्यादी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
               गरजूंना फळ फ्रूट आणि भाजीपाला वाटप

जालना (प्रतिनिधी):-जालना येथे कोरोणाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील नागरिकांनी नियमांचे पालन करून शासनाला सहकार्य करत आहे . परंतु 
यामध्ये शेतकऱ्याच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने त्यांचा माल विकत घेऊन तो गरीब लोकांना वाटप करण्यात येत आहे. भोकरदन नाका येथील दगडी मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांना मराठवाडा पाणी परिषद आणि जनविकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, क्रांतिसिंह बहुउद्देशिय सेवाभावी संस्था आणि नवजीवन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या तर्फे फळ फ्रूट आणि भाजीपाला वाटण्यात आले असून हा उपक्रम मराठवाडा पाणी परिषदे तर्फे संपूर्ण मराठवाड्यात हा उपक्रम घेण्यात आला असून
यावेळी मराठवाडा पाणी परिषदेचे जिल्हा अध्यक्ष एम. डी. सरोदे,संस्थेचे अध्यक्ष विष्णू पिवळ संस्थेचे अध्यक्ष गणेश गव्हाणे,सचिव ज्योती आडेकर मॅडम व सहसचिव विद्या जाधव यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

जालना जिल्ह्यातील सर्व धंदे टप्प्याटप्प्याने सुरू करावे - प्रकाश सोळंके

प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदना मार्फत मागणी.

जालना,प्रतिनिधी :- महाराष्ट्रात येणारे आर्थिक संकट लक्षात घेऊन महाराष्ट्रातील ग्रीन झोन,ऑरेंज झोन,मध्यद्योगधंदे टप्प्याटप्प्यानं चालू करा अशी मुख्यमंत्री कार्यालयास सूचना, मनसे अध्यक्ष मा श्री राज साहेब ठाकरे यांनी 
केलेली आहे.व तसेच जालना जिल्ह्यात जालना शहरात औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) मध्ये मोठ्या प्रमाणात, स्टील उद्योग कारखाने आहेत, तसेच जालना जिल्ह्यातील,वाईन शॉप बिर शॉप, खानावळ व सर्वच धंदे टप्प्याटप्प्याने चालू करा अशी मागणी मनसे जालना जिल्हा अध्यक्ष प्रकाश सोळंके माननीय मुख्यमंत्री महोदय यांना निवेदनाद्वारे केली आहे.
जालना जिल्ह्यातील जालना शहरात औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) मध्ये स्टील उद्योग मोठ्याप्रमाणात कारखाने आहेत,व जालना जिल्ह्यातील वाईन शॉप बिर शॉप व इतर सर्वच धंदे टप्प्याटप्प्याने चालवण्यासाठी परवानगी द्यावी, कारण जालना जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असल्यामुळे जिल्ह्यात,दोन कोरोना बाधित पेशंट आहेत, एक महिला पेशंट दुखी नगर जालना,तर दुसरा महिला पेशंट शिरोडा ता, परतुर येथील आहे, थोडे चिंतेची गोष्ट आहे शिरोडा ता परतुर येथील महिला पेशंटची प्रवास पार्श्वभूमी ( हिस्ट्री ) लोकांना स्पष्ट माहिती न मिळाल्यामुळे थोडी चिंता आहे, कारण शिरोडा ता परतुर येथील या महिला पेशंटला कोरोना लागन कशी झाली, कोठे झाले, हि अध्याप अधिकृत माहिती जाहीर न झाल्यामुळे प्रत्येकाच्या मनात चिंता आहे, शिरोडा ता परतुर येथील या महिला पेशंट सोबत संपर्कात आलेल्या बऱ्याच लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे काळजी करण्याची गरज वाटत नाही, परंतु ट्रॅव्हल हिस्ट्री नाही मग लागन कशी झाली हे समोर आल्यास जनता चिंतामुक्त होईल, हिच गोष्टी सोडली तर जालना जिल्ह्यात आठ हि  तालुक्यात अनेक उद्योगधंदे, वाईन शॉप,बिर शॉप, खानावळ हळू हळू टप्प्याटप्प्याने सगळेच छोटे मोठे धंदे चालू करण्यास हरकत नाही, कारण येणारे आर्थिक संकट बघता काही गोष्टी कोरणा सारख्या साथीच्या रोगाचे नियम बंधन सोशल डिस्टन्स पाळून व्यवहार चालू करण्यास हरकत नाहीत, तसेच येणारे आर्थिक संकट कोणालाही परवडणार नाही, म्हणून सर्वच उद्योगधंदे हळू हळू टप्प्याटप्प्याने जालना जिल्ह्यात चालू केल्यास आर्थिक संकटाला तोंड देण्याचे संकट निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन पुढील व्यवहार चालू करावे जालना शहरात स्टील उद्योग मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्याठिकाणी सर्व नियमाचे पालन करेल सोशल डिस्टन्स या कारखाने चालू करण्यास हरकत नाही याठिकाणी स्टील उद्योगातील स्टील असोशियन यांच्यासोबत चर्चा करून हा उद्योग चालू करण्यास हरकत नाही कारण या उद्योग चालू करण्यासाठी कामगार सुद्धा जालना शहरात थांबून आहेत.मनसे अध्यक्ष मा श्री राज साहेब ठाकरे यांनी येणारे आर्थिक संकट लक्षात घेऊन सर्वच उद्योगधंदे टप्प्याटप्प्याने,वाईन शॉप,बियर शॉप, खानावळ चालू करण्यास आपणास मुख्यमंत्री कार्यालयास पत्र देऊन सूचना केलेली आहे, आपण लवकरात लवकर हे सर्व उद्योगधंदे टप्प्याटप्प्याने चालू करण्यासाठी परवानगी द्यावी हीच जनतेची अपेक्षा आहे.तरी- मुख्यमंत्री साहेबांनी येणारे आर्थिक संकट लक्षात घेऊन, जालना जिल्ह्या ऑरेंज झोन मध्ये, असल्यामुळे, जालना शहरात औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) स्टील उद्योग, मोठ्याप्रमाणात कारखाने आहेत, व वाईन शॉप,बिअर शॉप,खानावळ, सोशल डिस्टन ठेवून व नेमाचे पालन, करून हे सर्व उद्योग चालू केल्यास मोठ्या प्रमाणात राज्य सरकारला महसूल उपलब्ध होईल, येणारे आर्थिक संकट टळले,म्हणून उद्योगधंदे करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी प्रकाश
सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष यांनी निवेदनात केेली आहे.
                 

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...