बुधवार, १८ मार्च, २०२०

मा.महेंद्र भाऊ बनकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विविध संघटनेकडून त्यांचे स्वागत.

सिंधीकाळेगाव( प्रतिनिधी ) :-आज दि.18/03/2020
रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर  व्याख्यानमाला 2020 च्या अध्यक्ष पदी बहुजन चळवळीचे समाजसेवक महेंद्रभाऊ बनकर यांची निवड झाल्या बद्दल शुभेच्छा देतांना पांडुरंग हिवाळे,नारायण माहोरे बिरसा क्रांतीदल महासचिव जालना,मिलिंदराजे मघाडे,आनंद हिवाळे,तेजस हिवाळे,करण रत्नपारखे,संघदिप कुलतर्के,कैलास बनसोडे इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.
वाटूर येथून कापूस परतूर कडे घेऊन जाणारा आयशर टेम्पो पलटी*
जालना प्रतिनिधी :-  वाटूर येथून कापुस परतूर कडे 
कापूस घेऊन जाणारा आयशर टेम्पो रस्त्याच्या बाजुला पलटी झाला अधिक माहिती अशी की वाटुर येथून कापूस भरून परतुर जाणारा आयशर टेम्पो क्रमांक MH:13.G.6471 हा आयशर टेम्पो भरधाव वेगात परतूर च्या दिशेने जात असताना रोहणा गावाजवळ ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. व तसेच सदररील गाडी चालक गंभीर जखमी
झाला आहे व गाडीचे नुसकान मोठ्या प्रमाणात झाले आहे.हा अपघात घडल्यानंतर आजूबाजूच्या गावातील लोकांनी चालकाला उपचारासाठी जालना रुग्णालय येथे नेण्यात आले आहे. हा अपघात झाल्यामुळे गावातील अपघात स्थळे लोकांची मोठी गर्दी झाली होती.

गाडीवर दगडफेक व मारहाण करून आयशर चालकास लुटले
        अंबड तालुक्यातील शहापूर येथील घटना
अंबड ता.प्रतिनिधी :- अंबड तालुक्यातील शहापूर गावजवळ आयशर चालकाला आडून चालकास लुटून गाडिवर दगफेक
 करुन चलकास मारहाण करण्याची घटना रात्री 2 वाजेच्या सुमारास घडली आहे. अधिक माहिती अशी,येरमाळा वरून जालना कडे जाणाऱ्या अइशरवर क्रमांक MH:28.BB0327 हा माल घेऊन जात असताना रात्री 2 पहाटे वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चार ते पाच जणांनी मिळुन दगड व विटा फेकून मारल्या यात गाडीतील ड्रायव्हर अख्तर शेख हे गंभीर जखमी झाले. गाडीच्या काचा फोडल्या ड्रायव्हर अख्तर शेख यांना मारहाण करून त्याच्याकडून रोख रक्कम व मोबाईल फोन घेऊन चोरटे फरार झाले.ड्रायव्हर ला डोक्यात व दंडावर गंभीर इजा झाली असून त्यांना ड्रायव्हर उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटनेची माहिती कळताच गोंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन भेट दिली गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदार व मंडळअधिकारी यांच्या पथकावर केली वाळू माफियांनी दगडफेक
जालना प्रतिनिधी :- जालना जिल्ह्यामध्ये महसूल पथकांवर हल्ल्याच्या घटानांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.साष्ट पिंपळगाव व आपेगाव येथील गोदावरी नदीपात्रातील वाळू माफियांची गुंडगीरी दिवसेंदिवस वाढतच असून आज दि.17 मार्च रोजी दुपारी तहसीलदार राजिव शिंदे यांच्या पथकावर गेवराई तालुक्यातील वाळू माफियांनी तुफान दगडफेक केली. पथकाच्या ताब्यातील वाळूने भरलेले तीन ट्रॅक्टरही या माफियांनी पसार केले असून याप्रकरणी गोंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तहसीलदार राजिव शिंदे, मंडळ अधिकारी दिवाकर, जोगलादेवीकर, मंडळ अधिकारी प्रवीण रुईकर, तलाठी अभिजित देशमुख, संतोष जयस्वाल, रमेश कोनळवार, किरण जाधव, रामकिसन महाले यांच्या पथकाने आज दुपारी एक वाजता साष्ट पिंपळगाव, आपेगाव येथील गोदावरी नदी पात्रातील वाळू पट्ट्याची पाहणी केली. दरम्यान हे पथक दुपारी साडेतीन वाजता गोंदी येथील गोदावरी नदीच्या पात्रात पोहोचले. त्या ठिकाणी वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी वाळू भरत असलेले तीन ट्रॅक्टर ताब्यात घेऊन कारवाई केली. पकडलेले ट्रॅक्टर सोडून द्या असे सांगत जीवे मारण्याची धमकी व अर्वाच्च भाषेत संबंधित वाळू माफियांनी शिवीगाळ केली. यावेळी जमलेल्या 15  ते 20 जणांच्या टोळक्याने पथकावर जोरदार दगडफेक केली. यात पथकाच्या चालकाला मार लागला. दगडफेकीचा फायदा घेत माफियांनी  वाळूने भरलेले तिने ट्रॅक्टर पसार केले. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिस ठाण्यातील पोलिस तात्काळ दाखल झाले. या प्रकरणी तलाठी अभिजीत देशमुख यांच्या तक्रारीवरून कृष्णा बेदरे रा. गेवराई, बाळू यादव व संतोष गवळी दोघे रा. बेलगाव ता. गेवराई, नारायण भुसारे व भैय्या जराड दोघे रा. खामगाव ता. गेवराई यांच्यासह दहा ते पंधरा जणांविरुद्ध गोंदी पोलिसात शासकीय कामत अडथळा व गौण खनिज कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. *ह्या घटने मुळे महसूल पथकातील अधिकारी व कर्मचारी वर्गामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आसून,वाळू माफीयांना कायद्याचा धाक राहीलेला नाही हेच सिध्द होते.सदरील घटनेचा आधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे हे करीत आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...