गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

             गुटखा, पानमसाला विक्री कार्यवाहीत चार
            प्रकरणात 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
नांदेड (भगवान कांबळे)  :- अन्न सुरक्षा मानद कायदा 2006 नियम व नियमन 2011 अन्वये गुटखा, पानमसाला व तत्सम पदार्थाची विक्री करणाऱ्यावर कार्यवाही तसेच प्रतिबंधीत अन्न पदार्थासोबतच वाहनांची जप्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात नुकत्याच करण्यात आलेल्या चार प्रकरणात प्रतिबंधीतसाठा
कॅप्शन जोडा
7 लाख 70 हजार 740 रुपये व तीन वाहने किंमत 2 लाख 55 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नांदेड येथील अन्न सुरक्षा अधिकरी स. वि. कनकावाड यांनी 4 एप्रिल 2020  रोजी माहूर तालुक्यातील पोलिस स्टेशन सिंदखेड येथे जावुन पोलिसांनी ताब्यात घेतलेला प्रतिबंधीत अन्न पदार्थ व दुचाकी वाहन एकुण किंमत 42 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन या प्रकरणी जावेद बरकत खिच्ची रा. वाई बाजार यांच्या विरुध्द अन्न सुरक्षा कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल केला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी सु. द. जिंतुरकर यांनी 8 एप्रिल रोजी धर्माबाद मे. राजराजेश्वर किराणा दुकान बाळापुर रोड धर्माबाद यापेढीवर धाड टाकुन प्रतिबंधीत अन्न पदार्थ 4 लाख 59 हजार 190 रुपयाचा साठा जप्त करून या प्रकरणी रविकुमार शंकरराव कोडावार व राजकुमार शंकरराव कोंडावार याच्या विरूध्द अन्न सुरक्षा कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
देगलूर तालुक्यातील पोलिस स्टेशन मरखेल येथे 11 एप्रिल रोजी मरखेल पोलिसांनी ताब्यात घेतलेला प्रतिबंधीत अन्न पदार्थाचा साठा 1 लाख 24 हजार 800 रुपयांचा व वाहन किंमत 2 लाख रुपयेचा साठा जप्त करुन या प्रकरणी शेख जावेद शेख समदानी यांच्या विरुध्द अन्न सुरक्षा कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
तसेच प्र.म. काळे यांनी अर्धापूर पोलिस स्टेशन अर्धापुर येथे जावुन 11 एप्रिल रोजी पोलिसांनी ताब्यात घेतलेला प्रतिबंधीत अन्न पदार्थ किंमत 9 हजार 750 रुपये व दुचाकी वाहन किंमत 35 हजार रुपये असा एकुण 44 हजार 750 रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन या प्रकरणी शेख सोहेब शेख सलीम व फसिउददीन काजी यांच्या विरूध्द अन्न सुरक्षा कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल केला आहे.ही कार्यवाही अन्न सुरक्षा अधिकारी यांनी सहायक आयुक्त (अन्न), म.रा. अन्न व औषध प्रशासन  तु. चं. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.प्रतिबंधीत अन्न पदार्थाची साठवणूक, वाहतूक, विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांनी छुप्या, चोरटया पध्दतीने प्रतिबंधीत अन्न पदार्थांची  विक्री, उत्पादन, साठा, वाहतुक करु नये अन्यथा कठोर कायदेशीर कार्यवाही समोरे जावे लागेल, असे आवाहन, नांदेडचे अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त (अन्न) तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.

     गरजु व्यक्तींना अन्नधान्य,जेवण व मदत वाटपाचे छायाचित्र                       समाजमाध्यमांवर प्रसारित करु नयेत
जालना,प्रतिनिधी:- देशभरात लॉकडाऊन झाल्यापासुन अनेक दानशुर व्यक्ती पुढे येवुन अनेक गरजुंना मदत करीत आहेत. मात्र ही  मदत करतांना अनेकांनी त्यांचे फोटो, व्हिडिओ, चित्रीकरण करुन सोशल मिडीयावर टाकले आहेत.
  यामुळे गरीब, गरजु व्यक्तींची अवहेलना होत असल्याची निदर्शनास आले आहे. यामुळे अशा व्यक्तींच्या स्वाभिमानास ठेच पोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.अन्नधान्य, जेवणाचे वाटप करतांना गर्दी होते त्यामुळे सामाजिक अंतर पाळले जात नसलयाने लॉकडाऊनचा मुख्य हेतु साध्य होत नाही.सर्व जिल्हावासियांना सूचित करण्यात येते की, कुणीही गरजु व्यक्तींना अन्नधान्य, जेवण व तत्सम मदत साहित्य देताना फोटो, व्हिडीओ, चित्रीकरण करुन सामाजिक माध्यमावर पाठवू नये. तसेच अशा गोरगरीब, गरजु व्यक्तींच्या स्वाभिमानास ठेच पोचणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. अशा प्रकारे गरजू व्यक्तींना अन्नधान्य, जेवण व तत्सम मदत साहित्य देताना फोटो, व्हिडीओ, चित्रीकरण करुन सामाजिक माध्यमावर टाकल्याचे निदर्शनास आल्यास साथरोग प्रतिबंधात्म्क कायदा 1897 अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे समजण्यात येऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकार रवींद्र बिनवडे यांनी एका परिपत्रकाद्वारे सुचित केले आहे.


शिधापत्रिकाधारकांसाठी नियमित व अतिरिक्त नियतन उपलब्ध
जालना,प्रतिनिधी:- कोरोना कोविड १९ विषाणूच्‍या प्रार्दुभावाच्‍या अनुषंगाने शासनाकडून लॉकडाऊन 
जा‍हीर करण्‍यात आलेला आहे. सदर पार्श्‍वभूमीवर जिल्‍हयातील शिधापत्रिकाधारकांना पुरेसे अन्‍नधान्‍य उपलब्‍ध होण्‍याच्‍या अनुषंगाने शासनाकडून नियमित व अतिरिक्‍त नियतन उपलब्‍ध करून देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसेय्ये यांनी दिली आहे.माहे एप्रिल २०२० करिता दिनांक १४ एप्रिल २०२० अखेर जिल्‍हयामध्‍ये  अंत्‍योदय अन्‍न योजनेच्‍या लाभार्थ्‍यांना १३४२८ क्विंटल, प्राधान्‍य कुटूंब योजनेच्‍या लाभार्थ्‍यांना ५३९५० क्विंटल, एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थी योजनेच्‍या लाभार्थ्‍यांना २९२५ क्विंटल धान्‍याचे वितरण करण्‍यात आलेले आहे. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजने अंतर्गत वितरण करावयाचा मोफत तांदूळ ७१३९ क्विंटल एकूण ८३ टक्‍के धान्‍य वितरण करण्‍यात आलेले आहे. हे नियतन शिधापत्रिकाधारकांसाठी वितरण करण्‍यात आलेले असून दिनांक २०.एप्रिल, २०२० पर्यंत १०० टक्‍के लाभार्थ्‍यांना सर्व योजनांचे धान्‍य वितरण करण्‍यात येणार आहे. धान्‍य वितरण सुरळीत होण्‍यासाठी तलाठी, ग्रामसेव‍क यांच्‍या तालूकास्‍तरावर  नियुक्‍त्‍या करण्‍यात आलेल्‍या आहेत. शिधापत्रिकाधारकांनी रास्‍तभाव दुकानास जावून त्‍यांचे धान्‍याची उचल करावी, असे श्रीमती रिना बसैय्ये यांनी कळविले आहे.

           सेलगांव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर 
                    यांच्या जयंतीनिमित अभिवादन.
सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी):- सेलगांव येथे सावता परिषदेच्या वतीने महामानव विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या  जयंतीनिमित अभिवादन  करन्यात आले ह्यवेळी उपस्थित सावता परिषदचे माजी युवक जि उपाध्यक्ष योगेश जाधव सुरेश घोरपडे दिपक माहागडे अमोल तुपे राहुल सोनुवणे आदींची उपस्थिती होती

      चंदनझिरा पोलीस ठाण्यात उभारला निर्जंतुकीकरण कक्ष
                        स्थानिक युवकांचा सहभाग.
               तर पो.कॉ.अनिल काळे यांचा पुढाकार
जालना प्रतिनिधी :- चंदनझीरा पोलीस स्टेशन मध्ये पोलिस निरीक्षक श्‍यामसुंदर कौठाळे यांच्या कल्पनेतून निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आला. त्याचे उद्घाटन 
उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या हस्ते करण्यात आले.अतिशय कमी खर्चामध्ये व काही जुन्या वस्तूंचा वापर करून सदरील निर्जंतुकीकरण कक्ष पोलीस ठाण्याच्या प्रवेश दाराजवळ उभारण्यात आला. पो.कॉ. अनिल काळे यांनी निर्जंतुकीकरण कक्षासंबंधी पुढाकार घेतला तर चंदनझीरा येथील इलेक्ट्रिशियन चा व्यवसाय करणारे अमोल आवटे, शिवा दैने व गणेश शेळके या युवकांनी आपले पूर्ण योगदान देऊन निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यास परिश्रम घेतले.चंदनझीरा पोलीस स्टेशनच्या कक्षामध्ये २४ गावांचा समावेश असून जालना शहराचा मोठा भाग येतो. त्या अनुषंगाने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना रात्रंदिवस गस्तीवर रहावे लागते. सध्या संचार बंदीच्या काळात पोलिसांवर कामाचा व्याप फार मोठा वाढलेला आहे. व कोरोना  च्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी कर्तव्य बजावत असताना असंख्य लोकांच्या सहवासामध्ये आल्यामुळे पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक झाले आहे. बऱ्याच ठिकाणी कर्तव्य बजावत असताना पोलिसांनाही कोराना ची बाधा झाल्याचे वृत्त येत आहे.त्यामुळे पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, उपअधीक्षक समाधान पवार व चंदनझीरा  पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्‍यामसुंदर कौठाळे व पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोलले यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील उपक्रम राबवण्यात आला निर्जंतुकीकरण पक्षाच्या बाजूने नियमांचे पालन करणे संबंधी सूचनांचे बॅनर लावण्यात आले.पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून चंदनझीरा येथील नागरीकांच्या वतीने अमोल आवटे, शिवा दैने व गणेश शेळके या युवकांचे कौतुक केले जात आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...