गुरुवार, १४ मे, २०२०

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन.


जालना जिल्ह्यातील परतुर-मंठा तालुक्यातील अनधिकृत वाळु चोरी करणाऱ्या तस्करांवर कार्यवाही करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश सोळंके यांची मागणी


जालना,प्रतिनिधी :- २०१९ या वर्षी सरासरी पेक्षा पाऊस कमी पडला मुळे परतुर-मंठा तालुक्यातील वाळु चोरणाऱ्या लोकांना ही संधी उपलब्ध झाली म्हणून. परतूर-मंठा तालुक्यातील रोज मोठ्या प्रमाणात अनधिकृत गौण खनिज वाळूची तस्करी होत आहे. या परतूर मंठा तालुक्यामध्ये वाळू तस्करी करणारी फार मोठी टोळी असून. ही टोळी दिवसा व रात्रभर जसी संधी मिळेल तसी वाळूची तस्करी करीत आहेत. या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय परतूर येथे दि.२४/२/२०२० रोजी निवेदन देऊन वाळू तस्करी बाबत तक्रार करण्यात आली होती. परंतु वाळू तस्करी करणाऱ्या लोकांवर कठोर कार्यवाही झाल्या दिसून येत नाही. कोरोना मुळे लॉकडाऊन हे तर वाळु चोरणाऱ्या लोकांच्या पथ्यावर पडले. या लॉकडाऊनच्या काळात ५० ते ५५ दिवस लॉकडाऊन मध्ये वाळू तस्करांनी वाळु चोरीच्या वाळूची विक्री तिप्पट दराने विक्री करीत आहे‌त. एक वाळूच्या हायवा गाडी ची किंमत सध्या ३५ ते ४० हजार रुपये प्रती गाडी किंमत आहे. हि  तस्करी वाळू चोरी मंठा तालुक्यातील. पूर्ण नदी पात्रातुन मोठ्या प्रमाणात बुलढाणा जिल्ह्यात पण विक्री होत आहे. तसेच मंठा तालुक्यात वाळूची विक्री फार मोठी प्रमाणात चालू आहे. परतूर तालुक्यातील दूधना नदी. गोदावरी गंगा नदी. निम्न दुधना प्रकल्प धरणात पाणी कमी असल्यामुळे परतुर तालुक्यातील  परतूर सेलू रोडवरील चिंचोली सालगाव फुलाच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात व या धरणाच्या पात्रातून वाळूची तस्करी करून चोरीच्या मार्गाने बांधकाम करणारे लोकांना तिप्पट किमतीने वाळू तस्कर वाळू उपलब्ध करून देते. या वाळू तस्करी चोरी करणारे पूर्णा नदी. दूधना नदी.गोदावरी (गंगा) नदी.या सर्व पात्रातुन. खास बाब म्हणजे यावर्षी निम्न दुधना प्रकल्पाच्या पात्रात कमी पाणी असल्यामुळे वाळू तस्कर चोरांचा मोर्चा तिकडे वळाला आहे. या ठिकाणा वरुण वाळू तस्करी चोरी केली जाते याची संपूर्ण माहिती या सर्व सजा मध्ये कार्यरत असलेले मंडळाधिकारी तलाठी यांना पूर्ण कल्पना असते परंतु चिरीमिरी मुळे हे मंडळाधिकारी व तलाठी कार्यवाही करत नाहीत. उदाहरणार्थ एखादी कारवाई केली तर ती यामुळे केलेली असते मंडळ अधिकारी व तलाठी यांचा हप्ता न मिळालाल्या मुळे. म्हणून कधी कधी मंडळ अधिकारी व तलाठी कार्यवाही करीत असतात. म्हणून मंडळाधिकारी व तलाठी यांना चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे वाळुंज चोर त्यांच्यावर ते कार्यवाही करत नाहीत,कारण हजारो ब्रास वाळूची तस्करी चोरी होत असेल आणि मग फक्त ५० ते १०० ब्रास वाळू चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल होतो.या वाळू तस्कर चोरीला आळा बसतांना दिसत नाही. म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी गौण खनिज यांच्या मार्गदर्शनाखाली एक नविन पथक नेमून. पूर्ण नदी. दुधना नदी. निम्न दुधना संपूर्ण प्रकल्प पात्र.गोदावरी गांगा नदी या सर्व पात्रातून आज पर्यंत किती ब्रास वाळू चोरी गेली असेल या बाबत जनतेला माहिती द्यावी व या वाळू तस्करी चोरी प्रकरणाला संबंधित मौजे सजाचे मंडळाधिकारी तलाठी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी. यापूर्वी उपविभागीय अधिकारी परतूर यांना या पात्रातून वाळूची तस्करी होत असल्याचा निवेदन देऊ तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी यांनी परतुर तहसीलदार मंठा तहसीलदार यांना संबंधित वाळू चोरीप्रकरणी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. या बाबत जा.क्र.२०२० जमा बंदी/कावी.दिनांक ०५/०३/२०२०. पत्र देण्यात आले होते परंतु पुढे परतुर तहसिलदार व मंठा तहसिलदार. या दोन्ही तहसिलदारांनी या वाळु चोराच्या विरोधात कठोर कार्यवाही  केलेली दिसून आली नाही. आणि कामात हलगर्जीपणा केला असे दिसून येत आहे.परतूर-मंठा तालुक्यातील वाळू तस्कर वाळू चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी नविन पथक निर्माण करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी तसेच आजपर्यंत अंदाजे किती वाळूचोरी झाली असेल याचे मोजमाप करून संबंधित मंडळाधिकारी व तलाठी यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करून दंड वसूल करून.वाळु चोरणाऱ्या टोळीचा बंदोबस्त करून त्या वाळू तस्करांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदना मार्फत केली आहे.


कोविड -19 च्या पार्श्वभुमीवर अतिजोखमीच्या रुग्णांकडे विशेष लक्ष देऊन वेळीच औषधोपचार करण्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे निर्देश 



जालना,प्रतिनिधी :- जालना जिल्हयात कोविड -19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत योग्य उपाययोजना करण्यात येत आहेत. तथापि, समाजातील काही अतिजोखमीच्या गटाला म्हणजेच क्षयरुग्ण,कुष्ठरुग्ण , एचआयव्ही संक्रमीत रुग्ण,मधुमेही,उच्च रक्तदाब असणारे रुग्ण,कर्करोग असणारे रुग्ण तसेच नवजात बालके ,गरोदर माता यांना तसेच समाजातील सर्व रुग्णांकरीता दैनंदिन आरोग्य सेवा नियमित सुरु ठेऊन अतिजोखमीच्या रुग्णांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना वेळीच औषधोपचार व आरोग्य सेवा देण्याचे निर्देश जिल्हाधिकारीरवींद्र बिनवडे यांनी एका आदेशान्वये दिले आहेत.






बॅटरीवर 35 कि. मी. चालणारी सायकल प्राध्यापक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चार विद्यार्थ्यांनी केली तयार



अंबड (प्रतिनिधी) :- वाहनांच्या वाढत्या संख्यामुळे होणार्‍या प्रदुशनावर मात करता यावा या उद्देशाने अंबड येथील शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयात प्राध्यापक एस. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रविभागात कोर्स करणारे शिवप्रसाद वाघमारे, अभिषेक शिंदे, अश्‍विनी नागवे, गोविंद डाके या चार विद्यार्थ्यांनी संकल्पनेतून दहा हजार रूपये खर्च येत असलेलली बॅटरीवर चालणारी सायकल तयारी केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबड येथील शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयात यंत्रविभागात शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पनेतून बॅटरीवर 35 किलोमिटर पर्यंत धावणारी सायकल बनविली असून ही सायकल तयार करण्यासाठी साधारण 10 हजार रूपयापर्यंत खर्च आला असून या सायकलच्या फिटींगसाठी बॅटरी, हेडलाईट, हॉर्न, बॉक्स या पद्धतीचे साहित्या वापरून ही सायकल तयार करण्यात आली आहे. या सायकलवर रात्रीच्या वेळेला सुद्धा प्रवास करता येवू शकतो तसेच बॅटरी संपल्यानंतर पायडलवर सुद्धा ही सायकल चालवता येवू शकते असेही त्या विद्यार्थ्यांनी सांगीतले.
अशा सर्वसामान्य कुटूंबातील विद्यार्थ्यांसाठी शासनाने विविध योजनेमार्फत अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढवावे. शासनाकडून अशा विद्यार्थ्यांची दखल घेतल्यास भविष्यात विद्यार्थी वेगवेगळ्या कलातून तंत्रज्ञानाचा उपयोग करू शकताता. बॅटरीवर चालणारी सायकल त्यांच्या प्रयोगाने विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमतेची ओळख निर्माण करून दिली आहे. या सायकलमुळे प्रदुषनाला आळा बसण्यास देखील मदत होते. जे गरीब विद्यार्थी महागडी गाडी घेवू शकत नाही त्यांच्यासाठी अशी सायकल फायदेशीर ठरू शकते.
सदरील विद्यार्थ्यांनी अंबड ते वडीगोद्री रस्त्यावर जाऊन परत येने असा एकुण 35 कि. मी. चा प्रवास या बॅटरीवर चालणार्‍या सायकलने केला. विद्यार्थ्याचे वडील तात्यासाहेब वाघमारे यांना सायकल संदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगीतले की, मुलांनी तयार केलेली बॅटरीवर चालणारी सायकल पाहुन मला मोठा आंनद झाला असून मी मुलाच्या पुढील शिक्षणासाठी प्रयत्न करणार असून त्याला उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणार असल्याचे त्यांनी सांगीतले.



छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य, विद्वत्ता संघर्षाचा इतिहास महाराष्ट्राला प्रेरणा देत राहील - उपमुख्यमंत्री अजित पवार




मुंबई,प्रतिनिधी:- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राला शौर्य, स्वाभिमान, स्वराज्यबाणा, पुरोगामी विचार दिला. ते निष्णात योद्धे, प्रकांड पंडित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी सलग नऊ वर्षे संघर्ष केला. स्वराज्यासाठी प्राणांचं बलिदान दिलं. त्यांचा संघर्षमय इतिहास आपल्यासाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. 

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराज अखेरच्या श्वासापर्यंत लढले. छत्रपती संभाजी महाराज राज्यकारभारात, युद्धनीतीमध्ये कुशल होते. मराठीसह हिंदी, संस्कृत भाषांवर त्यांचं प्रभुत्व होते. त्यांची ग्रंथसंपदा ही त्यांच्या असामान्य विद्वत्तेचं अलौकिक बुद्धीमत्तेचं उदाहरण आहे. छत्रपती संभाजीराजांनी रणांगणावर शौर्य गाजवलं. युद्धनीती, राजनीती कौशल्यांचा उपयोग करुन नऊ वर्षे मोगल, आदिलशाहा, सिद्दी, पोर्तुगीज, तसंच अंतर्गत शत्रूंविरुध्द लढा दिला. स्वराज्य रक्षणासाठी प्राणांचं बलिदान दिलं. त्यांनी दिलेला लढा, केलेला संघर्ष महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
                            

राज्य राखीव पोलीस दलाच्या चार जवानांच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह

जवानांना जिल्हा रुग्णालयातुन डिस्चार्ज

डॉक्टरांसह आरोग्यपरिचारिकांनी दिला टाळया वाजवुन निरोप.



राज्य राखीव पोलीस दलातील जवान व परतुर येथील 32 वर्षीय युवकाच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना,प्रतिनिधी :- राज्य राखीव पोलीस बलगट क्र.3 चे कोरोनाबाधित असलेल्या चार जवानांच्या स्वॅबचा अहवाल दुसऱ्यांदा निगेटीव्ह आल्याने त्यांना आज दि. 14 मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी डॉक्टरांसह आरोग्यपरिचारिकांनी चारही जवानांना टाळया वाजवनु निरोप दिला. या जवानांना पुढील 14 दिवस होम क्वारंटाईन राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.  तसेच राज्य राखीव पोलीस बलगट क्र.3 मधील एक जवान व परतुर येथील 32 वर्षीय पुरुषाच्या स्वॅबचा अहवाल आज दि. 14 मे, 2020 रोजी पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.**
आनंदनगर नुतन वसाहत येथे राहणारी व जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या परिचारिकेच्या स्वॅबचा अहवाल दि. 11 मे रोजी पॉझिटीव्ह प्राप्त झाला होता. परिचारिकेच्या संपर्कात आलेल्या लोरिस्क 9 सहवासितांच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाला आहे.  तसेच रंगनाथनगर पाण्याची टाकी परिसर, जालना येथील कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कातील ३ हायरिस्क व 8 लोरिस्क असे एकुण 9 व्यक्ती संपर्कात आले होते.  त्यापैकी ३ जणांच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आला असुन उर्वरित 8 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे.  अंबड तालुक्यातील कानडगाव येथील कोरोनाग्रस्त आढळलेल्या दोन व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या ५ हायरिस्क व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाला असल्याची माहितीही जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.जिल्ह्यात एकुण 1606 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 21 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 839 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 14 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 1269 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने -02 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 17 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1234, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 254, एकुण प्रलंबित नमुने -14 तर एकुण 818 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या - 5, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 629 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या-87, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -431, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-9, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -21, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -10, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 315 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे. 
आजपर्यंत जालना जिल्ह्यात इतर राज्यातुन  117 व राज्याच्या इतर जिल्ह्यातुन 3 हजार 83 असे एकुण 3 हजार 200 नागरिक दाखल झाले असुन या सर्वांना 14 दिवस होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातुन आजपर्यंत उत्तरप्रदेश-4369, बिहार-2944, मध्यप्रदेश-1014,राजस्थान-658, पश्चिमबंगाल-469, झारखंड-418, यासह उर्वरित 16 राज्यातील एकुण 10891 तर जालना जिल्ह्यातुन महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 4776 अशा एकुण 15667 नागरिकांना पास उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.जालना जिल्ह्यातुन आजपर्यंत बिहार-119,आंध्रप्रदेश-103,ओरिसा-113,मध्यप्रदेश-710,छत्तीसगड-8, उत्तरप्रदेश-2673, झारखंड-03,राजस्थान-107, तेलंगणा-27, हैद्राबाद-05 अशा एकुण 3868 नागरिकांना परराज्यात पाठविण्यात आले आहे. परदेशी अडकलेल्या भारतीयांना स्वगृही  आणण्यासाठी भारत सरकारच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या वंदे भारत मिशनअंतर्गत जालना जिल्ह्यात चार नागरिक दाखल झाले आहेत.  कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 431 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-34, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-07,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-12, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-23,पोलीस प्रशिक्षण केंद्र-81, मॉडेल स्कुल, अंबा रोड, परतुर-00, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-08, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-4, राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद -77, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -35, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे – 18, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी-45, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत क्र. 1-64,डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, भोकरदन-23 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 579 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 103 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 574 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 83 हजार 200 असा एकुण 310008 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कोरोना आपत्ती निवारण आरोग्य समिती परतूरच्या माध्यमातुन जालना जिल्ह्यातील पहिल्या कम्युनिटी क्लिनिक या उपक्रमाचा प्रारंभ



परतुर /प्रतिनिधी :-प्रशांत वाकळे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कोरोना आपत्ती निवारण आरोग्य समिती परतूरच्या माध्यमातुन जालना जिल्ह्यातील पहिल्या कम्युनिटी क्लिनिक या उपक्रमाचा प्रारंभ परतुर येथुन झाला.शहरानजिक असलेल्या पारधी व वड्डरवाडी वस्तीतील नागरिकांची वैद्यकिय तपासणी व जनजागरण करण्यात आले.एकुण 225 रूग्णांची तपासणी व मोफत औषधी वाटप करण्यात आले. ह्या उपक्रमातून महिला व लहान मूलांचे कूपोषण व रक्त कमतरता दूर करण्यावर विशेष भर देण्यात आला.आठवड्यातुन तीन दिवस हा उपक्रम विविध भागात चालणार आहे.परतुर शहरातील नामवंत डाॅ प्रमोद आकात, डॉ. संजय पूरी, डाॅ स्वप्निल मंत्री, डाॅ. सुधीर आंबेकर,डॉ. संदीप चव्हाण, डाॅ.भानुदास कदम, डाॅ.कल्याण बोनगे हे सर्व डॉक्टर्स स्थानिक संघ कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पूरविणार आहेत. स्वयंसेवकांमध्ये अशोक कादे,शिवाजी काका पवार,विकास पवार,मनिष अग्रवाल,योगेश दहिवाळ,शुभम सातोनकर उपस्थित होते.

आदर्श कॉलनीत नाल्या,रस्ताची प्रतीक्षा

नगर पालिकेने लक्ष देण्याची रहिवाशांची मागणी




परतुर/प्रतिनिधी:-प्रशांत वाकळे

परतुर नगर परिषदेच्या उदासिन धोरणामुळे गेल्या विस पंचविस वर्षो पासुन स्थापित झालेली आदर्श कॉलनी आजही नागरी सुविधा पासुन वंचीत आहे .शहराच्या मंध्यभागी असणार्या आदर्श कॉलनी मध्येनाल्याचे बाधकाम सिंमेट रस्ताचे काम अद्यापि झालेले नाही यामुळे सांडपाणी सर्वत्र पसरून कॉलनी मध्ये दुर्गंधी पसरली आहे. दुर्गधी मुळे आदर्श कॉलनी मधील नागरिकाचे आरोग्य थोक्यात आले आहे आदर्श कॉलनी मधील सांडपाणी हे सर्वत्र  पसरले असुन सांड पाण्यामुळे रोजच नागरिकांची एकमेकां सोबत कुरबुर होत आहे तरी नगर परिषदने याकडे लक्ष देण्याची मागणी आदर्श कॉलनीतील रहिवांशानी केली आहे .

 कोरोना तपासणी कॅबिन आत्ता परतूर मध्येही !

लायन्स क्लब आणि महालक्ष्मी पतसंस्थेच्या पुढाकाराकाराने ग्रामीण रुग्णालयाला उपलब्ध झाली कोरोना तपासणी कॅबिन




परतूर/प्रतिनिधी :- लायन्स क्लब आणि महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था परतूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मॉडेल स्कुलमध्ये नियोजित कोरोना तपासणी केंद्राला, कोरोना तपासणी कॅबिन उपलब्ध करून देण्यात आली आहे. भविष्यात गरज भासल्यास कोरोना संशयित रुग्णाचे नमुने घेण्याची सुविधा परतूर येथे सूरू करण्यात येणार आहे. या साठी आवश्यक असणाऱ्या कोरोना तपासणी कॅबिनची आवश्यकता असल्याने सामाजिक संघटनांनी पुढे येऊन ते उपलब्ध करुन द्यावेत असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. आर.नवल यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत लायन्स क्लब आणि महालक्ष्मी नागरी सहकारी पथसंस्थेने सदरील कोरोना तपासणी कॅबिन उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. मंगळवारी या कॅबिनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, लायन्स क्लबचे मनोहर खालापूरे, महालक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष एकनाथ कदम,डॉ.डी. आर.नवल,डॉ. जाहेद सय्यद, रामभाऊ काळे, परेश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोना विषाणूंचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासकीय पातळीवर आवश्यक त्या सर्व उपाय योजना केल्या जात आहेत.त्याच्यात एक भाग म्हणून भविष्यात गरज भासल्यास रुग्णांची सोय होण्याच्या उद्देशाने शहारानजीक आंबा येथील मॉडेल स्कुलचे रूपांतर विलगीकरण केंद्रात करण्यात आले आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या वसतिगृहाचे रूपांतर आयसोलेशन सेंटर मध्ये करण्यात आले आहे. रुग्णाच्या सोयीच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी यावेळी दिली.
कोरोना सारख्या जागतिक संकटात देश सापडला असतांना अनेक संस्था, संघटना आपल्या परीने या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारला मदत करत आहेत. देश संकटात असतांना मदतीसाठी पुढे आलेले हातच देशाला या संकटातून बाहेर येण्याचे बळ देणार आहेत. या जाणिवेतून महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीत एक लाख रुपये जमा केले आहेत. शिवाय प्रत्येक शाखा स्तरावर सामाजिक उपक्रम राबविला जातो आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून लायन्स क्लबच्या सहकार्याने ग्रामीण रुग्णालयाला आवश्यक साधन सामुग्री भेट देण्यात आली असल्याचे एकनाथ कदम यांनी यावेळी सांगितले.

लॉकडाऊन मध्ये एच.आय.व्ही. संसर्गितांना घरपोच औषध पुरवठा



परतूर प्रतिनिधी :- लॉकडाऊनमुळे एच.आय.व्ही. संसर्गित रुग्णांच्या औषधामध्ये खंड पडू नये म्हणून राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई यांच्या आदेशानुसार इंसिटट्यूट ऑफ सोशल रिसर्च अँड सस्टेनेबल डेव्हलोपमेंट,जालना अंतर्गत लिंक वर्कर स्किम जालना मार्फत   ए.आर.टी. सेंटर पर्यंत येऊ शकत नसलेल्या जालना जिल्ह्यातील व ईतर जिल्ह्यातून आलेल्या एच.आय.व्ही.बाधित रुग्णांना घरपोच औषध पुरवठा करण्यात येत आहे. जेणेकरुन रुग्णांच्या औषधामध्ये खंड पडणार नाही व त्यांच्या आरोग्यास हानी पोहचणार नाही.
               प्रकल्प संचालिका  मंदाकिनी पडूळ,प्रोग्राम ऑफिसर शरद शिंदे व जिल्हा साधन व्यक्ती राम वादे यांच्या मार्गदर्शनाखाली घरपोच औषध वाटपाची प्रक्रीया राबविण्यात येत आहे. ज्या रुग्णांना घरपोच औषध मिळवायची असतील त्यांनी राम वादे (डी.आर.पी.)-9763941780,शिवहरी डोळे (सदुपदेश,आय.सी.टी.सी.परतूर)-9850670645,निलेश चव्हाण(विभागीय पर्यवेक्षक)-8007568887, रामेश्वर पाटणकर (झेड.एस.)-9665652570, नरेश कांबळे (सि. एल.डब्ल्यू.)-8308151002 यांच्याशी संपर्क साधून आपली औषधि घरपोच मिळविण्याचे आवाहन भास्कर पडूळ यांनी केले. रुग्णांनी लॉकडाऊन च्या काळात घरातच सुरक्षित रहावे व घरपोच ए.आर.टी.औषध मिळविण्यासाठी संपर्क साधावा.सर्वांची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.असे नरेश कांबळे (सि.एल.डब्ल्यू.)  8308151002 यांनी कळविले आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...