मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती चिंताजनक उपायोजना करण्याची गरज. 
केशव मुंडे | वाळूज महानगर: कोरोना ने संपूर्ण जगात थैमान घातले आहे मृत्यूचा आकडा लाखाच्या घरात जाईल हे पाहून भारताने लॉक डाऊन संचारबंदी यासारखी कठोर पावले उचलली आहेत असे असताना कोरोना बाधितांचे आकडा पाच हजारापर्यंत पोहोचला
 असून धक्कादायक बाब म्हणजे यातील 40 टक्के लोक महाराष्ट्रातील आहेत आणि हा आकडा झपाट्याने वाढत आहे नागरिकांनी धोरणाशी लढा देण्यासाठी स्वतः घरातच राहून सरकारला सहकार्य करावे अनेक लोकांनी स्वतःला करनटाईम करून घेतला आहे तर अजूनही अनेक लोक कायदा तोडून बाहेर पडत आहेत याचा परिणाम कोरोना पाय पसरत आहे पोलीस कर्मचारी आरोग्य कर्मचारी सरकारी कर्मचारी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नियंत्रण आणण्यासाठी कंबर कसली आहे जगाच्या मनाने भारतात स्थिती चांगली असताना महाराष्ट्रात किती वाईट होत चाललेली आहे मुंबई तिसऱ्या स्टेजला जाण्याची शक्यता आहे असे झाले तर महाराष्ट्रामध्ये आणखी लॉक डाऊन संचारबंदी वाढण्याची चिन्हे आहेत त्यामुळे सरकार पोलिसांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे अनेक ऊसतोड मजूर कामगार लोक अडकून पडलेले आहेत या लोकांचा संयम न तुटता आहे तिथे सुरक्षित राहिले पाहिजे परंतु वाढलेला आकडा महाराष्ट्रासाठी अतिशय चिंताजनक आहे.
            उत्पादन शुल्क विभागाची किमयाच भारी
      दारू एका दुकानात,पण सील केले बाजूच्याच दारी

धर्माबाद (भगवान कांबळे):- संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाॅकडाऊन असताना जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर
यांच्या आदेशाने संचारबंदी कालावधीत महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील सर्व देशी-विदेशी दारूची दुकाने सील करण्यात आले आहेत.ही कारवाई करत असताना मात्र धर्माबाद मध्ये एका देशी दारूच्या दुकानात मुख्य दरवाजाला सील न करता बाजूचें चॅनलगेट असलेल्‍या दाराला सील करण्यात असल्याचे उघड झाले आहे.त्याचे झाले असे की काल एका किराणा दुकानांमध्ये अवैध गुटखा सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता त्या ठिकाणी त्या दुकानाच्या गोदामावर धाड मारत असताना घटनास्थळावर अनेक पत्रकार व पोलीस बांधव उपस्थित होते
धर्माबाद तालुक्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सुनील पाटील व काही पत्रकारांच्या लक्षात या देशी दारू च्या दुकानाकडे गेले
 सदरील दुकानाच्या मुख्य दरवाज्‍याला सील  नसल्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी शटर उचलून पाहिले तर आतून बंद केले होते व बाजूच्या चॅनल गेटला सील केलेल होते त्या ठिकाणाहून  श्री सुनील पाटील यांनी उत्पादन शुल्कच्या धर्माबाद च्या संबंधित  कार्यालय प्रमुखांना दूरध्वनीवरून विचारणा केली असता त्यांनी दुकान सील केल्याचे सांगितले परंतु मुख्य दरवाजा सील  केला नसल्यामुळे शहरात होत असलेल्या अवैध दारू विक्रीचे केंद्र तर हेच नाही ना अशीही शंका उत्पन्न होत आहे.
चढ्या भावाने दारूविक्री होत असतानाचा अनेक घटना समोर येत असताना देशी दारूच्या मुख्य दरवाज्याला सिल न करण्यामागे उत्पादन शुल्काची काय किमया आहे हे त्यांनाच माहीत
श्री सुनील पाटील यांची प्रतिक्रिया याविषयावर घेतली असता ते म्हणाले की उत्पादन शुल्क अधिकारी जेव्हा याठिकाणी येईल या  दुकानांची संपूर्ण चौकशी केली जाईल, रेकॉर्ड तपासले जातील आणि जर काही गडबड आढळल्यास संबंधितांवर कारवाई सुद्धा करण्यात येण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत तात्काळ उत्पादन शुल्काच्या नांदेड येथील अधिकार्याला व नांदेड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांना सुद्धा दूरध्वनीवरून माहिती देण्यात आली आहे
जर उत्पादन शुल्क विभागच अवैध दारू ला चालना देत असेल तर मात्र त्याला कोणीही रोखू शकणार नाही.वर्षभरामध्ये धर्माबाद  एकदाच येणारा उत्पादन शुल्क चा संबंधित अधिकारी आता मात्र दररोज चार वाजता धर्माबाद येथे येत असल्याचीही गुप्‍त माहिती होत आहे.धर्माबाद तालुक्यातील देशीविदेशी दुकानांच्या सील ची तपासणी करण्यासाठी येत असल्याचे सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात येतात आहे
संबंधित प्रकरणांमध्ये जिल्ह्याधिकार्‍यांनी लक्ष घातल्यास काळाबाजार उघड होईल असेही सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत
आजपर्यंत 6 लाख 3 हजार 998 रुपयांचा मुद्देमाल जप्त
            जालना, प्रतिनिधी :- अबकारी अनुज्ञाप्तीवरील व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश काळात अवैध 
दारु वाहतुक रोखण्यासाठी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जालना श्रीमती भाग्यश्री पं. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करण्यात आली असुन अवैध धंद्याविरुध्द कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात दररोज  मोहीम राबविण्यात येत आहे. दि. 6 एप्रिल 2020 रोजी राज्य उत्पादन शुल्क,अंबड विभागाच्या पथकाने कारला, थेरगाव रोडने वाहन क्रं. –MH-43N-8547 चा सिनेस्टाईल 5 ते 10 किलोमीटर पाठलाग करुन वाहन अडवत तपासणी केली असता त्यात देशी दारु 180 मिलीच्या 432 सिलबंद बाटल्या मिळुन आल्याने वाहन चालकास म.दा. का. 1949 चे कलम 65 अ,इ अन्वये अटक करण्यात आली आहे. तसेच निरिक्षक भरारी पथक, जालना यांच्या पथकाने दि. 6 एप्रिल 2020 रोजी जालना तालुक्यातील नाव्हा व कडवंची गावातील हातभट्टी दारु निर्मिती केंद्रावर छापे टाकुन 4 गुन्हे नोंदवले आहेत. त्यात त्यांनी 875 लिटर गुळमिश्रित रसायन जागीच नष्ट केले.
या कारवाईमध्ये निरीक्षक राहूल रोकडे निरीक्षक सुनिल गायकवाड, दुय्यम निरीक्षक अनिल बीडकर, अभय औटे, तसेच जवान सुनिल कांबळे, रावसाहेब पल्लेवाड, अंकुश बिजुले, विजेंद्र पवार, देविइदास आडेप,ज्ञानेश्वर सांबारे यांनी सहभाग नोंदवला.
             अवैध धंदा, दारु वाहतुक विरुध्द कारवाई – कोरोना विषाणु (कोवीड-19) च्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दि. 24 मार्च 2020 ते 7 एप्रिल 2020 एकुण 21 गुन्हे त्यामध्ये 4 वाहने एक तीन चाकी वाहन क्रं.MH-20BT-838 व दोन टु व्हिलर MH-21 AZ-4697,  MH-21 AN-9537, एक चारचाकी,MH-043N-8547 असा एकुण रुपये 603998 चा मुद्देमाल जप्त केला आहे.
            कोरोना विषाणु (कोवीड-19) अबकारी अनुज्ञप्तीवरील व्यवहार बंदच्या काळात दि. 24 मार्च 2020 ते 7 एप्रिल 2020 या कालावधीत एकुण 21 गुन्हे नोंद करण्यात आले असून त्यात 8 वारस व 13 बेवारस गुन्हे नोंदविण्यात आले असून 8 आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे. ज्यात हातभट्टी225 लिटर, रसायन 24330 लिटर देशी 212.06 ब.लि. असून 4 वाहने जप्त करण्यात आले असून 603998  रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध मद्यविक्री, वाहतूक संबंधी कुठलीही माहिती असल्यास दुरध्वनी क्रं.02482-225478 व 18008333333या टोल फ्री नंबर व्हॉटसअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक,  राज्य उत्पादन शुल्क जालना यांनी केले आहे.

धरमराज होलिये जुनीयर लक्ष्या मित्र मंडळ Mh20 प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने गोरगरीबांच्या संमजविल्या भावना
औरंगाबाद शहरात एक छोटीशी मदत म्हणून अत्यावश्यक किराणा वस्तुंचे वाटप
औरंगाबाद, प्रतिनिधी : कोरोनाच्या अनुषंगाने 
सध्या सर्वत्र बंद चालू आहे. त्यामुळे नाजूक स्थितीत असलेल्या परिवारांची फरफट होऊ नये व उपासपोटी भूकबळी होऊ नये यासाठी गरजू कुटुंबांना घराबाहेर जाता येत नाही या कोरोनाच्या धास्तिने तर महराष्ट्र भरात खळबळ उमजली आहे आणि तसेच त्यातली त्यात लॉक डाऊनमुळे घराबाहेर जाता ही येत नाही गरजु लोकांना व हाता वरुण काम करूंन जगणाऱ्याच तर अशक्य झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून लॉक डाऊन असल्यामुळे अन्न तर गरीबांनपासुन दूरच झाले आहे या असा प्रकार पाहुन धरमराज होलिये जुनीयर लक्ष्या मित्र मंडळ mh20 प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद शहरात मजूरंच अत्यावश्यक किराणा वस्तुंचे वाटप करण्यात आले...मागील काही दिवसापासून अखंड रीत्या ही सेवा देण्यात येत आहे यापुढेही जमेल तिथपर्यंत देण्याचा प्रयत्न करू असे धरमराज हिंगोले यांनी व त्यांच्या धरमराज होलिये जुनीयर लक्ष्या मित्र मंडळ mh20 प्रोडक्शन हाऊस ने स्पष्ट केले आहे.


     जालना शहरातील दु:खीनगर परिसरातील 28 रस्ते सील
20 आरोग्य पथकामार्फत पसिरातील एक हजार कुटूंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार
शहागड येथील 26 व्यक्तींबरोबर उर्वरित 20 व्यक्तींच्या स्वॅबचे नमुने निगेटिव्ह
जालना, प्रतिनिधी :- कोरोनाबाधित महिला रहात असलेल्या दु:खीनगर परिसरात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली 20 
पथकामार्फत एक हजार कुटूंबाचे पुढील 14 दिवस दररोज सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कंटेन्टमेंट प्लॅननुसार दु:खीनगर भागात येणारे 28 रस्ते सील करण्यात आले असुन या ठिकाणी 20 चेकपोस्ट स्थापन करण्यात येऊन कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत  करण्यात आले असुन शहागड ता. अंबड येथील 26 व्यक्तींबरोबरच उर्वरित 20 व्यक्तींच्या स्वॅबचे नमुने निगेटीव्ह आले असल्याची माहितीही प्रशासनामार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.जालना जिल्ह्यातील दु:खीनगर भागात 65 वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे दि. 6 एप्रिल, 2020 तपासणीअंती आढळुन आले. या महिलेची प्रृकती गंभीर असुन महिलेवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 61 व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले असुन यापैकी 44 व्यक्तींच्या स्वॅबचे नमुने घेण्यात येऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत व या व्यक्तींना  विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.  तसेच सामान्य रुग्णालयातील निकट संपर्कात आलेल्या 17 कर्मचाऱ्यांनाही अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली आहे.
 रांजणी ता. घनसावंगी या ठिकाणी कोरोनाबाधित महिलेची मुलगी शिक्षिका म्हणून कार्यरत असुन त्यांनी दि. 2 एप्रिल, 2020  रोजी शाळेत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत धान्य वाटप केले होते.  या पार्श्वभूमीवर 7 एप्रिल, 2020 रोजी घनसावंगीचे तहसिलदार यांच्या आदेशानुसार धान्य वाटपाच्या दिवशी व तदनंतर या शिक्षिकेच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या 19 व्यक्ती व ज्या विद्यार्थ्यांना धान्य वाटप केले त्या 1 हजार 119 कुटूंबातील 6 हजार 465 व्यक्तींचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.जालना जिल्ह्यात कोरोनाच्या एकुण 474 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 138 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 265 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 52 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 265 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने निरंक असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 01 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 227, रिजेक्टेड नमुने-03, एकुण प्रलंबित नमुने-34 तर एकुण 127 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 06,14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 49 एवढी

सर्वानी घरी राहूनच महात्मा फुले जयंति साजरी करावी
                                                                   - संतोष डोंगरखोस

सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) :- सध्या संपूर्ण
जगावर कोरोना चे संकट कोसळले आहे,व त्यामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले आहे,तसेच जगभरात लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे,कोरोनामुळे आपला देश व राज्य 14 एप्रिल पर्यंत लाॅकडाऊन  केले आहे,तेव्हा आपण या देशाचे नागरिक या नात्याने कायद्याचे पालण करुन सरकारला सहकार्य करणे आपले कर्तव्य आहे,तेव्हा आपण सर्वानी सार्वजनिक कार्यक्रम घेणे अथवा कार्यक्रमात सहभागी होणे स्वतःसाठी व देशासाठी घातक आहे.तेव्हा आपण सर्वानी सार्वजनिक कार्यक्रम टाळावे.
तसेच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांचे संपुर्ण देशात ,राज्यात तसेच आपल्या जिल्ह्यातही असंख्य पुर्णाकृती तथा अर्धाकृती पुतळे आहे या पुतळ्यांचा यथोचित सन्मान शासकीय पातळीवर शासनाने करावा ही नंम्र विनंती.तसेच जयंती उत्सव सार्वजनिक कार्यक्रम परिस्थिती पुर्ण आटोक्यात आल्यावर घेता येईल परंतु आज सार्वजनिक कार्यक्रम न घेता सरकारला सहकार्य करावे ही विनंती.प्रतिवर्षी 11 एप्रिलला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करत असतो परंतु यावर्षी आपण सर्व कोरोना सारख्या महामारीने संकटामधे आहोत तेव्हा घराबाहेर पडुन संघटीत कार्यक्रम न घेता घरात राहूनच गर्दी न करता अत्यंत साध्या पद्धतीने प्रतिमा पूजन करुन जयंति साजरी करावी ही नंम्र विनंती.असे आवाहन महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे जालना जिल्हाध्यक्ष श्री.संतोष डोंगरखोस यांनी केले.
                       भिमजयंती घरीच राहुन साजरी करुया !

परतुर/प्रतिनिधी: कोरोनाचा मुकाबला
करण्यासाठी येत्या १४एप्रिलपर्यंत लाँकडाऊन केले आहे.कोरोना हा साथीचा रोग गर्दीतुन अधिक पसरतो.त्यामुळे आता सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची ही वेळ नाही, तर कोरोना महामारीविरूद्ध लढण्याची वेळ आहे.त्यामुळे या वर्षी १४ एप्रिल रोजी येणारी भिम जयंती घरी थांबुनच साजरी करुया.असे आवाहन वंचित बहुजन आघाडी चे युवा कार्यकर्ते प्रशांत वाकळे यांनी केले आहे.१४ एप्रिलला बाहेर न जाता घरी राहुनच मिठाई,पुरणपोळी करुन डाँ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुध्द वंदना घेवुन भिमजंयती साजरी करावी,असे आवाहन प्रशांत वाकळे यांनी केले आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...