गुरुवार, २१ मे, २०२०

बंगलेवाडी येथे दोन महिलांच्या ताब्यातून 12 हजाराची गावठी दारु जप्त




रांजणी प्रतिनिधी/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील बंगलेवाडी तांडा येथे गावठी हातभट्टीच्या अड्डयावर धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन महिलांच्या ताब्यातून 12 हजाराची गावठी दारु जप्त केली. याप्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलकरण्यात आला.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बंगलेवाडी तांडा येथे हातभट्टीची गावठी दारु विक्री होत असल्याची गुप्त माहिती खब-याकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बंगलेवाडी तांडा येथील या अड्डयावर छापा टाकून 12 हजार रुपयांची गावठी हातभट्टीची दारु जप्त केली. ही कार्यवाही गुरुवारी दुपारी 12:55 वाजता करण्यात आली. या संदर्भात पोलिस कर्मचारी किशोर जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिस उपनिरीक्षक संपत पवार यांनी ही दारु नष्ट केली. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक एस.चैतन्य, अप्पर पोलिस अधीक्षक समाधान पवार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारु विरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक संपत पवार, आर.एस. पव्हरे, परमेश्वर धुमाळ, सुभाष पवार, सुरेश राठोड, धनाजी कावळे, रामेश्वर बघाटे, दिलीप कांबळे, राजेंद्र वेलदोडे, सुरेश नलावडे, यशवंत मुंढे, किशोर जाधव, महिला पोलिस अलका केंद्रे, रत्नमाला येडके व चालक धोंडीराम मोरे यांनी केली.

छगन चौगुलेंच्या निधनाने, लोककलेची मोठी हानी-वंचित



मुंबई/ब्युरोचीफ,दि.२१ :- अत्यंत दुःखद बातमी महाराष्ट्रातील एक प्रतिभावंत लोक कलावंत, सर्व लोककला संस्कृतीची जाण असलेले उमदे व्यक्तिमत्व छगन चौगुले यांच्या निधनाने आपण एका मोठ्या कलावंताला मुकलो आहोत. अश्या शब्दात वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष डॉ. अरुण सावंत यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. 

         विद्यापीठात असताना त्यांनी त्यांच्या विभागात अविस्वरणीय योगदान दिले व विभागाला एक उंची देण्यास मोलाचे योगदान दिले. प्रशिक्षक म्हणून ते खूप विद्यार्थीप्रिय होते.अत्यंत प्रांजळ व सुस्वभावी छगन चौगुले यांच्या जाण्याने विद्यापीठाची व महाराष्ट्राच्या लोककलेची खूप मोठी हानी झाल्याचे सावंत यांनी सांगितले. आतापर्यंत त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. मात्र त्यांना 'नवरी नटली' या गाण्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेले होते. आज सकाळी सेव्हन हिल्स रुग्णालयात कोरोनामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने लोककला क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे सावंत यांनी सांगितले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 

डॉ अरुण सावंत, माजी प्र कुलगुरू,मुंबई विद्यापीठ


पोलिसांकडून मजुरांची फसवणूक, अन्न पाण्याविना मजूर पोलीस ठाण्याबाहेर


मुंबई/ब्युरोचीफ,दि.२१ :- गेल्या २ महिन्यापासून गावी जाण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी रेल्वेने पाठविण्यात येईल असे सांगून सकाळ पासून विक्रोळी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. कामगार भाड्याची घरे खाली करून लेकराबाळांसह सकाळपासून विक्रोळी पोलीस ठाण्याबाहेर येऊन बसले होते. मात्र दुपारी त्यांना सांगण्यात आले की "गाडी नाहीये घरी जा, गाडी असेल तेव्हा फोन करून कळवण्यात येईल". भाड्याची खोली कायमची सोडून आलेल्या सकाळपासून उपाशी तापाशी बसलेल्या कामगारांना पोलिसांनी हाकलून दिले. आता गाडीची व्यवस्था होईपर्यंत राहायचे कुठे आणि खायचे काय असा प्रश्न या कामगारांना पडला आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रमेश मोहिते यांनी रस्त्यावर बसलेल्या कामगारांची विचारपूस करून पोलीस ठाण्यात जाऊन माहिती विचारली असता पोलिसांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन बाहेर काढून दिले. अनेक कामगार संतापून आता पायी चालत गावी जाणार असे म्हणून निघून गेले. सरकारला स्थलांतरित मजुरांची मदत करायची आहे की त्यांच्या आणि त्यांच्या लेकराबाळांच्या जीवाशी खेळायचं आहे? मजुरांची हेळसांड तातडीने थांबवली पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारने समन्वयाने मजुरांची काळजी घेणे अपेक्षित असताना इथे समन्वय आणि नियोजनाच्या नावाने बोंबाबोंब दिसत आहे. सगळाच भोंगळ कारभार. जर गाडीची व्यवस्था झालेली नव्हती तर पोलिसांना कोणी आदेश दिला कामगारांना बोलावण्याचा याची चौकशी झाली पाहिजे. आणि कामगारांचा छळ थांबला पाहिजे. ज्या मजुरांनी भाड्याचे घर सोडले आहे त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय तातडीने सरकारने करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.



डॉ.सत्यानंद कराड यांच्या पुढाकाराने शहरात मोफत मास्क वाटप.    

         

परतूर/प्रतिनिधी:-प्रशांत वाकळे               
परतुर येथील प्रसिद्ध अस्तिरोग तज्ञ डॉ सत्यानंद कराड यांच्या पुढाकाराने शहरात मोफत मास्क वाटप अभियान आज दिनांक 21मे 2020 रोजी वाटप करण्यात आले, सध्या लॉक डाऊन मध्ये थोडी शिथिलता मिळताच बाजारात नागरिकांनी गर्दी केली असून अनेक ठिकाणी शोषल डीसन्स नागरिक पाळताना दिसत नाही, अनेक जण मास्क न वापरता रुमाल गळ्यात लटकावून फिरताना दिसत आहे, यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल असा सवाल उपस्तीत करत, निदान मास्क वाटप करून यात जंजागृकता करता येइल या भावनेने सदरील अभियान आपण राबवत असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले, मोफत मास्क वाटप करताना याचे गामभिर्य ही सर्वांना समजून सांगत असल्याचे त्यांनी म्हटले आहे, कोरणांच्या प्रभाव अत्यंत तीव्र असून नागरिक बेफिकरपणे सार्वजनिक ठिकाणी वावरत आहेत , असा वेळी सर्वांनी प्रशासहनाचया सूचनांचे पालन करणे आवशक असल्याचे सांगत, जर अशीच विनाकारची गर्दी वाढत गेली तर कोरणांच्या विळखा आणखीनच घट्ट होईल व येणारी परस्तीती प्रशाषणाला व नागरिकांनाही आवरणे मुस्किल होईल असा इशारा त्यांनी दिला, नागरिकांनी सतर्क राहावे, मास्क वापरावे व नियमांचं तंतोतंत पालन करावे असे आहवन त्यांनी यावेळी केले।                  दरम्यान बालाजी नगर परिसर, रेल्वे स्टेशन परिसर व इतरत्र अनेकांना त्यांच्या वतीने मोफत मास्क वाटप करण्यात आले.


जिल्ह्यातील किराणा दुकानदारावर गुन्हे दाखल करा - मनसेची मागणी.




परतूर प्रतिनिधी/इम्रान कुरेशी
जालना जिल्ह्यातील सर्वच किराणा दुकानदाराने विनाकारण भाव वाढून दिले आहेत त्यांची चौकशी करून परवाने रद्द करून किराणा दुकानदारावर गुन्हे दाखल करण्या बाबतचे निवेदन महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे जालना जिल्हा अध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई त्यांच्याकडे ई -मेल द्वारे तक्रार केली आहे. तक्रारीत पुढे म्हटले आहे की,
जालना जिल्ह्यातील ८ तालुक्यातील किराणा दुकानदाराने विनाकारण भाव वाढून दिले आहेत. जीवनावश्यक व इतर प्रत्येक वस्तू महागे २० ते ३०% भावा वाढ करून दिली आहे. भाव का वाढवले याचे उत्तर दुकानदार स्पष्टपणे देतात की सध्या स्टॉक नाही सगळे काही बंद आहे त्यामुळे आम्हाला मिळणारा माल वाढीव भावाने मिळत आहे. खरे तर असे काही नाही जीवनावश्यक वस्तूंचा भरपूर साठा आहे परंतु कमी कशी करावी कसं लुटता येईल लोकांना याचं प्रफॅक्ट ज्ञान या लोकांना अवगत आहे. खरंच किराणा दुकानदार नशीबवान आहेत लॉकडॉउन काळात किराणा दुकान चालू ठेवण्याची परवानगी सरकारने किराणा दुकानदाराला दिली आहे इतर सगळे दुकाने काही दिवसा पर्यंत बंद होते यांना योगायोगाने व्यापार करण्याची संधी मिळाली परंतु त्या संधित सुद्धा हात धुऊन घेण्याचे काम किराणा दुकानदारांनी चालू ठेवल्याले आहे जनता बिचारी फार प्रमाणिक असते एखाद्या दुकानदाराकडे एखादी व्यक्ती गेली किराणा वस्तूंची यादी दुकानदाराकडे देते आणि सर्व वस्तू घेतल्यानंतर किती बिल झाले असे विचारून बिल देऊन टाकतात दुकानदाराने वस्तू काय भावने लावल्यात हेसुद्धा लोक बघत नाहीत. किराणा दुकानदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जी शासकीय यंत्रणा काम करते अगदी कुचकामी आहे या यंत्रणेच्या काय हेतु आहे हेच लक्षात येत नाही कारण ह्या सगळ्या सर्व गोष्टी सर्रास चालू असताना जालना जिल्ह्यातील तालुक्यात तुरळक २% किराणा दुकानदार कारवाई झालेली दिसून आलेली आहे.परंतु ९८% किराणा दुकानदारांवर नियंत्रण ठेवणाऱ्या या यंत्रणेने कारवाई का केली नाही. याची सुद्धा चौकशी करून या यंत्रणेवर कारवाई व्हायला हवी. कारण “जड हि खराब है पेड नही” या म्हणी प्रमाणे किराणा व्यापाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. यामुळे दुकानदार सर्रास गैरव्यवहार करीत आहेत.असेही दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पुढे असे आहे की, साखर ३७ ते ३८ किलो.गोड तेल १२० लिटर. शेंगदाणे १३० किलो. तुरदाळ, चनादाळ, मुगदाळ या दाळीमध्ये चक्क २० ते ३० टक्के वाढ.काही वस्तू मध्ये तर ५० ते ६० टक्के वाढ केली आहे त्या मध्ये तंबाखूजन्य पदार्थ आणि तंबाखू. सिगारेट तंबाखूची पुडी किंमत दहा रुपये की सध्या ३० रुपयाला मिळते. सिगारेटचे खादे पाकिट ९५ रुपये किंमत असेल ते सध्या १८० रुपयाला मिळते. अशाप्रकारे जालना जिल्ह्यात किराणा दुकानदार लुटालूट करीत आहेत. जालना जिल्ह्यातील जनतेला वेठीस धरल्यामुळे किराणा दुकानदारांवर कारवाई करावी. व या की किराणा दुकानदारांवर नियंत्रण ठेवणाऱ्या शासकीय यंत्रणेवर निष्काळजीपणा केल्या बद्दल निलंबनाची कारवाई करावी. जेणेकरून जनतेचे पिळवणूक थांबेन या पूर्वी ही जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे किराणा दुकानदार बाबत निवेदन देऊ तक्रार करण्यात आली होती. जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यातील किराणा दुकानदारांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत असेही शेवटी दिलेल्या महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपास करणाऱ्यावर कारवाई

अंबड तालुक्यातील गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.




अंबड़/प्रतिनिधि : अंबड तालुक्यातील गोंदी पोलिस ठाण्यात नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले,  पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे, यांनी गोदावरी पात्रातून अवैध उपास करणाऱ्या विरुद्ध कारवाई करत वाळूचे दोन  ट्रॅक्टरासह साडेनऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी गुप्त सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, गोदावरी नदीपात्रातून ऐवजी वाळू उपासा होत आहे. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्री पाऊस फाट्या गोदावरी नदीपात्रातून अवैध रित्या वाळू उपसा  करणाऱ्यांनविरुद्ध रात्रभर मोहीम राबविण्यात आली होती यावेळी मंगरूळ येथील नदीपात्रातून दोन ट्रॉली असलेले वाळू भरलेला एक ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला यानंतर पाथरवाला येथील नदीपात्रात पोलिसांना पाहून वाळू भरत असलेले ट्रॅक्टर सोडून चालत आणि इतर काही जण पळून गेले पोलिसांनी दोन ट्रॉली असलेले वाळूने भरलेला एक ट्रॅक्टर आणि एक रिकामा ट्रॅक्टर असे दोन ट्रॅक्टर व वाळू असा 9 लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून प्रकाश सुभाष परासे व किशोर प्रभू खरात दोघेही राहणार गोंदी यांना मुद्देमालासह अटक करून त्यांच्याविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*अंबड़ तालुक्यातील जामखेड येथील कानिफनाथ आश्रमातील खोल्या ताब्यात घेऊन अवैध धंदा करणाऱ्यानी गुप्त  गुटख्याची साठवणूक करुण केला गोडाऊन*



अंबड तालुक्यातील  जामखेड येथून 12 लाखाचा 46 पोते गुटख्याचा साठा जप्त, आरोपी मात्र फरार

*अंबड/अरविंद शिरगोळे* : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर डाऊनच्या काळात चोरीछुपे अवैध धंदे पावले असून या अवैध धंदा करणाऱ्या विरुद्ध पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकरांनी दंड थोपवीत धाडसत्र सुरू आहे यात दिनांक 20 मे रोजी भल्या पहाटे दोन वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना अंबड तालुक्यातील  जामखेड येथून 12 लाखाचा 46 पोते गुटख्याचा साठा असे जप्त केला असून आरोपी मात्र फरार झाला आहे याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी अंबड तालुक्यातील रोहिलागड परिसरातील जंगलात अडगळीत असलेल्या कानिफनाथ आश्रमा चे साधक व पुजारी असलेल्या पती-पत्नीने दोन वर्षापूर्वी निधन झाल्याने सदरील आश्रम ते बंद होते मात्र गुटका माफिया अनिल भोजने याचे मयत पुजारी दाम्पत्य हे नात्याने मावशी व मावसा होते त्यामुळे त्यांनी या कानिफनाथ आश्रमातील खोल्या ताब्यात घेऊन त्याचा गोडाउन प्रमाणे प्रयोग करून तिथे गुटख्याची साठवणूक करून युद्ध गोरख धंदा करीत असल्याची माहिती अंबड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांना एका गुप्त सूत्राकडून मिळाल्याने पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर व त्यांच्या पथकातील पो.हे.का विष्णू चव्हाण पाटील, पोलीस कर्मचारी संदीप कुटे, संतोष वनवे, महेंद्र गायके, शमीम बर्डे, वंदन पवार स्वप्नील भिसे, विषाल लोखंडे तसेच महिला पोलीस कर्मचारी परवीन शेख यांनी मोठ्या शतफिने सापळा रचला जिल्हा पोलिस अधिकाक्ष एस.चैतन्य अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार पोलीस अधीक्षक सि.डी.सेवन यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे 2 वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना रोहिलागड येथील कानिफनाथ आश्रमात तसेच जामखेड येथील गुटखा माफियांच्या  घरी छापा मारून तब्बल 12 लाखांचा रुपयांचा 46 जप्त करू दंड थोपवीत धाडसत्र सुरू आहे यात दिनांक 20 मे रोजी भल्या पहाटे दोन वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना अंबड तालुक्यातील  जामखेड येथून 12 लाखाचा 46 पोते गुटख्याचा साठा असे जप्त केला असून आरोपी मात्र फरार झाला आहे याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी अंबड तालुक्यातील रोहिलागड परिसरातील जंगलात अडगळीत असलेल्या कानिफनाथ आश्रमा चे साधक व पुजारी असलेल्या पती-पत्नीने दोन वर्षापूर्वी निधन झाल्याने सदरील आश्रम ते बंद होते मात्र गुटका माफिया अनिल भोजने याचे मयत पुजारी दाम्पत्य हे नात्याने मावशी व मावसा होते त्यामुळे त्यांनी या कानिफनाथ आश्रमातील खोल्या ताब्यात घेऊन त्याचा गोडावन प्रमाणे प्रयोग करून तिथे गुटख्याची साठवणूक करून युद्ध गोरख धंदा करीत असल्याची माहिती अंबड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांना एका गुप्त सूत्राकडून मिळाल्याने पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर व त्यांच्या पथकातील पो.हे.का विष्णू चव्हाण पाटील, पोलीस कर्मचारी संदीप कुठे संतोष वनवे, महेंद्र गायके, शमीम बर्डे, वंदन पवार स्वप्नील भिसे, विषाल लोखंडे तसेच महिला पोलीस कर्मचारी परवीन शेख यांनी मोठ्या शतफिने सापळा रचला जिल्हा पोलिस अधिकाक्ष एस.चैतन्य अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार पोलीस अधीक्षक सि.डी.सेवन यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे 2 वाजेच्या सुमारास गस्त घालत असताना रोहिलागड येथील कानिफनाथ आश्रमात तसेच जामखेड येथील गुटखा माफियांच्या  घरी छापा मारून तब्बल 12 लाखांचा रुपयांचा 46 जप्त करून. अंबड पोलीस ठाण्यात जमा केला येथील अन्न व औषधी प्रशासनाला पुढील गुन्हा दाखल करण्यासाठी कळविण्यात आले असून गुटका माफिया मात्र फरार झाला. असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. गुटखा माफिया  तसेच अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणून एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. फरारी गुटखा माफिया अनिल भोजने चा अंबड पोलिसांकडून शोध सुरू असून लवकरच आरोपीला ताब्यात घेण्यात येईल तसेच यामागे आणखी काही जणांचा हात असण्याची शक्यता पोलिस वर्तवली असून त्या दिशेने जोमाने तपास सुरु आहे.

बीड जिल्ह्यात उद्यापासून लालपरी जिल्हांतर्गत धावणार




बीड,प्रतिनिधी:- बीड जिल्ह्यामध्ये उद्या दि.22 मे पासून राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा 50 टक्के आसन क्षमतेनुसार म्हणजेच 22 प्रवाशी याप्रमाणे जिल्हांतर्गत सुरू करण्यात येत असल्याची माहिती विभाग नियंत्रक बीड कालिदास लांडगे यांनी दिली आहे. यासंदर्भात जिल्हा माहिती अधिकारी यांनाही अधिकृत पत्र देण्यात आले आहे.**
बीड जिल्ह्यामध्ये गेला सात दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची चाके थांबली आहेत.मात्र उद्या दिनांक 22 मे पासून जिल्हांतर्गत बस सेवा सुरू करण्यात येत असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हा माहिती अधिकारी यांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र शासन अधिसूचना मधील मुद्दा क्र.14 ( ड) नुसार नॉन रेड झोन मध्ये सार्वजनिक प्रवासी वाहतूक जिल्हाअंतर्गत बसच्या प्रवासी आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याबाबत सूचना प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने बीड विभागांमध्ये उद्यापासून जिल्हांतर्गत बस सेवा सुरू करण्यात येत आहे.
             याप्रमाणे सुरू होईल बसेवा
बीड ते परळी,  बीड ते अंबाजोगाई , बीड ते माजलगाव, बीड ते धारूर, बीड ते गेवराई, बीड ते पाटोदा, बीड ते आष्टी ,परळी ते अंबाजोगाई ,धारूर ते अंबाजोगाई,  केज ते माजलगाव, माजलगाव ते गेवराई गढी याप्रमाणे या बसच्या 12 फेऱ्या होणार आहेत.सदरील बसेस सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळेत प्रति 1 तासाने सोडण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक कालिदास लांडगे यांनी  प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे.

जालना जिल्ह्यातील कापूस खरेदीला गती देण्यासाठी सीसीआयने खरेदी केंद्र वाढवावेत

पालकमंत्री राजेश टोपे यांची राज्यस्तरीय खरीप हंगामाच्या बैठकीत मागणी



मुंबई,महा.ब्युरोचीफ :-  जालना जिल्ह्यातील कापूस खरेदीला गती देण्यासाठी सीसीआयने खरेदी केंद्र वाढवावेत. दररोज ७५ ते १०० गाड्या कापसाची खरेदी व्हावी अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी आज या बैठकीत केली.

राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंत्रालयातून उपमुख्यमंत्र्यांसह कृषीमंत्री दादाजी भुसे, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनील देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, सामान्य प्रशासन विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते.

यावेळी कापूस खरेदीला वेग देण्याची गरज असून सीसीआयने खरेदी केंद्र वाढविण्यासंदर्भात खासदार शरद पवार यांना भेटून त्यात लक्ष घालण्याची विनंती त्यांना केली जाईल, असेही श्री. टोपे यांनी सांगितले.

खरीप हंगामासाठी कर्ज वाटप जास्त होण्याची गरज आहे. एकूण उद्दिष्टाच्या ५० टक्के कर्ज  वाटप होते. त्यासाठी राष्ट्रीयीकृत व मध्यवर्ती सहकारी बँकांनी उद्दिष्ट पूर्ण करण्याची मागणीही पालकमंत्री टोपे यांनी केली. खते, बियाण्याची मुबलक उपलब्धता असून कमी पडल्यास शेतकऱ्यांनी स्वतःकडील बियाणे वापरावे, असे आवाहनही श्री.  टोपे यांनी केले.

प्रारंभी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी खरीप हंगामाबाबत सविस्तर सादरीकरण केले. सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांनीही सादरीकरण केले.

राज्यातील कृषि क्षेत्र दृष्टिक्षेपात

भौगोलिक क्षेत्र : ३०७ लाख हेक्टर

लागवडीलायक क्षेत्र :१७४ लाख हेक्टर

लागवडीखालील क्षेत्र

खरीप : १४९.७ लाख हेक्टर;

रब्बी  : ५७ लाख हेक्टर

कोरडवाहू क्षेत्र - ८१ टक्के

एकूण शेतकरी संख्या – १.५२ कोटी;

लहान : - २८.४० टक्के,

सीमांत : - ५१.१० टक्के

सरासरी पर्जन्यमान : ११९८ मि.मि.

प्रमुख पिके :

खरीप :  भात, ज्वारी, बाजरी, मका,  तूर , कापूस, सोयाबीन, ऊस

रब्बी : ज्वारी, गहू, हरभरा

------

पाऊसपाणी अंदाज -

२०२० चा नैऋत्य मौसमी पाउस सरासरी ९६ टक्के ते १०४ टक्के राहिल असा अंदाज आहे.

अल-निनो सामान्य राहणार आहे. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सौम्य स्वरूपात एल निनो स्थिती राहिल असा अंदाज

मान्सून मुंबईत ११ जूनपासून तर १८ जूनपर्यंत सर्व राज्यात पसरेल.

-----

खरीप हंगाम २०२० नियोजन

• विविध पिकाखालील एकूण क्षेत्र : १४०.११ लाख हेक्टर

• सोयाबीन व कापसाचे क्षेत्र ८२ लाख हेक्टर

• बियाणे बदलानुसार एकूण बियाणे गरज: १६.१५ लाख क्विंटल

• खरीप हंगाम २०२० साठी अंदाजित बियाणे उपलब्धता : १७.५१ लाख क्विंटल (महाबीज- ५.०८, राबिनि-०.३१ व खासगी-११.८६ लाख क्विंटल.)

• खरीप हंगाम २०२० (एप्रिल ते सप्टेंबर) करीता एकूण ४० लाख मे.टन खते मंजूर. खरीप २०१९ मध्ये ३३.२७ लाख मे.टन खतांचा वापर.

• १७ मे २०२० पर्यंत खतांची उपलब्धता : २६.१३ लाख मे.टन, पैकी ७.१५ लाख मे.टन खतांची विक्री

• खरीप २०२० मध्ये सोयाबीनचे अपेक्षित क्षेत्र : ४० लाख हेक्टर आहे. एकूण बियाणे गरज: १०.५० लाख क्विंटल.

संभाव्य सोयाबीन बियाणे उपलब्धता: महाबीज – ३.९१ लाख क्विंटल + राबिनि – ०.२२ लाख क्विंटल + खासगी- ७.११ लाख क्विंटल = एकूण ११.२४ लाख क्विंटल

• राज्यात कापूस पिकाखाली ४१ लाख हेक्‍टर क्षेत्र प्रस्तावित असून ९८ टक्के क्षेत्रावर बीटी कापसाची लागवड. या क्षेत्रासाठी १ कोटी ७० लाख बियाणे पाकिटांचे आवश्यकता. कापूस कंपन्यांनी २ कोटी ७२ लाख पाकिटांचे पुरवठा नियोजन केलेले आहे. त्यामुळे राज्यात कापूस बियाणे पाकीट यांचा तुटवडा भासणार नाही.

• खत पुरवठा नियोजन - ४० लाख

जिल्ह्यात तीन व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

तीन कोरोना बाधितांच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह


तिघांनाही कोव्हीड रुग्णालयातुन डिस्चार्ज - जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती



बिहारमध्ये जाणाऱ्या नागरिकांसाठी आज विशेष श्रमिक रेल्वे

जालना,दि.21 (महा.ब्युरो चीफ) :- मुंबई येथून परतलेले दोन पुरुष व एक महिला सिद्धेश्वर पिंपळगाव ता. अंबड येथे गेले असता सरपंच आणि इतर ग्रामस्थांच्या जागरुकतेमुळे या तिघांनाही अंबड येथे कोव्हीड सेंटमध्ये पाठविण्यात आले.  तेथुनया तिघांनाही जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले असता दि. 21 मे, 2020 रोजी तिघांच्याही स्वॅबचा अहवाल प्रयोगशाळेकडून पॉझिटीव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.  तसेच बिहार राज्यातील छापरा येथे जाण्यासाठी आज दि. 22 मे, 2020 रोजी विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येणारअसल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

            रंगनाथनगर पाण्याची टाकी परिसर, जालना येथील एक महिला, आनंदनगर, सतकर कॉम्प्लेक्स परिसर येथील एक महिला तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्यामहिला डॉक्टर या तीनही रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल प्रयोगशाळेकडून निगेटीव्ह प्राप्त झाल्यामुळे या तिघांनाही आज दि. 21 मे, 2020 रोजी कोव्हीड हॉस्पीटल येथुन डिस्चार्ज देण्यात आला.

            बिहार या राज्यातील कामगारांना बिहारमधील छापरा या ठिकाणी पाठविण्यासाठी जालना येथुन विशेष मोफत रेल्वे शुक्रवार दि.22 मे, 2020 रोजी सायंकाळी सोडण्यात येणार आहे.  ही रेल्वे दानापुर, आरा या रेल्वे स्थानकावर थांबणार असुन शेवटचे ठिकाण छापरा हे असणार आहे.  जालना शहरातील बिहार येथे जाणाऱ्या नागरिकांनी दुपारी १-00 वाजता आय.टी. आय. कॉलेज, चंदनझिरा, जालना याठिकाणी उपस्थित रहावे. त्यांना रेल्वे स्थानकापर्यंत बसने पोहोचविण्यात येणार असुन तालुका स्तरावरुन बिहार येथे जाणाऱ्या नागरिकांना संबंधित तहसिल कार्यालयात सकाळी 11-00 वाजता उपस्थित रहावे. तेथुन त्यांना जालना रेल्वे स्थानकावर आणण्याची व्यवस्था करण्यात आली असुन या विशेष रेल्वेसाठी नोडल अधिकारी म्हणून राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे संचालक मनोज देशमुख यांनी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

            जिल्ह्यात एकुण 1887 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 45 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 918 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 137 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या 1823 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने -03 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 44 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1638, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 327, एकुण प्रलंबित नमुने -137 तर एकुण 873 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.

14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या-18, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 785 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या-16, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -589, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-03, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -45, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -01, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 1309 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे. 

            आजपर्यंत जालना जिल्ह्यात इतर राज्यातुन 218 व राज्याच्या इतर जिल्ह्यातुन 8533 असे एकुण–8751 नागरीक दाखल झाले आहेत. या सर्वाना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातुन आजपर्यंत उत्तरप्रदेश–2728, मध्यप्रदेश -782, बिहार 160, तेलंगणा- 27, राजस्थान-167, झारखंड – 30, आंध्रप्रदेश-103, ओरिसा– 113, छत्तीसगड- 10, हैद्राबाद-08 असे एकुण–4128 नागरीकांना परराज्यात पाठविण्यात आले आहे.

            कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 589 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-34, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-26,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-6, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-22,पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -115 मॉडेल स्कुल, अंबारोड, परतुर-00, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-14, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-46, राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद -102, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -32, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-18, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे – 45, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी-37, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत क्र. 1-60,डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल क्र.2 भोकरदन-00, मॉडेल स्कुल मंठा-32 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.

            लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 618 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 117 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 597 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 90 हजार 100 असा एकुण 3 लाख 16 हजार 908 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  

कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुधारित कलम 144 लागु.





जालना,प्रतिनिधी :- राज्य शासनाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनांच्या अनुषंगाने संपुर्ण राज्यात दि. 31 मे, 2020 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंतच्या लॉकडाऊन कालावधीतील सुधारित मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार जालना जिल्ह्यात कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्याच्या अनुषंगाने उपायोजना करण्याच्यादृष्टीने जालना जिल्ह्यात यापुढेही फौजदार प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतुदी लागू ठेवणे आवश्यक असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फौजदारी दंड प्रकिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये  जालना जिल्हयात   दिनांक 31 मे 2020 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यत जालना जिल्ह्यातील संपुर्ण ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रात कोणत्याही ठिकाणी एका वेळेस 5 पेक्षा अधिक व्यक्तींना जमा होण्यास मनाई जिल्हादंडाधिकारी  रवींद्र बिनवडे  यांनी निर्गमित केले आहेत.शासनाने त्यांचे दि. 2 मे 2020 रोजीच्या लॉकडाऊन संदर्भातील मार्गदर्शक सुचना अधिक्रमीत करुन खालील प्रमाणे सुधारीत मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या असुन मनाई आदेशा दरम्यान दिनांक 31 मे 2020 पर्यत प्रतिबंधीत असलेल्या बाबी खालीलप्रमाणे.**
i. सर्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवासी हवाई वाहतूक - वैद्यकीय सेवा, एअर अॅम्बुलन्स, सुरक्षा विषयक बाबी आणि गृहमंत्रालयाने परवानगी दिलेल्या बाबी वगळून बंद राहील. 
ii. मेट्रो रेल सेवा
  ii.    सर्व प्रकारच्या शैक्षणीक संस्था, प्रशिक्षण केंद्रे, शिकवणी वर्ग/संस्था बंद राहतील. तथापी ऑनलाईन /दुरस्थ शिक्षणाला परवानगी राहील.
iii.   सर्व प्रकारच्या आदरातिथ्य सेवा बंद राहतील. मात्र आरोग्य /पोलीस/ शासकीय अधिकारी-कर्मचारी /आरोग्य विषयक कर्मचारी, लॉकडाऊनमुळे अडकलेल्या व्यक्ती जसे की, पर्यटक आणि अलगीकरणासाठी आवश्यक असणारी आदरातिथ्य सेवा चालु राहतील.  तसेच बस डेपो, रेल्वे स्टेशन आणि विमानतळावरील उपहारगृहे चालू राहतील. याव्यतिरिक्त बाकी सर्व उपहारगृहे आणि हॉटेल्स बंद राहतील. मात्र उपहारगृहातील खाद्यपदार्थांची घरपोच सुविधा सुरु राहील.
iv.  सर्व सिनेमा गृहे, मॉल्स, शॉपिंग कॉम्पलेक्स, व्यायाम शाळा, क्रिडा संकुल, जलतरण तलाव, मनोरंजन केंद्रे, प्रेक्षागृहे, बार, सभागृहे, मंगल कार्यालये आणि एकत्रित जमण्याची ठिकाणे आणि तत्सम इतर ठिकाणे.
   v.   सर्व सामाजिक/राजकीय/ क्रिडा विषयक/ मनोरंजन /शैक्षणिक / सांस्कृतीक /धार्मिक कार्यक्रम / इतर संमेलने
  vi.   सर्व धार्मिक स्थळे तसेच इतर सर्व प्रार्थना स्थळे भाविकांना दर्शनासाठी बंद राहतील. सर्व धार्मिक सभा/परिषदा बंद राहतील.
२) महाराष्ट्र शासनाच्या मानक कार्यप्रणालीनुसार अटी व शर्तीचे पालन करणे आवश्यक व बंधनकारक राहील.
३) कोव्हीड19 च्या व्यवस्थापनासाठी निर्धारित केलेल्या राष्ट्रीय मार्गदर्शक सुचना व तरतुदी कायम राहीतील.
४) सहज परिणाम होईल अशा व्यक्तींची सुरक्षा

i)  65 वर्षावरील जेष्ठ नागरीक, गरोदर महिला आणि 10 वर्षाच्या खालील मुले यांनी अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारण वगळता घरातच थांबणे आवश्यक आहे.
५) मार्गदर्शक सुचनांमध्ये नमूद केल्यानुसार जालना जिल्हा नॉन रेड झोन (ऑरेंज व ग्रीन झोन) मध्ये समाविष्ट केला आहे.
६) कंटेन्टमेंट झोन
    i.  केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचना लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन हे त्यांच्या भागातील कंटेन्टमेंट झोन निश्चित करतील.
    ii. जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांना  कंटेनमेंट झोन निश्चित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यात उपविभागीय दंडाधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात कंटेनमेंट झोन निश्चित करण्यासाठी    जिल्हाधिकारी  यांच्यावतीने प्राधिकृत करण्यात येत आहे. निवासी कॉलनी,मोहल्ला, झोपडपट्टी, इमारत, इमारतींचा समुह, गल्ली, वॉर्ड, पोलीस ठाण्याचे क्षेत्र, गाव किंवा छोटा समुह असे कंटेनमेंट झोनचे क्षेत्र असू शकेल. यापेक्षा मोठे क्षेत्र (संपुर्ण तालुका  किंवा संपुर्ण महापालिका क्षेत्र इत्यादी) कंटेनमेंट झोन म्हणुन जिल्हाधिाकरी यांचेशी सल्लामसलत करुन निर्णय घ्यावा. जिल्हाधिकारी हे मुख्य सचिवांशी सल्लामसलत करुन निर्णय घेतील.              
iii. कन्टेनमेंट झोनमध्ये क्षेत्रात फक्त अत्यावयक बाबीसंदर्भातील कार्याला परवानगी देण्यात येत आहे.  वैद्यकीय कारण आणि अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी या क्षेत्रातील लोकांना बाहेर जाण्या-येण्यास पुर्णत: प्रतिबंध करण्यात येत आहे.
7.   आरोग्य सेतू अॅपचा वापर
i.       आरोग्य सेतू संसर्गाची संभाव्य धोक्याची सुरवातीच्या काळात माहिती देते त्यामुळे ते व्यक्तींसाठी व समाजासाठी सुरक्षा कवचाप्रमाणे काम करते.
ii.     कार्यालये व कामाच्या ठिकाणांची सुरक्षीतता विचारात घेता जास्तीत जास्त कर्मचारी आरोग्य सेतू अॅप अनुरुप मोबाईल फोनमध्ये Install करतील याची खात्री करावी.
iii.  जिल्हा प्रशासन नागरिकांना आरोग्य सेतू अॅपचा वापर करावा आणि त्यांचे आरोग्याची अद्ययावत माहिती सदरील अॅपवर अपलोड करावी असे आवाहन करीत आहे. जेणे करून जोखमीच्या वेळी सबंधीताना तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देता येईल.
8. विशिष्ट प्रकरणांमध्ये व्यक्ती आणि वस्तु/ मालाची वाहतुक सुनिश्चित करण्यासाठी निर्देश
i) सर्व यंत्रणांनी डॉकटर्स, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि रुग्णवाहिकांना कोणत्याही प्रकारच्या निर्बंधाशिवाय राज्यातल्या राज्यात आणि एका राज्यातुन दुस-या राज्यात जाण्यासाठी परवानगी द्यावी.
ii)   सर्व प्रकारच्या जीवनाश्यक वस्तुंची वाहतुक व मालवाहतुक करणा-या आणि रिकाम्या ट्रक यांना                      राज्यातल्या राज्यात येण्या – जाण्यास सर्व यंत्रणांनी परवानगी द्यावी.
iii) शेजारील देशांसोबत जे करार  करण्यात आले आहेत त्या अंतर्गत होणा-या कोणत्याही वस्तु किंवा माल-वाहतुकीस आपल्या सीमेवर प्रतिबंध करण्याचा अधिकार कोणत्याही यंत्रणेला नसेल.
9.   रेड झोन व्यतिरिक्त क्षेत्र
i या क्षेत्रात वरील मुद्या क्रमांक 1 मध्ये नसलेल्या आणि विवक्षीतपणे प्रतिबंध नसलेल्या सर्व गोष्टींना  “Non Red Zone” मध्ये खालील अटी व शर्तीवर परवानगी राहील.
ii.     अनुज्ञेय असलेल्या कुठल्याही बाबीसाठी कोणत्याही शासकीय अधिका-यांची परवानगीची आवश्यक असणार नाही.
iii.  क्रीडा संकुले व क्रिडागृहे तसेच सार्वजनिक वापरातील खुल्या जागावर वैयक्तीक व्यायाम करण्यासाठी परवानगी राहील. तथापी प्रेक्षक आणि समुह गतीविधींना परवानगी असणार नाही. सर्व प्रकारचे शारीरीक व्यायाम आणि इतर सर्व गोष्टी योग्य सामाजिक अंतर ठेवून करणे आवश्यक आहे.
iv.     सर्व  शासकीय व खाजगी वाहतुकीसाठी खालील प्रमाणे प्रवासी अनुज्ञेय असतील.
i.       दुचाकी – केवळ चालक
ii.     तीनचाकी-  चालक व इतर 2 प्रवासी
iii.  चारचाकी- चालक व इतर 2 प्रवासी
v जिल्हांतर्गत बस वाहतुक ही आसन क्षमतेच्या कमाल 50 टक्के क्षमतेनुसार चालविण्यास परवानगी राहील. तथापि, बसमध्ये योग्य शारिरीक अंतराच्यानियमांचे पालन होण्यासह बसचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील.
viआंतरजिल्हा बस सेवेच्या अनुषंगाने वेगळे आदेश शासनामार्फत निर्गमित करण्यात येतील.
vii.     सर्व बाजार / दुकाने सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यत सुरु राहतील. तथापी गर्दी उसळल्यास व सामाजिक अंतराच्या तत्वाचे पालन होत नाही असे दिसून आल्यास स्थानिक प्राधिकरणाने संबंधीत बाजार/दुकाने तात्काळ बंद करावीत.
10.   सर्वसाधारण सुचना – कंटेनमेंट झोनमध्ये आरोगय विषयक प्रोटोकॉल पुर्वीच्या आदेशाप्रमाणेच लागु राहील.  यासोबत जोडलेले  परिशिष्ट -3 सोयीसाठी आहे आणि मुख्य आदेशासह वाचले जाणे आवश्यक आहे.
11.   दंडात्मक तरतूदी – उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचे विरुध्द  आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भा.दं.वि. 1860 चे कलम 188 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
परिशिष्ट -1
गृह मंत्रालय, भारत सरकार यांनी निर्गमित केलेल्या मानक कार्यप्रणाली (SOP)
1. परदेशी नागरिकांसाठी पारगमन व्यवस्थेबाबतीत निर्गमित (SOP) दि. 2 एप्रिल 2020
2. राज्य, केंद्रशासित प्रदेशांमधील अडकलेल्या कामगारांच्या स्थलांतर संबंधीत  निर्गमित (SOP) दि. 19 एप्रिल 2020-05-21
3. 3. साइन- इन आणि साइन- ऑफ  भारतीय समुद्री जहाजांचे संबंधीत निर्गमित (SOP) दि. 21 एप्रिल 2020
4. अडकलेल्या भारतीय कामगार, यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्तींच्या संबंधीत निर्गमित (SOP) दि. 1 मे 2020.
5. देशाबाहेर अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या आणि परदेशात जाण्यासाठी विशिष्ट व्यक्तींच्या प्रवास संबंधीत निर्गमित (SOP) दि. 5 मे 2020
6. रेल्वेने व्यक्तींच्या प्रवास संबंधीत निर्गमित (SOP) दि. 11 मे 2020
परिशिष्ट -2
कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी निर्धारित केलेल्या राष्ट्रीय  मार्गदर्शक सुचना
1.        सर्व सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क वापरणे बंधनकारक आहे.
2.       सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी थुंकणे दंडनिय राहील.  व त्यासाठी संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कायद्यानुसार दंड आकारण्यात यावा.
3.       सार्वजनिक स्थानांवर आणि वाहतुकीत सर्व व्यक्तींनी सामाजिक अंतर ठेवले पाहिजे.
4.      विवाहा सारख्या सार्वजनिक कार्यक्रमात सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. मात्र 50 पेक्षा जास्त  व्यक्तींना एकत्र येण्यास परवानगी असणार नाही.
5.       अंत्यविधी सारख्या प्रसंगी सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. मात्र 50 पेक्षा जास्त  व्यक्तींना एकत्र येण्यास परवानगी असणार नाही.
6.       सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा, मद्य यांचे सेवन करण्यास मनाई राहील.
7.       सर्व दुकांनावर ग्राहकांमध्ये कमीत कमी 6 फुटाचे अंतर राखणे बंधनकारक राहील. आणि दुकानावर एकावेळी 5 पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी असणार नाही.
कामाच्या ठिकाणी पाळावयाचे अतिरिक्त निर्देश
1.  जेथे शक्य असेल तेथे जास्तीत जास्त घरी राहून काम (Work from Home ) चा अवलंब करावा.
2. कार्यालयीन कामाची ठिकाणे, दुकाने,बाजारपेठ आणि औद्योगिक व व्यासायिक आस्थापनांमध्ये शिफ्ट निहाय कामकाजाच्या वेळा निश्चित कराव्यात.
3.   सर्व प्रवेश व निर्गम स्थानावर थर्मल स्कॅनिंग, सॅनिटाइझर व हात धुण्याची सुविधा उपलब्ध करावी. कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर, हॅड वॉश उपलब्ध करुन देण्यात यावे.
4.    सर्व कामाच्या ठिकाणाचे, सार्वजनिक सुविधांचे आणि मानवी संपर्कात येणारी सर्व ठिकाणी जसे की, दरवाजाचे हॅडल आदींचे दोन पाळयादरम्यान तसेच वांरवार निर्जतूकीकरण करावे.
5.   दोन पाळयामध्ये सुयोग्य अंतर ठेवून तसेच भोजन अवकाश योग्य वेळेचा ठेवून व इतर मार्गाचा वापर करून कामाच्या ठिकाणी योग्य सामाजिक अंतर पाळले जाईल यांची दक्षता घ्यावी.
-*-*-*-*-*-
परिशिष्ट -3
कोविड-19 लॉकडाऊन 4.0
काय सुरु राहणार व काय प्रतिबंधीत राहील
बाब रेड झोन उर्वरित क्षेत्र कंटेनमेंट झोन 
प्रवास विमान, रेल्वे, मेट्रो नाही नाही नाही
आंतरराज्य वाहतुक नाही नाही नाही
शाळा, महाविद्यालय नाही नाही नाही
आदरातिथ्य  हॉटेल्स नाही नाही नाही
शॉपिंग मॉल्स नाही नाही नाही
धार्मिक स्थळे, मोठे समारंभ नाही नाही नाही
दारुची दुकाने होय/ घरपोच सेवा होय नाही
बाहेर पडण्यास मनाई – 65वर्ष वयापेक्षा जास्त व्यक्ती, 10 वर्ष वयापेक्षा कमी मुले व गरोदर महिला नाही नाही नाही
वैद्यकीय दवाखाने, बाह्य रुग्ण सेवा होय होय नाही
टॅक्सी, कॅब, रिक्षा नाही 1 + 2 नाही
चार चाकी अत्यावश्यक 1 + 2 नाही
दोन चाकी अत्यावश्यक 1 नाही
आंतर जिल्हा बस सेवा नाही नाही नाही
जिल्हा अंतर्गत बस सेवा नाही होय नाही
माल पुरवठा होय होय होय
उद्योग (शहरी) अत्यावश्यक होय नाही
उद्योग (ग्रामीण) -- होय नाही
शहरी  क्षेत्रातील यथावत बांधकामे होय होय नाही
इतर खाजगी बांधकामे नाही होय नाही
शहरी भागातील एकल दुकाने मर्यादित होय नाही
जीवनावश्यक वस्तुंची दुकाने होय होय होय
ई- कॉम जीवनाश्यक वस्तु होय होय नाही
ई- कॉम बिगर जीवनाश्यक वस्तु होय होय नाही
खाजगी कार्यालये नाही होय नाही
शासकीय कार्यालये 5 टक्के (किमान 10 कर्मचारी) होय 100 टक्के नाही
कृषी विषयक कामे  नाही होय नाही
बँक व वित्तीय होय होय नाही
कुरीयर व पोस्टल होय होय नाही
वैद्यकीय अत्यावश्यक वाहतुक होय होय होय
न्हावींची दुकाने, स्पा, सलुन नाही होय नाही
प्रेक्षकाशिवाय स्टेडियम नाही होय नाही
उपहारगृह घरपोच सेवा होय होय नाही
दुय्यम निबंधक, प्रादेशिक परिवहन/ उप प्रादेशिक परिवहन कार्यालये होय होय नाही

*माजलगाव तालुका हादरला; धारूर तालुक्यातही शिरकाव*

माजलगाव : माजलगाव तालुका आज जबरदस्त हादरला असून तालुक्यात नव्या 12 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात सुर्डी येथील 1 आणि नित्रूड येथील 11 रुग्ण आहेत. धारूर तालुक्यातील कुंडी येथीलही एक रुग्ण पॉझिटीव्ह आहे.
यापुर्वी माजलगाव तालुक्यात तीन रुग्ण होते. हिवरा येथे 1, कवडगाव थडी येथे 2 आणि आता हे नवे 12 असे मिळून एकट्या माजलगाव तालुक्यात 15 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे 
आज पॉझिटीव्ह आढळलेले सर्व 13 रुग्ण मुंबईहून एकाच ट्रॅव्हल्समध्ये आलेले होते. कवडगाव थडी येथे या ट्रॅव्हल्समधील पहिला पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेला होता. त्यानंतर आरोग्य प्रशासनाने संपर्कातील सर्वजण ट्रेस केले होते. 

आज आढळलेले रुग्ण

संबंधीत बातमीसाठी क्लिक करा
बीड जिल्ह्याला मोठा धक्का आणखी 13 पॉझिटीव्ह

*21 मेपर्यंतची आकडेवारी (दुपारी 05:15 पर्यंत)*

आष्टी तालुका
शहर - 00
पिंपळा -01

गेवराई तालुका
शहर - 00
इटकूर 02

माजलगाव तालुका
शहर        - 00
हिवरा        - 01
कवडगाव थडी  - 02
नित्रूड - 11
सुर्डी - 01 

बीड तालुका
शहर        - 05

केज तालुका
शहर        - 00
चंदन सावरगाव    - 01
केळगाव  - 01

वडवणी तालुका    
शहर         - 01

पाटोदा तालुका
शहर        -01
वाहली        -02

धारूर तालुका
शहर- 00 
कुंडी - 01

एकूण - 30
अ‍ॅक्टीव्ह रुग्ण - 29
बरे झालेले रुग्ण - 01 (पिंपळा ता.आष्टी)

पाटण सांगवीत आढळलेल्या 07 रुग्णांची नोंद बीड जिल्ह्यातून काढून टाकण्यात आली आहे

       राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक संपन्न.

कोरोनाच्या संकटामुळे बदलणाऱ्या अन्नधान्याची गरज लक्षात घेऊन पिकांचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन.



मुंबई/ब्युरोचीफ,दि.२१:-. कोरोनाच्या संकटामुळे जगाची अन्न-धान्याची गरज बदलणार आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिके घेतली  जातील यादृष्टीने पुढील काळासाठी कृषी विभागाने आखणी  करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले तर कोरोनाचा मुकाबला करताना कृषी क्षेत्र आपल्याला आर्थिक संकटातून बाहेर काढू शकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे व्यक्त केला.

राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजीत पवार, कृषीमंत्री दादाजी भुसे, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनील देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, सामान्य प्रशासन विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते. तर प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांसह व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, धोक्यात आलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी  कृषी क्षेत्र महत्वाची  महत्वाची भूमिका बजावेल. कोरोनाचे संकट लक्षात घेता अन्न धान्याच्या दृष्टीने बाजारपेठेचा अंदाज घेऊन राज्यातील शेतकऱ्यांनी पावले उचलणे गरजे आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी  राज्य, देशच नव्हे तर जगाची देखील भूक भागवावी, असे आवाहन करतानाच पिक कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेकडे सातत्याने पाठपुरावा करीत असून राज्यातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही दिली.

खरीप हंगामासाठी पालकमंत्र्यांकडून चांगल्या सुचना आपल्याकडून आल्या. या सूचनांची दखल घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश कृषी व सहकार विभागाला दिले आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारला ६ महिने पूर्ण होत आहेत. मार्चमध्ये एक चांगला अर्थसंकल्प मांडला आणि कोरोनाचा वेढा आपल्याला पडला त्यामुळे आज राज्यासह देशाचीच अर्थव्यवस्था धोक्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोना नंतर बदलणाऱ्या जगात कृषी क्षेत्राची भूमिका महत्वाची

कोरोना नंतर जग बदलणार आहे, अर्थातच त्यात कृषी क्षेत्राची भूमिका महत्वाची असणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी दर्जेदार पिकं घेऊन मोठ्या प्रमाणावर निर्यात कशी होईल हेही पहिले पाहिजे त्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. खरीप हंगामासाठी राज्यात बियाणे, खतांची उपलब्धता असून शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादन घ्यावे. पीक विमा योजनेबाबत केंद्र शासनाबरोबर चर्चा सुरू असून कोरोनामुळे शेती बरोबरच अन्य कुठल्या क्षेत्रात आव्हाने आहेत यावर चर्चा करण्यासाठी सविस्तर बैठक लवकर घेऊ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कापूस, ज्वारी, मका, धान खरेदीसाठी गती द्यावी- उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, कोरोनामुळे राज्या समोर आर्थिक संकट आहे. त्यामुळे आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलिस, अन्न व नागरी पुरवठा यासारख्या विभागांना निधी देण्याचे प्राधान्य असून त्यामध्ये कृषी विभागाचाही समावेश केला जाईल. कोरोनाचा मुकाबला करताना कृषी क्षेत्र आपल्याला आर्थिक संकटातून बाहेर काढू शकेल, असा विश्वास करतानाच राज्यात तातडीने कापूस, ज्वारी, मका, धान खरेदीसाठी गती द्यावी आवश्यक तेथे खरेदी केंद्र वाढवावीत.

राज्यात बियाण्यांचा तुटवडा नसून सोयाबीनसाठी शेतकऱ्यांनी उबवण पद्धत वापरून केलेले घरगुती बियाण्यांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. राज्यातील शेतकऱ्यांचे खरीपाचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करुया. विशीष्ट कंपनीचेच खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना सक्ती केल्यास विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

युरियाचा ५० हजार मेट्रिक टन अतिरिक्त साठा- कृषीमंत्री दादाजी भुसे

कृषिमंत्री दादाजी भुसे यावेळी म्हणाले की, कोरोनाच्या काळात खरीप हंगामासाठी खते, बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले असून आतापर्यंत १८ हजार शेतकरी गटांच्या माध्यमातून ६० हजार मेट्रिक टन खते, २० हजार क्विंटल बियाणे दीड लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत. राज्यात सोयाबीन बियाण्यांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे मात्र मी यानिमित्ताने सर्वांना आश्वस्त करतो की सोयाबीनसह कुठलेही  खते आणि बियाणे कमी पडू दिले जाणार नाही. राज्यात  सोयाबिन उबवन क्षमतेचे ६३ हजार प्रयोग झाले असून शेतकऱ्यांना घरातील सोयाबीन बियाणे वापरण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात युरियाचा ५० हजार मेट्रिक टन अतिरिक्त साठा करून ठेवण्यात आला आहे. या हंगामात २५ हजार शेतीशाळा घेण्याचे नियोजन केले असून त्यात २५ टक्के शेतीशाळा महिलांच्या असतील. सिक्कीमच्या धर्तीवर राज्यात सेंद्रिय शेतमाल प्रमाणीकरणास मान्यता देण्यात आली आहे. राज्यात प्रयोगशील शेतकऱ्यांची रिसोर्स बँक तयार करण्यात आली असून शेतकरी शास्त्रज्ञ मंच देखील स्थापन करण्यात आले आहेत.

कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यामुळे सोशल डिस्टंसिंग पालन करण्यासाठी ऑनलाईन, झूम, वेबिनार, शेतकरी व्हाट्सअप ग्रुप यांच्या माध्यमातून सहा लाख शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात ३२०० केंद्रांवरून दररोज २००० टन भाजीपाला पुरवठा करण्यात आल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्र्यांनी केलेल्या विविध सूचनांबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिले. कृषी राज्यमंत्री  डॉ. विश्वजीत कदम यांनी आभार मानले. प्रारंभी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी खरीप हंगामाबाबत सविस्तर सादरीकरण केले. सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांनीही सादरीकरण केले.

राज्यातील कृषि क्षेत्र दृष्टिक्षेपात

भौगोलिक क्षेत्र : ३०७ लाख हेक्टर

लागवडीलायक क्षेत्र :१७४ लाख हेक्टर

लागवडीखालील क्षेत्र

खरीप : १४९.७ लाख हेक्टर;

रब्बी  : ५७ लाख हेक्टर

कोरडवाहू क्षेत्र - ८१ टक्के

एकूण शेतकरी संख्या – १.५२ कोटी;

लहान : - २८.४० टक्के,

सीमांत : - ५१.१० टक्के

सरासरी पर्जन्यमान : ११९८ मि.मि.

प्रमुख पिके :

खरीप :  भात, ज्वारी, बाजरी, मका,  तूर , कापूस, सोयाबीन, ऊस

रब्बी : ज्वारी, गहू, हरभरा

------

पाऊसपाणी अंदाज -

२०२० चा नैऋत्य मौसमी पाउस सरासरी ९६ टक्के ते १०४ टक्के राहिल असा अंदाज आहे.

अल-निनो सामान्य राहणार आहे. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सौम्य स्वरूपात एल निनो स्थिती राहिल असा अंदाज

मान्सून मुंबईत ११ जूनपासून तर १८ जूनपर्यंत सर्व राज्यात पसरेल.

------

खरीप हंगाम २०२० नियोजन

• विविध पिकाखालील एकूण क्षेत्र : १४०.११ लाख हेक्टर

• सोयाबीन व कापसाचे क्षेत्र ८२ लाख हेक्टर

• बियाणे बदलानुसार एकूण बियाणे गरज: १६.१५ लाख क्विंटल

• खरीप हंगाम २०२० साठी अंदाजित बियाणे उपलब्धता : १७.५१ लाख क्विंटल (महाबीज- ५.०८, राबिनि-०.३१ व खासगी-११.८६ लाख क्विंटल.)

• खरीप हंगाम २०२० (एप्रिल ते सप्टेंबर) करीता एकूण ४० लाख मे.टन खते मंजूर. खरीप २०१९ मध्ये ३३.२७ लाख मे.टन खतांचा वापर.

• १७ मे २०२० पर्यंत खतांची उपलब्धता : २६.१३ लाख मे.टन, पैकी ७.१५ लाख मे.टन खतांची विक्री

• खरीप २०२० मध्ये सोयाबीनचे अपेक्षित क्षेत्र : ४० लाख हेक्टर आहे. एकूण बियाणे गरज: १०.५० लाख क्विंटल.

संभाव्य सोयाबीन बियाणे उपलब्धता: महाबीज – ३.९१ लाख क्विंटल + राबिनि – ०.२२ लाख क्विंटल + खासगी- ७.११ लाख क्विंटल = एकूण ११.२४ लाख क्विंटल

• राज्यात कापूस पिकाखाली ४१ लाख हेक्‍टर क्षेत्र प्रस्तावित असून ९८ टक्के क्षेत्रावर बीटी कापसाची लागवड. या क्षेत्रासाठी १ कोटी ७० लाख बियाणे पाकिटांचे आवश्यकता. कापूस कंपन्यांनी २ कोटी ७२ लाख पाकिटांचे पुरवठा नियोजन केलेले आहे. त्यामुळे राज्यात कापूस बियाणे पाकीट यांचा तुटवडा भासणार नाही.

• खत पुरवठा नियोजन - ४० लाख मेट्रीक टनाचे नियोजन आहे.

• राज्यात खतं विक्रेते- ४४ हजार १४५,  बियाणे विक्रेते- ३८ हजार ४७९, किटकनाशके विक्रेते- ३५ हजार ८४१ एवढे विक्रेते आहेत.

• गुणवत्ता नियंत्रणाच्या अनुषंगाने भरारी पथकांची स्थापना : प्रत्येक जिल्हास्तरावर एक याप्रमाणे एकूण ३५ पथके, प्रत्येक उपविभागस्तरावर ९०, तालुकास्तरावर ३५१, राज्यस्तरावर मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक पथक स्थापन करण्यात आले आहे.

• कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना बांधावर खते, बियाणे पोहोचविण्यासाठी १७ हजार ११४ शेतकरी गट कार्यरत आहेत. ठाणे विभाग- ५६७, कोल्हापूर विभाग- १७६६, नाशिक विभाग- १२०१, पुणे विभाग- ४४५२, औरंगाबाद विभाग- ९८९, लातूर विभाग- १६६८, अमरावती विभाग- १९४८, नागपूर विभाग- ४५२३ असे शेतकरी गट कार्यरत आहेत.

-----

खरीपासाठी ४४ हजार कोटींच्या पीक कर्जाचे उद्धिष्ट -

मार्च २०२० पर्यंत महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. १९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १२ हजार कोटी रुपये वर्ग केले आहेत. योजनेअंतर्गत ३२ लाख खातेदारांना लाभ देणे अपेक्षित आहे. निधी अभावी ११ लाख १२ हजार खातेदारांना ८,१०० कोटींचा लाभ देणे अद्याप बाकी आहे.

सहकार विभागाने खरीप हंगामात ४४ हजार २५ कोटी रुपये पीक कर्ज पुरवठ्याचे उद्धिष्ट निश्चित केले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना अद्याप महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभ दिलेला नाही, त्यांना जिल्हा बँकांनी थकबाकीदार म्हणून गृहीत न धरता नवीन पीककर्ज द्यावे, अशा सूचनाही सहकार विभागाने दिलेल्या आहेत.

----

शिल्लक कापूस २० जूनपर्यंत खरेदी करणार -

राज्यात ४१० लाख क्विंटल कापसाचे उत्पादन झाले. आतापर्यंत ३४४ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली. शिल्लक कापूस १५ ते २० जून पर्यंत खरेदी केला जाईल. १६३ कापूस खरेदी केंद्र कार्यरत. दररोज २ लाख क्विंटल पर्यंत कापसाची खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राज्यात ९८ हजार ९३३ शेतकऱ्यांकडून ९ लाख क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे.

राज्यात ज्वारी, मका, खरेदीसाठी ७५ केंद्र सुरू आहेत. त्यात २९ जिल्ह्यांचा समावेश आहे. उन्हाळी धान खरेदीसाठी २९३ खरेदी केंद्र असून आतापर्यंत १ लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे.

🔴दुःखद बातमी;

🟠 *'नवरी नटली' फेम लोककलावंत छगन चौगुले यांचे कोरोनामुळे निधन*

मुंबई – कोरोनाची बाधा झाल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रसिद्ध लोककलावंत आणि ‘नवरी नटली’ फेम छगन चौगुले यांचे आज (गुरुवारी) निधन झाले.

छगन चौगुले यांना करोनाची लागण झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले होते. 

तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यातच त्यांचे निधन झाले.

‘मांढरदेवी काळुबाईची कथा’, ‘आईचा गोंधळ’, ‘कथा खंडोबाची’ हे त्यांचे अल्बम प्रसिद्ध होते.
*मंत्रालयातील १४०० अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस सेवेत रुजू होण्याचे आदेश, सरकारचा निर्णय*
*मंत्रालयातील १४०० अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस सेवेत रुजू होण्याचे आदेश, सरकारचा निर्णय*
""”"""""""""""""""""""""""""""""'"''"
मुंबई...*संजय खेतले*
पोलिसांवरील वाढलेला ताण लक्षात घेता त्यांच्या मदतीसाठी अधिकच्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

मुंबई – देशात आणि राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्याने सरकारमध्ये चिंतेच वातावरण आहे. अशातच गेल्या २ महिन्यापासून देशव्यापी लॉकडाऊन असल्याने पोलीस खात्यावरचा ताण वाढला आहे. लॉकडाऊन दरम्यान केंद्र शासनाने स्थलांतरित मजुरांना बसेस आणि श्रमिक रेल्वेने त्यांच्या गावी जाण्यासाठी परवानगी दिली आहे. या मजुरांच्या माहितीचे व्यवस्थापन आणि सुविधा देण्याचं काम पोलिसांकडून केलं जात आहे.

पोलिसांवरील वाढलेला ताण लक्षात घेता त्यांच्या मदतीसाठी अधिकच्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासाठी राज्य सरकारने मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना पोलिसांच्या मदतीला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास १४०० कर्मचारी-अधिकाऱ्यांना पोलीस सेवेत रुजू होण्यास सांगितले आहे. ज्यांचे वय ४० वर्षापेक्षा कमी आहे अशांना ३१ मे पर्यंत अथवा पुढील आदेश येईपर्यंत पोलीस आयुक्त, मुंबई यांच्यासाठी सेवा द्यावी लागणार आहे.

संबंधित कर्मचारी, अधिकारी यांना पोलीस आयुक्तांनी पोलीस स्टेशनला नियुक्ती द्यावी, त्यांना कामाचे वाटप करावे तसेच अन्य प्रशासकीय कामदेखील आवश्यकतेनुसार देण्यात यावीत असं परिपत्रकात म्हटलं आहे. या १४०० कर्मचारी अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांच्या सांगण्यानुसार नेमणूक केलेल्या ठिकाणी कर्तव्यावर हजर व्हावे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत त्यांना कामावर हजर राहणे बंधनकारक आहे असं सांगण्यात आलं आहे.

तसेच जे कोणी अधिकारी, कर्मचारी कामावर रुजू होणार नाहीत त्यांची माहिती तात्काळ सामान्य प्रशासन विभागाकडे पोलीस आयुक्तांनी कळवावी. अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल तसेच कायदेशीर कारवाईही करण्यात येईल असा इशारा राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिला आहे.

दरम्यान, राज्य पोलीस दलात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १,३८८ वर पोहोचला असून यात १४२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उपचार घेत ४२८ कोरोना योद्धा बरे झाले आहेत. यापैकी काही जण पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत.

कोरोनावर मात करून सेवेत रुजू होणाऱ्या पोलिसांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. चाळीतील नागरिकांचे प्रेम पाहून भारावलेल्या एका महिला पोलिसाने म्हटले, मला माहिती होते की, माझ्या कुटुंबात फक्त ४ माणसे नसून तुम्ही सगळे माझे कुटुंब आहात. तुमच्यासाठी लवकर बरे होण्याच्या जिद्दीतून कोरोनावर मात केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. याबाबतचा व्हिडिओ पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ट्विट केला आहे.
पोलिसांवरील वाढलेला ताण लक्षात घेता त्यांच्या मदतीसाठी अधिकच्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

मुंबई – देशात आणि राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्याने सरकारमध्ये चिंतेच वातावरण आहे. अशातच गेल्या २ महिन्यापासून देशव्यापी लॉकडाऊन असल्याने पोलीस खात्यावरचा ताण वाढला आहे. लॉकडाऊन दरम्यान केंद्र शासनाने स्थलांतरित मजुरांना बसेस आणि श्रमिक रेल्वेने त्यांच्या गावी जाण्यासाठी परवानगी दिली आहे. या मजुरांच्या माहितीचे व्यवस्थापन आणि सुविधा देण्याचं काम पोलिसांकडून केलं जात आहे.

पोलिसांवरील वाढलेला ताण लक्षात घेता त्यांच्या मदतीसाठी अधिकच्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासाठी राज्य सरकारने मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना पोलिसांच्या मदतीला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास १४०० कर्मचारी-अधिकाऱ्यांना पोलीस सेवेत रुजू होण्यास सांगितले आहे. ज्यांचे वय ४० वर्षापेक्षा कमी आहे अशांना ३१ मे पर्यंत अथवा पुढील आदेश येईपर्यंत पोलीस आयुक्त, मुंबई यांच्यासाठी सेवा द्यावी लागणार आहे.

संबंधित कर्मचारी, अधिकारी यांना पोलीस आयुक्तांनी पोलीस स्टेशनला नियुक्ती द्यावी, त्यांना कामाचे वाटप करावे तसेच अन्य प्रशासकीय कामदेखील आवश्यकतेनुसार देण्यात यावीत असं परिपत्रकात म्हटलं आहे. या १४०० कर्मचारी अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांच्या सांगण्यानुसार नेमणूक केलेल्या ठिकाणी कर्तव्यावर हजर व्हावे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत त्यांना कामावर हजर राहणे बंधनकारक आहे असं सांगण्यात आलं आहे.

तसेच जे कोणी अधिकारी, कर्मचारी कामावर रुजू होणार नाहीत त्यांची माहिती तात्काळ सामान्य प्रशासन विभागाकडे पोलीस आयुक्तांनी कळवावी. अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल तसेच कायदेशीर कारवाईही करण्यात येईल असा इशारा राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिला आहे.

दरम्यान, राज्य पोलीस दलात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १,३८८ वर पोहोचला असून यात १४२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उपचार घेत ४२८ कोरोना योद्धा बरे झाले आहेत. यापैकी काही जण पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत.

कोरोनावर मात करून सेवेत रुजू होणाऱ्या पोलिसांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. चाळीतील नागरिकांचे प्रेम पाहून भारावलेल्या एका महिला पोलिसाने म्हटले, मला माहिती होते की, माझ्या कुटुंबात फक्त ४ माणसे नसून तुम्ही सगळे माझे कुटुंब आहात. तुमच्यासाठी लवकर बरे होण्याच्या जिद्दीतून कोरोनावर मात केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. याबाबतचा व्हिडिओ पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ट्विट केला आहे.

रांजणी येथे हातभट्टीच्या अड्डयावर गुन्हे शाखेचा छापा, महिलेसह दोघाविरोधात गुन्हा दाखल.



रांजणी प्रतिनिधी/असलम कुरेशी

घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील गावठी हातभट्टीच्या अड्डयावर धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महिलेसह दोघाविरोधात गुन्हा दाखल केला असून महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. या कार्यवाहीत पोलिसांनी 140 लिटर गावठी दारु नष्ट केले.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला रांजणी येथे हातभट्टीची गावठी दारु विक्री होत असल्याची गुप्त माहिती खब-याकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रांजणी येथील या अड्डयावर छापा टाकून तब्बल 43 हजार 150 रुपयांची 140 लिटर गावठी हातभट्टीची दारु, रसायन व युरिया खत जप्त केले. बुधवारी सकाळीच ही कार्यवाही करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली. या ठिकाणी पोलिस उपनिरीक्षक संपत पवार व कर्मचा-यांनी धाड टाकली तेव्हा घरात प्लास्टिकच्या कॅन व पाण्याच्या जारमध्ये जवळपास 90 लिटर गावठी दारु मिळून आली. यानंतर महिला पोलिसांनी अधिक चौकशी केली असता इतर ठिकाणी लपवून ठेवलेली आणखी 50 लिटर गावठी दारु सापडली. या संदर्भात महिला पोलिस अलका केंद्रे यांच्या फिर्यादीवरून भाऊसाहेब निवृत्ती गायकवाड व सुनिता भाऊसाहेब गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेला ताब्यात घेऊन घनसावंगी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मात्र भाऊसाहेब गायकवाड फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. हो कार्यवाही शफिक अतार व ज्ञानेश्वर आढाव या पंचासमोर करण्यात आली. यानंतर पोलिस उपनिरीक्षक मनोहर खिळदकर व पोलिस उपनिरीक्षक संपत पवार यांनी ही दारु व रसायन नष्ट केले.  ही कार्यवाही पोलिस अधीक्षक एस.चैतन्य, अप्पर पोलिस अधीक्षक समाधान पवार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारु विरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक संपत पवार, आर.एस. पव्हरे, परमेश्वर धुमाळ, सुभाष पवार, सुरेश राठोड, धनाजी कावळे, रामेश्वर बघाटे, दिलीप कांबळे, राजेंद्र वेलदोडे, सुरेश नलावडे, यशवंत मुंढे, किशोर जाधव, महिला पोलिस अलका केंद्रे, रत्नमाला येडके व चालक धोंडीराम मोरे यांनी केली.

रमजान ईदपर्यंत खरेदीसाठी मार्केट उघडण्याची परवानगी देऊ नका



परतूर प्रतिनिधी/इम्रान कुरेशी

देशात तसेच राज्यात कोरोना, कोव्हीड -१९ चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून त्यात महाराष्ट्र राज्याची परिस्थिती अत्यंत बिकट असून त्या अनुषंगाने रमजान ईदसाठी आपण परतुर शहरात खरेदीसाठी परवानगी देऊ नका अशी मागणी जमियते उलमा ए हिंद शाखा वरफळच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पुढे निवेदनात म्हटले आहे की परवानगी दिल्यास त्याचे परिणाम म्हणजे बाजारात गर्दी होईल, सोशल डिस्टन्स त्या ठिकाणी ठेवता येणार नाही. अर्थातच कोरोना व्हायरसला शिरकाव करण्यास मुभा मिळेल आणि परिणाम गंभीर होऊ शकतात. म्हणून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस प्रशासनासह, इतर प्रशासणासोबत समाजातील विविध घटकातील सामाजिक कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहे. त्यात मुस्लिम समाजही सर्वतोपरी सहकार्य करीत आहे . अशा परिस्थितीत आपण मार्केट उघडण्याची परवानगी दिल्यास रूग्णांची संख्या वाढण्यासाठी ते कारण होईल व एखादा प्रसंग भोवला जाईल अशी भीतीही व्यक्त करण्यात आली. अशा विदारक परिस्थितीमध्ये आनंद साजरा करता येणार नाही. याची जाणिव आम्हास आहे. तसेच महाराष्ट्राची स्थिती सुध्दा गंभीर आहे. त्यामुळे या गंभीर बाबींचा गंभीरता पुर्वक विचार करून रमजान ईद निमित्त कोणत्याही परिस्थितीत मार्केट उघडण्याची परवानगी देण्यात येऊ नये असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शाखा अध्यक्ष हाफेज मुखीद, हाफेज अफजल, हाफेज मूहिद यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.

निलेश राणे विरोधात प्रकाश आंबेडकरांचे खडे बोल,निलेश राणेनी माफी मागावी - प्रकाश आंबेडकर



पुणे,ब्युरोचीफ :- गुंडगिरी प्रवृत्तीचे लोकं जेव्हा राजकारणात येतात तेव्हा त्यांना सामाजिक भान राहत नाही.माणूस म्हणून कोणालाही हिनवण्याचा अधिकार नाहीये. तृतीयपंथी देखील माणूस आहेत, त्यांना स्वीकारले पाहिजे. हे भान राजकारण्यांना असावे. ऐरवी निलेश राणेची दखल घेण्याची गरज नाही.अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निलेश राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. निलेश राणेने जो शब्द वापरला आहे तो मागे घ्यावा आणि समस्त समाजाची माफी मागावी. निलेश राणेंच्या वक्तव्याचा जाहीर निषेध प्रकाश आंबेडकर यांनी केला असून वंचित बहुजन आघाडी तृतीयपंथी समूहाच्या बाजूने उभे असल्याचे ही त्यांनी सांगितले. निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हिजडा शब्दाचा अवमानकारक पद्धतीने उल्लेख करून तृतीयपंथी समुदायाच्या भावना दुखविल्या आहेत. त्याविरोधात 499, 501 अन्वये अब्रूनुकसान आणि मानहानीचा गुन्हा फैजपुर (जळगांव) पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून निलेश राणे व त्यांच्या विरोधी असलेले प्राजक्त तनपुरे यांच्यात सोशल मीडियावर राजकीय वाद चालू आहे. निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून तृतीयपंथी समुदायाचा उपहासात्मक पद्धतीने वापर करत समुदायाच्या भावना दुखावल्या होत्या.कोणीतरी ‘हिजडा' राज्यमंत्री आहे तनपुरे नावाचा, ज्याला माझा कार्यक्रम करायचा आहे. असे कार्यक्रम करणारे आम्ही खूप बघितले समोर आले की पिवळी होते साल्यांची, जागा सांग तनपुरे येतो मी. अशा पद्धतीने भाषा वापरत, तृतीयपंथी समुदाय जो की, स्वतःची सांस्कृतिक व सामाजिक ओळख ठेवून आहे व त्याच्या संघर्षा विषयी कुठलीही जाणीव नसलेले व लोकप्रतिनिधी म्हणून राहिलेले, निलेश राणे यांनी संवेदनशीलता न दाखवता बेताल वक्तव्य केले. हे अशोभनीय व तृतीयपंथी समुदायाच्या अस्मितेला ठेच पोहोचविणारे असल्याचे तक्रारदार शमीभा पाटील यांनी म्हटले आहे. 2014 च्या दीर्घ अहवालाअंती माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने केंद्र व राज्य सरकारी यांनी तृतीयपंथी अर्थात सांस्कृतिक ओळख हिजडा असलेल्या व्यक्ती वा समुदायाला कायदेशीर अधिकृत अशी लिंग म्हणून तृतीयपंथी मान्यता दिलेली आहे. कुठल्याही लिंग, जातीधर्माचा उपरोधिक वा अवमानकारक पद्धतीने त्याच्या अस्मितेला ठेच पोहोचविणारा व सामाजिक क्षती पोहोचविणे हा अपराधच आहे. भारतीय दंड विधान 499, 501 नुसार वंचित बहुजन महिला आघाडीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या शमिभा पाटील यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी ही माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


🔴न्यूज फ्लॅश;

🟠 *सामाजिक कार्यकर्त्याच्या प्रयत्नाने 96 गरीब रूग्णांचे वैद्यकीय बिल माफ*

पुणे - येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत काकासाहेब मोरे यांनी कोरोनाच्या संकट काळात 96 गरीब रुग्णांचे 19 लाख 67 हजार बिल माफ करण्यासाठी प्रयत्न केले. केंद्र, राज्य सरकार, धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या व पुणे महापालिकेच्या आरोग्य सुविधेची माहीती देऊन या सर्व रुग्णांचे वैद्यकीय बिल माफ करून मोफत उपचार मिळवून दिले.

सामाजिक कार्यकर्ते मोरे यांच्या या सेवाभावी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ज्या रुग्णांचे वार्षिक उत्पन्न 85 हजारांच्या आत आहे. त्याबाबतचे पुरावे देऊन बिल माफ करून घेतले. तस्सेच ज्यांचे उत्पन्न 85 हजार ते 1 लाख 60 हजारापर्यंत आहे त्यांचेही अर्धे बिल माफ झाले.
या सर्व रूग्णांना त्यांनी रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले. तिथे रूग्णांवर उपचार पूर्ण झालेले 77 रुग्ण पुन्हा रुग्णवाहिकेतून घरी नेऊन सोडण्याचे कामही मोरे यांनी केले.

औषधांसह सर्व रुग्णांना एक महीना पुरेल इतका किरणाही त्यांनी मिळवून दिला. मोरे यांनी गेले दहा वर्ष पोलीस दलास मदत म्हणून रस्ते अपघातातील 442 मृतदेह उचलण्यासाठी मोलाची मदत केली आहे. त्याचबरोबर अपघातातील जखमींना वेळीच रुग्णांलयात दाखल करून 33 जणांचे प्राण वाचवले आहेत.
केंद्र सरकार, राज्य सरकार व धर्मादाय आयुक्त कार्यालय, पुणे महानगरपालिका यांच्या विविध आरोग्य सेवा व सुविधा यांची माहिती देण्याचे काम ते सातत्याने करीत आहेत.

त्यामुळे गरीब व सर्व सामान्य कुंटुबांतील रुग्णांना मोरे यांचा मोठा आधार आहे. त्यांनी 10 वर्षात 2 हजार 567 रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्याचे सामाजिक कार्य केले आहे.

रमाई आवास योजनेअंतर्गत घराचे बांधकाम होऊन दोन महिने झाले, बजेट नसल्याने लाभार्थ्य ना आर्थीक अडचण निर्माण होत आहेत.



प्रतिनिधी सिंधीकाळेगाव :- जालना तालुक्यातील सावंगी तलान ग्रामपंचायत अंतर्गत येथील रमाई आवास योजनेअंतर्गत काही लाभार्थ्यचे घराचे बांधकाम होऊन एक ते दोन महिने झाले आहेत .व काही लाभार्थ्यचे बांधकाम चालु आहेत . या योजनेला बजेट नसल्याने त्यांना पुढील हाप्ता मिळण्यास विलंब लागत आहेत . तसेच लाभार्थी -श्री . सोपान राजाराम मांदळे, कैलास लक्ष्मण रंधवे, संजय भास्कर रंधवे, निवृ ती नारायण रंधवे, सोनाजी त्रिंबक मोरे यांनी बोलताना सांगितले की , आम्हाला पहिला हप्ता १५,०००(पंजरा हजार सपये ) अॅडव्हाँन्स मिळाला आहे . त्यामधुन घराचे बेसमेंट लेवल बांधकाम केले आहे.तसेच दुसरा हाप्ता ४५,०००( पंचेच्याळीस हजार रुपये )काही लाभार्थ्यना मिळाले आहे,काहींना मिळाले नाही  तसेच काही लाभार्थ्यचे घराचे बांधकाम पुर्ण झाले असुन त्यांना तिसरा व अंतिम हाप्ता रुपय ४०,०००(च्याळीस हजार रूपये) देण्यास अडचण निर्माण होत आहे. तसेच लाभार्थीनी सांगितले की, रेती,सिमेंट,विटा, मिस्तरी यांची ऊसणवारी,उधारी करून बांधकाम पुर्ण केले असुन ते कुठून द्यावे. व आता काही दिवसापासून शेतीची काम चालु होणार असुन बीयाणे कुठून आणावी हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. तसेच वरील लाभार्थ्यनी वारंवार पंचायत समिती- गटविकास अधिकारी व इंजिनीअर यांना वारं-वार विचारणा केली.पण, त्यांनी सांगितले की शासनाकडून निधी आल्यानंतर वितरीत करणयात येईल. तसेच दुसरी कडे-शबरी योजनेला व पंतप्रधान आवास योजनेला निधी असुन या योजनेला का नाही हा प्रश्न लाभार्थ्यना भेडसावत आहे. तसेच वरिलाप्रमाणे आपली ही समस्या रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी  बोलतांना सांगितले.

लाॅकडाऊन मुळे माणगांव बाजारपेठेत मच्छीचा तुटवडा खवल्यांच्या घशाखाली घास उतरेना. 

 बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक पार्श्वभूमीवर शासनाने लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदी मच्छीमारी करणार्या कोळी समाजाने आपल्या मच्छीमारी करणार्या बोटी खोल समुद्रातून बाहेर काढून समुद्र किनारी लावल्या मुळे खोल समुद्रातील  मासेमारी बंद करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्याच्या बाजारपेठेत सर्वत्र मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याने तमाम मच्छी प्रेमींच्या घशाखाली घास उतरेना अशी त्यांची अवस्था झाली आहे. 
     रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेस विस्तिर्ण असा अरबी समुद्र असल्याने या अरबी समुद्रात पापलेट, सुरमई, हलवा, रावस, सरगा, करली, वांब, कुपा, मुशी तथा शार्क, टोळ, ढोमी, कानटा, बांगडा, बोंबील, म्हाकळी, बोईट, पाखट, कोत्या, बळीवडा, खेकडे इत्यादी विविध प्रकारची वैविध्यपूर्ण मच्छी मुबलक प्रमाणात सापडते. त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, अलिबाग, मुरुड, म्हसळा आणि श्रीवर्धन या समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या तालुक्यातील कोळी समाजाचा प्रमुख व्यवसाय मच्छीमारी हाच आहे. त्यामुळे या सर्व तालुक्यातील कोळी समाज शासन निर्धारित मच्छीचा प्रजनन काळ वगळता वर्षभर मोठ्या प्रमाणात मच्छीमारी करून आपला उदरनिर्वाह करत असतात. 

     रायगड जिल्ह्यातील वरील सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या मच्छीमारी मच्छीमारी च्या माध्यमातून संपूर्ण देश विदेशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात आयात निर्यात होते. या आयात निर्यातीच्या माध्यमातून
भारतीय अर्थव्यवस्थेत अब्जावधी रुपयांची उलाढाल होऊन अर्थ व्यवस्था सक्षम करण्यात समुद्री मच्छीमारीचा महत्त्वाची भूमिका आहे. मात्र सध्या कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक पार्श्वभूमीवर शासनाने संपूर्ण देशात लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदी मुळे रायगड जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या मच्छीमारीवर संचारबंदीचे निर्बंध आले आहेत. त्यामुळे कोळी समाजाने आपल्या खोल समुद्रातील मोठ मोठ्या मच्छीमारी करणार्या बोटी खोल समुद्रातून बाहेर काढून समुद्र किनारी लावून आपली पारंपरिक मच्छीमारी सद्या बंद केली आहे. त्यामुळे माणगांव तालुक्यातील मच्छीमार्केट मध्ये समुद्री मच्छीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे तमाम मच्छी प्रेमींच्या घशाखाली घास उतरेना अशी त्यांची अवस्था झाली आहे.

    कोरोनाविरुध्द लढाईत माजी सैनिकही सरसावले.


पुणे,ब्युरोचीफ :- देशाच्या सीमेवर लढताना आपला नेमका शत्रू कोण हे सैनिकांना माहीत असते. परंतु देशात एका अदृश्य शत्रुने आक्रमण केले आहे, त्यांचे नाव कोरोना.. गेल्या दोन महिन्यापासून डॉक्टर्स, पोलीस, महसूल विभाग, सफाई कामगार या कोरोनाविरध्दच्या लढाईत अहोरात्र झटत असताना देशाच्या रक्षणासाठी ज्या सैनिकांनी लढा दिला, ते माजी सैनिकही अदृश्य शत्रुरुपी कोरोनाविरुध्दच्या लढाईत पुढे सरसावले आहेत.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी जेव्हा माजी सैनिकांना आवाहन केले तेव्हा माजी सैनिकांनी मोठ्या संख्येने हाकेला प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, भोर, वेल्हा, जुन्नर, येथे माजी सैनिक चेक पोस्टवर संरक्षणासाठी जबाबदारी बजावत असताना जीवनावश्यक वस्तू पुरविण्याची दुहेरी भूमिका बजावत आहेत. पोलिसांची संख्या व त्यांच्यावरील कामाचा ताण पाहता आपण का बर घरी बसून राहावे, आपणही देशासाठी पुढे आलो पाहिजे, अशी स्वाभाविक प्रतिक्रिया माजी सैनिकांनी व्यक्त केली.


पोलिसांच्या खाद्यांला खादा लावून आरोग्यसेवक, स्वयंसेवक, सेवाभावी संस्था आदी कार्यरत आहेत. कोरोना विरुध्दची लढाई आपण नक्की जिंकू असा आशावादी संकल्प करत, प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी पुणे जिल्हातील माजी सैनिकांनी पुन्हा अंगावर वर्दी चढवली आहे. त्यामुळे पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत आहे. पोलिसांना एक प्रकारचे मानसिक समाधान मिळत आहे. कोरोनाविरुध्दच्या जीवघेण्या लढाईत पोलिसांवरील कामाचा ताण कमी होऊन ते तणावमुक्त सेवा देत आहेत, अशी प्रतिक्रिया जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलींद तुंगार यांनी व्यक्त केली.


कोरोनाविरुध्द लढाईत माजी सैनिकही सरसावले
देशाच्या सीमेवर लढताना आपला नेमका शत्रू कोण हे सैनिकांना माहीत असते. परंतु देशात एका अदृश्य शत्रुने आक्रमण केले आहे, त्यांचे नाव कोरोना.. गेल्या दोन महिन्यापासून डॉक्टर्स, पोलीस, महसूल विभाग, सफाई कामगार या कोरोनाविरध्दच्या लढाईत अहोरात्र झटत असताना देशाच्या रक्षणासाठी ज्या सैनिकांनी लढा दिला, ते माजी सैनिकही अदृश्य शत्रुरुपी कोरोनाविरुध्दच्या लढाईत पुढे सरसावले आहेत.


पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी जेव्हा माजी सैनिकांना आवाहन केले तेव्हा माजी सैनिकांनी मोठ्या संख्येने हाकेला प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, भोर, वेल्हा, जुन्नर, येथे माजी सैनिक चेक पोस्टवर संरक्षणासाठी जबाबदारी बजावत असताना जीवनावश्यक वस्तू पुरविण्याची दुहेरी भूमिका बजावत आहेत. पोलिसांची संख्या व त्यांच्यावरील कामाचा ताण पाहता आपण का बर घरी बसून राहावे, आपणही देशासाठी पुढे आलो पाहिजे, अशी स्वाभाविक प्रतिक्रिया माजी सैनिकांनी व्यक्त केली.

पोलिसांच्या खाद्यांला खादा लावून आरोग्यसेवक, स्वयंसेवक, सेवाभावी संस्था आदी कार्यरत आहेत. कोरोना विरुध्दची लढाई आपण नक्की जिंकू असा आशावादी संकल्प करत, प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी पुणे जिल्हातील माजी सैनिकांनी पुन्हा अंगावर वर्दी चढवली आहे. त्यामुळे पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत आहे. पोलिसांना एक प्रकारचे मानसिक समाधान मिळत आहे. कोरोनाविरुध्दच्या जीवघेण्या लढाईत पोलिसांवरील कामाचा ताण कमी होऊन ते तणावमुक्त सेवा देत आहेत, अशी प्रतिक्रिया जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलींद तुंगार यांनी व्यक्त केली.


बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील आजी माजी सैनिक संघटनेच्यावतीने फक्त चार दिवसात 35 हजार रूपये आणि 600 किलो अन्नधान्यांचे संकलन केले. बारामती पोलीस दलास माजी सैनिक सहकार्य करीत आहेत. त्यांना विशेष पोलीस अधिकारी कोवीड-19 योध्दा या नावाने विशेष ओळखपत्र देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोरोनाबाधित रुग्णाला रक्ताचा तुटवडा कमी पडू नये, याकरिता रक्तदानही केले आहे. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी या गावात एकूण 30 हजार रूपये जमा करून गावातील नागरिकांना आवश्यक ती मदत पोहचवली आहे, अशी माहिती आजी माजी सैनिक संघटनाचे कार्याध्यक्ष अनिल शिंदे यांनी दिली.

बारामती शहरामध्ये पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली जय जवान आजी माजी सैनिक संघटनेच्यावतीने ‘पोलीस व माजी सैनिक साथ साथ’ कोरोनाविरोधी मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये पोलिसांच्या सोबत ‘चित्ता’ ड्रेस परिधान केलेले माजी सैनिक रस्त्यावर उतरले असून ते नागरिकांना शिस्तीचे धडे देत आहे. त्यांना सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत पोलिसांसोबत नेमून दिलेले काम एकदिलाने करीत आहेत. नागरिकांनी मास्क वापरावे, शारीरिक अंतर ठेवावे, अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये, ज्येष्ठ नागरिकांची कोरोना विषाणूपासून कशी काळजी घ्यावयाची, अशी प्राथमिक स्वरुपात माहिती देत आहेत. शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त करण्याबरोबर चेकपोस्टवर कर्तव्य बजावत आहेत. पोलीस प्रशासन व माजीसैनिक यांच्या समन्वयाने बारामती तालुका कोरोनामुक्त करण्यास हातभार लागत आहे.

जुन्नर येथील माजी सैनिक संघटनेच्यावतीने कोराना विषाणूच्या विरुध्द लढा देण्यासाठी उभारण्यात आलेल्या पीएम केअर्स निधीत व मुख्यमंत्री सहायता निधीत अनुक्रमे 65 हजार रुपयांचे योगदान दिले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना देशातील वेगवेगळ्यास्तरावर कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकांनी आपल्या भावनेनुसार, आवडीनुसार, वेळेनुसार, https://covidwarriors.gov.in/  या डिजिटल व्यासपीठावर स्वेच्छेने सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते. आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील एकूण 9 हजार 814 माजी सैनिकांनी या डिजिटल व्यासपीठावर ऑनलाईन नोंदणी करुन सहभागी झाले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील 1 हजार 587 माजी सैनिक आहेत राज्यातील इतर जिल्ह्याचा विचार करता सर्वाधिक माजी सैनिक पुणे जिल्ह्यातील आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 8 एप्रिल 2020 रोजी कोरोना युद्धात सहभागी होऊन शासनाच्या बरोबरीने काम करू इच्छिणाऱ्या आणि आरोग्य सेवेत काम केलेल्या लोकांनी जसे की आरोग्य सेवेत काम केलेले निवृत्त सैनिक, निवृत्त परिचारिका, वॉडबॉय, आरोग्य सेवेत प्रशिक्षण पूर्ण केलेले परंतु ज्यांना जागा नाही म्हणून काम मिळाले नाही, पण त्यांना काम करण्याची इच्छा आहे, त्या सर्वांनी पुढे येऊन आपले  नाव, पत्ता covidyoddha@gmail.com  या ई मेल वर नोंदवावे, असे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे जिल्ह्यातील माजी सैनिक कोरोनाविरुध्दच्या युध्दात सहभागी झाले आहेत.

इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून या गावातील मुख्यरस्त्यावर उभारण्यात आलेल्या चेक पोस्टवर माजी सैनिक सेवा बजावत आहेत. पळसदेव ग्रामपंचायत आणि माजी सैनिक यांच्या समन्वयाने मुख्य रस्त्यावर चौकशी कक्ष सुरु करण्यात आले आहे.

देशावर आलेले कोरोना विषाणूचे संकट हे आपल्याला परतून लावायचे आहे. लष्करातील जवानांनी एकदा अंगावर वर्दी चढवली की त्यांच्या अंगातली लष्करी वृत्ती, लढाऊ बाणा अखंड सळसळतो भले ते सेवानिवृत्त झाले तरीही ! याची अनुभूती पुणे जिल्ह्यातील माजी सैनिकांनी पुन्हा एका प्रयत्यास आली आहे. देशाच्या संरक्षणासाठी ज्या निस्वार्थ वृत्तीने माजी सैनिक लढले त्याचप्रमाणे कोरोना विरुध्दच्या लढाईत तन-मन-धनाने माजी सैनिक उतरले असून खऱ्या अर्थाने आपण या कोरोना योद्धांचा सन्मानच केला पाहिजे, अशी भावना नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे


  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...