शनिवार, १६ मे, २०२०

 सन 2017 18 च्या खरेदी-विक्री संघाच्‍या खरेदी घोटाळा ची फाईल पुन्हा उघडली

पो नि सोहन माछरे मुख्य सूत्रधारा पर्यंत पोहोचतील का ?

तालुक्यातील 33 शेतकऱ्यांनी वजनात वाढ केली म्हणून पोलिसांच्या चौकशीसाठी नोटिसा

बसव ब्रिगेड शेतकर्‍यांच्‍या पाठिशी




*धर्माबाद (भगवान कांबळे ):- सन 2017 18 मध्ये संपूर्ण नांदेड जिल्ह्याला व मराठवाड्यामध्ये गाजलेला धर्माबाद चा हरभरा तूर  खरेदी घोटाळा पुन्हा एकदा पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी तपासासाठी समोर घेतलाय घेतलाय शेतकऱ्यांनी खरेदी-विक्री संघाला विकलेल्या मालाच्या पावती मध्ये खाडाखोड करून वजन वाढवून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते केल्याचा आरोप खरेदी-विक्री संघाच्या सचिव यांणि पोलीस ठाणे मध्ये दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहेया प्रकरणांमध्ये अनेक खरेदि विक्र संघाच्या तात्कालीन कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल झाले होते व कृषी उत्पन्न बाजार समिती धर्माबाद च्या गोदाम पालावर सुद्धा गुन्हा नोंद झाला होता सदरील प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक भागवत जायभाये यांच्याकडे होता येथून बदली झाल्यामुळे सदरील प्रकरणाचा तपास विघमान  सोहन माछर यांच्याकडे आला असल्यामुळे याप्रकरणातील सत्यता जाणून घेण्यासाठी गुन्हा नंबर 48 /2020 कलम 420,468 ,408, 34 भारतीय दंडविधान मधील फिर्यादी शाम राजाराम संगेवार  धमाऀबाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक करत आहेत .फिर्यादीने आपल्या फिर्यादी मध्ये नमूद केल्याप्रमाणे सन 2017 18 साला करिता विदर्भ कोऑपरेशन मार्केटिंग फेडरेशन नागपूर यांचे सभेचे एजंट म्हणून खरेदी विक्री संघ धर्माबाद संस्थेमार्फत महाराष्ट्र सरकारने हमी भावाने खरेदी केलेल्या तूर व हरभरा खरेदी यांचा सभी एजंट म्हणून खरेदी विक्री संघातर्फे हा तत्कालीन व्यवहार करण्यात आला होता या व्यवहारांमध्ये खरेदी-विक्री संघाने नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या पावत्या मध्ये खाडाखोड करून वजनात वाढ केल्याची तक्रार त्यावेळी दाखल करण्यात आली असल्यामुळे तात्कालीन कर्मचाऱ्यांना अटकही करण्यात आली होती.कधी विक्री खरेदी विक्री संघ धर्माबाद येथे विक्री केलेल्या तूर आणी हरभऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या वजनात काही क्विंटलची वजनाची वाढ केल्यामुळे त्यांच्या बँक खात्यात शासनाच्या हमी भावाप्रमाणे खरेदी केलेले पैसे जमा झाले असल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे

तर संबंधित शेतकऱ्यांची प्रतिक्रिया घेतली असता _---__-------------------------------सदरील प्रकरण आपल्याला काहीच माहीत नसून माझ्या शेतात घामाने कष्टाने पिकविलेल्या  माल मी खरेदी-विक्री संघाच्या मार्फत विक्री केला असून त्यामध्ये कुठलीही वाढ केलेली नाही किंवा कुठल्या पावती आमच्या हातात नव्हत्या आम्हाला 
आम्ही विक्री केलेल्या मालाचे पैसे मिळाले असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे
-----+----++++++++++
नोटिसा दिलेल्या सर्व शेतकऱ्यांनी आज धावत धर्माबाद ते पोलिस स्टेशन गाठले 
-------------------------पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी चौकशी केल्यानंतर सत्यता पडताळून पाहू आणि कुठल्याही निरापराध शेतकऱ्यावर गुन्हा दाखल होणार नाही याची शाश्वती उपस्थित शेतकऱ्यांना दिली

या प्रकरणाचा निष्पक्ष पणे निष्पक्षपाती पणे मी तपास करीत असून दोषी आढळणाऱ्या ला कोणाचीही गय केली जाणार नाही मग तो शासनाचा प्रतिनिधी असेल खरेदी विक्री संघाचे प्रतिनिधी असेल किंवा कोणी शेतकरी असेल त्यावर योग्य तपास करून गुन्हा दाखल होईल कायद्यासमोर कुणी लहान-मोठा नाही असे प्रतिपादन श्री सोहन मात्रे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला केले
-----------+-------------
लाॅकडाऊच्या काळामध्ये आपल्या शेतीच्या कामासाठी व्यस्त असणारा आधीच आर्थिक विवंचनेने मध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा तपासासाठी पोलिस अधिकाऱ्याने बोलल्यामुळे एकच धांदल उडाली होती परंतु सदरील काही शेतकऱ्यांनी बसव ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील गाडीवान यांना हे प्रकरण निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील गाडीवाण यांणि पोलिस स्टेशन गाठून सदरील शेतकऱ्यांची बाजू पोलिस निरीक्षकास समोर मांडली असता पोलीस निरीक्षकांनी निरापराध शेतकऱ्यांना कुणालाही या प्रकरणात गोवण्यात येणार नाही फक्त त्यांना एक तपासाचा भाग म्हणून या ठिकाणी नोटीस देऊन बोलावण्यात आलेले आहे अन्याय कुणावर होणार नाही अशी शाश्वती दिली असता शेतकऱ्याचे समाधान झाले

यानंतर बसव ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की ---------------
तत्कालीन घोटाळ्याची व्याप्ती पाहता येणाऱ्या मालाची तूट भरून काढण्यासाठी खरेदी-विक्री संघाच्या मार्फत ही फिर्याद दिली गेली असून निरापराध शेतकऱ्याला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला तर तो सामान्य शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून खपवून घेतला जाणार नाही
 आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्याला कर्मचाऱ्याने केलेल्या चुकीची शिक्षा जर मिळत असेल तर हा प्रकार निंदनीय असून या प्रकरणाचा पूर्णतः छडा लावल्याशिवाय बसव ब्रिगेड स्वस्थ बसणार नाही 
शेतकर्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही असेही जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील गाडीवान यांनी आपले मत व्यक्त केले

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून लोणी सावंगी उच्च पातळी बंधाऱ्यात सीआर मधून पाणी सोडा -आमदार बबनराव लोणीकर



परतूर प्रतिनिधी/ इम्रान कुरेशी
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून लोणी सावंगी उच्च पातळी बंधाऱ्यात सीआर मधून पाणी सोडण्याबाबतचे निवेदन जलसंपदामंञी जंयत पाटील यांना आमदार बबनराव लोणीकर यांनी दिले आहे.निवेदनात पुढे म्हटले आहे की, जालना जिल्ह्यातील परतूर व बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील काही भागात पाणी टंचाईचे संकट उभे राहिले असून उन्हाच्या वाढत्या पातळीमुळे विहिरींनी तळ गाठला आहे अशा परिस्थितीत लोणी सावंगी उच्च पातळी बंधारा खाली येणारी परतूर तालुक्यातील लोणी, कनकवाडी, गोळेगाव, कुंभारवाडी, चांगतपुरी, संकनपुरी, पिंपळी धामणगाव, सावरगाव, कुंभारवाडी, लांडगदरा यासह माजलगाव तालुक्यातील नाथ्रा, सादोळा, जवळा, आदी गावांमध्ये सद्यस्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे लोणी सावंगी बंधाऱ्यात पाणी सोडण्यास जनावरांना पिण्याचे पाणी यासह परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी व शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल. सद्यस्थितीत सदरील गावकऱ्यांना कोरोना संकटाच्या काळात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून येत्या काळात पाणी न सोडल्यास या गावांना टॅंकरने पाणीपुरवठा केल्याशिवाय पर्याय उरणार नाही. सदरील गावांना पाणी मिळावे म्हणून लोणी सावंगी या उच्च पातळी बंधाऱ्यात पाणी सोडणे गरजेचे आहे, बंधाऱ्यात पाणी सोडण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा व तात्काळ पाणी सोडण्याबाबत चे आदेश देण्यात यावेत असेही निवेदनात शेवटी म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र राज्य देवेन्द्रजी फडणवीस विरोधीपक्ष नेता विधानसभा महाराष्ट्र राज्य प्रधान सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय मुंबई व जिल्हाधिकारी, जालना यांना दिल्या आहेत.

महावितरणला केंद्राने तात्काळ बिनव्याजी 5000 कोटीची मदत करावी : ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत


वीज क्षेत्राला अत्यावश्यक घटक म्हणून एन.डी.आर.एफ.मध्ये समाविष्ट करा

लॉकडाऊनमुळे वीज बिल वसुली कमी झाल्याने आर्थिक झळ

90000 कोटींचे पॅकेज अस्पष्ट

नागपूर,प्रतिनिधी :- लॉकडाऊनमुळे महावितरणसह देशातील सर्व वीज वितरण कंपन्या आर्थिक संकटात सापडल्यामुळे केंद्राने विजेला अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून राष्ट्रीय आपदा निवारण फंड (एन.डी.आर.एफ.) मधून तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे.सध्या महावितरण कंपनीला केंद्राकडून तातडीने 5000 कोटी रुपयांची मदत आवश्यक असून गेल्या 2 महिन्यात 7200 कोटी रुपयांचे नुकसान महावितरणला सहन करावे लागले असून एप्रिल महिन्यात वीज बिलाची फक्त 40 टक्के वसुली झाली आहे. मे महिन्यात ती 25 टक्के इतकी कमी होणार असल्याचे अनुमान असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 90 हजार कोटी रुपयांचे पॅकेज वीज वितरण कंपन्यांना देण्याची घोषणा केली असून हे पैसे अनुदान स्वरूपात अथवा बिनव्याजी मिळाले तरच महावितरणला वीज खरेदीचे पैसे, कर्मचाऱ्यांचा पगार व इतर आवश्यक देणी देणे शक्य होणार आहे. केंद्राने वीज वितरण क्षेत्राला कर्जरुपी पैसे न देता आर्थिक आधार देण्याची हि वेळ असल्याचे डॉ. राऊत म्हणाले.आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत पॅकेजमधील  90 हजार कोटी रुपये वितरण कंपन्यांना नेमके कोणत्या स्वरूपात, किती रक्कम आणि कधी मिळणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. हे पैसे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन व रूरल ईलेट्रीफिकेशन कॉर्पोरेशनकडून कर्जाच्या स्वरूपात मिळणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. मात्र त्यावर व्याज किती असेल?, कर्ज फेडीचे हप्ते किती असतील व अटी कोणत्या असतील हे अजूनहि गुलदस्त्यातच आहे. याचा उलगडा लवकर झाल्यास त्यादृष्टीने पुढची पाउले उचलता येतील असे मत डॉ राऊत यांनी व्यक्त केले.स्थिर आकार रद्द करण्याची मागणी देखील उद्योजकांकडून होत आहे.लॉकडाऊनमुळे देशांतील वीज वितरण कंपन्यांना खूप मोठा तोटा सोसावा लागत असल्याने नुकसानभरपाईच्या स्वरूपात केंद्राने तातडीने मदत करावी, अशी आग्रही मागणी उर्जामंत्री यांनी केली आहे.

जिल्ह्यात सात व्यक्तींच्या स्वॅबचे अहवाल पॉझिटीव्ह


रुग्णांना कोव्हीड हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी भरती

जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना,प्रतिनिधी :-  मालेगाव येथुन परतलेल्या व भोकरदन येथे संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या चार जवानांचा, शहरातील एका खासगी दवाखान्यातील 48 वर्षीय डॉक्टर, 28 वर्षीय प्रशासकीय अधिकारी तसेच मुंबई येथुन परतलेल्या व मंठा येथील कोव्हीड सेंटरमध्ये संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या 26 वर्षीय महिलेच्या स्वॅबचा अहवाल  दि. 15 मे रोजी पॉझिटीव्ह प्राप्त झाला असुन सर्वांना कोव्हीड हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे. जिल्ह्यात एकुण 1691 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 33 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 863 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 15 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 1366 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने -07 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 25 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1322, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 257, एकुण प्रलंबित नमुने -15 तर एकुण 830 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या - 51, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 692 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या-13, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -442, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-19, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -33, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -26, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 357 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.  *
आजपर्यंत जालना जिल्ह्यात इतर राज्यातुन 136 व राज्याच्या इतर जिल्ह्यातुन 4 हजार 386 असे एकुण 4 हजार 522 नागरिक दाखल झाले असुन या सर्वांना 14 दिवस होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.जालना जिल्ह्यातुन आजपर्यंत उत्तरप्रदेश-4441, बिहार-3009, मध्यप्रदेश-1026,राजस्थान-658, पश्चिमबंगाल-481, झारखंड-425, यासह उर्वरित 16 राज्यातील एकुण 11076 तर जालना जिल्ह्यातुन महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 5704 अशा एकुण 16780 नागरिकांना पास उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
जालना जिल्ह्यातुन आजपर्यंत बिहार-128, आंध्रप्रदेश-103, ओरिसा-113,मध्यप्रदेश-739,छत्तीसगड-10, उत्तरप्रदेश-2707, झारखंड-28,राजस्थान-140, तेलंगणा-27, हैद्राबाद-05 अशा एकुण 4 हजार नागरिकांना परराज्यात पाठविण्यात आले आहे.कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 442 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-34, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-07,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-6, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-00,पोलीस प्रशिक्षण केंद्र-107, मॉडेल स्कुल, अंबा रोड, परतुर-00, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-03, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-4, राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद -84, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -36, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे – 41, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी-45, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत क्र. 1-60,डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टे क्र.2 भोकरदन-00, मॉडेल स्कुल मंठा-03, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-12 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 578 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 103 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 583 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 83 हजार 200 असा एकुण 310008 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  

जिल्हा परिषद गट निहाय किंवा पंचायत समिती गण निहाय क्वारंटाईन सेंटर चालू करा- प्रतिभा इंद्रजित घनवट




परतूर / प्रतिनिधी    प्रशांत वाकळे

     सध्याची कोरोनाची भीषण परस्तीती पाहता होम क्वारंटाईन केलेले गाभिर्य  पाळत नसून यामुळे याचा प्रादुरभाव वाढायला काहीच वेळ लागणार नाही, यांचे गाभिर्य  लक्षात घेत प्रशाषणाने तालुक्यातील जिल्हा परिषद गट निहाय किंवा पंचायत समिती गण निहाय क्वारंटाईन सेंटर चालू  करण्याची मागणी जिल्हा परिषद सातोना गटाचे सदस्य प्रतिभा इंद्रजित घनवट यांनी निवेदनाद्वारे केली आहे उपविभागीय अधिकारी तसेच मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आले की, तालुक्यात एकूण 84 ग्रामपंचायती असून तीन ते चार ग्रामपंचायतीला एक ग्रामसेवक आहे. चार ते पाच गावासाठी एक तलाठी असून दोन ते तीन गावासाठी आरोग्य कर्मचारी आहे यासाठी आरोग्य कर्मचारी आणि तलाठी व ग्रामसेवक यांना प्रत्येक गावात जाऊन बाहेरून आलेल्या लोकांची माहिती घेणे अत्यत जिकरीचे झाले आहे. याठिकाणी काही महिला कर्मचारी असून त्यांना चार - चार पाच - पाच गावासाठी काम करणे अत्यंत जिकरीचे होत आहे, या कर्मचाऱ्यांना बाहेरुन आलेली व क्वारंटाईन केलेली लोक दात देत नसून, घरात न राहता ही लोक सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसत आहेत, यांना रोखण्याचा प्रयत्न केला गावातील सरपंच व इतर कोरोना रक्षक हे गावात काम करत असताना गावातील आलेल्या काही  आडमुठी पणाच्या लोकांमुळे गावात छोटे - मोठे वाद होत आहेत तरी तालुक्याचे नाही परंतु जिल्हा परिषद गट निहाय किंवा पंचायत समिती गण निहाय विलगीकरण सेंटर करून आलेल्या लोकांना गावाच्या बाहेर दुसर्या  गावात ठेवल्यास हे लोक चांगल्या परीने राहतील व खऱ्या अर्थाने सोशल डीस्टन्सिंग पाळल्या जाईल या करिता वरिष्ठांनी तात्काळ कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे . गाव वाचले तरच देश वाचेल आपल्याकडे आरोग्य व्यवस्था पाहिजे तशी नसून जर ग्रामीण भागात कोरोना वायरस चा प्रादुर्भाव झाल्यास गावची गाव वस पडतील अशी चिंता त्यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.  वेळेतच वरील प्रमाणे उपाययोजना केल्यास गावाच्या व नागरिकांच्या हिताचे राहील अशी रास्त मागणी शेवटी त्यांनी निवेदनात केली आहे

      लाल परीही स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला.


११ हजार ३७९ बसेस मधून १ लाख ४१ हजार ७९८ मजुरांचा प्रवास

मुंबई,ब्युरो चीफ :- महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ज्या एस.टी बस कडे पाहिले जाते त्या एस.टी बसेसही स्थलांतरीत मजुर आणि कामगारांच्या मदतीला धावून आल्या आहेत. आतापर्यंत ११ हजार ३७९ बसेसद्वारे सुमारे १ लाख ४१ हजार ७९८ स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत बसची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.  आतापर्यंत आपल्या लाल परीने मध्यप्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक यासारख्या राज्यांच्या सीमेपर्यंत धावून स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या घरी जाण्यास मदत केली आहे.यातील काही स्थलांतरीत मजुरांनी पुढच्या प्रवासासाठी श्रमिक रेल्वे सेवेचा ही लाभ घेतला आहे.  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून जसे इतर राज्यातील स्थलांतरीत मजुर आणि कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवले जात आहे तसेच इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना राज्यात आणण्याचे ही काम केले जात आहे.


*श्रमिक रेल्वेने २ लाखाहून अधिक मजुर आपल्या राज्यात परतले*

महाराष्ट्रात अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी सुरु केलेल्या श्रमिक रेल्वे सेवेच्या माध्यमातून आतापर्यंत १९१ रेल्वेगाड्यातून २ लाख ४५ हजार ०६० स्थलांतरीत कामगारांना सुखरूप त्यांच्या राज्यात पोहोचवण्यात आले आहे. परराज्यातील कामगारांना त्यांच्या राज्यात  सकुशल पाठविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्यांच्या तिकिटासाठी ५४ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला गेला आहे.

तुम्ही आहात तिथेच थांबा, तुम्हाला तुमच्या राज्यात सुखरूप पाठविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी वारंवार दिली होती.  आता ही व्यवस्था गतीने काम करत असून त्यामुळे इतर राज्यातील स्थलांतरीत कामगार आणि मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

*रोज धावताहेत २५  रेल्वेगाड्या*

कोविड १९ या विषाणुच्या प्रादुर्भावानंतर महाराष्ट्रात अडकलेल्या इतर राज्यातील कामगार आणि मजुरांना त्यांच्या गावी परतण्याची तीव्र इच्छा होती. त्यांची हीच इच्छा लक्षात घेऊन त्यांना सुखरूपपणे त्यांच्या राज्यात परतता यावे, त्यांचे हाल होऊ नयेत यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यास केंद्र शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आता राज्याच्या विविध शहरातून परराज्यातील स्थलांरतीत मजुरांसाठी आणि कामगारांसाठी रोज २५ रेल्वे गाड्या धावत आहेत. बिहार, राजस्थान, उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, झारखंड, आंध्रपदेश, ओरिसा,  जम्मु  या राज्यातील मजुर आता या श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून घरी परतू लागले आहेत. यात प्रामुख्याने उत्तरप्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेशच्या स्थलांतरीत मजुरांची संख्या अधिक आहे.

*अंबड तालुक्यातील मुडेगाव येथील गुटखा जप्त, पोलिसांनी केलेली कारवाई*


दि 16 मे रोजी पहाटे तीन वाजता धाड टाकून झाडाझडती असता 16 गोण्या गोवा गुटखा तर 16 गोण्या सुगंधी सुपारी

*अंबड/अरविंद शिरगोळे* : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मुडेगाव येथिल जाहीर उस्मान पटेल यांच्या घरात गुटखा साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जहीर उस्मान पटेल याच्या घराची आज दि 16 मे रोजी पहाटे तीन वाजता धाड टाकून झाडाझडती घेतली असता 16 गोण्या गोवा गुटखा आणि 16 गोण्या सुगंधी सुपारी, असा छापील किमतीनुसार 1 लाख 28 हजार रुपयांचा अवैध व प्रतिबंधित गुटखा साठा आढळून आला आहे. आरोपी जहीर पटेल यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याने हा माल फारूक नामक व्यक्तीकडून आणल्याची कबुली दिली आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागामार्फत याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू आहे.
पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, पोलीस उपनिरीक्षक शैलेश शेजुळ, पोलीस कर्मचारी विष्णू चव्हाण पाटील, संदीप पाटील, महिंद्र गायचे, शुभम तळेकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केले आहे. व शहरात खळबळ उडाली आहे

*पोलीस ठाण्याच्या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी तडकाफडकी केल्या बदल्या*

अधिकार्‍यांमध्ये अधून-मधून खटके, एस.चैतन्य  तडकाफडकी ने केल्या बदल्या


*अंबड/प्रतिनिधी* : अंबड तालुक्यातील गोंदी पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस अधिकार्‍यांना पोलीस निरीक्षक एस.चैतन्यांनी यांनी आज शुक्रवारी तडकाफडकी हलवले असून गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या जागी आता तालुका जालना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पोलिस ठाण्यात चार महिन्यापूर्वी झालेले प्रभारी अधिकारी मिलिंद खोपडे आणि इतर दोन अधिकार्‍यांमध्ये अधून-मधून खटके उडत होते ही बाब पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांच्यापर्यंत गेल्यानंतर त्यांनी गंभीर दखल घेत येथील तीनही अधिकाऱ्यांची आज बदली केली आहे. गोंदी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. मिलिंद खोपडे यांची पोलीस नियंत्रण कक्ष पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांची चंदनझिरा आणि उपनिरीक्षक भागवत नागरगोजे यांची सदर बाजार पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तालुका जालना पोलीस ठाण्यातील स.पो.नि.रत्नदीप जोगदंड यांची गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच चंदंझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले आणि सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गजानन कौळसे यांची गोंदी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांमधील अंतर्गत यामुळे बेबनवामुळे पोलीस अधीक्षक एस.चैतन्य  तडकाफडकी बदल्या केल्याची चर्चा चालू आहे

*अंबड़ शहरात प्रिन्स लॉज जवळ  पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार जाँन पिल्ले 7 हजाराची घेतली लाच*

प्रतिबंधक विभाग जालना यांनी रंगेहाथ पकडल्याने अंबड शहरात खळबळ


*अंबड/प्रतिनिधी* :  अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार जाँन पिल्ले यांना आज दि 13 मे रोजी प्रिन्स लाँजजवळ अंबड येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांनी रंगेहाथ पकल्याने खळबळ माजली आहेयाबाबत हकिगत अशी की , यातील तक्रारदार यांनी तक्रार दिली की , त्यांचेवर व त्यांचे भाऊ ,पत्नी आणि मुलगी यांचेवर पोलीस ठाणे अंबड जि जालना येथे दाखल असलेल्या गुरन 173 / 2020 कलम 324 , 323 . 504 , 506 , 34 भादंविचे गुन्हयात अटक न करता मा कोर्टात हजर करुन तपासात मदत करण्यासाठी आलोसे श्री जॉन पिले पोहेकॉ / 1018 यांनी तक्रारदाराकडे 40 , 000 / – रूपये लाचेची मागणी केली . सदर कामासाठी तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली . सदर तक्रारीची दिनांक 11 . 05 . 2020 रोजी पडताळणी केली असता तहजोडीअंती तक्रारदार यांचेकडे लोकसेवक श्री . जॉन पिल्ले पोहेकॉ / 1018 यानी 20 , 000 / – रुपयेची लाचेची मागणी करून लोकसेवक श्री . जॉन पिल्ले पोहेकॉ / 1018 यांनी दि . 13 . 05 . 2020 रोजी 20 , 000 / – रुपये रक्कमेपैकी पहीला हप्ता म्हणुन 7 , 000 / – रुपये लाचेची रक्कम स्वतः पंचासमक्ष लाच स्वीकारली असतांना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालनाचे पथकाने प्रिन्स लॉज जवळ अंबड जि जालना येथे रंगेहाथ पकडण्यात आले . लोकसेवक श्री . जॉन पांडीयन पिल्ले वय 51 वर्ष व्यवसाय नोकरी पोलीस हवालदार इ . ने 1018 नेमणुक पोलीस ठाणे अंबड , रा रामनगर कॉलनी , जालना यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्याबाबात पुढील कार्यवाही चालु आहे . सदरची सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री.अरविंद चावरीया , अपर पोलीस अधिक्षक डॉ . अनिता जमादार , ला . प्र . विभाग औरंगाबाद यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक श्री . रविंद्र डी . निकाळजे ,पोलीस निरीक्षक एस . एस . शेख , पोलीस निरीक्षक श्री.संग्राम ताटे तसेच कर्मचारी श्री . मनोहर खंडागळे,श्री .ज्ञानदेव जुंबड , श्री.अनिल सानप , श्री .ज्ञानेश्वर म्हस्के,श्री .गणेश चेके,श्री.सचिन राऊत , श्री .शिवाजी जमधडे,व चालक श्री.प्रविण खंदारे , श्री.आरेफ शेख यांनी पार पाडली .

*जिल्ह्यातील सर्व होमगार्ड अधिकारी व कर्मचारी सैनिकावर उपासमारीची वेळ व त्यांच्यावर मानसिक छळ*


*अंबड़ /पतिनिधि* : covid-19 बंदोबस जिल्ह्यातील सर्व होमगार्ड अधिकारी व कर्मचारी करीत आहेत तर काहींना covid-19 बंदोबस्त होमगार्ड यांना मिळालेल्या नाही वेळोवेळी संगणक प्रणालीद्वारे यादीनुसार मुसाद मनोहर शहा व अधिकारी व कर्मचारी यांचे नावे जिल्हा कार्यालयात संपर्क करूनही त्यांचे योग्य समाधान केले नाही जी यादीत येत होती ति आता मिळत नाही मधील भेट योग्य समाधान केलेले नाही जी यादी राखण्यात येत आहे. त्यांचे नाव यादीत डबल येत नाही पो.स्टे. ड्युटी ऑफिस 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या होमगार्ड सैनिकाला बंदोबस्त करून दिलेला होता परंतु दोन महिन्याच्या कालावधीत त्यांचे नाव किंवा बंदोबस्त मिळालेला नाही पन्नास वर्षाच्या वरील कर्मचारी यांना बंदोबस्त मिळालेला आहे परंतु सध्या चालू बंदोबस्त मध्ये त्यांच यादीतील कर्मचारी यांचे नावे येत असून बाकी कर्मचारी हे वंचित आलेले आहे. तरी जिल्हासमादेशक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी योग्य दिशा घेऊन बंदोबस्त द्यावा जेणेकरून इतर कर्मचारी ची अवहेलना होणार नाही बंदोबस्त न मिळाल्याने होमगार्ड सैनिकाचा एक प्रकारचा मानसिक छळ केला जात आहे प्रत्येकाला समान बंदोबस मिळावा हे हेतूने आपण महासमादेशक साहेबांनी याचं परिपत्रक जाक्र/मस/कार्या 03/2017/544 दिनांक 18 फेब्रुवारी 2017 नुसार सर्वांना समान बंदोबस्त मेळावा परंतु तसे त्या आदेशाचे अनुपालन होत नाही करिता आमच्या अर्जाचा गंर्भियाने विचार करावा. जिल्ह्यातील सर्व होमगार्ड अधिकारी व कर्मचारी सैनिकाला सामान न्याय सामान बंदोबस्त देण्यात यावा कारण त्यांच्या मागे कुटुंबाचे उर्दनिर्वहा चे प्रश्न पडला आहे तसेच जालना जिल्ह्यात 786 होमगार्ड व महिला असून काहींना कुठेही कधीच बंदोबस्त मिळालेला नाही कारण काही निवृत्त/मयत झालेले व काहींना नोकरी लागल्या आहेत त्यांचे नाव कमी झालेले नाही त्यामुळे इतरांना कुठलाही बंदोबस्त मिळत नाही यांच्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे यांना मा.श्री. महासमादेशक साहेब, मा.जिल्हाधिकारी साहेब, मा.राज्यपाल. साहेब (मुंबई),  मा. मुख्यमंत्री साहेब (मुंबई), मा. पालक मंत्री साहेब  (जालाना), मा.गृहमंत्री राज्यमंत्री महाराष्ट्र (मुंबई), मा. विभागीय आयुक्त साहेब (जालना) यांनी रोजगार प्रदान करून न्याय देण्यात यावे

      तलवाडा येथील मुस्लिम समुदायच्या वतीने                          सार्वजनिकरित्या 150 कीटचे वाटप

तलवाडा प्रतिनिधि :-ईम्रान सौदागर 

गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील दर शनिवारी भरना-या आठवडी बाजाराच्या हिसाबाने लाॅक डाऊनला जवळपास नऊ आठवड्याचा कालावधी ऊलटला आसतांना गोर गरीब हातावर कुटुंबाचा ऊदारनिर्वाह आसना-या कुटूंबाकडे या तलवाडा गावातील मताचा जोगावा मागना-या सर्वच गाव पुढा-यांनी दुर्लक्ष केलेले आसतांना रमजान महिन्याच्या पावन पवित्र दानत्व रितीरिवाजा नुसार पुण्याईच्या कामात सर्वांचा हातभार लागावा या निर्मळ हेतुने मुस्लिम समुदायातील काही तरुणांनी समाजातुनच वर्गणी करुण तब्बल 150 कीटचे नुस्ते मुस्लिम समुदायातच नव्हे तर अठराह पगड जाती धर्माच्या गरजुंना वाटप करुन राष्ट्रीय एकत्मतेचा संदेश दिला असुन आज मितीला कोन्ही रक्ताचे नाते किंवा राजकिय मंडळी पुढे येऊन जिवा भावाच्या सोबत्यांना आर्थिक सहकार्य करन्या एैवजी फक्त व्हाटस्प व फेसबुकच्या माध्यमाातुन घरात रहा काळजी घ्या एवडेच पण घरात रहा आणी काय खाॅ याचा विचार या निर्लज्जम सदासुखींना का येत नाही आसा प्रश्न या निम्मीताने निर्माण होत असुन सर्व धर्म समुदायातील ज्या 150 गरजुंना या किटच्या रुपाने आठवडा भरच्या किराणा सामानचा दिलासा मिळाला त्यांनी मुस्लिम समुदायच्या पुढाकार घेणा-या तरुणांन प्रती आभार व्येक्त करुन त्यांना धन्यवाद दिले आहे.विषेश म्हणजे रमजान महिन्याच्या महिमेची तलवाडा येथील सर्व परिचित आसलेले ह.भ.प. गणेश महाराज कचरे यांना ब-या पैकी जान आसल्याने त्यांच्या कल्पनेतुन मुस्लिमांच्या या तरुणांनी हा ऊपक्रम राबवला शहेंशाहभाई सौदागर, मुबीन खतीब,शेख आप्सर, खमरखाॅ पठान, इद्रीस कुरैशी, शेख नाजेर, बाळु शिनगारे, सुनील तुरुकमारे, नजीरभाई कुरैशी व त्यांच्या सर्व सहकार्यामुळे हा समविचारी कार्यक्रम पार पडला.

 कोरोना-19 आणि रमज़ान ईद च्या पार्श्वभूमीवर गेवराई तालुक्याती मुस्लिम धर्मगुरु मुफ़्ती गय्यास जहागिरदार आणि त्यांचे सहकारी यांच्या कडून उत्कृष्ट उपकरण



गेवराई/प्रतिनिधी:- कोरोना-19 आणि रमज़ान ईद च्या पार्श्वभूमीवर गेवराई तालुक्याती मुस्लिम धर्मगुरु मुफ़्ती गय्यास जहागिरदार आणि त्यांचे सहकारी यांच्या कडून उत्कृष्ट उपकरण घेण्यात आले शहरातील गरीब ,विधवा महिला, अनाथ लोकांची ईद गोड़ व्हावी ह्या साठी 1000(हजार) कुटुंबना राशन आणि ईदच्या शिरखुर्रमा साहित्य वाटप मुस्लिम समुदाय मध्ये एक प्रथा आहे मुस्लिम समुदायातील धन-धांडगे लोक ज्याच्या कड़े खरी कमाई मधून सगळा खर्च होऊन काही पैसे शिल्लक आहे अश्या लोकांना दर वर्षी शिल्लक रक्कम वर जकात(एक प्रकारचा कर) 100 रुपये ला 2.5% काढून ते समाजातील ग़रीब लोकांना द्यावा लागतो. आणि आपन स्वस्थ आणि निरोगी राहो आपल्या वर काही संकट येऊ नये म्हणून सदखा(दान काही रक्कम) दिला जातो.योग्य गरजवंतांना ज़कात(एक प्रकारचा कर) आणि सदखा(दान काही रक्कम) जावी म्हणून गेवराई येथील मुस्लिम धर्मगुरु आणि त्यांचे सहकारी गेवराई तालुक्यात फिरन ज़कात(एक प्रकारचा कर) आणि सदखा(दान काही रक्कम) जमा करुण त्या जमा झालेल्या रक्कमें मधे किराणा आणि ईदच्या शिरखुरमा सहित्याची 1000(हजार) किट तयार केली आणि ते किट समाजातील गोर-गरीब ,विधवा महिला आणि अनाथ लोकांची ईद गोड़ व्हावी म्हणून किट वाटप करण्यात आली ह्या उपकर्णचा गेवराई तालुक्यात स्थुति होत आहे

ह्या किट मध्ये खालील वस्तु आहे.
गेहू,चावल, तेल,मिर्ची,नमक, हल्दी, खोपरा, खजूर,किशमिश, काजू,बदाम, ज़ीरा, शक्कर, मूंगदाल,मसूरदाल,चनादाल,डालडा, पत्ती
खालील लोकांनी परीश्रम केले
मुफ़्ती गय्यास जहागिरदार, हाफिज अनवर,नईम अत्तार,अब्दुल मुखतदिर,अतीक तंबोली, तुराब अत्तार,गुफरान सिद्दीक़,

मांगवडगाव खून प्रकरणातील पिडीत पवार कुटुंबियांची पालकमंत्री धनंजय मुंडेंनी घेतली भेट.


प्रकरणात दोषारोपपत्र ५० दिवसांच्या आत दाखल करण्याच्या पोलिसांना केल्या सूचना


मृतांच्या कुटुंबियांना सामाजिक न्याय विभागाकडून आर्थिक मदत



घरकुल व अन्यत्र जमीनही उपलब्ध करून देणार - ना. मुंडे


बीड/अंबेजोगाई  :- बीड जिल्ह्यातील मांगवडगाव तिहेरी हत्याकांडातील पीडित पवार कुटुंबियांची आज जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन पवार कुटुंबियांचे सांत्वन केले.यावेळी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जावे यासाठी आपण प्रयत्न करणार असून विशेष सरकारी वकिलाची नेमणूक केली जाईल असे श्री. मुंडे म्हणाले. तसेच सदर प्रकरणातील दोषारोपपत्र ५० दिवसांच्या आत दाखल करावे अशा सूचना ना. मुंडेंनी पोलीस अधिकाऱ्यांना केल्या.यावेळी ना. मुंडे यांच्यासह आमदार संजय दौड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, बहुजन मुक्ती मोर्चाचे बाबुराव पोटभरे, मानवी हक्क अभियानचे मिलिंद आव्हाड, अजय मुंडे , शिवाजी शिरसाट, दत्ताआबा पाटील यांसह अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक राहुल धस, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांसह स्थानिक अधिकारी उपस्थित होते.'धनु भाऊ आता तुम्हीच आमचे माय बाप' म्हणत पीडितांनी फोडला टाहो...धनंजय मुंडे पवार कुटुंबाच्या पालावर जाताच पवार कुटुंबियांनी 'धनु भाऊ, आता तुम्हीच आमचे माय बाप आहात, आम्हाला न्याय द्या...' असे म्हणत टाहो फोडला. यावेळी ना. मुंडे यांनी या प्रकरणातील दोषींना शिक्षा मिळून 100 % न्याय मिळेल अशी खात्री दिली. अंबेजोगाई येथे पालावर राहणाऱ्या पवार कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी ना. मुंडे यांनी किमान तीन महिने पुरेल इतके अन्न धान्य पवार कुटुंबियांना देण्याबाबत स्थानिक तहसीलदारांना आदेशित केले आहे. तसेच विभागामार्फत घरकुल योजनेतून घरासाठी निधी व जागा उपलब्ध करून देण्यात येईल असे ना. मुंडे म्हणाले.दरम्यान सामाजिक न्याय विभागामार्फत हत्या झालेल्या तीनही व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख १२ हजार रुपये आर्थिक मदत तात्काळ देण्यात आली आहे. तसेच योजनेनुसार उर्वरित ४ लाख १२ हजार रुपये रक्कम दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर देण्यात येईल असे ना. मुंडे म्हणाले.पवार कुटुंबीयांनी ना. मुंडे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या, यावेळी हे प्रकरण जमिनीच्या वादातून झाले असल्याचा संशय असल्याने पवार कुटुंबाने आपल्याला आणखी धोका होऊ नये म्हणून इतरत्र जमीन मिळवून देण्याबाबत ना. मुंडे यांना विनंती केली. श्री. मुंडे यांनी पवार कुटुंबियांना इतरत्र जमीन मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे.


  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...