बुधवार, २२ एप्रिल, २०२०


       लाँकडाऊनचा फुल उत्पादक शेतकर्यांना मोठा फटका
सिंधीकाळेगाव,प्रतिनिधी (शाम गिराम):-जगभरात थैमान घातलेल्या कोरोणा विषानुने लाँकडाऊन करण्यात आले आहे. या कालावधीत धार्मिक, सामाजिक 
कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. याचा सर्वाधिक फटका फुल उत्पादकांना बसला आहे. जालना तालुक्यातील पिरकल्याण येथील शेतकरी अक्षय शिंदे यांनी शेतामध्ये गुलछडी, गलांडा आदी फुल पिकांची चार महिन्यापुर्वी लागवड केली होती माञ फुले विक्रिस आली आणि कोरोनामुळे संचार बंदी लागु झाली त्यामुळे फुल शेती करणार्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. फुलशेतीवर केलेला खर्चही निघणे मुश्किल झाले, असुन व्यापारीही येत नसल्याने फुल उत्पादक शेतकर्यांची चिंता वाढली. रोज कमीत कमी 20 ते 25 किलो माल वाया जात आहे.  लॉकडाउन असल्यामुळे फुल मार्केट पूर्णपणे बंद आहे शेतकऱ्यांचे फुल शेतातच सडत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढलं आहे .

प्रतिक्रिया (अक्षय शिंदे)
माझी 20 गुंठे गुलछडी आहे दररोज 15 किलोच्या आसपास फुल निघत होते परंतु संचारबंदीमुळे
        
फुल शेतातच सडून जात आहे त्यामुळे माझं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे खरं तर फुल शेतीवर शेतकऱ्यांचा दैनंदिन उदरनिर्वाह अवलंबून असतो.फुलमार्केट बंद असल्याने संपूर्ण शेतकरी अधिक आर्थिक अडचणीत सापडला आहे फुलशेती करणार्यांना शेतकऱ्यांना सरकारने काही मदत करायला हवी अशी भावना सर्व सामान्य शेतकऱ्यांची आहे.अशा प्रकारचे फुले फुलली परंतु लाकडाऊनमुळे विक्रिसाठी नेता येत नाही


दुधविक्रेत्यांना सायं 6 ते 8 या वेळेत दुध वाटपासाठी मुभा
जालना,प्रतिनिधी:-  दुधविक्री, फळे व भाजीपाला विक्री, किराणा दुकाने, पिठाची गिरणी, कृषि निविष्ठा (बि-बियाणे), खते, किटकनाशके, कृषी औजारे, पेट्रोलपंप 
ही दुकाने सकाळी 7.00 ते दुपारी 2.00 या वेळेतच केवळ अत्यावश्यक सेवा देणारी दुकानेच सुरु ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असुन या वेळेव्यतिरिक्त दररोज सायंकाळी 6.00 ते 8.00 या वेळेत जिल्ह्यात दुध वाटपासाठी, संकलन केंद्रावर जमा करण्यासाठी दुधविक्रेत्यांना सुट देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी, जालना यांनी कळविले आहे.  तसेच अत्यावश्यक सेवा व त्यासंबंधीची सेवांची गोदामे व त्यातील कर्मचारी यांनाही आदेशातुन सुट देण्यात आली असुन वाहतुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत संबंधितांना पास देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत.


परतुर तालुक्यातील मौजे शिरोडा येथील महिला कोरोना बाधित
             महिलेच्या संपर्कातील 41 पैकी 19 व्यक्तीं 
                      विलगणीकरण कक्षात दाखल.
           उर्वरित व्यक्तींना विलगीकरण कक्षात दाखल
                         करण्याची कार्यवाही सुरु
जालना, प्रतिनिधी:- परतुर तालुक्यातील मौजे शिरोडा येथील 39 वर्षीय महिलेच्या स्वॅबचा अहवाल दि. 21 एप्रिल, 2020 रोजी पॉझिटीव्ह आला आहे.  महिलेच्या सहवासात 14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 8, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 273 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 1, सध्या अलगीकरण  केलेल्या व्यक्ती -303, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-37, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 00, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 71, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 116 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे. जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 303 एवढी झाली असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना – 48, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह-41, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-49,मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-16, पोलीस प्रशिक्षण केंद्र-98, मंठा येथे 13 तर गुरुगणेश भवन, जालना येथे 38 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 325 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 59 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 402 वाहने जप्त करण्याबरोबरच 26 हजार 808 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली इंडस प्रकल्प यांच्या नियोजनानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समन्वयाने विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातुन शहरातील गरजू व्यक्तींना आजपर्यंत 2 लाख 78 हजार 186 फुड पॅकेटचे वाटप करण्यात आले आहे.
B मौजे शिरोडा येथील महिलेस दि. 13 एप्रिल,2020 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे खोकला व ताप या आजाराचा जिल्ह्यात कोरोनाच्या एकुण 805 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 71 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 486 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 23 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 567 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने 01 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 02 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 532, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 94, एकुण प्रलंबित नमुने-27 तर एकुण 415 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.टाऊन हॉल परिसरातील एक 55 वर्षीय महिला न्युमोनिया व मधुमेह आजारानेग्रस्त आहेत.वाटुर ता. परतुर येथील 34 वर्षीय पुरुष, रोषनगाव ता. बदनापुर येथील 21 वर्षीय तरुण, लालबहादुरशास्त्री महाविद्यालय परिसर, परतुर येथील 75 वर्षीय पुरुष हे न्युमोनियानेग्रस्त असुन अंबड येथील 60 वर्षीय पुरुष रुग्ण क्षयरोगग्रस्त असुन जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे दाखल आहेत.  या सर्व रुग्णांच्या स्वॅबचे नमुने निगेटीव्ह आलेले असुन त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.
सामान्य रुग्णालय, जालना येथे दु:खी नगर येथील कोरोनाग्रस्त 65 वर्षीय महिलेची प्रकृती गंभीर असुन या महिलेचे तीन स्वॅबचे नमुने पॉझिटीव्ह प्राप्त झाले होते मात्र दि. 21 एप्रिल रोजी स्वॅबचा नमुना निगेटीव्ह आला असुन पाचवा स्वॅबचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला असुन अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहितीही जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.
उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. सदरील महिलेला 6 एप्रिलपासुन ताप व खोकला होता.6 एप्रिल रोजी महिलेने परतुर व 10 ते 13 एप्रिल दरम्यान जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते.  जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे दाखल झाल्यास दि. 13 एप्रिल रोजी महिलेच्या स्वॅबचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.  दि. 14 एप्रिल रोजी त्याचा अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाला. महिलेचा दुसऱ्यांदा स्वॅबचा नमुना 20 एप्रिल रोजी पाठविण्यात आला होता.  त्याचा अहवाल दि.21 एप्रिल, 2020 रोजी रात्री 10.00 वाजता पॉझिटीव्ह प्राप्त झाला आहे. महिला ही न्युमोनिया आजाराने ग्रस्त असुन महिलेची प्रकृती स्थिर आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांच्या पथकाने शिरोडा ता. परतूर येथे भेट देऊन तालुका आरोग्य अधिकारी, रतुर यांना कंटेन्टमेंट प्लॅनच्या अनुषंगाने सुचना देऊन महिलेच्या संपर्कात आलेल्या सहवासितांच्या पाठपुराव्यासाठी वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशा सेविका, अंगणवाडी मदतनीस यांचा समावेश असलेली दोन पथके  तयार करण्यात आली असुन  80 कुटूंबातील 560 लोकांचे सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे.
49 व्यक्ती आल्या असुन यात 8 व्यक्ती हायरिस्क तर 41 लोरिस्क संपर्कातल्या असुन त्यापैकी 19 जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असुन स्वॅब तपासणी व उर्वरित संपर्कातील व्यक्तींना सामान्य रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु  असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.


सिंधीकाळेगाव :-जालना तालुक्यातील सेलगांव येथे  सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून शेलगावचे सरपंच श्री धोंडीराम फकिरा पवार यांनी शेलगाव येथील सर्व गरजू नागरिकांना 50 कुंटल  अन्नधान्याचे वाटप केले गरजुवताना कही तरी मदत करावा म्हनुण गहु वाटप केले ह्या वेळी उपस्थित योगेश जाधव राहुल पवार रोहित पवार सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
      संचारबंदी काळात अवैध मद्य विक्रीवर प्रशासनाची ‘टाच’
            बुलढाणा जिल्ह्यात 77 गुन्हे; 57 आरोपींना अटक
             9 लाख 71 हजार 521 रूपयांचा मुद्देमाल जप्त                                 

बुलडाणा, प्रतिनिधी : कोरोना विषाणू संक्रमणाच्या कालावधीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद 
करण्यात आलेल्या आहेत. तसेच बारसुद्धा बंद आहेत. मात्र जिल्ह्यात अवैधरित्या मद्य विक्री, मद्य निर्मिती होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागास मिळाली. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक आदींवर प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. संचारबंदी काळात अशा्रपकारचे 77 गुन्हे दाखल करण्यात आली असून 57 आरोपींना अटक करण्यात आली आहे.लॉकडाऊन कालावधी लागू झाल्यापासून 21 एप्रिल 2020 पर्यंत जिल्ह्यात अवैध मद्याबाबत 77 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.  त्यामध्ये हातभट्टी दारू 508 लीटर, मोहा सडवा रसायन 10309 लीटर, मोहाफुले 20 किलो, विदेशी मद्य 27.45 लीटर, बिअर 202.8 लीटर, देशी मद्य 105.22 लीटर, एक चारचाकी वाहन व 10 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली ओहत. अशाप्रकारे एकूण 9 लाख 71 हजार 521 रूपयांचा दारूबंदी गुन्ह्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई जिल्ह्यातील भिलवाडा, देऊळघाट शिवार, डोंगरखंडाळा शिवार, सुंदरखेड, डोंगरशेवली, अंबाशी, शिरपूर शिवार, अमडापूर, पेठ शिवार, मेहकर फाटा, खरमोळा, लाडनापूर शिवार, खिरोडा व नागापूर शिवार, किन्ही महादेव गाव व शिवार, पारखेड, शेलूडी शिवार, खामगांव, चांदई शिवार, कोलारा, शेळगांव आटोळ शिवार, सावरखेड नजीक शिवार, पळसखेड दौलत शिवार, देऊळगांव घुबे शिवार, गायखेड व हरणखेड शिवार, कुऱ्हा गोतमारा शिवार, शेलापूर, बोराखेडी शिवार, धाड – करडी शिवार, रणथम शिवार, देवधाबा शिवार या जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कारवाई करण्यात आलेली आहे.ही कारवाई जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त मोहन वर्दे यांच्या सुचनेनुसार अधिक्षक बी.व्ही पटारे यांचे कालावधीत करण्यात आलेली आहे. या कारवाईत निरीक्षक जी. आर गावंडे, डि. आर शेवाळे, भरारी पथकाचे एस. डी चव्हाण, ए. आर आडळकर, दुय्यम निरीक्षक र.ना गावंडे, एन. के मावळे, वा. रा बरडे आणि यांचे पथकातील कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे, असे अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी कळविले आहे.

                                                                                             

सैलानी येथील मनोरुग्ण व नातेवाईक यांची जेवण व राशनची व्यवस्था करा

आमदार श्वेताताई महाले यांची पालकमंत्री ना.राजेंद्र शिंगणे साहेब यांच्याकडे मागणी
बुलडाणा,प्रतिनिधी:- सैलानी ता.जि. बुलडाणा हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र असून हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्माचे भाविक दर्शनासाठी येत असतात. येथे मोठ्या प्रमाणावर मनोरुग्ण बरे होतात अशी मान्यता असल्याने तिथे मनोरुग्ण येण्याचे खूप मोठे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविक येणे बंद झाल्याने मनोरुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची उपासमार होत असल्याने त्यांच्या राशन व जेवण्याची व्यवस्था करण्याची मागणी आ. सौ. श्वेताताई महाले यांनी पालकमंत्री मा .ना. राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्याकडे एका लेखी निवेदनाव्दारे केली आहे .दि 21/4/2020 रोजी आजही लॉक डाऊन असतांना ही सैलानी  येथे शेकडो मनोरुग्ण व त्यांचे नातेवाईक आहे. सगळी कडे तीर्थक्षेत्रे बंद असल्याने भविकांचे येणे जाणे बंद आहे . तिथे मागून खाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने त्यांचे पोट ही मिळेल त्याच्यावर असल्याने त्यांची उपासमार होत आहे . तेथील मनोरुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना खाण्यासाठी काहीही नसल्याने त्यांचे हाल होत आहे .  त्यांच्याजवळ राशन कार्ड नाही. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही योजनेचा त्यांना लाभ मिळत नाही. मनोरुग्ण साखळयांमध्ये बांधलेले असल्याने ते खाण्यापिण्यासाठी भटकंती सुद्धा करू शकत नाही . जे मनोरुग्ण मोकळे आहेत त्यांना कुणी जवळ येऊ देत नाही .
     त्यामुळे तिथे राहत असलेले मनोरुग्ण आणि त्यांच्या नातेवाईक यांची राशनची व जेवण्याची व्यवस्था करण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी आ. सौ. श्वेताताई महाले यांनी केली आहे .


                  धक्कादायक नांदेड पिर बुऱ्हाणनगर येथे 
                          कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...
नांदेड (भगवान कांबळे):-नांदेड जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन च्या काळात प्रशासनाने प्रचंड काळजी घेतली होती.जिल्ह्यात काल कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नसल्याने नांदेड जिल्ह्याची दिलासादायक परिस्थिती होती. बुधवारी मात्र नांदेड शहरात कोरोनाचा रुग्ण सापडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या रुग्णाचे वय 64 असल्याचे सांगण्यात आले आहे. पहिल्यांदा लॉकडाऊन घोषित केल्यापासून जिल्हा प्रशासन 
आणि पोलिसांनी जिल्ह्यातील परिस्थितीही आखून दिलेल्या नियमांप्रमाणे काटेकोर पद्धतीने हाताळली होती त्यामुळे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नव्हता.आतापर्यंत एकूण क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची संख्या 683 आहे. यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली 222 असून सध्या निरीक्षणाखाली असलेले 89 नागरिक आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 70 नागरिक आहेत. तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 613 अशी संख्या आहे.दि. २१ एप्रिल रोजी  तपासणीसाठी 66 नागरिकांचे नमुने घेतले होते. आजपर्यंत एकुण 449 नमुने तपासणी झाले आहेत. यापैकी 378 नमुने निगेटीव्ह आले असून 66 नमुने तपासणी अहवाल येणे बाकी होते. नांदेड जिल्ह्यात काल पर्यंत कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याने दिलासादायक परिस्थिती होती. काल पाठवलेले 66 संशयिताचे तपासणी अहवालातील उर्वरित 9 लोकांपैकी 8 लोकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे समजते तसेच 1 संशयिताचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजते. बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 77 हजार 676 असून  त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले होते.
मंगळवारी रात्री नांदेड जिल्ह्यातून 9 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो राहात असलेला संपूर्ण परिसर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन आणि पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

              अत्यावश्यक सेवेतील  दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2
                             या वेळेतच सुरु ठेवावीत.

           जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश जारी


जालना,प्रतिनिधी:- जालना शहरासह जिल्ह्यातील सर्व दुधविक्री, फळे व भाजीपाला विक्री, किराणा दुकाने, पेट्रोलपंप, घरगुती गॅस व औषधी दुकाने सकाळी 7.00 ते दुपारी 2.00 या वेळेतच सुरु ठेवावीत. या व्यतिरिक्त ईतर सर्व दुकाने 
जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 302 एवढी झाली असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना – 48, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह-41, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-49,मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-15, पोलीस प्रशिक्षण केंद्र-98, मंठा येथे 13 तर गुरुगणेश भवन, जालना येथे 38 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 304 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 59 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 302 वाहने जप्त करण्याबरोबरच 26 हजार 808 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  जिल्ह्यात कोरोनाच्या एकुण 766 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 38 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 449 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 20 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 544 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने निरंक असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 01 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 515, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 91, एकुण प्रलंबित नमुने-22 तर एकुण 411 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 89, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 265 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 27, सध्या अलगीकरण  केलेल्या व्यक्ती -302, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-09, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 00, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 38, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 67 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.  
बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी एका आदेशान्वये दिले आहेत.कोव्हीड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये संचारबंदीमुळे जालना जिल्ह्यातील अडकलेल्या ऊसतोडणी मजुर व ऊस वाहतुक करणारे कामगार व त्यांच्या कुटूंबियांना त्यांच्या मुळ गावी पाठविण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार मजुर ज्या जिल्ह्यात कामगार म्हणून काम करत आहेत तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावास मान्यता दिल्याच्या पत्राची प्रत त्यांना जालना जिल्ह्यात प्रवेशासाठी आवश्यक राहील. तसेच मान्यतेसोबत कामगारांचे त्यांच्या निवासी पत्त्यासह, गाव, तालुका व जिल्हानिहाय यादी, संबंधित कामगारांच्या गावातील सरपंचाचे नाव, त्यांचा संपर्क क्रमांक याचा उल्लेख असावा. ज्या वाहनातुन  कामगार प्रवास करणार आहेत त्या वाहनांची  रीतसर परवानगी पत्र, कामगारांच्या वाहतुकीबाबत आवश्यक ते परवाने घेण्याची कार्यवाही करण्याबरोबर कामागारांना प्रवासामध्ये भोजन, पिण्याचे पाणी आदी व्यवस्थेची जबाबदारी संबंधित कारखान्यांची राहणार आहे.कामगारांना घेऊन वाहने जालना जिल्हा हद्दीत प्रवेश केल्यानंतर पोलीस विभागाने येणाऱ्या वाहनांची चेकपोस्टवर संपुर्ण कागदपत्रांची व यादीतील व्यक्तींची तपासणी करावी. तसेच यासाठी स्वतंत्र नोंदवही ठेवावी. चेकपोस्टच्या ठिकाणी पोलीस विभाग संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी समन्वय ठेऊन कामगारांची तपासणी करेल. कामगार गावात आल्यानंतर सरपंच व ग्रामसेवकांनी त्यांना वेगळे ठेवण्यासाठी योग्य अशी जागा निवडावी व आरोग्य विभागाच्या मदतीने संबंधित कामगारांना 14 दिवस क्वारंटाईन करावे. तसेच मुळ गावी पोहोचल्यानंतर कामगारांचा गावप्रवेश, कामगार मुळगावी पोहोचल्याचे प्रमाणपत्र संबंधित सरपंच व ग्रामसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविणे बंधनकारक राहील.तालुका आरोग्य अधिकारी हे संबंधित कामगारांची सरपंच व ग्रामसेवक यांच्या मदतीने 14 दिवस क्वारंटाईन करण्याची व्यवस्था करतील व त्यांच्या दैनंदिन तपासणीसाठी आरोग्य विभागाचे पथक नियुक्त करतील. पथकाने त्या कामगारांची 14 दिवस दररोज भेट देऊन तपासणी करावी व अहवाल नियमितपणे जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठविण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.सामान्य रुग्णालय, जालना येथे दु:खी नगर येथील कोरोनाग्रस्त 65 वर्षीय महिलेची प्रकृती गंभीर असुन टाऊन हॉल परिसरातील एक 55 वर्षीय महिला न्युमोनिया व मधुमेह आजारानेग्रस्त आहेत.  वाटुर ता. परतुर येथील 34 वर्षीय पुरुष, रोषनगाव ता. बदनापुर येथील 21 वर्षीय तरुण, लालबहादुरशास्त्री महाविद्यालय परिसर, परतुर येथील 75 वर्षीय पुरुष हे न्युमोनियानेग्रस्त असुन अंबड येथील 60 वर्षीय पुरुष रुग्ण क्षयरोगग्रस्त असुन जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे दाखल आहेत.  या सर्व रुग्णांच्या स्वॅबचे नमुने निगेटीव्ह आलेले असुन त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.


  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...