बुधवार, २४ जून, २०२०

अंजानी आई फाऊंडेशन तर्फे पंढरपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी सैनिटीजर वाटप


औरंगाबाद,ब्युरोचीफ :- कोरोना व्हायरस ने जगात थैमान घातले असून प्रत्येक जिल्ह्यात कोरोना पेशंट झपाट्याने वाढत आहे .पोलीस प्रशासन जीव धोक्यात घालून  नागरी सेवा करीत आहे दिवसेन दिवस पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांना देखील कोरोनाची लागण  होऊन मृत्यू होत आहे  प्रशासन मार्फत पोलीस ना कोणतेही सेफ्टी किट  दिलेली नाही  पोलीस अधिकारी अंमलदार स्वतःचा जीव धोक्यात घालून  कर्तव्य बजावत आहे.सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अंजनीआई फाऊंडेशन जालना पंढरपूर टीम च्या वतीने शहर पोलिस  स्टेशन पंढरपूर या ठिकाणी पोलीस अधिकारी ठाणे अंमलदार,नागरिक  याना सैनिटीजर वाटप करण्यात आले.
अंजानी आई फाऊंडेशन लॉक डाऊन सुरू झाल्यापासून कार्यरत आहे जालना,औरंगाबाद, पंढरपूर,भुसावळ ,इत्यादी जिल्ह्यात तालुक्यात अंजनीआई फाऊंडेशन जालना ची टीम स्वतः फिल्ड वर्क करत आहे अन्न धान्य, किराणा किट,मास्क,सैनिटीजर,रुमाल,फूड पाकीट ,पायी प्रवासी याना टी -शर्ट,चपल जोड वाटप करण्यात आले.दहा हजार व्हिटॅमिन c च्या गोळ्या ,फेस शिल्ड,औरंगाबाद शहर येथे वाटप करण्यात आले भुसावळ या ठिकाणी गरजू ना किराणा किट देण्यात आली  करण्यात येत आहे किरवले मित्र मंडळ च्या माध्यमातून वाटप सुरू आहे फाऊंडेशन चे काम विविध जिल्ह्यात चालू आहे अंजनी आई फाऊंडेशन
पंढरपूर टीम चे विजय जाधव, सचिन माने,आण्णा वाघमोडे अमोल अधटराव,यांनी सैनिटीजर वाटप केले.अशी माहिती अंजनी आई फाऊंडेशन च्या विद्या जाधव ज्योती आडेकर यांनी दिली.psi बालाजी किरवले यांनी मास्क ,सामाजिक अंतर ठेवण्याचे आव्हान केले.

अर्जुनराव खोतकर यांच्या प्रयत्नांना गटनेता विजय पवार यांची समर्थ साथ


प्रभागातील धार्मिक स्थळांचे करून घेतले निर्जतुंकीकरण

*जालना,प्रतिनिधी :-* माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या विशेष प्रयत्नांतून जालना शहरातील धार्मिक स्थळांचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. त्याच अनुषंगाने श्री खोतकर यांच्या प्रयत्नांना साथ देत पालिकेचे शिवसेनेचे गटनेते विजय पवार यांनी प्रभाग क्र 13 मध्ये हा उपक्रम राबविला असून त्यांच्या नियंत्रणाखाली या भागातील सर्व धार्मिक स्थळ परिसरात फवारणी करण्यासह स्वच्छता मोहिम राबविण्यात आली आहे.शहरातील अनेक भागात कोरोना रूग्ण आढळण्याचे प्रमाण गत काही दिवसात वाढले आहे. त्याचीच दखल घेऊन माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या नियोजनानुसार शहरातील धार्मिक स्थळांचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. प्रामुख्याने औषध आणि धुराची फवारणी करून संबंधीत परिसरात स्वच्छता राहण्यावर मोहिमेअंतर्गत विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या मोहिमेला समर्थ साथ देण्याचा गटनेता विजय पवार यांचा प्रयत्न आहे. या अनुषंगाने प्रभाग क्र 13 मधील सर्व धार्मिक स्थळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आलेले आहे. या परिसरांमध्ये विजय पवार यांच्या नियंत्रणाखाली धूर व औषध फवारणी केली गेली आहे. शिवाय धार्मिक स्थळांसोबत प्रभाग परिसरातही साफ सफाई राखण्यावर श्री पवार यांचे विशेष लक्ष असून कुठल्याही परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड नाही अशी ग्वाही श्री पवार यांनी दिली आहे.


डॉ.जयंत भालेराव यांचे निधन


जालना,प्रतिनिधी :- येथील आनंदवाडी परिसरातील रहिवासी डॉ. जयंत आबाराव भालेराव यांचे सोमवारी (दि 22) दिर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 64 वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर रामतिर्थ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. घनसावंगी येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन अधिकारी म्हणून डॉ. भालेराव हे सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, भाऊ, बहिण, दोन मुले, सुना नांतवडे असा मोठा परिवार आहे.


ऑनलाईन परिक्षेत सचिन आर्य यांचे यश .ऑलंम्पिक दिनानिमित्त आयोजित केली होती स्पर्धा


जालना,प्रतिनिधी :- एकीकडे कोरोना महामारीसारख्या संकटाचा सामना करण्यासाठी जनतेच्या खांद्याला खांदा लावून उभा असलेल्या जिल्हा पोलीस दलातील कर्मचार्‍यांनी आपल्या दैनंदिन कामाकाजासही आवडीनिवडीवरची पकडही कमी होऊ दिलेली नाही. त्याचेच उदाहरण म्हणजे पोलीस दलातील कर्मचारी सचिन आर्य यांनी ऑलंम्पिक दिनानिमित्त अखिल भारतीय स्तरावर आयोजित ऑनलाईन स्पर्धेत विशेष यश संपादन केले हे मानले जात आहे.कोरोना आजारावर मात करण्यासाठी पोलीस प्रशासनासह आरोग्य विभाग, स्वच्छता कर्मचारी तसेच नागरिक गत अनेक दिवसांपासून झटत आहेत. त्यातच सर्वसामान्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी जिल्हा पोलीस दलातील तायक्वांदो खेळाचे राष्ट्रीय पदक विजेते तथा राष्ट्रीय पंच सचिन आर्य यांनी ऑलंम्पिक दिनानिमित्त आयोजित स्पर्धेत सहभाग नोंदवून हे यश संपादीत केले आहे. भारतामधील एकमेव स्पोर्टइन या नामांकीत संस्थेच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात संपादीत केलेले यश हे आर्य यांचे नेत्रदिपक यश मानले जात आहे. या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद देशमुख, जनता पोलीस समन्वय समितीचे धनसिंह सुर्यवंशी, विजय कमळे, राष्ट्रीय खेळाडू विपूल राय, फईम खान, सय्यद निसार, सचिन गादेवार, मयुर पिवळ, प्रतिक ढाकणे यांनी श्री आर्य यांचे अभिनंदन केले आहे.


जिल्ह्यात चौदा व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर वीस रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज - जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती


जालना,ब्युरोचीफ :- शहरातील लक्कडकोट परिसरातील 01,नानक निवास 04, विठ्ठल रुक्मिणी लोधी मोहल्ला 01, काद्राबाद 03, शंकर नगर 01, सरस्वती मंदिर 01,गुडला गल्ली 04, जाफ्राबाद शहरातील अंबेकर नगर 01,जाफ्राबाद शहरातील नगर पंचायत 01, जाफ्राबाद शहरातील आदर्श नगर 01, आदर्श नगर पिंपळखुडा, जाफ्राबाद 01,अंबड शहरातील 01 अशा एकुण 20 रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात तर  जालना शहरातील काद्राबाद परिसरातील 02,मंगळबाजार 03, राज्य राखीव पोलीस बल गट क्रं 3 मधील 01 जवान,नाथबाबा गल्ली 03,मोदीखाना 01,नुतन कॉलनी, भोकरदन 02,गोंदी ता. अंबड येथील 02 अशा एकूण 14 व्यक्तींच्या पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण–3789 असुन  सध्या रुग्णालयात -104, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1436, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–61, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -4674, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने–14 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -398, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -4211 रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-406 एकुण प्रलंबित नमुने-61, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1320.14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती–03, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती –1215, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-44, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-245, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत–16, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -104, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-24, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-20, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-277, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या -102, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या-07, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-10597, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 12 एवढी आहे. आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 245 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-14, शासकीय मुलींचे वसतिगृह  मोतीबाग जालना-29, संत रामदास वसतिगृह जालना-00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-00, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-26, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना–59 मॉडेल स्कुल परतुर-05, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-01, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-11, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-01 मुलींचे शासकीय वसतीगृह भोकरदन-03, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी–02,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन -27, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -00, हिंदुस्थान मंगल  कार्यालय, जाफ्राबाद-09, जिजाऊ इंग्लिश स्कुल जाफ्राबाद –00, जेबीके विद्यालय, टेंभुर्णी-28, शेठ इ.बी.के. विद्यालय टेंभुर्णी -30.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत - 171 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 872 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 827 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली   3 लाख 76 हजार 930 असा एकुण 4 लाख 3 हजार 738 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  


प्रत्येक शेतकऱ्याला पीककर्ज उपलब्ध करुन द्या.

कंन्टेन्टमेंट झोनमधुन नागरिकांनी बाहेर पडू नये.


एसबीआय, युनियन बँक तसेच शहरातील कंन्टेन्टमेंट भागास भेटीप्रसंगी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या सुचना

जालना,ब्युरोचीफ :-जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज दि. 24 जुन रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या मुख्य शाखेस, अंबड येथील एसबीआय  तसेच रामनगर येथील युनियन बँकेला भेट देऊन शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीककर्जाचा बँकेच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.तसेच जालना शहरातील कन्टेन्टमेंट झोनला प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली.बँक अधिकाऱ्यांकडून आढावा घेताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकांच्या लागवडी तसेच मशागतीसाठी पीककर्जाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते.  शासन तसेच प्रशासनामार्फत प्रत्येक बँकांना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.  पीककर्जाचे दिलेले उद्दिष्ट प्रत्येक बँकांनी शंभर टक्के पुर्ण करावे.  तसेच जिल्ह्यातील एकही गरजू शेतकरी पीककर्जापासुन वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देत ज्या बँका दिलेले उद्दिष्ट पुर्ण करणार नाहीत अथवा पीककर्ज देण्यास टाळाटाळ करतील अशा बँकांवर कारवाई करण्याचा ईशाराही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिला.यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण, एलडीएम निशांत ईलमकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


नागरिकांनो कंन्टेन्टमेंट भागातुन बाहेर पडू नका
जालना शहरामधील कंन्टेन्टमेंट भागास जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज प्रत्यक्ष भेट देत या भागाची पहाणी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असुन कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये.केवळ अत्यावश्यक असेल त्या वेळीच घराबाहेर पडा.सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन, मास्क, सॅनिटायरचा वापर, वारंवार साबणाने हात धुणे या बाबींची सवय लावून घेण्याबरोबरच प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


अंबड येथील कापूस खरेदी केंद्राला भेट अंबड येथे सुरु करण्यात आलेल्या कापूस खरेदी केंद्राला जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज प्रत्यक्ष भेट देत खरेदी करण्यात येत असलेल्या कापसाची पहाणी करुन एकाही शेतकऱ्याचा कापूस खरेदीविना पडून राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधितांना यावेळी दिले.यावेळी आमदार नारायण कुचे, उप विभागीय अधिकारी शशिकांत हदगल, जिल्हाउपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांच्यासह अधिकारी व शेतकऱ्यांची  उपस्थिती होती



अंबड तहसिल कार्यालयास जिल्हाधिकाऱ्यांची भेट
अंबड येथील तहसिल कार्यालयास जिल्हाधिकारीरवींद्र बिनवडे यांनी भेट देऊन तेथील कामकाजाचा महसुल अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.यावेळी उप विभागीय अधिकारी शशीकांत हदगल, तहसिलदार श्री शिंदे यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.



मौजे निरखेडा येथील सोयाबीन पेरलेल्या शेतीची जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडून पाहणी




जालना,ब्युरोचीफ :- खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांकडून सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली. पेरणीनंतर काही गावातील बियाणांची उगवण होत नसल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जालना तालुक्यातील मौजे निरखेडा येथील श्री जाधव या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन महाबीजकडून घेतलेल्या सोयाबीन बियाण्याची कमी पेरणी झालेल्या क्षेत्राची पहाणी करुन उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी श्री गाडे, मोहीम अधिकारी श्री कराड, मंडळ कृषी अधिकारी श्री सुखदेवे, कृषी सहाय्यक श्रीमती कुलकर्णी व गावातील शेतकरी उपस्थित होते.


रांजणी परिसरात सोयाबीनच्या पेरणीला आला वेग, शेतक-यांची आधुनिक यंत्रांना पसंती


रांजणी प्रतिनिधी/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी व परिसरात सोयाबीनच्या पेरणीला वेग आला असून शेतकरी वर्ग पेरणीसाठी जुन्या तिफन व फराटा ऐवजी ट्रॅक्टरच्या सहाय्याने आधुनिक पध्दतीने पेरणी करताना दिसत आहे. त्यामुळे आधुनिकतेचा शेती कामावर देखील प्रभाव पडत असल्याचे दिसत आहे.
काही वर्षापूर्वी ग्रामीण भागात बैलांच्या सहाय्याने फराट किंवा तिफनने पेरणी केली जायची. त्यामुळे शेतामध्ये आठ ते पंधरा दिवस शेतक-यांना मुक्काम करावा लागत होता. यामुळे शेतांना एखाद्या गावासारखे स्वरुप येत होते. परंतु माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात सर्वत्र आधुनिक परिवर्तन होत आहे. याला शेती सुध्दा अपवाद राहिली नाही. आधुनिकतेच्या या युगात कोणाकडे वेळ नाही. प्रत्येकाला घंटो का काम मिनटो में करण्याची सवय लागली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच शेतकरी तिफन ऐवजी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करताना दिसत आहे. मागच्या आठवड्यात जास्त पावसामुळे शेतीची कामे खोळंबली होती. त्यामुळे सोयाबीनची पेरणी सुध्दा लांबणीवर पडली होती. सध्या पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी वर्ग पेरणीची कामे आटोपण्याच्या तयारीत असून लवकर पेरणी होण्यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग करताना दिसत आहे.


वीजग्राहकांची प्रचंड लूट, सुलभ हप्त्यांच्या सवलतीचे गाजर - राजेंद्र पातोडे



मुंबई,ब्युरोचीफ :-लॉकडाऊनच्या कालावधीनंतर मीटर रिडींग न घेता सरसकट तींन महिन्याचे वीजबिल ग्राहकांना देऊन त्यांची लूट करण्यात येत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केला आहे. या वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्ते करून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. तथापि ही सवलत नसून शासकीय लूटीला राजाश्रय दिला जात असल्याचे ही त्यांनी सांगितले.

लॉकडाऊनच्या कालावधीत वीज ग्राहकांची मीटर रिडींग घेण्यात आली नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात ग्राहकांना सरासरी वीज वापरानुसार बिल देण्यात आले. मार्चनंतर प्रथमच थेट जूनमध्ये मीटर रिडींग घेण्यात आले. त्यामुळे मार्च ते जून पर्यंतचे रिडींग घेऊन एकूण वीजवापराचे एकत्रित बिल ग्राहकांना देण्यात आले. हे सरासरी बील आकारताना एकूण तीन महिन्याचे बिल एकत्र केल्याने युनिट पाचशेच्यावर जाताच त्याच्या दरात मोठी वाढ करण्यात येत आहे. गृहीत धरा की तीन महिन्याचे सरासरी बिल हे ६६४ युनिट असेल तर त्याला ११. ७१ प्रमाणे आकार लागेल व त्याचे तीन महिन्याचे बिल हे ७७७५ इतके होईल. शिवाय त्या मध्ये इतर चार्ज समाविष्ट केल्यास ती रक्कम ८४०० इतकी होईल. हेच बिल दरमहा आकारले तर ६६४ भागीले तीन महीने केले असता दरमहा  २२१.३३ इतका वीज वापर होतो. त्याचा वीज दर २२१.३३ x ७. ५० पैसे केला तर हे बिल १६५९. ७५ होईल व दरमहा  १६५९.९७ प्रमाणे वीज बिल असल्यास तीन महिन्याचे ४९७९.९२ इतके वीज बिल येईल. परंतु महावितरणने हे सरासरी बिल देताना ८४०० इतके दिले आहे. कारण एकत्रित बिलामुळे वीज आकारात वाढ झाली आहे. वीज बिल आकारणी करताना घरगुती वीज ग्राहकास १०० युनिट पर्यंतचा दर हा २,५७ पैसे अधिक इंधन समायोजन आकार घेतला जातो. १०० ते ३०० युनिट पुढे ४,५५ पैसे अधिक इंधन समायोजन आकार लावला जातो.३०० ते ५०० युनिटचा ६,५१ पैसे तर  ५०१ ते १००० युनिट पर्यंत ७,५५ पैसे आणि १००० युनिट पुढे हा आकार ७,८१ पैसे आहे.
ही दर आकारणी पाहता दरमहा १०० ते ३०० युनिट साठी ४,५५ पैसे अधिक इंधन समायोजन आकार असलेल्या ग्राहकांना सरासरी बिलामूळे ५०० युनिट पेक्षा अधिकचा ७,५५ पैसे दर लावण्यात आला आहे. त्यामुळे वीज बिलात जवळ जवळ दुप्पटीने वाढ झाली आहे. हा ग्राहकाच्या खिश्यावर टाकलेला सरकारी दरोडा आहे. ही महावितरणची मनमानी असल्याचे राजेंद्र पातोडे यांनी सांगितले.
एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीचे वीजबिल असल्याने स्लॅब बेनिफिट देण्याचे तसेच ग्राहकांनी एप्रिल व मे मध्ये सरासरी वीजबिलांची रक्कम भरली असल्यास त्या रकमेचे समायोजन करण्यात येईल, चुकीच्या बिलाची दुरुस्तीसाठी तत्परतेने कार्यवाही करण्यात यावी व ग्राहकांना चुकीच्या वीजबिलांचा कोणताही त्रास होऊ नये, अशा सूचना महावितरणला देण्यात आल्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत सांगितले.परंतु वीज बिल न भरता ही दुरुस्ती होणार नाही. त्यामुळे दिलेल्या रकमेच्या अवाजवी वीज बिलाचा भरणा ग्राहकाला करावा लागेल. सोबतच बिल कमी करण्यासाठी किंवा दुरुस्त्यासाठी वीज कार्यालयाच्या फे-या माराव्या लागतील.
महावितरणच्या ग्राहकांवर वीजबिलांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा भुर्दंड लादलेला नाही, असे ऊर्जामंत्री सांगत असले तरी  जूनमध्ये देण्यात येत असलेली वीज बिले ही लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी वापरलेल्या सरासरी युनिट प्रमाणे दिले आहे. त्यामध्ये ग्राहकांना लुटण्यात येत आहे.सबब वीज ग्राहकांनी ही अवास्तव वीज बिलाचा भरणा करू नये. https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर जाऊन आपल्या रीडिंगची तपासणी करावी व सरासरी बिल न घेता दरमहा बिल (तीन स्वतंत्र बिल) घेऊनच वीज बिलाचा भरणा करावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे.


कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात अपुऱ्या सुविधांमुळे,वंचितने अधिकाऱ्यांना धरले धारेवर


कल्याण,ब्युरोचीफ :- अपुऱ्या सुविधांमुळे कल्याणच्या रुक्मिणी रुग्णालयात एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला होता. असे प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून रुक्मिणी रुग्णालयात वेंटिलेटर व बेडची संख्या वाढवावी, खाजगी रुग्णालयात आयसोलेशन वाढ तयार करण्यात यावा, टेस्ट लॅबची संख्या वाढविण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या ठाणे विभागाच्यावतीने कल्याण-डोंबिवली मनपा अधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन जाब विचारण्यात आला.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून आरोग्याच्या गैरसोयींमुळे सामान्य व्यक्तींचे अतोनात हाल होत आहे. कल्याणच्या रुक्मिणी रूग्णालयात व्हेंटिलेटर व बेड उपलब्ध नसल्याने एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे रुक्मिणी रुग्णालयात बेड व व्हेंटिलेटर वाढविण्यात यावे, खाजगी रुग्णालयात आयसोलेशन वार्ड तयार करावा. कोविडच्या टेस्टसाठी लॅब वाढवाव्यात.  पालिका रुग्णालयात कर्मचारी व  रुग्णवाहिकेची संख्या वाढविण्यात यावी. या व इतर मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या ठाणे महिला जिल्हाध्यक्ष माया कांबळे, नितीन वानखेडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रुपेश हुंबरे यांच्यावतीने कल्याण-डोंबिवली मनपा अधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आले.


कोकणवासीयांना तात्काळ मदत करावी - प्रकाश आंबेडकर


आपत्तीग्रस्तांना 'वंचित'च्यावतीने अन्नधान्य, कपड्यांचे वाटप !

*रायगड,ब्युरोचीफ :-*  निसर्ग वादळामुळे कोकणवासीयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून फळबाग, घरे तसेच शाळांना त्याचा मोठा फटका बसला आहे. शासनाने यांना मदतीचा हात पुढे केला असला तरी अद्यापही मदत मिळालेली नाही. त्यामुळे कोकणवासीयांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. या ठिकाणी त्यांनी अनेक कुटुंबांना आज गरजेच्या वस्तूंची मदत केली. शिवाय येत्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणावर गरजेच्या वस्तू, अन्न धान्याचे वाटप देखील करण्यात येणार आहे.'निसर्ग' वादळाने कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. त्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे आज मंडणगड तालुक्यात आले होते. सुपारी आंबा-काजू या फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच हजारो घरांचे छप्पर उडून गेले असून अनेक घरांची पडझड झाली आहे. शाळा तसेच महावितरणचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक भागात अद्यापही वीज प्रवाह सुरळीत झालेला नाही. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावरही झाला आहे.
कोकणात गुंठा पद्धत असून कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात एकरी आणि हेक्‍टरी नुकसान भरपाई देण्याची पद्धत आहे ही पद्धत या ठिकाणी अंमलात आणू नये, गुंठा पद्धतीनेच नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच ज्या घरांचे नुकसान झाले आहे ते सरसकट न देता प्रत्येक घरांचे किती नुकसान झाले आहे ते पाहून नुकसान भरपाई देण्यात यावी, जेणे करून ते त्यांच्या पायावर उभे राहतील. अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी शासनाला केली आहे. हे सरकार कोकणवासीयांवर उभे असून कोकणातील लोकांनी पहिल्यांदाच मदत मागितली आहे. सेना त्यांना पूर्णपणे मदत करेल अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. महाड या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन या पाहणी दौऱ्याची सविस्तर माहिती प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांना दिली. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.


कापूस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान, अकोला राज्यातील पहिली जिल्हा परिषद


अकोला,ब्युरोचीफ :- अल्पभूधारक सर्वसाधारण शेतकऱ्याला आर्थिक पाठबळ देण्यासाठी तसेच त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना कपाशी बिजी२ बीटी बियाणे लागवडीसाठी ९० टक्के अनुदान योजनेला मान्यता देण्यात आली आहे. अशी योजना मंजूर करणारी अकोला जिल्हा परिषद ही राज्यातील एकमेव आहे. वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या योजनेबाबत सूचना केल्या होत्या.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण कृषि अर्थव्यवस्था अडचणीत आली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. माणसांचे जीवनमान सर्व शेतीवरच अवलंबून असते. कितीही क्रांती झाली तरी पोटाला लागणारे अन्न जमिनीतून निर्माण होते. त्यासाठी शेतकरी काबाड कष्ट करतो. मात्र समाजाचा व शासनाचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था वाईट होत चालली आहे.या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा विचार करता, या वर्षी भारतातील कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे म्हणून शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळावा यासाठी अकोला जिल्हा परिषदेने अल्पभूधारक, सर्वसाधारण शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचे निश्‍चित केले आहे. २०२०-२१ खरीप हंगामात शेतकऱ्यांना कपाशी बिजी २, बीटी बियाणे लागवडीसाठी 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. 90 टक्के अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी अध्यक्ष प्रतिभा भोजने, सभापती पंजाबराव वडाळ, पशुसंवर्धन समिती व गटनेते यांनी सहकार्य केले. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे यांनी दिली.


  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...