सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२०

             जिल्हा स्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत आंतरवाली राठी 
                                शाळेचे घवघवीत यश

सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) :- दि.१५ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय प्रश्न मंजुषा कार्यक्रम जि.प.मुलांची शाळा जालना येथे संपन्न झाला.मुलांच्या बौद्धिक क्षमता अधिक प्रभावीपणे विकसित करण्यासाठी व संपादन कौशल्य कितपत प्रभावी पणे अंमलबजावणी होतात याची अचूक पडताळणी व स्पर्धात्मक परीक्षेसाठी ग्रामीण भागातील मुलांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध करण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या
मार्गदर्शनाखाली प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन जिल्हास्तरावर करण्यात आले.स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी प्राथमिक कैलास दातखीळ, उपशिक्षणाधिकारी मंगल धुपे,गटशिक्षणाधिकारी कडेलवार,विस्तार अधिकारी विनया वडजे,विस्तार अधिकारी सोळंके,केंद्रप्रमुख अण्णासाहेब खिल्लारे यांची उपस्थिती होती.या स्पर्धेत १ली ते ५ गटात घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली राठी केंद्र राणीउंचेगाव शाळेतील मुलांनी प्रथम क्रमांक पटकावला यामध्ये अमृता गायकवाड,वनराज गव्हाणे,अमृता कंक,सिद्धेश्वर कळकुंबे,पृथ्वीराज डवले मुलांचा सहभाग होता.६ वि ते ८ वि  गटात द्वितीय क्रमांक पटकावला यामध्ये अनुजा सांगळे,शितल डवले,हर्षद कंक,प्रणाली डवले,यांचा सहभाग होता.मुलांच्या बौद्धिक क्षमतेची कस या स्पर्धेच्या माध्यमातून प्रभावीपणे दिसून आली. तालुक्यातील स्पर्धेत मिळवलेल्या यशाच्या जोरावर जिल्हा स्तरीय स्पर्धेत मुलांनी अवांतर वाचनाचा पुरेपूर उपयोग केला,मुलांमध्ये असणारा प्रगल्भ विचार व स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक असणारा सराव शाळेतील शिक्षक गोरखनाथ पवार,भाऊसाहेब बहिर,सुभाष इंगळे यांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे मुलांना यश संपादन करण्यासाठी कामी आले.या वेळी यशस्वी विध्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी मुलांना प्रमाणपत्र व टॅब भेट देऊन सत्कार केला.या वेळी अंतरवाली राठी शाळेचे मुख्याध्यापक पटेकर,सहशिक्षक भाऊसाहेब बहिर,सुभाष इंगळे,प्रियंका तिरपुडे,गोरखनाथ पवार,विस्तार अधिकारी रमेश देशमुख,केंद्रप्रमुख राजेश सदावर्ते,उपस्थित होते.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...