शनिवार, १८ एप्रिल, २०२०

💥प्रशासनाच्या ‘पॉझीटीव्हीटी’ पुढे.. कोरोना झाला ‘निगेटीव्ह’..!
💠जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्यासह डॉक्टर्स, नर्सेस यांनी                            टाळ्या वाजवून व्यक्त केला आनंद💠

    🔹रूग्णवाहिकेतून प्रशासनाने तीन रूग्णांना सोडले घरी🔹 

बुलडाणा, प्रतिनिधी:-कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असताना जिल्ह्यालाही आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या कोरोनाबाधीत रूग्णाचा अहवाल मृत्यूनंतर पॉझीटीव्ह आल्यानंतर जिल्हा प्रशासन खळबळून जागे झाले. 
त्यानंतर प्रशासनाने पॉझीटीव्ह रूग्णाच्या हायरीस्क व लो रिस्क संपर्कातील सर्वांना ताब्यात घेत त्यांचे विलगीकरण केले. त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. सदर मृत रूग्णाच्या निकट संपर्कातील आणखी चार रूग्ण पॉझीटीव्ह आल्यानंतर जिल्हाभर सुन्न वातावरण निर्माण झाले. त्यानंतर प्रशासनाने क्लस्टर कन्टेन्टमेंट प्लॅन लागू करीत कडक उपाययोजना केल्या. प्रशासनाने केलेल्या सर्व ‘पॉझीटीव्ह’ प्रयत्नांमुळे अखेर कोरोनाला ‘निगेटीव्ह’ करीत पहिल्या तीन रूग्णांना रूग्णालयातून आज 17 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजेदरम्यान डिस्चार्ज देण्यात आला.
 प्रशासनाने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे आज तीनही रूग्णांचे दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्यांना आनंदाने जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.  शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारादरम्यान संबंधित रुग्णांचे दोन्ही अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन्ही तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने 19 दिवसानंतर या रुग्णांना आज डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण उपचारात बरे झाल्याने रुग्णांच्या चेहऱ्यावर तर आनंद होताच, मात्र त्याला बरे करण्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावलेले कोरोना संसर्ग वार्डात काम करणारे डॉक्टर, पारिचारिका, कर्मचारी यांच्या चेहऱ्यावरुनही आनंद ओसंडून वाहत होता. त्यामुळे या सर्वानी टाळ्या वाजवून संबंधित कोरोनाबाधीत रूग्ण बरे झाल्याचा आनंद व्यक्त केला. यानंतर जिल्हाधिकारी यांनी डिस्चार्ज पेपर देवून, रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना घरी सोडण्यात आले.
बुलडाणा येथे 28 मार्च रोजी  एका संशयीत व्यक्तीचा उपचारादरम्यान रूग्णालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट कोरोनाबाधीत आला होता. त्यानंतर त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना दाखल करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. यामध्ये चार संशयीतांचे रिपोर्ट कोरोना पॉझीटीव्ह आले. तपासणी अहवालानंतर कोरोना संसर्ग वार्डात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले.  तसेच शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या रुग्णांवर तसेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात तपासणी, उपचार करण्यात आले. कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तींचे दोन्ही स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पहिला तपासणी अहवाल निगेटीव्ह असल्याचा, तर दुसरा तपासणी रिपोर्टही निगेटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. दोन्ही अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर बाधीत रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्याला आज डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले. घरी जातांना या रूग्णांच्या चेहऱ्यावर आनंद होता. त्यांनी मनोमन वॉर्डातील नर्सेस, ब्रदर, आरोग्य कर्मचारी यांचे मनोमन धन्यवाद मानले.                                               

           गुंडेवाडी येथील महिलेचा पती व निकटसहवासित 
                       विलगीकरण कक्षात दाखल.
      संबंधितांच्या स्वॅबचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी
जालना, प्रतिनिधी :- जालना तालुक्यातील गुंडेवाडी येथील भुमी कॉटेक्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांपैकी एक 30 वर्षीय  महिला ही गुजरात राज्यात गेली व सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात जालना येथील दु:खीनगर भागाती कोरोनाग्रस्त 65 वर्षीय महिलेची प्रकृती गंभीर आहे.  तसेच एक ५५ वर्षीय महिला न्युमोनिया व मधुमेह तर 62 वर्षीय महिला गंभीर फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त असुन दोघींचीही प्रकृती गंभीर आहे.  या दोनही महिलांच्या स्वॅबचे नमुने निगेटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.जालना जिल्ह्यात कोरोनाच्या एकुण 698 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 122 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 405 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 32 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 486 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने निरंक असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 01 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 438, रिजेक्टेड नमुने-03, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 78, एकुण प्रलंबित नमुने-42 तर एकुण 283 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 27, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 142 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 31, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-98, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 03, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 122, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 67 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच नागरिकांकडून लॉकडाऊनचे उल्लंघन होऊ नये यादृष्टीकोनातुन चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असुन लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत 251 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 15 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 15 वाहने जप्त करण्याबरोबरच 26 हजार 808 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.दि 17 एप्रिल, 2020 रोजी 30 वर्षीय तरुणास खासगी रुग्णालयातुन जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्यवस्थ स्थितीमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. खबरदारी म्हणून तरुणाच्या स्वॅबचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला असुन त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही.तपासणीअंती कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती गुजरात पोलीसांमार्फत जिल्हा नियंत्रण कक्षास मिळाली. त्यानुसार महसुल, आरोग्य, पोलीस व पंचायत विभागाच्या पथकाने गुंडेवाडी येथील भुमी कॉटेक्स येथे जाऊन महिलेच्या 37 वर्षीय पती व त्यांच्या 15 निकट सहवासितांना जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे विलगीकरण कक्षात दाखल करुन त्यांच्या स्वॅबचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तालुका आरोग्य अधिकारी, जालना व वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र पिरपिंपळगाव यांना कन्टेटमेंट प्लॅनच्या अनुषंगाने सुचना केल्या. तसेच महिलेच्या संपर्कात आलेल्या सहवासितांच्या पाठपुराव्यासाठी एक वैद्यकीय अधिकारी, दोन पर्यवेक्षक व 12 आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले सहा पथके तयार करण्यात येऊन तेथे सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे.मुंबई येथुन आलेल्या राज्य राखीव दलाच्या 97 जवानांची वैद्यकीय तपासणी करुन 87 जवानांना पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना येथे अलगीकरण कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात आले असुन उर्वरित 10 जवानांना जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

शिवसेनेच्या वतीने दहा हजार घरापर्यंत भाजीपाला देण्याच्या                                       मोहिमेचा शुभारंभ.
कोरोना विषाणू संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉक डाऊन कालावधित जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी केलेले सर्व कार्य लोकोपयोगी : माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर
जालना,प्रतिनिधी:- शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी दहा हजार घरापर्यंत मोफत भाजीपाला वितरित करण्याचा उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमाचा
शुभारंभ आज (दि.18) शनिवार रोजी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार संतोष सांबरे, उपजिल्हाप्रमुख पंडीतराव भुतेकर, शहरप्रमुख विष्णू पाचफुले,  युवासेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, माजी शहरप्रमुख बाला परदेशी, शहर संघटक दीपक रणनवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी वरील उद्गार काढले.पुढे बोलतांना ते म्हणाले की, सध्या लॉक डाऊन असल्यामुळे नागरिक अत्यंत अडचणीत आहेत.यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. कारोना संसर्गाच्या राज्यातील गंभीर स्थितीमुळे वाढलेलं गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेनेच्यावतीने शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी सुरुवातीपासूनच मुकाबला कोरोनाचा ही मोहीम हाती घेऊन त्या अंतर्गत हॅण्डबील वाटप करणे,शहरातील प्रमुख चौकात होर्डीग लावणे, ऑटो रिक्षामधून आवाहन करून जनजागृती करणे व नंतर प्रत्यक्ष मदतकार्य करण्यास सुरुवात केली असून मास्क वाटप, अन्नदान वाटप, अन्नधान्य वाटप व आता घरपोच भाजीपाला वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे आणि हे सर्व कार्य अखंडपणे सुरू आहेत.  एवढे सगळे उपक्रम राबविणारा जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्यासारखा कार्यकर्ता अभावानेच असेल असे गौरवोद्गार यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी काढले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की, जनतेने आम्हाला खूप दिले त्याची परतफेड करण्याची ही वेळ असून अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. अशा या लॉक डाऊन कालावधीमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी घरात बसण्यापेक्षा लोकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक हेही आपल्या भागांमध्ये मदत करीत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवजी ठाकरे यांनी सेवाभावी संस्था त्याचप्रमाणे पदाधिकारी यांना कळकळीचे आवाहन करून अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्यास सांगितले असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेने हे कार्य अखंडपणे सुरू ठेवलेले आहे. अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी सांगितले. यावेळी उपशहरप्रमुख घनश्याम खाकीवाले, युवासेनेचे शहरप्रमुख दुर्गेश काठोटीवाले, उपशहरप्रमुख किशोर नरवडे, संतोष जमदडे,  गणेश लाहोटी, गणेश तरासे, मदन खरात, राजू इंगळे, सुभाष पितांबरे, रामेश्वर कुरील, यांच्यासह शिवसेना पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...