शनिवार, ७ मार्च, २०२०

       सावगी तलान शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.
सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) केंद्रिय प्राथमिक शाळा सावंगी तलान केंद्र-सावंगी (त) ता. जालना दिनांक 05/03/2020 गुरुवार रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी
 कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू डोंगरे हे होते.उदघाटक कमलाकर कळकुंबे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जालना,प्रभाकर रंधवे सरपंच,डॉ.श्याम कळकुंबे उपसरपंच,रामजी खराडे,काशीनाथ राठोड ग्राम पंचायत सदस्य,प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्रकुमार हंसराजजी ओस्तवाल माजी सहसचिव श्री वर्धमान स्थानक वाशी जैन श्रावक संघ जालना,संदिप सखारामपंत बदनापूरकर प्रसिद्ध पत्रकार तसेच जिल्हा प्रतिनिधी दैनिक भास्कर जालना,भागवत जेटेवाड केंद्रप्रमुख, अशोक गायकवाड माजी केंद्रीय मुख्याध्यापक,माधव विभूते सहशिक्षक,संभाजी उस्तुर्गे केंद्रिय मुख्याध्यापक, परमेश्वर चिंचोले ग्रामसेवक,अजिमखान अत्तार,कैलास मुळे,विष्णू मोरे,बाळू हरकळ,जोती अहेरकर,सीमा खराडे,अस्मिता राठोड,सुनिता रंधवे,गजानन कळकुंबे,डिगंबर कळकुंबे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,भीमशक्ती युवा मित्रमंडळ चे सर्व सदस्य तसेच गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत,लावणी,गोंधळ कोळीनृत्य,भांगडा,धार्मिक गीते यांवर बहारदार नृत्य सादरीकरण केले त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा परिचय देणारा पोवाडा व बेटी बचाव बाबत संदेश देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माराम बोलसुरे,आश्विनी पाटिल यांनी केले.तर सूत्रसंचालन सत्यव्रत लोखंडे,प्रशांत भुरे यांनी केले. तसेच उपस्थितांचे आभार नारायण माहोरे मुख्याध्यापक पाथ्रूड तांडा यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशन ईरमले,अशोक गुहाडे,सतीश श्रीखंडे,रजनीकांत खिल्लारे,नारायण माहोरे,रामदास लिहिणार,गंगाधर होनवडजकर,रमेश रुद्रे,के.के.तळेकर,लक्ष्मण राठोड,विपिन भगत व गावातील सर्व तरुण यांनी अथक परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट रित्या विद्यार्थ्यांनी सादर केल्याबद्दल सर्व गावकऱ्यानी सर्व शिक्षकांचे कौतुक केले.यावेळी गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण तयार झाले.
अंबड तालुक्यातील मार्डी येथे राहत असलेले अजय भोजने यांचा मनवेडा अल्बम साँग रिलीज युट्युब वर चांगला प्रतिसाद
                           अभिनयातला उगवता तारा
अंबड़/प्रतिनिधि : यु-ट्यूब वर सद्या  'मनवेडा'  हे अल्बम साँग गाजते हे
 साँग अनेकांनी पहिले ही असेल हे नुकताच पुनेकरानी नवे तर हे साँग
अंबड़  शहरातील एका विद्यार्थ्यांनी बनवलेल आहे.
अजय एकनाथ भोजने रा. मार्डी ता. अंबड़ जि.जालना  पुढील शिक्षणाकरित  तो शेवगांव वीखे फाउंडेशनच्या मेडिकल कॉलेज मधे शिक्षण घेत असे शिक्षण घेता घेता त्याला अभिनयाचा छंद जडला. तो मित्रांना अभिनय करुन दखवाईचा त्याचा अभिनय इतरांना आवडू लागला. मग त्याने स्वतः चा अल्बन  साँग बनवाईचा निर्णय घेतला.आणि सुरु झाली.चित्रकरनापासून तर एडिटिंग, कास्टिंग, मेकअप आणि साँग प्रदर्शित करण्यापर्यंत ची माहिती मिळविण्याची तयारी  व एक-ए माहिती मिळवत गेला. त्या प्रवासात अनेकांना भेटून चांगले मित्र व मार्गदर्शक मिळाले. मित्राच्या संपर्क धनंजय आरसुळे यांच्या सह्याने जालना येथील एनफिनिटी स्टूडियो येथे विशाल कांबळे यांच्याकडून संगीतसाज चढवला. आता गान तयार झाल होत. फक्त चित्रिकरणाचा अवकाश होता. हरो म्हणून स्वतः अजय भोजने तर हेरोइन निकिता कुलकर्णी (कट्टी बट्टी फेम, लग्नाची वाईफ, वेन्डिंगची बायको फेम) या ऐक्टर ने होकर दरविला. पुढील शूटिंग चे काम सुरु झाले. 4 दिवसात त्यानी औरंगाबाद परिसरात त्यांनी 'मनवेडा' अल्बम साँग चित्रित केले. शेवगाव जि.अ.नगर येथील क्रीएटिव्ह आर्टसचे मुकेश तुपविहिरे यांनी हे अल्बम सोंग संकलित केले. या गिताचे निर्मिति निर्दर्शकआणि अभिनय आशा विविध बाजू अजय भोजने यांनी पेलले अल्बन साँग अगदी व्यवसायिक पद्धतीने चित्रित करण्यास त्यांना यश मिळाले. मनवेडा अल्बम साँग  तयार करण्यासाठी संदीप डेबडे, विशाल दिधे, रोहन राजगुरु, कृष्णा डोंगरे, नाजिम शेख, प्रकाश पाटिल, अक्षय जधाव, अलटकर, हितेन शहा, धनंजय आरसुळे, प्रकाश गुंठे, दीपक हरवारे, अस्या मित्रांनी चांगला प्रतिसाद दिला. तर संदीप डेबडे यांनी खुप सहकार्य केले  व दयानेश आंधळे यांनी चित्रीकरण,  गीत चित्रबद्ध किरण गायकवाड़ यांनी संहिता लिहली. मनवेडा अल्बम साँग यू-ट्यूब वर रिलीज आहे. अजय भोजने चा पहिला प्रयन्त कौतुकास्पद ठरला आहे.
रोबोटिक तंत्रज्ञान रुग्णांसाठी वरदान - आरोग्यमंत्री राजेश टोपे
रोबोटिक शस्त्रक्रिया लाऊज व ऑपरेशन थिएटर चे उद्घाटन
जालना /प्रतिनिधी. :- रोबोटीक तंत्रज्ञानामुळे अत्यव्यस्थ रूग्णांवर सहज उपचार करणे शक्य होणार आहे. नाशिकमध्ये एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने नाशिकचे पर्यायाने
महाराष्ट्राचे नाव जागतिक स्तरावर पोहोचेल व रोबोटिक तंत्रज्ञान रूग्णांसाठी वरदान ठरेल, असे गौरवोद्गगार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये आयोजित केलेल्या पहिल्या रोबोटिक शस्त्रक्रिया लाउंज आणि रोबाटिक ऑपरेशन थिएटरच्या उदघाटन सोहळ्या प्रसंगी केले.
      यावेळी एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्येआयोजित केलेल्या पहिल्या रोबोटिक शस्त्रक्रिया लाउंज आणि रोबाटिक ऑपरेशन थिएटरच्या उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून केंब्रिजचे मार्क स्लॅक, ऑस्ट्रेलियाचे मार्कस कॅरी, पद्मश्री डॉ. रमाकांत देशपांडे, सीएमआर सर्जिकलचे सीईओ वेगार्ड नेर्सेट, एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे एमटी आणि मुख्य सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. राज नगरकर उपस्थित होते. यावेळी रोबाटिक ऑपरेशन थिएटरचे उदघाटन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाली. पुढे बोलतांना आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, ‘कॅडेव्हर प्रशिक्षण व संशोधन केंद्र असणे, ही काळाची गरज आहे. भारतातील पहिली रोबोटिक कॅडेव्हर लॅब एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये उभारल्याने, त्याचा लाभ सर्वसामान्य रूग्णांना व्हावा यादृष्टीने राज्य सरकार पुढाकार घेणार आहे. या लॅबच्या परवानगी संबंधांची नियमावली भारत देशासाठी असेल. त्यात राज्य सरकार पुढाकार घेईल. त्याचबरोबर लॅबच्या सुविधा सर्वसामान्यांना मिळाव्यात याकरिता पीपीपी तत्वावर राज्य सरकारकडून प्रयत्न केले जातील तसेच राज्यात रोबोटीक शस्त्रक्रिया पीपीपी तत्वावर सुरु केल्यास चार विभागांना त्याचा फायदा होईल असे ही टोपे यांनी स्पष्ट केले.यावेळी डॉ. राज नगरकर म्हणाले की, एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर हे नेहमीच नावीन्याचा शोध घेत प्रगत तंत्रज्ञान रूग्णांच्या सेवेत घेऊन आलो आहोत. त्यामुळे नाशिकचे नाव जगाच्या नकाशावर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या तांत्रिक बदलामुळे आता रोबोटिक शस्त्रक्रियेचा सगळीकडे वापर केला जात आहे. नाशिकमध्ये देखील पहिल्या रोबोटिक शस्त्रक्रिया लाउंज आणि रोबोटिक ऑपरेशन थिएटरचा प्रारंभ झाल्याने रूग्णांना याचा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.याकार्यक्रमास नागरिकांची मोठया संख्येने उपस्थित होती.
                           8 मार्च महिला दिन विशेष
अशिक्षित सीताबाई ते उद्योजक सीताबाईचा थक्क करणारा प्रवास सिंधी काळेगाव येथे सुरू झालेली आवळा कॅन्डी ची हेच थायलंड पर्यंत विक्री.
सिंधी काळेगाव/(श्याम गिराम) प्रतिनिधी :-अंबड तालुक्यातील 
ताडहदगाव  येथे शेतकरी   कुटूंबीयात जन्मलेल्या  सिताबाई मोहिते . कुटूबातील परीस्थीती जेमतेम त्यामुळे सिताबाई कधीही शाळेत जाण्याचा विषय च नव्हता त्यामुळे घरची गरीबी असल्यामुळे सिताबाई  कधीही शाळेत चाऊ शकल्या नाही. त्यात ग्रामीन भागात लग्नही लवकरच व्हायचे . त्यामुळे त्याच लग्न ही लवकरच झाले. जालना तालुक्यातील घोडेगाव येथील रामभाऊ मोहीते यांच्या साबत त्याचा विवाह झाला . सासर ची थोडीफार शेती होती परंतु रामभाऊ सिंधी काळेगाव येथे सालगडी म्हणुन कामाला राहीले . त्यामुळे सिताबाई सुद्धा रामभाऊ सोबत काम करू लागल्या . परंतु स्वत:ला लिहीता वाचता येत नसल्याने त्यांना खुप राग येत होता. त्यामुळे त्याना काहीतरी नविन करण्याची उम्मीद निर्मान झाली. काहीतरी जोडधंदा करावा अस त्यांना मनोमन वाटत होते. त्यासाठी त्या धडपड करत होत्या .  परतु त्या निरक्षर असल्याने त्याना अनेक अडचनीचा सामना करावा लागत होतो.  एकदा त्याच्या मैत्रीनीजवळ  त्यानी आवळा कँन्डी बघीतली व घेतली ती चविस्ठ  लागली   त्यामुळे त्यानी ती आळला कँन्डी बनवली त्या व्यक्तीची भेट घेतली . योगायोगाने ती व्यक्ती ही ओळखीची निघाल्याने सिताबाई ला मनोमन आनंद झाला .  व त्याच्याकडून आवळा कँन्डी बनवण्याची प्पकीया जाणुन घेतली . परतु पहीलीच वेळे असल्याने सिताबाई कडून प्रमान चुकले  परंतु त्यामुळे त्या  नाराज झाल्या होता.  परंतु काही तर करायच्या उम्मेदीमुळे परत त्यांनी त्या व्यक्तीची भेट घेतली . नतंर त्या व्यक्तीने तूम्ही रितसर प्रशिक्षन घेण्यास सांगीतले. त्यामुळे मोहिते दापत्यांनी खरपूडी येथील विज्ञान केद्रात प्रशिक्षन घेतले . व त्या नतंर परभणी येथील कृषी विद्यापीठात ही प्रशिक्षन पुर्ऩ केले . विशेष म्हणजे रामभाऊ मोहिते हे शिक्षीत असल्याने ते सर्व सिताबाई ला समजावुन सांगत होते. परंतु निरक्षर असलेल्या सिताबाई यांच्याकडून अनेक वेळा चूका झाल्या . परंतु सिताबाई ने कधीही हार मानली नाही . नंतर च्या काळात आळला कँन्डी विक्री होऊ  लागल्याने  त्यातुन त्यानी दोनशे (२००) रुपए जमा केले त्यातून त्यांनी थोड्या प्रमानात साहीत्य घेऊन त्यानी भोलेश्वर फळ व भाजीपाला उद्योग सुरू केला . व सन १९९७ मध्ये स्वत: शेद्रीय खताचा वापर करून  रोपे तयार केले.व त्याची विक्री करू लागले . दोन तीन वर्षा नंतर त्यांचा आवळा कँन्डीचा व्यवसाय सुरळीत चालु लागला .   व त्याना चांगले उत्पन्व मिळु लागले . विशेष म्हणजे त्यांना आवळा कँन्डी ची विक्री ही शेजार्यापासुन सुरू केले ते थेट थायलंड पर्यत गेल्या . त्यानंतर त्यानी अनेक कृषी प्रदर्शनात  सहभाग घेतला . प्रदर्शनामुळे आवळा कँन्डीला प्रसिद्धी मिळु लागली . व आवळा कँन्डीची मागणी ही वाढू लागली त्यामुळे त्यांना आर्थिक उत्पन्न मिळू लागले . व आज ही त्याचा व्यवसाय जोमाने सुरू आहे. व महाराष्ट्र शासनाने त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानीत केले आहे.
२०० रुपऐपासून सूरूवात.
सिताबाई मोहिते यांनी अगदी  कमी  भांडवलावर स्वत:चा व्यवसाय सुरू केला होता. त्यांनी सुरूवातीला फक्त २०० रुपऐ चा आवळा खरेदी केला होता. सन २००३ मध्ये शेतकरी मेळाव्यात त्यांनी आवळा कँन्डी व सरबत चा स्टॉल लावला  होता . व पाच दिवस सुरू असलेल्या  मेळाव्यात त्यांनी १२०० चे विक्री केली . व आवळ्याने २००रुपऐ वजा करता  त्यांना निव्वळ नफा १०००रुपऐ राहीला होता . व त्या नफ्यातून त्यानी आवळा  उद्योक मोठ्सा जोमाने सुरू केला व त्यानतंर त्याच्या या उद्योगाला भरभराटी आली .

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...