बुधवार, ४ मार्च, २०२०

पाडळी च्या महिलांनी धुंंडाळली स्वयंरोजगाराची वाट, होळीसाठी इको फ्रेंडली रंगाची निर्मिती बाजारातील वाढती मागणी
बदनापूर प्रतिनिधी: - बदनापूर, ता.2 : बदनापूर तालुक्यातील अवघ्या 70 उंबरठ्याचे छोटेसे गाव असलेल्या पाडळी (ता बदनापूर) येथील
महिला स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करीत आहेत. या महिला मागील दोन वर्षांपासून नैसर्गिक साधनांचा (इकोफ्रेंडली) वापर करून होळीच्या रंगांची निर्मिती करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या गाठीशी दोन पैसे जमा होत असून छोट्या उद्योगापासून मोठा उद्योग सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.उपक्रमशील आणि जलसाक्षर पाडळी दुधना नदीच्या काठी असलेले पाडळी गाव उपक्रमशील आहे. गावाला संत गाडगेबाबा स्वच्छता  अभियानाचा पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळाला आहे. शिवाय पानंदमुक्त गाव अशी पाडळीची ओळख आहे. गावनजीकच्या दुधना नदीचे लोकसहभाग आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून खोलीकरणाचे काम झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. महिलांनी धरली स्वयंरोजगाराची वाट पाडळी येथील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्मितीवर भर देत आहेत.ग्रामविकास समिती ( रा. स्व. संघ) माध्यमातून नैसर्गिक कच्चा माल घेऊन होळीसाठी नैसर्गिक रंगांची निर्मिती केली जात आहे. यासाठी गटाच्या प्रमुख सुनीता दत्तात्रय सिरसाठ यांच्या पुढाकाराने महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. मागच्या वर्षी या गटाने होळीच्या नैसर्गिक रंगाची निर्मिती केली होती त्यास बाजारात मोठी मागणी होती. शिवाय दिवाळीच्या वेळेस नैसर्गिक साधनांचा वापर करून सुगंधित उटनेही तयार केले होते. एकूणच महिलांना उद्योगातून उत्पन्न मिळत असल्याने गावातील इतर महिलाही स्वयंरोजगारासाठी पुढाकार घेत आहेत.अशी होते नैसर्गिक रंगाची निर्मिती पाडळी येथील सुनीता सिरसाट यांच्यासह कालींदा प्रल्हाद सिरसाठ, सीता राजेंद्र सिरसाठ, नंदाबाई विष्णू सिरसाठ, राधा रखमाजी मदन, अश्विनी दत्तात्रय सिरसाठ, मीना एकनाथ सिरसाठ, राधा कैलास सिरसाठ, जिजाबाई विष्णू अंभोरे, ध्रुपदाबाई बाळू शिनगारे या दहा महिलांनी ग्रामविकास समिती कडून उडीद डाळीचे पीठ, मक्याचे पीठ, बुंदीसाठी लागणारा खाता रंग असे कच्चा माल विकत घेतला. त्यानंतर 100 किलो कच्चा मालातून प्रमाणबद्ध मिश्रण केले. शिवाय त्याला उन्हात वाळू घातले. त्यानंतर त्याची आकर्षक पॅकिंग केली. आता हा माल बाजारात विक्रीसाठी तयार झाला आहे.प्रतिसाद पाहता दुपटीने रंगाची निर्मिती मागच्या वर्षी महिलांनी तयार केलेल्या नैसर्गिक रंगाला बाजारात व लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या नैसर्गिक रंगामुळे शरीराला व चेहऱ्याला कुठलाही अपाय होत नसल्यामुळे होळीसाठी रंग खरेदी करणाऱ्या लोकांचा ओढा या रंगाकडे वाढत चालला आहे. त्यामुळे त्यांनी यंदा दुपटीने रंगाची निर्मिती केली. तयार झालेला रंग महिला बाजारात जाऊन किरकोळ व ठोक पद्धतीने विक्री करतात.आम्ही तयार केलेला होळीचा रंग नैसर्गिक वस्तूंपासून तयार झालेला आहे. त्यामुळे त्वचेला त्याचा कुठलाही अपाय होत नाही. आम्ही दिवाळीला उटनेही तयार केले होते. पुढे नैसर्गिक साबण, शाम्पू व बिस्कीट, केक, पापड, कुरडाया तयार करणार आहोत. छोट्या उद्योगातून मोठ्या उद्योगाकडे वळण्याचा आमचा मानस आहे.पाडळी छोटे गाव असले तरी गावातील महिला स्वावलंबी होण्यावर भर देत आहेत. त्यामुळे आम्ही नैसर्गिक रंग निर्मितीपासून आमचा छोटा व्यवसाय सुरू केला आहे. भविष्यात गावातील इतर गरजू महिलांनाही सहभागी करून उद्योग वाढवणार आहोत.



अंबड तालुक्यातील गोंदी पोलीसांची कारवाई
वाळूची अवैधवाहतूक करणारी वाहने पकडली

अंबड / प्रतिनिधी :-  अंबड तालुक्यातील जोगलादेवी येथील गोदावरी नदीपात्र व पाथरवाला शिवारातील अवैध वाळुची चोरी करत असतांना कार्यवाही करून एक हायवा व दोन ट्रॅक्टर असा ४० लाखाचा मुददेमाल गोंदी पोलिसांनी जप्त केला.३ मार्च रोजी ४ .३० वाजेचे सुमारास गोंदी पोलिस पेट्रोलिंग करीत असतांना स .पो .नि .खोपडे गोदीवरी नदी पात्रातुन एक हायवा ट्रक वाळु भरुन जोगलादेवी गावातुन जात
असल्याचे दिसले .स .पो .नि.खोपडे हे तात्काळ दोन पंच येथे घेऊन गेले. सकाळीं ०५ वाजेच्या सुमारस हायवा ट्रक मध्ये अवैधरीत्या गोदावरी नदीपात्रातील गौण खनिज वाळू उपसा करून ती चोरटी वाहतूक करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असतांना दिसले . याप्रकरणी हायवा ट्रक जप्त करून गुन्हा दाखल केला. पुढील तपास कामी पुढील तपास कामी पो नाईक वाघमारे यांच्याकडे देण्यात आला. तसेच पाथरवाला शिवारातील दोन ट्रॅक्टर अवैधरित्या गोदावरी पात्रातील वाळू उपसा करून चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना सकाळी ०६.३० सुमारास दोन ट्रॅक्टर दिसले. ट्रॅक्टरवर देखील गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एस चैतन्य व उपविभागीय अधिकारी सी.डी शेवगण उपविभाग अंबड मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाही गोंदी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मिलींद खोपडे,सहाय्यक फौजदार दिवटे,गोपनीय शाखेचे महेश तोटे,गणेश लकश,अशोक भांगळ, आविनाश पगारे,आदी नी केली आहे.


आधार प्रमाणीकरणाचे काम करण्यासाठी कोणत्याही शेतकऱ्यांनी पैसे देवू नये
जालना / प्रतिनिधी :-  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहीर केलेली आहे. सदर योजनेतंर्गत आधार प्रमाणिकरणाचे  काम आपले सरकार सेवा केंद्र चालकामार्फत,स्वस्त राशन दुकान चालकांमार्फत सुरु करण्यात आले असून  जालना जिल्हयातील 1,30,158 शेतकऱ्यांची यादी प्रसिध्द झाली  आहे. तसेच शेतक-यांचे आधार प्रमाणिकरण करण्याचे काम सुरु झालेले आहे. या प्रकरणी शासन धोरणाच्या अनुषंगाने कार्यवाही न करता शेतक-यांकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने जिल्हाधिकारी जालना  यांनी दिनांक 3 मार्च 2020  रोजीच्या पत्रान्वये जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना व जिल्हा समन्वयक, E-Governance Services India Ltd.Jalna यांना सर्व आपले सरकार सेवा केंद्र, स्वस्त राशन दुकान चालकांना सूचना देऊन कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जाणार नाही याबाबत खबरदारी घेणे बाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरी सर्व  आपले सरकार सेवा केंद्र व स्वस्त राशन दुकान चालकांना आवाहन ही करण्यात आले आहे. तरी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत आधार प्रमाणिकरणासाठी कोणत्याही लाभार्थ्याकडुन पैसे घेऊ नये अथवा मागणी करु नये, तसेच संबधीत लाभार्थी यांनी कोणत्याही आपले सरकार केंद्र व स्वस्त राशन दुकान चालकांना पैसे देवु नये.अशा प्रकारचा गैरप्रकार आढळुन आल्यास संबंधीत तहसिलदार, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयास निदर्शनास आणुन दयावे. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, जालना यांनी केले आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...