बुधवार, १७ जून, २०२०

मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने शिला संतोष मोरे यांची अमरावती महिला जिल्हाध्यक्ष पदी निवड


अमरावती,ब्युरोचीफ :- मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने शिला संतोष मोरे यांची अमरावती महिला जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.हि निवड मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.सचिन साठे साहेब यांच्या आदेशानुसार करण्यात आली.महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा सौ रंजनाताई बलसाने यांच्या नेतृत्वाखाली शिला संतोष मोरे यांची अमरावती महिला जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.व पक्षाच्या वतीने त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा. देण्यात आल्या.

खासगी आस्थापनांनी कौशल्य विकास विभागाच्या पोर्टलचा लाभ घेण्याचे आवाहन


जालना,ब्युरोचीफ :- कोरोना प्रार्दुभावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परप्रांतीय व इतर जिल्हयातील कर्मचारी,मजुर,कारागीर स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे औद्योगीक क्षेत्रातील आस्थापना,खाजगी आस्थापना  खाजगी स्थानीक बेरोजगार युवक युवतींना  नौकरीची संधी प्राप्त होणार असल्यामुळे अशा बेरोजगारासाठी औद्योगीक क्षेत्रातील आस्थापना, खाजगी आस्थापना यांनी  त्यांना  लागणा-या मनुष्यबळासाठी विभागाच्या - वेब पोर्टलवरील सुविधाचा लाभ घ्यावा या साठी आस्थापनांनी www. mahaswayam.gov.in या पोर्टल वर नोंदणी  करुन प्राप्त होणा-या युझर  ID व पासवर्ड चा  वापर करुन त्यांच्या कडील रिक्त पदे अधिसुचीत करुन पात्र बेरोजगाराची यादी प्राप्त करुन घेवून पात्र रोजगार इच्छुक उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दयावी. तसेच ज्या आस्थापनांनी यापुर्वीच नोंदणी केलेली आहे त्यांनी वरील पोर्टलचा लाभ घ्यावा. विभागाच्या पोर्टलवरुन रिक्त पदे अधिसुचीत करणे, शैक्षणिक पात्रतेनुसार कुशल मनुष्यबळाबाबतची माहिती तसेच रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमाअतर्गत रिक्त पदे अधिसुचित करणे व आस्थापनातील मनुष्यबळाची माहिती भरणे (ER -1) इ. सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. तसेच www.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर रोजगारासाठी इच्छुक सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांची नोंदणी करण्यात येते. त्या मध्ये नोंदणी कृत उमेदवाराचे नांव, पत्ता, शैक्षणिक पात्रता, ईमेल व मोबाईल नंबर इत्यादीची माहिती आस्थापनांना  प्राप्त होऊ शेकते.
ज्या सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त करावयाची आहेत अशा उमेदवारांनी EMPLOYMENT या  OPTION वर क्लिक करुन वरील संकेत स्थळावर नोंदणी करावी तसेच ज्या उमेदवारांनी नोदणी आधार लिंक केली नाही त्यांनी नोंदणी आधार लिंक करावी. सदर नोंदणी ही विनामुल्य आहे.आस्थापना व उमेदवारांना नोंदणी बाबत काही अडचण असल्यास त्यांनी जिल्हा कौशल्य, विकास रोजागर व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना येथील दुरध्वनी क्रमांक 02482 - 225504 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य, विकास रोजागर व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.          


सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या 12 व्यक्तींवर कारवाई


जालना,ब्युरोचीफ :- सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करता फिरणा-यांवर पोलीस प्रशासन व नगर परिषदेमार्फत दि. 17 जुन 2020 रोजी संयुक्तरीत्या एकुण 12 व्यक्तींवर कारवाई करत 4 हजार 800 रुपयांचा रुपयांचा दंड वसुल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.महाराष्ट्र दारुबंदी कायद्याप्रमाणे पोलीस ठाणे सदर बाजार येथे एक गुन्हा दाखल करण्यात आला असुन 79 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  कोरोना व्हायरस (COVID – 19)ला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचनांबरोबरच सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. सर्व व्यापारी प्रतिष्ठाने व दुकानदार यांनी आपल्या दुकानात येणा-या ग्राहकामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल, याची दक्षता घ्यावी. दुकानासमोर विशिष्ट अंतरावर चुन्याने मार्कींग करुन घ्यावी. दुकानात कुठल्याही प्रकारे गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असेही पोलीस प्रशासनामार्फत आवाहन करण्यात आले आहे. 


जिल्ह्यात सात व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर सात रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती


जालना,ब्युरोचीफ :- जिल्हा सामान्य रुग्णालयातुन राममंदिर परिसर, जाफ्राबाद येथील -1, जालना शहरातील संभाजीनगर परिसरातील-1, लक्कडकोट परिसरातील-1, मोदीखाना परिसरातील-1 लक्ष्मीनारायणपुरा परिसरातील-3, असे एकुण 7 कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे तर दि. 17 जुन 2020 रोजी जालना शहरातील समर्थनगर परिसरातील 1,  राज्य राखीव पोलीस दलातील 1 जवान, जिल्हा सामान्य रुग्णालयातील 1 डॉक्टर, भाग्यनगर  परिसरातील 1, जामवाडी ता. जालना येथील 1, नानक निवास जालना येथील 1, आदर्श नगर जाफ्राबाद येथील 1 अशा एकुण 7 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.जामवाडी ता. जालना येथील रहिवासी असलेला 60 वर्षीय पुरुष रुग्ण चार ते पाच दिवसांपासुन आजारी होता. त्याने जवळच्याच एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. मात्र त्याची तब्येत गंभीर झाल्यामुळे त्यास शहरातील एका खाजगी रुग्णालयात दि. 16 जुन 2020 रोजी आणण्यात आले. तेथील डॉक्टरांनी संबंधित रुग्ण गंभीर असल्यामुळे त्याला सामान्य रुग्णालयात संदर्भित (Refer) केले. संबंधित रुग्णास दि. 16 जुन 2020 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. ताबडतोब त्यांच्या लाळेचा नमुना घेऊन प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल दि. 17 जुन 2020 रोजी प्रयोगशाळेकडून पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण–3492 असुन सध्या रुग्णालयात -97, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती -1321, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–161, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -4202, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने–7 ,असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -316, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -3759, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-399, एकुण प्रलंबित नमुने -123, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1215.
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती–11, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती –1119,आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-14, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-315, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत–23,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 97, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-128, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-7, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या -192, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या- 110, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या -05, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 8754, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 09एवढी आहे.  कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण -315 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये : - पोलीस प्रशिक्षण केंद्र–98, मोतीबाग शासकीय मुलींचे वसतिगृह -25, संत रामदास वसतिगृह जालना-30, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना- 23, मुलींचे शासकीय निवासी वसतिगृह जालना- 35, मुलींचे शासकीय वसतिगृह भोकरदन -2,             डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड – 8, शासकीय मुलींचे वसतिगृह अंबड-36, शासकीय मुलांचे वसतिगृह बदनापुर- 14, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी – 2, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह घनसावंगी-6, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह इमारत क्र.2 भोकरदन- 13, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद- 12, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-8, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना – 3.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 169 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 821 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 825 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 3 लाख 33 हजार 430 असा एकुण 3 लाख 60 हजार 238 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करा.


मुंबई,ब्युरोचीफ :- राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या नोकरीसाठी  इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाइन लिंक करण्याची आवश्यकता आहे,  अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त छाया कुबल यांनी दिली आहे.
नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नावनोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना सर्व सेवा, सुविधा ऑनलाइन पद्धतीने वेबसाईटच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. राज्यभरातील वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध रोजगार मेळाव्यांची सर्व माहिती मिळवणे व त्यासाठी उत्सुकता व पसंतीक्रम नोंदविणे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळवणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे व सहभाग घेणे, आपली शैक्षणिक पात्रता अद्ययावत करणे, पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल यामध्ये दुरुस्ती करणे, वेगवेगळ्या उद्योजकांनी वेळोवेळी अधिसूचित केलेली रिक्त पदांची माहिती मिळवून त्यासाठी उमेदवारीचा अर्ज सादर करणे आदी बाबींचा त्यात समावेश करण्यात आलेला आहे.
उद्योजकांच्या मागणीनुसार उमेदवारांच्या याद्यांमध्ये समावेश होण्यासाठी नोंदणीस आधार लिंक असणे आवश्यक आहे. अनेक बाबींचा लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने नोंदणीस आधार कार्ड जोडणी करणे गरजेचे आहे, असे श्रीमती कुबल यांनी स्पष्ट केले आहे


दुध दर वाढीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱी यांना निवेदन.

औरंगाबाद,ब्युरोचीफ :- शासन धोरणानुसार शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव परवडत नाहीत. याकरिता 30 रुपये दर प्रमाणे दुधाचे भाव वाढवून व 10 रुपये अनुदान स्वरुपात प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत.अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्ष युवक आघाडी औरंगाबाद च्या वतीने केली आहे. सदरील दरवाढी झाली नाही तर यापुढे रस्त्यावर उतरून रासप च्या वतीने तिव्र आंदोलन करेल याची सर्व जवाबदारी प्रशासनांची राहील .मुख्य मंत्री व पशुसंवर्धन मंत्री यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या दुधाला 30 रुपये प्रमाणे दुध दर वाढवावा हि विनंती.निवेदनात करण्यात आली. यावेळी रासपचे युवाक जिल्हा अध्यक्ष दिलीप रिठे प्रदेश प्रवक्ते प्रो भास्कर टेकाळे देविदास नजन जिल्हा सचिव सुरेश कटारे शहर जिल्हा अध्यक्ष नारायण रिठे आदी उपस्थित होते





झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी वंचितचे राज्यभर आंदोलन, निवेदनांचा पडला पाऊस, हे सरकार जातीय व धर्मवादी - प्रकाश आंबेडकर


अकोला,ब्युरोचीफ :- राज्यात मागासवर्गीयांवरील हल्ल्यात प्रचंड वाढ झाली असून तपास यंत्रणा कुचकामी ठरल्या आहेत. कोणत्याही प्रकारची चौकशी होत नाही, कोणाला पकडले जात नाही, या सर्व प्रकारणांकडे दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न होत असून या झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी राज्यभर आंदोलने करण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सर्व जिल्हाधिकारी,  प्रांत, तहसील, विभागीय अधिकारी यांना निवेदने देऊन या हल्ल्यांचा निषेध करण्यात आला. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली.राज्यात मागासवर्गीयांवर हल्ले असून नागपूर येथे अरविंद बनसोड तर पुणे येथे विराज जगताप या तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच बरोबर औरंगाबाद, जळगाव, रत्नागिरी, परभणी, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मागासवर्गीयांवर हल्ले करण्यात आले. यातील काही प्रकरणात दिखाऊपणाची कारवाई करण्यात आली. अनेक ठिकाणी तर आरोपी पकडलेच गेले नाही. ज्यांना पकडले त्यांना सौम्या कलम लावल्याने ते जामिनावर बाहेर आले तर काही ठिकाणी पीडितांवरतीच गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे पोलिसांचे एक प्रकारे समर्थन मिळत असल्याने अशा गावगुंडांचे मनोबल वाढत आहे आणि त्यामुळेच अशा हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे. कुंभार, पारधी, नाभिक, बौद्ध, मातंग या व इतर समाजाला लक्ष करून मारहाण केली जात आहे. त्याचा निषेध म्हणून आज राज्यभर निवेदने देऊन आंदोलने करण्यात आली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली.**
हे सरकार जातीयवादी तर आहेतच मात्र आता धर्मवादी दिसायला लागले आहे. शासनाकडून आमची अपेक्षा आहे की पोलिसांना योग्य तो आदेश देऊन या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात यावी, जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख माया कांबळे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे ठाणे उपाध्यक्ष रुपेश उंबरे, प्रवीण गोसावी, वाशी नाका येथे ज्योती यादव, अनिल वाकोडे, सुरेश वाघमारे सुनीता डोळस तर पुणे येथे पी.टी. काळे, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष अमित भुईगल, राजेंद्र पातोडे, सिद्धार्थ मोकल तसेच इतर जिल्हा, तालुका अधक्ष्यानी राज्यातील सर्व तालुका जिल्हा स्तरावर निवेदने देऊन या हल्ल्यांचा निषेध केला. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.  

मातंग समाज बँड संघटना पदाधिकाऱ्यांचा आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी  केला  सत्कार                    




चिखली,ब्युरोचीफ :- चिखली तालुका मातंग समाज बँड संघटना चिखली तालुका व शहर यांच्या नियुक्त्या  दि.०८जून रोजी जाहीर झाल्या आहेत. त्यांचे  अभिनंदन म्हणून आज दि.१७ जून वार बुधवार  रोजी चिखली विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी बँड संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन साळवे, उपतालुका अध्यक्ष रामदास कांबळे, शहराध्यक्ष प्रवीण कांबळे, उपशहराध्यक्ष सुभाष कांबळे, कोषाध्यक्ष रमेश घाडगे, सदस्य रमेश साळवे,रणजित साळवे, भारत साळवे, यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच भाजपा नेते अंकुशराव तायडे , पत्रकार छोटु कांबळे या संघटनेचे सल्लागार म्हणून यांचा सुद्धा सत्कार  सौ.श्वेताताई महाले यांच्या हस्ते करण्यात आला. बँड पथकांना आर्थिक मदत तात्काळ मिळावी यासाठी प्रयत्न करणार असून मतदार संघातील मातंग समाजाच्या समस्या लवकरच मार्गी लावणार असल्याचे   आमदार श्वेताताई यावेळी बोलताना सांगितले.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...