रविवार, १४ जून, २०२०

राज्यात ५३ हजार १७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ५० हजारांहून जास्त – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती


मुंबई,ब्युरोचीफ :- राज्यात आज कोरोनाच्या ३३९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५३ हजार १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज १६३२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ९७८ झाली आहे अशी  माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.**
राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ५७ हजार ७३९ नमुन्यांपैकी  १ लाख ७ हजार  ९५८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख  ८७ हजार  ५९६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५३५ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये  ७७ हजार १८९ खाटा उपलब्ध असून सध्या २९ हजार ६४१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १२० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे.आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे:

ठाणे- ८० (मुंबई ६९, ठाणे ४, उल्हासनगर ५, पालघर १, वसई-विरार १), पुणे- १४ (पुणे ११, सोलापूर ३), नाशिक-१४ (नाशिक ३,जळगाव ११), कोल्हापूर-१ (रत्नागिरी १), औरंगाबाद-७ (औरंगाबाद ७), लातूर -२ (उस्मानाबाद २), अकोला-२ (अकोला २).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८१ पुरुष तर ३९ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२० मृत्यूपैकी ६०वर्षे किंवा त्यावरील ६६ रुग्ण आहेत तर ४० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १४ जण ४० वर्षांखालील आहे. या १२० रुग्णांपैकी ८० जणांमध्ये ( ६७ टक्के)  मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३९५० झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४३ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू २ जून ते ११ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७७ मृत्यूंपैकी मुंबई ५८,जळगाव – ८, नाशिक -३, ठाणे -३, उल्हासनगर -३, रत्नागिरी -१ , पुणे १ मृत्यू असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (५८,२२६), बरे झालेले रुग्ण- (२६,९८६), मृत्यू- (२१८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९,०५०)

ठाणे: बाधित रुग्ण- (१८,०८०), बरे झालेले रुग्ण- (६८७१), मृत्यू- (४३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,७७४)

पालघर: बाधित रुग्ण- (२३२६), बरे झालेले रुग्ण- (७१४), मृत्यू- (५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५६२)

रायगड: बाधित रुग्ण- (१८६८), बरे झालेले रुग्ण- (११६३), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३९)

नाशिक: बाधित रुग्ण- (१९३४), बरे झालेले रुग्ण- (११७८), मृत्यू- (१०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५१)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२३९), बरे झालेले रुग्ण- (१६६), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४)

धुळे: बाधित रुग्ण- (३९३), बरे झालेले रुग्ण- (२२३), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४३)

जळगाव: बाधित रुग्ण- (१७०२), बरे झालेले रुग्ण- (६६८), मृत्यू- (१३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९०३)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (४८), बरे झालेले रुग्ण- (३०), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४)

पुणे: बाधित रुग्ण- (१२,१८४), बरे झालेले रुग्ण- (६७५०), मृत्यू- (४८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९५४)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१८२०), बरे झालेले रुग्ण- (६७६), मृत्यू- (१३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०१३)

सातारा:  बाधित रुग्ण- (७४१), बरे झालेले रुग्ण- (४३६), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७७)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (६९४), बरे झालेले रुग्ण- (५३२), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५४)

सांगली: बाधित रुग्ण- (२२५), बरे झालेले रुग्ण- (१२०), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९८)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१५०), बरे झालेले रुग्ण- (७८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (३९२), बरे झालेले रुग्ण- (२७६), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१००)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२६६८), बरे झालेले रुग्ण- (१४५५), मृत्यू- (१३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०७८)

जालना: बाधित रुग्ण- (२७२), बरे झालेले रुग्ण- (१५९), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०७)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२३९), बरे झालेले रुग्ण- (१८७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१)

परभणी: बाधित रुग्ण- (८२), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०)

लातूर: बाधित रुग्ण- (१७६), बरे झालेले रुग्ण- (१२०), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१४६), बरे झालेले रुग्ण- (११३), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)
बीड: बाधित रुग्ण- (७५), बरे झालेले रुग्ण- (४९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२४)
नांदेड: बाधित रुग्ण- (२३५), बरे झालेले रुग्ण (१५१), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४)
अकोला: बाधित रुग्ण- (१०२१), बरे झालेले रुग्ण- (५६८), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१०)
अमरावती: बाधित रुग्ण- (३४४), बरे झालेले रुग्ण- (२४३), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०)
यवतमाळ: बाधित रुग्ण- (१८१), बरे झालेले रुग्ण- (१३६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२)
बुलढाणा: बाधित रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (७३), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९)
वाशिम: बाधित रुग्ण- (४९), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१)
नागपूर: बाधित रुग्ण- (१०१३), बरे झालेले रुग्ण- (५९८), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०३)
वर्धा: बाधित रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५)
भंडारा: बाधित रुग्ण- (४९), बरे झालेले रुग्ण- (४१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८)
गोंदिया: बाधित रुग्ण- (७०), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१)
चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (४७), बरे झालेले रुग्ण- (२७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०)
गडचिरोली: बाधित रुग्ण- (४९), बरे झालेले रुग्ण- (३९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९)
इतर राज्ये: बाधित रुग्ण- (८१), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१)
एकूण: बाधित रुग्ण-(१,०,७९५८), बरे झालेले रुग्ण- (५०,९७८), मृत्यू- (३९५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१३),ॲक्टिव्ह रुग्ण-(५३,०१७)
(टीप- आयसीएमआर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १३५ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील१४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर .पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.

 

बेलूर येथील आंतरराज्य पोलीस चौकी चे जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या हस्ते लोकार्पण.



धर्माबाद (भगवानकांबळे) :- धर्माबाद तालुक्यातील बेलूर येथे महाराष्ट्र व तेलंगणा च्या राज्यसीमेवर धर्माबादचे सुप्रसिद्ध गुतेदार दानशूर व्यक्तिमत्त्व नुसरत कॉन्ट्रक्शन चे मालक मोईजसेठ बिडीवाले करखेलीकर  यांच्या सौजन्याने आंतरराज्य पोलीस चौकी कार्यन्वित झाली असून जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर व नुसरत कॉन्ट्रक्शन चे मोईजसेठ बिडीवाले करखेलीकर  यांच्या हस्ते संयुक्तरित्या या चौकीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे.या कार्यक्रमास जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर,धर्माबाद चे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक सोहण मांचरे, उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी,मोईज सेठ बिडीवाले, पोलीस उपनिरीक्षक आणील सनगले,आदींची उपस्थिती होती. नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मोईजसेठ बिडीवाले करखेलीकर  यांनी आंतरराज्य सीमेवर गस्त घालतांना होत असलेली अडचण लक्षात घेऊन जनतेच्या सुरक्षेसाठी अविरत सेवा देणाऱ्या पोलीस प्रशासनास सर्वसुविधा युक्त अशी दर्जेदार पोलीस चौकी उभारून दिली आहे.उन्हाळ्यात व पावसाळ्यात विशेषतः मोठी अडचण होत असे पोलीस बांधवांना हक्काचे ठिकाण म्हणून ही चौकी उभारणी करण्यात आली असून या माध्यमातून गुन्हेगारीवर ही आळा घालण्यासाठी मदत होणार आहे

उपजिल्हाधिकारी (रोहयो) व उपजिल्हाधिकारी भुसंपादन फेसबुक लाईव्ह द्वारे दि. 15 जुन रोजी साधणार जनतेशी संवाद


जालना,ब्युरोचीफ -- दि.15 जुन रोजी सायं 4.00 ते 4.30 या वेळेत  उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर हे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेशी संबंधित माहिती देण्याबरोबरच जनतेशी संवाद साधणार असुन सायं. 4-30 ते 5-00 या वेळेत उपजिल्हाधिकारी भुसंपादन गणेश निऱ्हाळी हे भुसंपादन बाबीविषयक माहिती देणार आहे. ही माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्या https://www.facebook.com/diojalna या फेसबुक खात्यावरून जनतेशी संवाद साधून माहिती देणार आहेत.

जिल्ह्यात आठ व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर पंधरा रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती.



जालना,ब्युरोचीफ :- जिल्हा सामान्य रुग्णालयातुन जालना शहरातील मोदीखाना परिसरातील 3, जामवाडी ता. जालना येथील -1, नानसी ता. मंठा येथील -8, केंधळी ता. मंठा येथील - 2, वैद्यवडगांव ता. मंठा येथील -1, असे एकुण 15 कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करुन व त्या सर्वांच्या दुस-या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर  त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच दि. 14 जुन 2020 रोजी 8 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. पॉझिटिव्ह सापडलेल्या व्यक्तींमध्ये  जालना शहरातील नानक निवास येथील 3, विकास कॉलनी रामनगर परिसरातील 1, अलंकार टॉकीज परिसरातील 1, विठ्ठल रुक्मीणी लोधी मोहल्ला  परिसरातील 1, सोनक पिंपळगांव  ता. अंबड येथील 2, असे एकुण 8 व्यक्तींचा समावेश आहे.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण – 3372 असुन सध्या रुग्णालयात -99, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती -1278, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या – 89, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -3821, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने – 8 ,असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -277, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -3441, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-399, एकुण प्रलंबित नमुने -99, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1171,
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 8, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती – 1074, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -84, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -515, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत–13,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 99, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -25, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-15, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या -165,  सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या- 96, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या -08,  पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 8125, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 08 एवढी आहे. 
कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 515 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास वसतीगृह जालना – 39, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-14,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -26, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-33, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -193, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद- 06,जिजाऊ इंग्लिश स्कुल जाफ्राबाद- 31, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -07, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड – 34, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे –04, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी -23, मॉडेल स्कुल मंठा-03,कस्तुरबा गांधी बालिका वसतीगृह मंठा- 04, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -01, , पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद-11,ज्ञानसागरविद्यालय जाफ्राबाद -22, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल इमारत क्र. 2 भोकरदन -  06. आयटीआय कॉलेज जाफ्राबाद – 58  व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 169  व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 800 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 825 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली   3 लाख 33 हजार 430 असा एकुण 3 लाख 60 हजार  238 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मेहनत व प्रामाणिकते च्या जोरावर त्याने केली परस्तितीवर मात..


विशेषप्रतिनिधी :- संजीवकुमार गायकवाड 
बारड येथे राहणाऱ्या महेश श्रीरामवार या युवकाला लहानपणापासूनच व्यवसायाची आवड.घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे उच्च माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणात अडचणी आल्या.
       त्यांनंतर महेश याने मिळेल ती छोटी मोठी कामे करायला सुरुवात केली. त्याला केळी व इतर फळपिकांच्या व्यापाराची आवड असल्यामुळे सुरुवातीला फ्रूट व कमिशन एजंटकडे नोकरी केली. या क्षेत्रात अनेक राज्यातील व्यापाऱ्यांशी व शेतकऱ्यांशी त्याच्या ओळखी झाल्या.
  यातूनच मग त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहिले. काही काळ फिरुन ऑर्डर घेत सचोटी व प्रामाणिकतेच्या बळावर व्यवसायात जम बसविण्यास सुरुवात केली. आंध्र प्रदेश व कर्नाटक मधूनही ऑर्डर मिळवल्या. सध्या त्याचा माल महाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा, दिल्ली व काश्मीर राज्यात जातो.
      आज अर्धापूर येथे तिरुपती फ्रूट मर्चंट अँड कमिशन एजंट या नावाने कार्यालय सुरु केले. या कार्यालयाचे आज उद्घाटन केले यावेळी माझ्यासह माजी जि.प.सदस्य बाळासाहेब बारडकर,जि.प.सदस्य बबन बारसे,ज्येष्ठ मार्गदर्शक धर्मराज देशमुख, नगराध्यक्ष अर्धापूर शेख लायक,संजय लहानकर, दत्ता पाटील पांगरीकर,संतोष पाटील कपाटे,समद भाई,मनसुक सेठ,रनजित सिंगजी,आदी उपस्थित होते.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...