सोमवार, २३ मार्च, २०२०

राज्यात १५ नवीन कोरोणा बाधित रुग्ण, राज्यातील एकूण संख्या ८९ - आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबई, प्रतिनिधी : राज्यात नवीन १५ करोना
 बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ११ जण मुंबईतील तर प्रत्येकी एक रुग्ण पुणे, ठाणे, वसई विरार आणि नवी मुंबई भागातील आहेत.  त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ८९ झाली आहे. मुंबई आणि परिसरात आढळलेल्या १४ नवीन रुग्णांपैकी ९ जण हे यापूर्वीच्या कोरोना बाधित रुग्णांचे निकटसहवासित आहेत. इतर ५ जणांनी दुबई, मलेशिया, थायलंड, श्रीलंका,ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आदी देशात प्रवास केल्याचा इतिहास आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
दिनांक १३ मार्च २०२० रोजी कस्तुरबा रुग्णालयात भरती झालेल्या ५९ वर्षीय फिलीपाइन नागरिकाचा काल रात्री हिरानंदानी रुग्णालयात मृत्यू झाला. सुरुवातीला कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या या रुग्णाचे नंतरचे दोन नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले होते म्हणजे त्याचा कोरोनो हा आजार बरा झाला होता तथापि त्याला असलेल्या मधुमेह आणि अस्थमा  या आजारांमुळे झालेल्या गुंतागुंतीत त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू कोरोनामुळे झालेला  नाही.
राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील असा:
पिंपरी चिंचवड मनपा १२     
 पुणे मनपा १६     
  मुंबई  ३५   
 नवी मुंबई   ५     
नागपूर, यवतमाळ,
कल्याण प्रत्येकी  ४   
अहमदनगर, ठाणे               
 प्रत्येकी २   
पनवेल, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार     प्रत्येकी  १    एकूण रुग्ण  ८९        मृत्यू २
राज्यात आज परदेशातून आलेले २५५ प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत.    ज्यांना दि. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळून आली अशा २१४४ जणांना राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी १८८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ८९ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
आरोग्य खात्यामार्फत आवाहनकाल राज्यभर पाळण्यात आलेल्या जनता कर्फ्युनंतर पुणे - मुंबई मधील बरेच लोक आपापल्या गावी जाताना दिसत आहेत. काही ग्रामीण भागात पुणे आणि मुंबईहून आलेल्या लोकांबद्दल भितीचे वातावरण आहे, या लोकांची करोना टेस्ट करुन घ्यावी, किंवा त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्का मारण्यात यावा, अशी मागणी काही तुरळक ठिकाणी होताना दिसते आहे. पुणे आणि मुंबईमध्ये काही करोना बाधित रुग्ण आढळलेले असले तरी या भागातून येणा-या लोकांबद्दल विनाकारण भिती बाळगण्याचे कारण नाही.अनेक ठिकाणी वैद्यकीय व्यावसायिकांनी ओपीडी बंद ठेवल्याचे आढळले आहे. अशा उद्रेक काळात उद्रेकाशिवाय इतर आरोग्य सेवा तसेच तातडीची वैद्यकीय सेवा जनतेला मिळणे आवश्यक असल्याने कोणीही ओपीडी अथवा इतर आरोग्य सेवा बंद ठेवू नयेत असे कळकळीचे आवाहन आरोग्य खात्यामार्फत करण्यात आले आहे.नुकतेच परदेशाहून आलेले काही नागरिक होम क्वारंटाईन न पाळता घराबाहेर पडताना दिसत असल्याबाबतच्या तक्रारी राज्य हेल्पलाईनला प्राप्त होत आहेत. स्थानिक प्रशासनाने आपल्या कार्यक्षेत्राचे विभागवार वाटप करुन प्रत्येक क्षेत्रासाठी जबाबदार अधिका-याला होम क्वारंटाईन व्यक्तींची यादी देऊन प्रत्येकजण नियमाप्रमाणे विलगीकरण सूचनांचे पालन करत आहे,याची खातरजमा करावी. यासाठी निवासी सोसायटीच्या समित्यांचीही मदत घेण्यात यावी.
राज्य नियंत्रण कक्ष  ०२०/२६१२७३९४  टोल फ्री  क्रमांक १०४
             जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली
हिवरा कबली येथे भरतो दारूचा बाजर गावातील नागरिकाकडुन होत आहे कारवाई ची मागणी.
जाफराबाद / प्रतिनिधी (दिनेश जाधव) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ देशी आणि विदेशी  मद्य विक्री
दिनांक 20 मार्च 2020 रोजी रात्री 10.00 वाजेपासुन ते दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशी कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जालना यांनी आदेश दिले असताना देखील जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील हिवरा काबली येथे सर्रास पणे दारु विक्री चालु आहे .तरी याकडे तरी याकडे कोणत्याही पोलीस प्रशासन याकडे लक्ष देत नाही.तर दुसरीकडे कोरोना विषयी माहीती दिली जात आहे.घराबाहेर कोणी कामा कामी निघावे अन्यथा कारवाई करण्यात येईल.अशी माहीती दिली जात आहे.
     पण मात्र दुसरीकडे लक्ष दिले तर हिवरा काबली येथे नळविहीरा
सावरगाव  खामखेडा आळंद  बोरखेडी या गावामधून दारु पिण्यासाठी लोक गर्दी करत आहे. यावरुन सिद्ध होते कि कोरोना यावरुन जास्त प्रमाणात पसरु शकतो. याकडे पोलीस प्रशासनाने तात्काळ स्वरुपात लक्ष दिले पाहीजे. व कारवाई केली पाहीजे अशी आसपास च्या महिलांचे म्हणणे आहे. या गावामध्ये देशी विदेशी गावरान सर्व प्रकारच्या दारु मिळतात.तर लायसन्स धारकांचे  शासनाने बंद केले आहे आणि या गावामध्ये सगळ्या प्रकारचे दारु मिळतात .
   याकडे तात्काळ स्वरुपात पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी गावातील समान्य नागरिक व महिलांच्या वतीने करण्यात येत आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदान करण्यास घाबरू नका - जनकल्याण रक्तपेढी
जालना : सध्या कोरोना विषाणूची साथ सुरु आहे .दरवर्षी एप्रिल व मे मध्ये शाळा य महाविद्यालयात सुट्या 
असल्यामुळे तसेच नियमित रक्तदाते बाहेरगावी गेल्यामुळे रक्ताचा तुटवडा भासत असतो . जालना शहरामध्ये साधारणपणे 40 ते 50 रक्तपिशव्या जनकल्याण रक्तपेढीमधून रुग्णांना रक्तपुरवठा केला जातो . रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी , अपघातग्रस्तांसाठी व थैलेसिमीया , हिमोफिलीया या रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते . सदर बाब लक्षात घेता . रक्तदात्यांची कोरोना विषाणूबाबतचे लक्षणे व प्रवासाचा पूर्व इतिहास तपासून व सुरक्षा स्वच्छतेचे पालन करुन रक्तदान शिबीराची व्यवस्था जनकल्याण रक्तपेढीने केली आहे . रक्तदात्यांमध्ये रक्तदान करण्याविषयी भिती अथवा संभ्रम निर्माण झालेला असून प्रतिबंधक उपाय म्हणून गरजेशिवाय घराच्या बाहेर पडू नये व गर्दी करु नये हे जरी खरे असले तरी रक्तदान हे गरजु रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे . कारण सध्या स्थितीत रक्तास कुठलाही पर्याय नाही , रक्तदान केल्यामुळे अथवा रक्त संकमणामुळे कोरोना विषाणूची लागण होत नाही जालना शहरातील सर्व सामाजिक संघटना , संस्था , रक्तदाते यांनी रक्तपेढीच्या गरजेनुसार रक्तदान शिबीर आयोजित कराये व गरजु रुग्णांसाठी रक्त संकलन करून त्यांचे प्राण वाचविण्याच्या उदात्त कार्यास सहकार्य करावे . तसेच इच्छुक रक्तदाते यांनी सकाळी 10 ते 5 या वेळेत 2 किंवा 3 या संख्येने रक्तदात्यांनी जनकल्याण रक्तपेढीत येऊन रक्तदान करावे , तसेच शिविर संदर्भात रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी शिवराज जाधव - 8380049340 , 9421322252 या नंबरवर संपर्क करावा . तसेच 31 मार्चपर्यंत रक्तपेढीच्या वतीने शहरातील सर्व हॉस्पिटलांमध्ये कुरीयर सेयेच्या माध्यमातुन रक्तपिशवी पोहोच करणार असून यासाठी रक्तपेढीमध्ये या नंबरवर 02482 - 238397 , 243085 , 7722027470 संपर्क करावा , असे आवाहन रक्तपेढीचे अध्यक्ष रमेशभाई पटेल यानी केले .

*शांताबाई विनायकराव निबांळकर यांचे वृद्धपकाळाने निधन*
*जालना (प्रतिनिधी)* ः शहरातील शिवाजी नगर भागातील रहिवाशी शांताबाई विनायकराव निबांळकर यांचे वृद्धपकाळाने 
(ता.22) मार्च रोजी सकाळी 6 वाजता निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय (85) वर्षे होते. त्यांच्या पश्‍चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर रामतीर्थ स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. त्या महावितरणचे कर्मचारी अमोल निंबाळकर यांच्या आजी होत.

*कोरोना विषाणुपासून बचावासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सकल्पनेतुन आ.कूचे  परिवराचा जनता कर्फ्यूमधे सहभागसह थाळीनाद*
कोरोनाच्या विषाणुपासून बचावासाठी पाळले नियम
*अंबड़ / प्रतिनिधि* : कोरोना विषाणु ने तर जगभरात हदरुन लावले याच्या बचावासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 
संकल्पनेतुन आज रविवार(ता 22) सकाळी 7 ते रात्री 9 वजेपर्यंत एकदिवशिय जनता कर्फ्यूमधे सर्व जनतेने 100 टक्के प्रतिसाद दिला.जनतेच्या सहकार्य बद्दल आ. नारायण। कूचे यांनी जनतेचे आभार वेक्त केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेप्रमाणे  आ.नारायण कूचे यांनी त्यांच्या परिवारसह घरी राहून जनता कर्फ्यूमधे सहभाग नोंदवला तसेच सायंकाळी 5 वाजेजता जे कोरोनशी लढत आहे. त्या सर्वांच्या सन्मार्थ व आभारसाठी आ. कूचे यांच्या सह त्यांच्या कुटुंबाने शंखनाद, टाळी, थाळी, व घंटी नाद केला.यावेळी आ.नारायण कूचे, देवविदास कूचे   यांच्या परिवरासह उपस्तित होते.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...