शनिवार, १३ जून, २०२०

अंबड व्यापारी महासंघाचे प्रभारी अध्यक्ष द्वारकादास जाधव तर प्रभारी सचिव गणेश बोरडे यांची एकमताने निवड.




अध्यक्ष चंद्रप्रकाश सोडाणी यांच्या अध्यक्षतेखाली आनंदी लॉन्स येथे सोशल डिस्टन्स पाळून बैठक पार

अंबड़/प्रतिनिधि : अंबड व्यापारी महासंघाची आज 13 जून रोजी विद्यमान अध्यक्ष चंद्रप्रकाश सोडाणी यांच्या अध्यक्षतेखाली आनंदी लॉन्स येथे सोशल डिस्टन्स पाळून बैठक पार पडली...महासंघाचा कार्यकाळ संपल्यामुळे शहरातील सर्व संघटना अध्यक्ष त्यांचे प्रतिनिधी व विविध व्यापारी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली..बैठकीत पुढील काही कालावधी साठी *प्रभारी अध्यक्ष* म्हणून सिड्स संघटनेचे श्री द्वारकादास मेहेरबान जाधव यांची तर *प्रभारी सचिव* म्हणून श्री गणेश रोहिदास बोरडे यांची एकमताने निवड करण्यात आली...प्र.अध्यक्ष यांच्या कडे मावळते अध्यक्ष चंद्रप्रकाश सोडाणी व सचिव अंबादास अंभोरे यांनी आपला राजीनामा सादर केला..व गेल्या काळात शहरातील सर्व व्यापारी बांधव सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी शहरातील सामाजीक संघटना कार्यकर्ते विविध राजकीय नेते कार्यकर्ते सर्व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या सर्वोतोपरी सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले...नूतन अध्यक्ष व सचिव यांनी पुढील काळात शहरातील सर्व लहान मोठे व्यापारी बांधवांची अद्यावयात यादी आप आपल्या संघटनां मार्फत प्राप्त करायची असून त्यानंतर शहरातील सर्व लहान मोठ्या व्यापारी बांधवांना एकत्र करून पुढील तीन वर्षा साठी अंबड व्यापारी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकरणीची निवड करायची आहे असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला..बैठकी दरम्यान अनेक व्यापारी बांधवानी आपली मनोगत व्यक्त केली. बैठकीस खालील संघटना अध्यक्ष व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते**
मेडीकल-शिवाजी बजाज
हार्डवेअर-अतुल मालू आडत-अशोक बियाणी
सिड्स-द्वारकादास जाधव
इलेक्ट्रॉनिक-ओमप्रकाश उबाळे सराफा-रमेश शहाणे
ब्लिडींग मटे..-शिरीष सावजी स्टील भांडी- जे.चौधरी मद्य-राजुसेठ बजाज हॉटेल-संजय जोशी किराणा-निलेश लोहिया कापड- भाई जामदरे
पान स्टोल-अजीज बेग हेअर सलून-कांता चित्रे मंडप डेको-मनोज शर्मा जनरल-शिवाप्रसाद चांडक मशिनरी-गुलाब राठोड फोटो स्टुडियो-अरुण भवर फुटवेअर-सुनील मोटवणी यांच्यासह व्यापारी कैलाश जयणारायन राठी, भीमराव शिंगाडे, पुरुषत्तोम सोमाणी,  कैलास अग्रवाल, राजेंद्र डहाळे, बाळासाहेब पांढरे, राधेश्याम मंत्री, अजित मालानी, सुनील खानचंदानी, संदीप जाजू, विष्णू देवडे, विशाल काला, रामेश्वर भोरे, विशाल गिलडा, संतोष ढोबळे, शेख अल्ताफभाई, नरेश बुंदेलखंडे, यांच्या सहीत मावळते अध्यक्ष *चंद्रप्रकाश सोडाणी* मावळते सचिव *अंबादास अंभोरे* नूतन प्रभारी अध्यक्ष *द्वारकादास जाधव* प्रभारी सचिव *गणेश बोरडे* यांची उपस्थिती होती...सर्वांचे आभार मानून बैठक आनंदी लॉन्स येथे सोशल डिस्टन्स पाळून बैठक  संपन्न झाली. 


पिंपरी - चिंचवडमधील अवघ्या वीस वर्षांच्या तरुणावर जातीय द्वेषातून सामूहिक हल्ला करून त्यास जीवे ठार मारण्यात आले . जातीय द्वेषातून दलित तरुणांची हत्या करणाऱ्यांना फाशीची कठोर शिक्षा करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे पिंपरी चिंचवड येथे हत्या करण्यात आलेल्या युवक दिवंगत विराज जगताप या कुटुंबायांची सांत्वनपर भेट केंद्रीय राज्यमंत्री ना रामदासजी आठवले यांनी घेतली
 पिंपरी - चिंचवडमधील अवघ्या वीस वर्षांच्या तरुणावर जातीय द्वेषातून सामूहिक हल्ला करून त्यास जीवे ठार मारण्यात आले . जातीय द्वेषातून दलित तरुणांची हत्या करणाऱ्यांना फाशीची कठोर शिक्षा करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे पिंपरी चिंचवड येथे हत्या करण्यात आलेल्या युवक दिवंगत विराज जगताप या कुटुंबायांची सांत्वनपर भेट केंद्रीय राज्यमंत्री ना रामदासजी आठवले यांनी घेतली

जिल्ह्यात चौदा व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर एका रुग्णाला यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज - जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती



  जालना,ब्युरोचीफ :- जिल्हा सामान्य रुग्णालयातुन जालना शहरातील मंगळ बाजार परिसरातील एका 25 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णावर यशस्वी उपचार करुन व त्याच्या दुस-या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.  तसेच दि. 13 जुन 2020 रोजी 14 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. पॉझिटिव्ह सापडलेल्या व्यक्तींमध्ये  राज्य राखीव पोलीस गट क्र. 3 चे 4 जवान, जालना शहरातील उतार गल्ली परिसरातील  5, काद्राबाद परिसरातील 1, बदनापुर तालुक्यातील भराडखेडा येथील 4, अशा एकुण 14 व्यक्तींचा समावेश आहे.**
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण - 3285असुन सध्या रुग्णालयात -99, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती -1265, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या – 44, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -3732, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने – 14 ,असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -269, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -3405, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-385, एकुण प्रलंबित नमुने -54, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1158,14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 19, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती – 1066, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -25, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -463, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत–26,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 99, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -135, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-01, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या -150,  सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या- 106, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या -05,  पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 7949, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 08 एवढी आहे. 
कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 463 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास वसतीगृह जालना – 39, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-14,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -26, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-26, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -193, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद- 07,जिजाऊ इंग्लिश स्कुल जाफ्राबाद- 34, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -05, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड – 33, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे –08, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी -21, मॉडेल स्कुल मंठा-08,कस्तुरबा गांधी बालिका वसतीगृह मंठा- 15, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -01, , पंचगंगा मंगल कार्यालय जाफ्राबाद-11, दयानंद सागर विद्यालय जाफ्राबाद -22, व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 168 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 795 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 825 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली   3 लाख 33 हजार 430 असा एकुण 3 लाख 60 हजार  238 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

   नाभिक समाजावर अन्याय नको, त्यांनाही दुकाने उघडण्याची परवानगी द्या -  प्रकाश आंबेडकर


पुणे,ब्युरोचीफ :- केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन शिथील केला असून आता सर्वच दुकानांना उघडण्याची  परवानगी दिली आहे.मात्र केस कर्तनालयाच्या (सलून) दुकानांना उघडण्याची परवानगी न देऊन या सरकारने नाभिक समाजावर अन्याय केला आहे. तेव्हा लवकरात लवकर केस कर्तनालयाच्या दुकानांना उघडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
कोरोनामुळे गेले अनेक दिवस देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गरीब, मजूर, नाका कामगार, घरकाम करणारे कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. ८० दिवसानंतर केंद्र आणि राज्य सरकारने लॉक डाऊन शिथील करून हॉटेल, मॉल तसेच इतर दुकानांना उघडण्याची परवानगी दिली. मात्र यामध्ये केस कर्तनालयाच्या दुकानांना उघडण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे नाभिक समाजावर हा अन्याय असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दिवसभर काम केल्यावरच पैसा मिळवणारा नाभिक समाज हा रोजंदारी सारखाच काम करणारा वर्ग आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात दुकाने बंद राहिल्याने त्यांनीही अनेक हालअपेष्टा काढल्या आहेत. त्यामुळे आता लॉकडाऊन शिथिल झाल्याने त्यांच्यावर अन्याय न करता, त्यांना केस कर्तनालयाची दुकाने उघडण्याची परवानगी देण्याची यावी, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. अशी माहिती राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.


      प्रधानमंत्री किसान निधी सन्मान योजनेंतर्गत
215 कोटी 48 लक्ष 94 हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा
क्यार वादळामुळे नुकसान झालेल्या 5 लाख 19 हजार शेतकऱ्यांना
429 कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम अदा
                   फेसबुकलाईव्हमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी श्री गायकवाड यांची माहिती


जालना,ब्युरोचीफ :- अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी यासाठी डिसेंबर 2019 मध्ये सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातुन आतापर्यंत 215 कोटी 48 लक्ष 94 हजार एवढी रक्कम जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी  फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांशी संवाद साधताना दिली.
दि. 13 जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात नैसर्गिक आपत्ती, फेरफार, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना तसेच टंचाईच्या उपाययोजना याविषयावर अधिकाऱ्यांनी जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी तहसिलदार प्रशांत पडघन यांची उपस्थिती होती. 
नैसर्गिक आपत्ती, फेरफार, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने संदर्भात माहिती देताना निवासी उपजिल्हाधिकारी श्री गायकवाड म्हणाले, प्रधानमंत्री किसान निधी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरवर्षी  सहा हजार रुपयांचे अनुदान तीन टप्प्यामध्ये वितरित करण्यात येते.  जालना जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 2 लाख 83 हजार 141, दुसऱ्या टप्प्यात 2 लाख 88 हजार 505, तिसऱ्या टप्प्यात 2 लाख 23 हजार 966, चौथ्या टप्प्यात 1 लाख 82 हजार 174 तर पाचव्या टप्प्यामध्ये 99 हजार 661 असे एकुण 215 कोटी 48 लक्ष 94 हजार एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. 
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक लाभार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.  परंतु आधारक्रमांक चुकीचा असणे, खाते क्रमांक, आयएफएससी क्रमांक चुकीचा असणे अशा अडचणीमुळे त्यांना लाभ मिळालेला नाही. अशा लाभार्थ्यांनी तालुकास्तरावर सुरु करण्यात आलेल्या मदतकक्षाच्या माध्यमातुन त्रुटींची पुर्तता करुन घ्यावी.  जेणेकरुन लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणे शक्य होईल.  अंबड तालुक्यामध्ये मदतनीस म्हणून विजय भांडवले यांची नियुक्ती करण्यात आली असुन मो. क्र. 8605775854, बदनापुर तालुक्यासाठी सनी कांबळे-8263948844, भोकरदन तालुक्यासाठी सतीष काकडे-7588089052, घनसावंगी किशोर थोरात-9511774055, जाफ्राबाद अनिल चुंगडा-9420359492, जालना तालुक्यासाठी  शाम गुंजाळ -8830633212, मंठा सुभाष कुलकर्णी-9730713847 तर परतुर तालुक्यासाठी मदतनीस म्हणून निवृत्ती चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असुन त्यांचा मोबाईल क्रमांक 7875222627 असा असल्याची माहितीही निवासी उपजिल्हाधिकारी श्री गायकवाड यांनी यावेळी दिली.
गत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये क्यार वादळामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.  या नुकसानीपोटी जिल्ह्यातील 5 लाख 19 हजार शेतकऱ्यांना 429 कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यावर तीन टप्प्यामध्ये वर्ग करण्यात आली आहे.  तसेच या नुकसानीच्या मदतीपासुन वंचित राहिलेल्या 42 हजार 497 शेतकऱ्यांसाठी  31 कोटी  97 लाख 89 हजार 798 रुपयांची मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली असुन निधी प्राप्त होताच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच फेब्रुवारी, मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतपीकाचे पंचनामे करण्यात आले असुन 18 कोटी 27 लाख रुपयांची मागणीही शासनाकडे नोंदविण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.  
जालना जिल्ह्यात डीडीएम (डॉक्युमेंट डिस्ट्रीब्युशन मॉडयुल) प्रणालीमधुन 5 लाख 58 हजार  863 सातबारा,  4 लाख 88 हजार 204 8-अ, 36 हजार 549 फेरफार असे एकुण 10 लाख 83 हजार 616 ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती देत नागरिकांनी विचारलेल्याप्रश्नांची उत्तरेही श्री गायकवाड यांनी यावेळी दिली.
टंचाईच्या अनुषंगाने माहिती देताना कार्यकारी अभियंता श्री डाकोरे म्हणाले, ऑक्टोबर ते जुन दरम्यान टंचाई उपायोजनांचा आराखडा तीन टप्प्यामध्ये तयार करण्यात येतो. जालना जिल्ह्यात 1 हजार 111 गावे आणि 144 वाड्यांचा समावेश असलेल्या एकुण 1 हजार 354  उपाय योजनांसाठी आराखडा प्रस्तावित करण्यात आल्या होता.  त्यास मंजुरी मिळुन कामे प्रगतीमध्ये आहेत.  जिल्ह्यात  नळयोजना विशेष दुरुस्ती 102, तात्पुरती पुरक योजना 43 उपाययोजना प्रगतीपथावर असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.  जिल्ह्यात मागणीनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला असुन आजघडीला जालना तालुक्यात 05, बदनापुर-17, जाफ्राबाद-05, मंठा-05, अंबड-17 तर घनसावंगी येथे 01 अशा एकुण 50 टँकद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असुन जिल्ह्यात 101 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असुन यामध्ये जालना येथे 11, बदनापुर-20, जाफ्राबाद-15, मंठा-9 अंबड-17 तर घनसावंगी येथे 29 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असल्याची माहितीही श्री डाकोरे यांनी यावेळी दिली.  यावेळी उपअभियंता नरेंद्र भुसारे, आर.के. राठोड उपस्थित होते.


कोरोना चाचण्यांसाठी आता सर्वात कमी दर 

खासगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचण्यांसाठी २२०० रुपये दर निश्चित.



        आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा




मुंबई,ब्युरोचीफ :- राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीत जास्त २२०० रुपये इतका दर आकारला जाणार असून रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी २८०० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. सर्वसामान्य रुग्णांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे जाहीर केले.

यासंदर्भात आरोग्य विभागाने चार सदस्यांची समिती गठीत करण्यात आली होती. समितीने शासनाला अहवाला सादर केला असून त्यांच्या शिफारशीनुसार दरनिश्चित करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

*समितीने निर्धारित वेळेत अहवाल दिल्याने सामान्यांना दिलासा*

दि. २ जून रोजी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने समिती गठीत करण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. राज्य आरोग्य हमी सेवा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुल्क निश्चिती समिती गठीत केली होती. त्यात आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक अजय चंदनवाले, ग्रॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रा. अमिता जोशी यांनी सदस्य म्हणून काम पाहिले. या समितीला आठवडाभराचा कालावधी देण्यात आला होता. निर्धारीत केलेल्या कालावधीत समितीने आपला अहवाल सादर करून सामान्यांना दिलासा दिल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

*कोरोना चाचण्यांसाठी सर्वात कमी दर महाराष्ट्रात*

याबाबत अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले की, राज्यात खासगी प्रयोगशाळा कोरोना चाचणीसाठी ४५०० रुपये आकारत होते. घरी जाऊन स्वॅब घेतला त्यासाठी पीपीई कीटचा वापर यामुळे ५२०० रुपये आकारले जात होते. मात्र समितीने केलेला अभ्यास आणि काढलेल्या निष्कर्षावरून आता राज्यात कोरोना चाचणीसाठी जास्तीत जास्त २२०० रुपये आकारले जातील तर घरी जाऊन केलेल्या चाचणीसाठी २८०० रुपये आकारले जातील. संपूर्ण देशात एवढे कमी शुल्क अन्यत्र कुठेही नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. या दर निश्चितीमुळे सामान्यांना दिलासा मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

*महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधीक चाचण्या*

देशात महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधीक चाचण्या केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या राज्यात सध्या ५३ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९५ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आतापर्यंत ६ लाख २४ हजार ९७७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १ लाख ०१ हजार १४१ नमुने पॉझिटिव्ह (१६.१८ टक्के ) आले आहेत. मुंबईमध्ये सर्वाधिक चाचण्या झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच चाचण्या होत असून त्यात कुठलीही तडजोड केली जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


रिपब्लिकन पार्टी आँफ इडियाँ (A) पुणे तर्फे सावंगी पो.स्टेशनला निवेदन सादर.


विराज जगताप हत्या प्रकरण आरोपीला अटक केली परंतु मुलीला सुद्धा सह आरोपी करा - किशोर कांबळे यांची मागणी





पुणे,ब्युरोचीफ :- महाराष्ट्र ला काळिमा फारसणारी घटना पुण्यातील पिंपळे सौदागर येथे घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. महाराष्ट्र देवसांन दिवस अत्याचार वाढत आहे.पिंपरी येथील पिंपळे  सौदागर येथे झालेल्या जातिवादी प्रेम प्रकरणातुन जातिवाद ह्या भावणेतून अमानुषपने मारहाण करून विराज जगताप ह्याची हत्या करण्यात आली.त्यांनंतर रिपब्लिकन पार्टी आँफ इडियाँ (A) चे महाराष्ट्र सचिव किशोर कांबळे साहेब यांनी विराज जगताप यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली व सर्व प्रकार लक्षात घेता सांगवी पोलीस थाने येथे जाऊन मा. ACP श्रीधर जाधव यांची प्रत्यक्ष  भेट घेऊन प्रेमप्रकरणात हत्यामागे त्या मुलीलाही अटक करून 302/अस्ट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दखल करण्यात यावा ह्यासाठी त्यांना निवेदन देण्यात आले.त्यावेळेस तेथे सोबत आकाश कांबळे,ईश्वर गुडेटटी, गौतम गायकवाड़,अमोल सपकाल,ऋतिक सिंग, आणि विकि कांबळे,प्रमोद गायकवाड़ उपस्थित होते.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...