रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

रुग्ण हक्क परिषदेच्या प्रदेश सचिव पदी संध्याराणी निकाळजे आणि सोहनी डांगे यांची निवड* 
ता.प्रतीनीधी गेवराई 
*पुणे -* रुग्ण हक्क परिषदेच्या प्रदेश कार्यकारणीतील सचिवपद हे प्राधान्याने महिलांसाठी आरक्षित केलेले आहे. रुग्ण हक्क परिषदेच्या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात, तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामध्ये , विदर्भातील नागपूर जिल्ह्यात रुग्ण हक्क परिषदेची संघटनात्मक बांधणी करून अल्पावधीत आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या सातारा जिल्हा सचिव संध्याराणी निकाळजे यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या सचिव पदी बढती मिळाली  आहे . त्यांच्या कडे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याची जबाबदारी परिषदेचे  संस्थापक  अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी सोपवली आहे . परिषदेच्या प्रधान कार्यलयामध्ये आज त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले .
सातारा जिल्ह्यातील संध्याराणी निकाळजे यांच्या सोबतच पुणे येथील सोहनी डांगे यांचीही प्रदेश सचिव पदी वर्णी लागलेली आहे. रुग्ण हक्क परिषदेमध्ये स्थापने पासून कार्यरत राहून विविध उपक्रम,  शाखा उदघाटने,  तसेच हॉस्पिटलच्या मनमानी कारभाराच्या विरोधात झालेल्या अनेक आंदोलनामध्ये सोहनी डांगे यांनी सहभाग घेतला आहे . सोहनी डांगे यांच्याकडे मुंबईसह कोकण आणि उत्तर महाराष्ट्रची जबाबदारी सोपविण्यात आली आहे . प्रधान कार्यलयामध्ये संस्थापक  अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते प्रदेश सचिव पदी नियुक्तीचे पत्र त्यांना देण्यात आले.
जालना slug : अंबड जवळ लालवाडी येथे तीन दिवसीय रहमती पीर उरस 
 प्रतिनिधी/अंबड रस्त्यावर लालवाडी पाटी जवळ असलेल्या रहमती पीर यांच्या तिसऱ्या उरसासाठी राज्यभरातून भाविकांनी हजेरी लावली आहे. सोमवारपासून (दि. 27 जानेवारी) सुरू झालेल्या या तीन दिवसीय उरुसाचा आज समारोप आहे.रब्बानी फाउंडेशनच्या वतीने या उरुसाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी कवालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते...तर येथील पीरवर चादर चढविण्यासाठी राज्यभराच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी इथे हजेरी लावली आहे...बाहेरगावाहून आलेल्या भाविकांच्या निवासाची व्यवस्था देखील रब्बानी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
दर्ग्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असल्यामुळे जालना-अंबड रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना ही विद्युत रोषणाई एक सुखद अनुभव देऊन जाते... या उरुसाला सुरुवात होण्यापूर्वी सोमवारी जालना शहरातून भव्य मिरवणूक ही काढण्यात आली होती. या कार्यक्रमाला रब्बानी पीर साहब सज्जादा नशीन रहमती पीर यांसह मोईन अजमेरी साहब शहजादा रंगीले पीर मुंबई, सुहेल खंडवणी साहब ट्रस्टी मगदूम साहब चारिटेबल ट्रस्ट मुंबई, यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...