रविवार, ३ मे, २०२०


शहरातील चौधरीनगर येथील 708 कुटूंबातील 3 हजार 107 व्यक्तींचे सर्वेक्षण पुर्ण

सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे असलेला एकही व्यक्ती नाही
परतुर येथील कोरोनाग्रस्त युवकाच्या संपर्कातील तीनही व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह



जालना दि. 3 प्रतिनिधी :-  राज्य राखीव पोलीस बलगट क्र. ३ मधील चार जवान कोरोनाग्रस्त आढळले होते.  त्यापैकी एक जवान शहरातील चौधरीनगर येथील रहिवाशी असल्याने जवानाच्या संपर्कातील सहवासितांच्या पाठपुराव्यासाठी वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, आरोग्यसेविका, अशा सेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सेविका यांचा समावेश असलेल्या १६ पथकाने 708 कुटूंबातील  3 हजार 107 व्यक्तींचे सर्वेक्षण पुर्ण केले.  या सर्वेक्षणात सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळलेली एकही व्यक्ती आढळुन आली नाही. तसेच सातोना. ता. परतुर येथील 24 वर्षीय कोरोनाग्रस्त तरुणाच्या संपर्कात आलेल्या तीनही व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.
जिल्ह्यात एकुण 1105 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 74 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 748 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 137 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 1043 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने -00 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 08 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 894, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 221, एकुण प्रलंबित नमुने-137 तर एकुण 674 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 16, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 421 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 00, सध्या अलगीकरण  केलेल्या व्यक्ती -260, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-28, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 74, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 18, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 230 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.  
कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 260 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना – 48, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह-41, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-23, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-19, पोलीस प्रशिक्षण केंद्र-112, परतुर-08, जाफ्राबाद-6 तर भोकरदन येथे 03 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.
लॉकडाऊनमुळे परजिल्ह्यात अडकुन पडलेल्या ऊसतोड कामगारांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येत असुन दि. 1 मे, 2020 पर्यंत जालना तालुक्यामध्ये सांगली येथुन 15 व सातारा येथुन 04 असे एकुण 19 कामगार, बदनापुर तालुक्यामध्ये बीड येथुन 11 व पुणे येथुन 28 एकुण 39 कामगार, परतुर तालुक्यात सांगली येथुन 51 व कोल्हापुर 37 एकुण 88 कामगार, मंठा तालुक्यात सांगली-72 कोल्हापुर 19, व सातारा येथुन 6 असे एकुण 97 कामगार, घनसावंगी तालुक्यात सांगली-66,पुणे-36, कोल्हापुर-50 व सातारा-150 असे एकुण 302 कामगार, तर अंबड तालुक्यात बीड-28, पुणे-45,सांगली 176,कोल्हापुर-119, सातारा-354, सोलापुर-73,  लातुर-2 व अहमदनगर येथुन 07 असे एकुण 804 कामगार दाखल झाले आहेत.  जालना जिल्ह्यात परजिल्ह्यातुन आतापर्यंत 1 हजार 349 कामगार दाखल झाले आहेत.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 464 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 79 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 539 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 59 हजार 400 असा एकुण 2 लाख 86 हजार 208 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  जालना जिल्ह्यातुन इतर राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत https://jalna.gov.in/tofromjalna/  लिंक तर पोलीस विभागाचा प्रवासासाठी परवाना मिळण्यासाठी http://covid19.mhpolice.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली असुन या मध्ये माहिती भरावी. परराज्यात व परजिल्ह्यात जाण्यासाठी दोन्ही प्रकारच्या परवानग्या आवश्यक आहेत. या परवाग्या केवळ ऑनलाईन पद्धतीने दिल्या जाणार असल्याने कोणीही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करुन नयेत.  तसेच जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नोंदणी करुन नये. नोंदणी केल्याचे आढळल्यास संबंधितावर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.


मातोश्री स्व.भुदेवी गोरंटयाल अन्न छत्राचा उपक्रम कौतुकास्पद - ना.राजेश टोपे



जालना/प्रतिनिधी:- 
मातोश्री स्व.भुदेवी किसनराव गोरंटयाल अन्न छत्राच्या माध्यमातून गरीब व कष्टकर्‍यांसाठी अन्नदानाचा उपक्रम राबवून गरजू लोकांची भूक भागविण्यासाठी चालवलेला उपक्रम कोतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राजेशभय्या टोपे यांनी येथे बोलतांना केले. कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य शासनाने प्रथम राज्यात संचारबंदी लागू केली होती.राज्य शासनाच्या या निर्णया पाठोपाठ केंद्र सरकारने देखील देशभरात लॉकडाऊनचे आदेश जारी केल्यामुळे उद्योग, व्यवसाय,कारखानदारी,अगदी छोटे मोठे व्यवसाय बंद करण्यात आले. परिणामी यासर्व व्यवसायांवर अवलंबून असलेला कामगार,मजूर, गोरगरीब,आणि कष्टकर्‍यांची आर्थिक अवस्था बिकट होऊन जालना शहरातील हजारो कुटुंब आणि या कुटुंबातील सदस्यांच्या दररोजच्या अन्न पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. ही बाब लक्षात घेऊन जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल आणि नगराध्यक्षा सौ.संगीताताई गोरंटयाल या दाम्पत्याने जालना शहरातील गरीब व कष्टकर्‍यांच्या मदतीला धावून जात प्रारंभी जालना शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून पोळी भाजी,पुरी भाजी,खिचडी पुलाव वाटप करून त्यांना आधार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दि 9 एप्रिल रोजी असलेला वाढदिवस साजरा न करता कोरोनाचे संकट लक्षात घेऊन आ.कैलास गोरंटयाल यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि सहकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जालना शहरातील सुमारे 25 हजारपेक्षा अधिक गरजू कुटुंबाना अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करून मदतीचा उपक्रम राबविला. संचारबंदी सह दोनवेळा लॉकडाऊन वाढविल्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने जालन्याचे आ.कैलास गोरंटयाल आणि नगराध्यक्षा सौ.संगीताताई गोरंटयाल या दाम्पत्याने गोरगरीब व कष्टकरी लोकांच्या अन्न पाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी आपल्या मातोश्री स्व.श्रीमती भुदेवी गोरंटयाल यांच्या स्मृती प्रित्यर्थ जालना शहरात आठ दिवसापूर्वीच अन्न छत्राचा उपक्रम सुरू केला आहे. शहरातील मंगलबाजार भागात असलेल्या मोतीबंगला येथे सुरू करण्यात आलेल्या या अन्नछत्राच्या उपक्रमाला राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राजेशभय्या टोपे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार कैलास गोरंटयाल यांनी पालकमंत्री श्री टोपे यांना या उपक्रमाविषयी विस्तृत माहिती देऊन शहरातील जवळपास तीन ते चार हजार गरजूंना पाकिटबंद अन्न घरपोच पुरवठा केले जात असल्याचे सांगितले. यावेळी पालकमंत्री श्री राजेशभय्या टोपे यांनी याउपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की,जालना शहरातील सामाजिक कार्यात गोरंटयाल परिवाराने सातत्याने पुढाकार घेतला आहे. उदोजक स्व.किशनराव गोरंटयाल,स्व.श्रीमती भुदेवी गोरंटयाल यांनी गोरगरिबांना नेहमीच मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.त्यांच्या या कार्याची प्रेरणा घेऊन आ.कैलास गोरंटयाल व नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंटयाल यांनी सामाजिक कार्याचा हा वारसा जपला असून आज कोरोना सारख्या संकटाच्या कठीण परिस्थितीत नातेवाईक एकमेकांपासून दूर होत असतानाही गोरंटयाल दाम्पत्याने मात्र स्व.भुदेवी गोरंटयाल अन्न छत्राच्या माध्यमातून जालना शहरातील प्रत्येक भागात गरजू व्यक्तींपर्यंत अन्नाचे पाकीट पोहचवून दररोज गरजूंची भूक भागविण्याचा केलेला प्रयत्न अत्यंत कोतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे उदगार पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी काढले.लॉकडाऊन संपेपर्यंत शहरातील इतर सामाजिक संघटना, त्यांचे सर्व पदाधिकारी, व्यापारी,उद्दोजकांनी अशा पध्दतीने अन्नछत्र सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा देखील श्री टोपे यांनी व्यक्त केली. यावेळी राम सावंत, शहराध्यक्ष शेख महेमुद,नगरसेवक रमेश गौरक्षक, संजय भगत, हरिष देवावाले,विनोद यादव,योगेश पाटील, योगेश भोरे,अरुण घडलिंग,गोपाल चित्राल,गणेश चौधरी, दीपक जाधव, सोनू सामलेटी, पांडुरंग शिंदे, शंकर साळवे,संतोष चांदणे, मंगल मापारे, राजू घाटेकर,किरण सगट, समाधान शेजुळआदींची उपस्थिती होती.


उज्वला गॅस धारकांना मे व जून दरमहा एकप्रमाणे दोन सिलेंडर मोफत - जिल्हाधिकारी राहुल रेखावार



प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका एक किलो डाळ 
मोफत

बीड,प्रतिनिधी दि.३ :- देशातील कोरोना व्हायरस  विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत  राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरणव्यवस्थेततून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका प्रतिमाह  एक किलो या परिमाणात  तुरडाळ  व चणाडाळ या दोन्हीपैकी एक डाळ 1 किलो या कमाल मर्यादेत मोफत वितरीत करण्यात येणार आहे. तसेच उज्वला गॅस धारकांना माहे मे व जून 2020 दरमहा एक सिलेंडर याप्रमाणे एकूण दोन सिलेंडर मोफत असून गॅस सिलेंडरची किंमत  दरमहा गॅस धारकांच्या खात्यात जमा होणार आहे. ती रक्कम खात्यातून काढून गॅस कंपनीला द्यावे असे जिल्हाधिकारी राहुल यांनी  सांगितले आहे. बीड जिल्ह्यासाठी त्यानुसार तूरडाळ  व चणाडाळ ही शासकीय गोदाम देवगिरी कॉलेज रोड, उस्मानपुरा औरंगाबाद येथून उपलब्ध होणार असून तालुक्याच्या ठिकाणाच्या शासकीय गोदाम मध्ये मंजूर नियतनाप्रमाणे पोहोच करण्यात येणार आहे. शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या परिमाणानुसार खालीलप्रमाणे तालुकानिहाय मे व जून 2020 या महिन्यांसाठी मे -2020 करिता तूरडाळ व जून 2020  करिता चनाडाळीचे नियतन मंजूर करण्यात आले आहे.
    यानुसार अंत्योदय अन्न योजना ,  प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी, एपीएल केसरी शेतकरी लाभार्थी आणि उर्वरित केसरी  शिधापत्रिकाधारक लाभार्थी परिमाण प्रत्येक महिन्यासाठी नियतन मंजूर करून पोहोचवण्यात येत आहे


           कोरोना वायरसने घेतला  नांदेड़  अजून एक बळी
                   नांदेड मध्ये मृत्यू ची संख्या आता तिनवर

नांदेड (भगवान कांबळे) :-पिरबुऱ्हाणनगर भागातील त्या कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला कोणामुळे कोरोनाची लागण झाली, हा प्रश्न आजही अनुत्तीर्ण आहे. असे असतांना देगलूरनाका भागातील रहमतनगर येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान रहेमतनगर परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू असून हा परिसर  शहरातील चौथा 'कंटोंमेंट झोन ' होणार आहे.
रहेमतनगर येथील ही महिला काही दिवसांपूर्वी डॉक्टर लेन भागातील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाली होती. उपचार सुरू असताना तिला श्वास घेण्यास त्रास होत होत होता आणि दमही लागत होता. त्या महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले होते असे सांगितले जात आहे. त्या ठिकाणी त्या महिलेचे स्वाब घेतले असता त्याचा अहवाल आज पॉझीटिव्ह आल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान स्वब चाचणीच्या अहवालात खाजगी रुग्णालय,नांदेड असा उल्लेख असल्याने संबंधित महिला नेमक्या कुठल्या भागातील रहिवासी आहे, असा प्रश्न सुरुवातीला प्रशासनाला पडला होता. शेवटी शोधाशोध केल्यानंतर ती महिला रहमतनगर भागातील रहिवासी असल्याचे समोर आले. दुसरीकडे ती कोरोनाबाधित महिला सुरुवातीला डॉक्टर लेन भागातील ज्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती त्या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या असून या रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण केले जाणार असल्याचे सांगण्यात येते.
रहमतनगर भागातील त्या महिलेचा अहवाल पॉझीटिव्ह आल्यानंतर हा संपूर्ण भाग सील करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
कोरोना वायरसने हातपाय पसरवले!
गेल्या दोन दिवसात नांदेडमध्ये २३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा ग्राफ वाढत चालल्याचे दिसून येते.शनिवारी गुरुद्वारा लंगरसाहिब परिसरात कार्यरत २० जणांना कोरोना झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण असताना रविवारी कोरोना रुग्णाच्या संख्येत तीनने वाढ झाली. यापैकी दोन जण हे यात्रेकरूंना पंजाबला सोडून आलेले वाहनचालक असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कोरोना वायरसने शहरात हातपाय पसरवणे सुरू केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या व्यक्तींना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी व येण्यासाठी लागणाऱ्या परवानगीची माहिती ऑनलाईन भरा. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आवाहन

जालना,प्रतिनिधी:- लॉकाडाऊनमुळे जालना जिल्ह्यात अडकलेल्या मजुर, परप्रांतीय, विद्यार्थी, नागरिकांना परत त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी तसेच जालना जिल्ह्यातील इतरत्र अडकलेल्यांना व्यक्तींना परत आपल्या मुळगावी येण्यासाठी लागणाऱ्या परवानगीची
 आवश्यक ती माहिती भरण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्यात आलेला फॉर्म ऑनलाईन पद्धतीने पुढील दिलेल्या लिंकवर भरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे. जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना जालना जिल्ह्याच्या बाहेर आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf-3O7dG3TauMolwo6Xen0lDt97Bk1fnVS1D9pWCPQvUEK-lw/viewform  या लिंकवर आवश्यक ती माहिती भरावी.  प्रशासनाला आपली माहिती प्राप्त होताच ती संबंधित राज्याच्या, जिल्हयाच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येऊन त्यांच्याकडून नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त होताच आपण https://covid19.mhpolice.in/ या लिंकवरुन आपली माहिती भरुन आपला प्रवासाचा पास डाऊनलोड करुन घेऊ शकता. 
  तसेच भारताच्या व महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात अडकलेल्या व्यक्तींना जालना जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी परत येण्यासाठी परवानगी हवी असल्यास https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd0ooOZDnCbHnm-wxms3WXP1S50Ht6k909j40TnTXxbfeFRkw/viewform या लिंकवर आवश्यक ती माहिती भरावी. प्रशासनाला आपली माहिती प्राप्त होताच संबंधित राज्याच्या, जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनामार्फत नाहरकत प्रमाणपत्र पाठविण्यात येईल. त्यानंतर प्रवासासाठी आवश्यक असलेल्या पाससाठी https://covid19.mhpolice.in/ या लिंकवर माहिती भरावी प्रशासनामार्फत आपल्या पासला मंजुरी देण्यात येईल त्यानंतर आपण आपला पास डाऊनलोड करु शकता. नागरिकांनी आपल्या गरजेनुसार वरीलपैकी लिंकवर आवश्यक माहिती भरून  जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02482-223132 येथे संपर्क करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.



                  मालेगाव येथुन आलेल्या चार जवानांच्या 
                         स्वॅबचे अहवाल पाझिटीव्ह.



मुंबई येथुन परतुर येथे आलेल्या तरुणाचा अहवालही पॉझिटीव्ह

जालना,प्रतिनिधी:- मालेगाव जिल्हा नासिक येथे जालना येथील राज्य राखीव बलगट क्र. 3 चे जवान बंदोबस्तासाठी गेले होते.  यापैकी जालना येथे परत आलेल्या चार जवानांच्या स्वॅबचा अहवाल दि. 1 मे, 2020 रोजी प्रयोगशाळेकडून पॉझिटीव्ह आला आहे. तसेच परतुर येथील २४ वर्षीय तरुण मुंबई येथुन आला असुन या युवकाच्या स्वॅबचा अहवालही पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.कोरोनाचा पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या चार जवानांपैकी एक जवान जालना शहरातील चौधरीनगर परिसरातील रहिवाशी असल्यामुळे उप विभागीय अधिकारी, जालना यांनी चौधरीनगर, सनसिटी, पोद्दार शाळेच्या मागील व खरपुडी शिवारातील चौधरीनगरलगत असणारी घरे हा संपुर्ण भाग एक किलोमीटर परिसराती क्षत्र प्रतिबंधित म्हणुन घोषित केले असुन या क्षेत्राच्या सीमा व त्यामधील क्षेत्र तसेच चौधरीनगरमध्ये जाणाऱ्या सर्व बाजुच्या रस्त्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात एकुण 1035  व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 60 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 712 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 23 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 907 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने -05 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 08 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 871, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 120, एकुण प्रलंबित नमुने-24 तर एकुण 652 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 31, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 405 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 18, सध्या अलगीकरण  केलेल्या व्यक्ती -278, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-20, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 60, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 37, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 190 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.  
कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 278 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना – 48, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह-41, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-28, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-19, पोलीस प्रशिक्षण केंद्र-112, मंठा येथे 13, परतुर-08, जाफ्राबाद-6 तर भोकरदन येथे 03 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.लॉकडाऊनमुळे परजिल्ह्यात अडकुन पडलेल्या ऊसतोड कामगारांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येत असुन दि. 1 मे, 2020 पर्यंत जालना तालुक्यामध्ये सांगली येथुन 15 व सातारा येथुन 04 असे एकुण 19 कामगार, बदनापुर तालुक्यामध्ये बीड येथुन 11 व पुणे येथुन 28 एकुण 39 कामगार, परतुर तालुक्यात सांगली येथुन 51 व कोल्हापुर 37 एकुण 88 कामगार, मंठा तालुक्यात सांगली-72 कोल्हापुर 19, व सातारा येथुन 6 असे एकुण 97 कामगार, घनसावंगी तालुक्यात सांगली-66,पुणे-36, कोल्हापुर-50 व सातारा-150 असे एकुण 302 कामगार, तर अंबड तालुक्यात बीड-28, पुणे-45,सांगली 176,कोल्हापुर-119, सातारा-354, सोलापुर-73,  लातुर-2 व अहमदनगर येथुन 07 असे एकुण 804 कामगार दाखल झाले आहेत.  जालना जिल्ह्यात परजिल्ह्यातुन आतापर्यंत 1 हजार 349 कामगार दाखल झाले आहेत.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 458 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 79 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 539 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 59 हजार 400 असा एकुण          2 लाख 86 हजार 208 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातुन इतर राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत https://jalna.gov.in/tofromjalna/  लिंक तर पोलीस विभागाचा प्रवासासाठी परवाना मिळण्यासाठी http://covid19.mhpolice.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली असुन या मध्ये माहिती भरावी. परराज्यात व परजिल्ह्यात जाण्यासाठी दोन्ही प्रकारच्या परवानग्या आवश्यक आहेत. या परवाग्या केवळ ऑनलाईन पद्धतीने दिल्या जाणार असल्याने कोणीही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करुन नयेत.  तसेच जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नोंदणी करुन नये. नोंदणी केल्याचे आढळल्यास संबंधितावर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...