शुक्रवार, १० एप्रिल, २०२०


शहरातील दु:खीनगर भागातील 7 हजार 22 व्यक्तींचे सर्व्हेक्षण पुर्ण
              16 एप्रिलपर्यंत सर्व्हेक्षण सुरुच राहणार
जालना, प्रतिनिधी – जालना शहरातील दु:खी नगर परिसरात 20 पथकाच्या सहाय्याने 1 हजार 175 कुटूंबातील 7 हजार 22 व्यक्तींचे सर्व्हेक्षण करण्यात आले असुन हे सर्व्हेक्षण 
16 एप्रिल, 2020 पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती जिल्ह्यात एकच कोरोनाबाधित असलेल्या महिलेच्या निकट संपर्कात आलेल्या सामान्य रुग्णालयातील 17 कर्मचाऱ्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असुन त्यांच्या स्वॅबचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.  दि. 6 एप्रिल रोजी कोरोना बाधित महिलेवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरु असुन त्यांची प्रकृती गंभीर आहे.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे आतापर्यंत 159 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले असुन 15 व्यक्तींना अटक करण्याबरोबरच 15 वाहने जप्त करण्यात आली आहेत तर 26 हजार 808 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे जिल्ह्यात कोरोनाच्या एकुण 499 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 131 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 305 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 22 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 306 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने निरंक असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 01 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 267, रिजेक्टेड नमुने-03, एकुण प्रलंबित नमुने-34 तर एकुण 174 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 5, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 72 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या शुन्य, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-5, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या निरंक, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 131, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या            67 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे. 

a
जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

           राशन दुकानदारांकडून ग्राहकांची सरास लूट
         एका कार्ड धारकाकडून 5 किलोचे अन्न लंपास
                  हा काळा बाजार थांबणार कधी

  
जालना / प्रतिनिधी :- जालना तालुक्यात राशन दुकानदारांकडून गरीब ग्राहकांची सर्रास लूट करण्यात येत आहे.प्रत्येकी ग्राहकाकडून 5 ते 10 किलो चे धान्य दुकानदार 
लंपास करीत असल्याचे निदर्शनात आले.
शहराचा धान्य पुरवठा हा ग्रामीण भागात वितरण होत असल्याचे निदर्शनात आले आहे.शासनाकडून प्रत्येकी व्यक्ती 3 किलो गहू तर 2 किलो तांदूळ देण्यात येते परंतु स्वस्त धान्य दुकानदार हे प्रत्येकी कार्ड मागे 5 ते 10 किलो धान्य ग्राहकाकडून लंपास करून ग्राहकांची लूट करीत आहे.तसेच जालना शहरातील दुकान नंबर 44 चा धान्य हतवन येथील दुकान नंबर 157 मध्ये या धान्याची काळ्या बाजाराने विक्री होत असल्याची बाब लक्षात आली असता या दुकानदाराला जालना तालुका पुरवठा अधिकारी राजमनी यांच्या समोर हजर करण्यात आले.हा काळ्या बाजाराची त्याच्या समोर उघड झाला आहे.देश भरात कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे यामुळे देशभरात लोकडाऊन करून सचारबंदी लादण्यात आली आहे.यासाठी गरिबांचे हाल होऊ नये त्यांना उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. अन्नधान्य हा मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.विविध संघटना हे गोर गरिबांसाठी जेवण अन्नधान्य हे मोफत पुरवठा करत आहे.आणि दुसरीकडे स्वस्त धान्य दुकानदार याचा गैरफायदा घेत आपली घरे भरत आहे.गोरगरीब जनतेची पिळवणूक करीत आहे.याला शासनाने कुठेतरी आळा घालावा नसता गरीब जनतेवर उपासमारीची वेळ येईल.जालना तालुका पुरवठा अधिकारी राजमनी यांनी असं जर कुठे आढळून आल्यास याची तक्रार करावी जेणे करून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असल्याचे त्यांनी सांगितले.पुढे बोलताना राजमनी म्हणाले की,मे व जुनचा पुरवठा हा रास्त भावानेच होईल तोही उद्यापासून त्याचे वाटप सुरू करण्यात येणार आहे त्यात तांदूळ हे शासनाकडून मोफत देण्यात येणार आहे त्याचे कोणतेच पैसे घेण्यात येणार नाही ते मोफत देण्यात येईल.जर कोणी दुकानदार त्याचे पैसे लादत असेलतर त्याची तक्रार करावी त्याच ठिकाणी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल.
             साध्या पद्द्तीने महात्मा फुले जयंती साजरी करवी.

सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) :- महात्मा ज्योतिबा फुले यांची सार्वाजानिक जयंती 11एप्रलि रोजी असुन ती आपल्या घरातच कुटूंबासोबत साजरी करावी, 
असे आवाहन महाराष्ट्र माळी समाज महासंघ तालुका अध्यक्ष संजय गिराम यांनी केले आहे. देशावर कोरोनाचे संकट आहे. सर्वांनी घरातच फोटोची पुजा करावी.सध्या जगावर कोरोना सारख्या माहामारीचे संकट आहे आणी हजारो लोक म्रुत्यु मुखी पडले आणी हजारो लोकांना याची लागन झालेली आहे हीच परिस्थिती लक्षात घेता भारतात सुध्दा 14 एप्रिल पर्यंत संचार बंदी घालण्यात आली आहे . महात्मा जोतिबा फुले यांची जयंती घरातच साजरी करावी व सरकार ला सहकार्य करावे असे महाराष्ट्र माळी समाज महासंघ तालुका अध्यक्ष संजय गिराम यांनी सांगितले.

             पोलीसांनी तयार केली सॅनिटायझर व्हॅन
             पोलिसांसाठी देखील सॅनिटायझर व्हॅन!
पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली झाली निर्मिती
जालना,प्रतिनिधी :- जीव धोक्यात घालून 
ही रक्षण करणाऱ्या पोलीसांचे संरक्षण व्हावे म्हणून जालना पोलीसांनी सॅनिटायझर व्हॅनची निर्मिती केली आहे. एका पोलीस व्हॅनचे रुपांतर सॅनिटायझर व्हॅनमध्ये केले असून कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांसाठी या व्हॅनमधून सॅनिटायझेशन करण्यात येत आहे.पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विशेष शाखेकडून या व्हॅन ची निर्मिती करण्यात आली आहे.कर्तव्यावर असलेल्या पोलीसांना एका प्रकारे सुरक्षा कवच मिळाले आहे.पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विशेष शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही व्हॅन तयार केली आहे. जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, प्रशांत महाजन आणि बिनतारी संदेश यंत्रणेचे पोलीस निरीक्षक संजय व्यास या तिघांच्या प्रयत्नांमधून ही व्हॅन तयार झाली आहे.व्हॅनच्या आतमधील सर्व बाजू प्लास्टिकने बंद करुन शेती आणि यंत्र अन्य कारखान्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्पिंकलरच्या साह्याने यांमधून सॅनिटाझरची शरीरावर फवारणी होते. शहरातील सर्व भागांमध्ये फिरून त्याठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांसाठी ही व्हॅन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. जिल्हा विशेष शाखेने केलेल्या या उपक्रमाबद्दल पोलीस प्रशासनातून त्यांचे कौतुकही होत आहे. अतिरीक्त पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी बोलताना या व्हॅनची माहिती दिली.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...