गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

          धर्माबाद नगर परिषद व पोलिस प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील सर्व  सीमा बंद; बाहेरच्यांना लोकांना शहरात नो एन्ट्री
धर्माबाद( भगवान कांबळे) :-कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस स्टेशन 
व नगर परिषद च्या वतीने धर्माबाद शहर आता शिल करण्यात आले  आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत तालुक्यात व शहरात येणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. मात्र, या लोकांमळे हा आजार आपल्या शहरात व तालुक्यात  पसरू शकतो या भीतीने काही गावांनी आपल्या सीमा बंद करुन घेतल्या आहेत. यापूर्वीच म्हणजे सोमवारी सरकारने राज्यात संचारबंदीसह जिल्ह्यातील सीमाही बंद केल्या आहेत. त्यामुळे अनेकजण जिल्ह्यात अकडून पडलेत. तर, गावकऱ्यांनीही सीमा बंद केल्याने गावातही जाताना अडचण येत आहे. दरम्यान, गावाकडे आलेल्या नागरिकांशी सौजन्यावे वागण्याचं आवाहन धर्माबाद पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सोहन माच्छरे  यांनी केलं आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर जनता कर्फ्यू पुकारण्यात आला. पण, त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी दिसलेले चित्र हे चिंता वाढवणारे असेच होते. कारण, मोठ्या प्रमाणात नागरीक घराबाहेर पडले होते. बाईक, कार, रिक्षा यांची संख्या देखील रस्त्यावर मोठी होती. त्यामुळे रविवारी कमावलं के सोमवारी गमावलं असे हे चित्र होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदीचा निर्णय घेतला. सोबतच जिल्ह्यातील सीमाही ऐकमेकांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. यातून अत्यावश्यक सेवा वगळ्यात आल्या आहेत.
                      तालुक्यातील काही गावतही सीमाबंदी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात असून धर्माबाद  तालुक्यातील ब-याच  गावकऱ्यांनी नवीन व्यक्तींना गावात नो एंन्ट्री केली आहे. याबाबतचा निर्णय सोमवारी गावकऱ्यांच्या बैठकीत झाला आहे.  राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात आहेत. घरा बाहेर न जाणे, सतत हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे यासह इतर सुचना दिल्या जात आहेत. या शिवाय गर्दीची ठिकाणे टाळण्याच्या सुचनाही दिल्या जात आहेत.
    करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरात थांबावे, यासाठी      धर्माबाद  पोलिसांच्या वतीने परिसरात रूट मार्चद्वारे आवाहन
धर्माबाद(भगवान कांबळे):- महाराष्ट्रापुढे कोरोना व्हायरसचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनावर मात 
करण्यासाठी डॉक्टर, पोलीस आणि आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करत आहे.  करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरात थांबावे, यासाठी धर्माबाद  पोलिसांच्या वतीने शहर परिसरात रूट मार्चद्वारे आवाहन करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी सूनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली धर्माबाद  पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सोहन माच्छरे यांच्या आदेशानुसार  पोलिस  स्थानकापासून ते  शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक फूलेनगर , साठेनगर, रामनगर, मेनरोड बाळापूर रत्नाळी मौलाली नगर  या प्रमुख मार्गावर सहाय्यक पोलिस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे,  अनिल सन्नगले, यांसह ३० पोलिस कर्मचारी व होमगार्ड यांचा एकत्रित रूट मार्च विविध भागांतून पार पडला.

            !! काय केलस कोरोंना......भूक घरी बसु देत नाही !!                                   सरकार घराबाहेर निघू देत नाही !
देशाची संवाद साधायची बातमी येते तेव्हा मनामध्ये धस करते. कारण देशातील नागरिकांनी धसकाच घेतलाय .देशवासियांना याचा पूर्वानुभव आहेच. संपूर्ण जग कोरोना.नावाच्या
भयानक वायरस चा सामना करण्यासाठी आपल्या देशातील आरोग्य सेवेचा आढावा घेऊन.पूर्वतयारी करत असताना. आपल्या देशाचे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मात्र  आपल्याच धुंदीत होते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात. आपल्या देशांमध्ये पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हा प्रधानमंत्री .नमस्ते ट्रम्प. आणि मध्यप्रदेशच्या  प्रदेश सरकारच्या घडामोडींमध्ये व्यस्त होते. त्यांच्या अगोदर राज्य सरकारांनी. आपल्या  राज्यात खबरदारीचा उपाय करत असताना .चहूबाजूने नरेंद्र मोदी यांच्यावर टीका होण्यास सुरुवात झाली. तेव्हा त्यांना अचानक देशातील नागरिकांना संवाद साधण्याची आठवण आली. पहिल्याच संवादामध्ये त्यांनी एक दिवसाचा जनता कर्फ्यू. स्वतःहून पाळण्याचे आव्हान देशवासीयांना केले. तेव्हा कुठे त्यांना डॉक्टर. नर्स .पोलीस .सफाई कामगार. आपल्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस लढत असल्याचे दिसले. या सर्वांचं मनोबल वाढवण्यासाठी. व आभार व्यक्त करण्यासाठी. संध्याकाळी पाच वाजता सर्वांनी. आपल्या घरासमोर दारात येऊन टाळी आणि थाळी वाजवून यांचे आभार मानावे असे आव्हान केले. बहुतांशी देशातील जनता कुठलीही शंका न घेता मोठ्या प्रमाणावर याच्यावर अमल केली. टाळी थाळी वाजवून काही होणार नाही. माहित असून सुद्धा. मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. ते या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व बंधू भगिनींन च मनोबल वाढवणे साठीच. आपण जे आव्हान केलं. त्याला जनता प्रतिसाद देते.म्हणून कसलीही  पूर्वतयारी न करता अचानक 21 दिवसाचे लॉक डाऊन जाहीर केले. झालं असं अन्नधान्य यांचा तुटवडा पडतो की काय. या भीतीपोटी लोकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी तुंबळ गर्दी केली. आपापल्या कुवतीप्रमाणे खरेदी करून साठवले. दुसरीकडे मजूर वर्ग चिंतेत पडला. रोज काम केल्याशिवाय चूल पेटत नाही. अशांची संख्या लाखोंच्या घरात जाते. त्याच बरोबर ज्यांचं पोट भिक्षेवर अवलंबून आहे. त्यांची तर कल्पनाच केलेली बरी. डोंबारी समाज .रस्त्यावर खेळ मांडून .आपल्या मुलांचा जीव धोक्यात घालून. लोकांचं मनोरंजन करतो. त्यावर मिळालेल्या पैशावर पोट भरतो. पारधी समाज. रस्त्यावर खेळणी लहान सहान  वस्तूंची विक्री करून आपली भूक भागवतो. मांगारूडी समाज .म्हशी भादरने. जनावरांची सिंग कापणे. करून आपलं घर चालवतो .डक्कलवार समाज . भिक्षेवर अवलंबून असतो. त्याच बरोबर बुर बर् पोचंमा. असो किंवा गोसावी डौरी गोसावी असो.हा  सर्व समाज आज सुद्धा मोठ्या प्रमाणावर भिक्षा मागूनच जगतो. या सर्वावर उपासमारीची वेळ आली. त्यांच्याकडे  कुणाचेच लक्ष नाही. नेत्यांचे लक्ष भविष्यात आपल्या कामी येणार याकडे .शासकीय अधिकाऱ्यांचे त्यांचं  लक्ष जाईल तिथेच .अशी अवस्था दिसून येते. शासन सांगते कोणीच उपाशी झोपणार नाही. इकडे मजुरांना व गरिबांना काहीच मिळत नाही. प्रश्न असा की खाते कोण?
आठ एप्रिल रोजी धानुरे. ता. खेड. जिल्हा .पुणे येथून मला फोन आला .लातूर विभागातील तीनशेच्या आसपास मजुर  अडकलेत. गावी जाण्यासाठी साधन नाही .घरी भरलेलं राशन  संपत आले. आमच्यावर उपासमारीची वेळ आली. आम्हाला कोणीच मदत करत नाही. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राम वावडे. यांनी आपल्या परीने थोडीफार मदत करण्याचा प्रयत्न केला .परंतु तेवढ्यावर कसं भागणार? शासनाची काहीच मदत पोहोचत नाही .असे संगीले. यांची दुसरी अडचण अशी. की यांच्याकडे रेशन कार्ड नाहीत. एक वर्षासाठी तात्पुरते रेशन कार्ड दिले होते. परंतु एक वर्षानंतर त्याचा सर्वे केला नाही. त्यांना कायमची रेशन कार्ड दिले नाहीत .त्यामुळे शासनाचे रीतसर अन्नपुरवठा दुकान आहेत. तिथून यांना रेशन मिळत नाही. म्हणून त्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली. शासन व्यवस्था असंच काम करत राहिली. तर कोरोना  पेक्षा जास्त लोक अन्न अन्न करुन तडफडून मरतील. ही वेळ येऊ द्यायची नसेल  तर सरकारला आपल्या कामाची गती वाढवावी लागेल. अन्न व नागरी पुरवठा. संबंधित जिल्हा अधिकारी. प्रांत अधिकारी. गाव पातळीवरील कर्मचारी .या सर्वांच्या संगनमताने. योजनाबद्ध पद्धतीने गरजू उपाशीपोटी झोपणाऱ्या पर्यंत. अन्न धान्य तातडीने  पोहोचवले पाहिजे. याच बरोबर  आदिवासी समाजाची. सुद्धा अधिक काळजी घेण्याची गरज आहे. आगोदरच कुपोषणामुळे  रोज हजारो बालकांचा मृत्यू होतो .अशा महामारी च्या वेळी तर परिस्थिती आणखीन भयानक होऊ शकते. म्हणून त्यांच्याकडे विशेष  लक्ष देण्याची गरज वाटते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे. आरोग्य मंत्री आदरणीय राजेश टोपे .आदरणीय गृहमंत्री अनील देशमुख .आणि त्यांचे सर्व मंत्रिमंडळ .डोळ्यात तेल घालून 24 तास या परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. खूप चांगलं काम करत आहेत. किती रुग्ण वाढले. किती रुग्ण बरे झाले .किती रुग्ण दगावले.डॉक्टर .नर्सेस. सफाई कर्मचारी.यांच्या सुरक्षेसाठी काय काय उपाययोजना केली. तपासणी केंद्र किती वाढवले. सरकार याविषयी किती संवेदनशील आहे .तपशीलवार माहिती महाराष्ट्राला देत आहेत. परंतु एवढ्यावर भागणार नाही. हे सुद्धा तेवढेच खरे. गोरगरीब वंचित बेसहारा लोकांना वेळेवर अन्नधान्य पोहोचलं नाही. तर पुढील काळामध्ये भयंकर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा. प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल. ज्या पद्धतीने माध्यमे कवर करत आहेत. त्यावरून असे दिसते की मजूर गरीब सर्वहारा समाजाचं यांना काहीच पडलेले नाही .किती गरिबांपर्यंत अन्नधान्य गेलं अडकलेल्या मजुरांची काय  अवस्था. याची बातमी ना वाचायला मिळते ना बघायला मिळते .फक्त शासनाने कोरोना विषयी .जी माहिती दिली जाते त्याच बातम्या वारंवार दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून वास्तव समोर येत नाही. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. म्हणतात माणूस कोणत्याही परिस्थितीत जगलाच पाहिजे. अन्न व नागरी पुरवठा संबंधित जिल्हा अधिकारी प्रांत अधिकारी गाव पातळीवरील अधिकारी कर्मचारी यांना एवढीच विनंती .या संकट काळी.कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही मार्गाने यांना जगवा. कारण महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी  या कष्टकरी वंचित समूहाचा सिंहाचा वाटा आहे. शेवटी या गरीब व बेसहारा समूहाला जगवण्याची शासन व समाज.या सर्वांची जबाबदारी आहे. माणूस हा जगलाच पाहिजे. आता या गरीब वंचित कष्टकरी समूहावर असं

  म्हणायची वेळ आली आहे...काय केलंस कोरोना....भूक घरात               बसू देत नाही.. सरकार घराबाहेर निघू देत नाही.
                       ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
                       सुभाष हणमंते./संपादक.चार्वाक                                                   दर्शन.मुंबई.मो.नो.9987788692



             जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी
                 पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातुन
                16 कोटी 30 लक्ष रुपयांच्या निधीस मंजुरी
जालना, प्रतिनिधी :- जालना जिल्ह्यातील 
जनतेला आरोग्याच्या सेवा अधिक चांगल्या प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातुन आरोग्य सेवेसाठी जवळपास 16 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.अंबड येथे असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे नुतणीकरण व निवासस्थानांच्या कामांसाठी 4 कोटी 59 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  तसेच जालना येथील जिल्हा रुग्णाललयाच्या टाईप-1 व टाईप-2 निवासस्थांनाची दुरुस्ती, ईमारतीची व परिसरातील ड्रेनेज व अंतर्गत रस्ते दुरुस्ती आदी कामांसाठी 8 कोटी 72 लक्ष रुपये तर घनसावंगी येथील ग्रामीण रुग्णालयातील कक्षाचे बांधकाम, परिसर सुधारणा, मुख्य ईमारत व निवासस्थानांच्या दुरुस्तीसाठी 2 कोटी 99 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.


     निवडणूक दरम्यान मतासाठी दारू.मटन खाऊ घालणार्यानो
                           आता दानत्व दाखवाल काय ?
                                        ✍️✍️✍️     
                               संपादक....हँलो रिपोर्टर.
भारतात कोरोना नवाची बीमारीने आपले वास्तव्य निर्माण केले .पाहाता पाहता हा रोग शहरा पासुन ग्रामीण 
भागात हि डोक वर काढु पाहातोय याला रोकण्यासाठि आपले सरकार .आणी सामाजिक संस्था हि कामाला लागल्या महत्वचा चे म्हणजे लाँकडाऊन हे ब्रम्हास्त्र जबरदस्त वापरल्याने कोरोना चा फैलाव बराच आटोक्यात आला आहे.एक बाब मात्र कोणाला समजेना निवडणूक काळात मतदार राजाला वेगवेगळ्या उपमा देणारे. मतासाठी विकास कमा बाबत निरनिराळे आश्वासन देनारे आणी शेवट शेवट निवडून येतच नाही हे लक्षात आल्यावर. मतदारसंघात मतदाराना दारु.मटन.खाऊ घालणारी पांढरी पिलावळ आता गेली तरी कुठे.आज सरकार मदतीला धावतय सामाजिक संस्था धरपड करतायत कि आज काही जरी झाले. तरी महाराष्ट्रत ऊधभवलेली महामारीतुन जनता वाचली पाहिजे म्हणून सर्वस्थरातुन सहकार्य होताना दिसत आहे.  परंतु आमचे नेते. दादा.नाना.काका.राजे.साहेब. आबा.बाबा. आन्ना .भैय्या .ऱ्यहदयस्थान.हे आता आशा वेळेस आपल्या बाले किल्यातल्या मावळ्यांना मदतीला का येईनात नेमक काय झालय या लोकांना आज पंधरा दिवस झालय लाँकडाऊन सुरु झलय.आहो ज्या मतदारसंघात संघात आपण लाखाच्या सभा लावल्या लोक बिचारी पडत्या पावसात आपले भंपक भाषणे ऐकुन तुमच्या सभेला हजर राहिले आज हिच भोळी भाबडी जनता व तुमचा कार्यकर्ता तुमच्या  एका फोनची आणी मदतीची वाट पाहातोय पण आद्याप एका हि पाढंरपेशा वर्गानी जनतेला मदत .धिर .किंवा घाबरू नका आम्ही आपल्या बरोबर आहोत आसा धिर दिला नाही. मान्य आहे. संचार बंदी आहे. लाँकडाऊन आहे.म्हणून भेटता येत नाही आस आपणास मनायचे का आपल्याला. मग आम्ही म्हणतो की.जसे आपण निवड नुकीत मतासाठी पैसा वाटण्यासाठी कींवा दारू .मटन .कसे पोचवता तशी आत्ता हि जनता वाचवण्यासाठी डोक लावा आणी आपल्या बालेकिल्ला वत्या ठिकाणी आसणार्या लोकाचा विचार करा नुसत्या निवडणूकी पुर्ता विचार करणे सोडा आज प्ब्लिक संकटात आहे.पुढार्यानो जरा मैदानात या आज खरच लोकांना हताला काम नाही. खिशात दाम नाही. किराणा दुकानात आव्वाच्या सव्वा किमतीत माल दिला जातोय. सर्वसामान्य ना पंपावर पेट्रोल डिझेल मिळेना .दवाखान्यात जातानाही पोलीस दांडे घालत आहे. एक लक्षात घ्या ज्या जनतेच्या मतावर सरकार स्थापन झाले. त्याच सरकार चे पोलीस आम्हाला नाहक बडवत आहेत. परंतु पुढार्यानो. पोलिसांनो लाँकडाऊन थोडे दिवस चालेल नंतर आम्ही नागरिक च आपल्याला कामी येणारे आहोत.म्हणून सर्वानी आपल्या आवकातीत राहावे. आणी आज आम्ही संकटात आहोत आपली जबाबदारी समजून आम्हाला सहकार्य करा आसा सुर सध्यातरी आम जनतेतुन निघत आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...