गुरुवार, ४ जून, २०२०

लोकांचा अंत सरकारने पाहू नये,वीस लाख कोटीच्या पॅकेजची पुनर्रचना करावी - प्रकाश आंबेडकर





अकोला,ब्युरोचीफ :- इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड (आय.एम.एफ) मुळे देशातील लॉकडाऊन मध्ये
अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर पत्रकारांशी बोलत होते. देशातील अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून त्यासाठी २० लाख कोटींच्या पॅकेजची पुनर्रचना करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे ते पॅकेज निर्मिती (प्रोडक्शन) करणाऱ्यांच्या फायद्यासाठी आहे, म्हणून अर्थव्यवस्था मजबूत करायचे असेल तर प्रोडक्शन बरोबरच मागणाऱ्यांची साईड देखील महत्त्वाचे आहे त्याचा विचार केला गेला पाहिजे, मागणारच नसेल तर प्रोडक्शन करून काय उपयोग आहे. म्हणूनच २० लाख कोटींच्या पॅकेजची पुनर्रचना होणे गरजेचे आहे. यामध्ये मागणी करणाऱ्या मजूर, मध्यमवर्गी यांचा विचार केला गेला पाहिजे असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले
           गेल्या सत्तर दिवसांपासून लोक घरांमध्ये कोंडले गेले आहेत, जेल मध्ये माणूस कसा जगतो ते त्यांनी भोगलेले आहे म्हणून लोकांचा अंत सरकारने पाहू नये, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी ही माहिती दिली.
वाढ करण्यात आली आहे. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून सर्वसामान्यांचे जीवन हे सुरळीत झाले पाहिजे, ही लोकांची भावना आहे. सरकारने लोकांचा अंत पाहू नये तसेच कोरोनाच्या रुग्णांना वाचविण्यासाठी सर्वतोपरी मदत केली पाहिजे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांचा अकोला दौरा, अनेक विषयांवरीती केल्या बैठका,कोरोनाग्रस्तना सेवा देण्याच्या सूचना

अकोला,ब्युरोचीफ :-  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली. डॉक्टरांची कमतरता असल्याने खाजगी डॉक्टरांची सेवा घेण्याबाबतचा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला. तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

        अकोला शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून हा भाग रेड झोन मध्ये आला आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने डॉक्टरांची कमी जाणवत आहे. त्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची भेट घेतली. या वेळी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, अनेक खासगी डॉक्टरांनी आमच्याशी संपर्क करून आम्ही सर्विस देण्यास तयार आहोत तर अशा डॉक्टरांची सर्विस पालिकेने घ्यावी. ज्यांचे नर्सिंग होम आहेत आणि ते द्यायला तयार असतील तर ते घ्यावे. त्याचबरोबर आता परीक्षा नसल्याने अनेक विद्यार्थी जिल्हयात परत येतील. त्यांची उतरण्याची आणि तपासण्याची सोय एकाच ठिकाणी करण्यात यावी, तसेच कोरोना व्हायरसचे जे रुग्ण आहेत,त्यांच्यात तीन विभाग करण्यात यावेत, ज्यांची तपासणी झाली असे, ज्यांना लागण झाली आणि अतिगंभीर असणारे, शिवाय ज्यांना कोरोनटाईन करायचे आहे त्यांना त्यांच्या घरामध्ये कोरोनटाईन करून, त्यांची चौकशी करावी, ज्यांना श्वसनाचा त्रास नाही त्यांच्यावर घरीच उपचार करावे, जेणेकरून रुग्णालय प्रशासनावर ताण येणार नाही. या सर्व विषयांवर चर्चा झाल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
     या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ घावकर, मनपा आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच वंचितचे प्रवक्ते डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, प्रदेश महिला महासचिव अरुंधती सिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखेडे उपस्थित होते. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला चार दिवसात डिस्चार्ज, घरी पाठविलेला रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह, जिल्हा प्रशासनाचा हलगर्जीपणा - राजेंद्र पातोडे.


अकोला,ब्युरोचीफ :-  येथील २७ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याला अवघ्या चार दिवसात चाचणी न करता घरी पाठविण्याचा प्रताप जिल्हा सामान्य रुग्णालय व महापालिका प्रशासनाने केला आहे. या तरुणांची पुन्हा टेस्ट केली असता तो पॉझिटिव्ह निघाल्याने त्याच्या कुटुंबियांवरती कोरोन्टाईन होण्याची वेळ आली आहे.  जिल्हा प्रशासन व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळेच अकोल्यात कोरोनाचा हॉट स्पॉट तयार झाला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.अकोल्यातील देशमुख फाईल या ठिकाणी राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणाची १९ मे रोजी स्वॅप टेस्ट करण्यात आली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात केलेल्या या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. २१ मे रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अवघ्या पाच दिवसात २५ मे रोजी 

त्याला डिस्चार्ज देऊन पीकेव्हीही येथील विलगीकरण केंद्रात पाठविण्यात आले. पीकेव्हीही येथील केंद्रात काहीही सुविधा नसून थातुरमातुर वैद्यकीय सेवा देत असल्याचे सदर तरुणाचे म्हणणे आहे. २५ मे  रोजी डिस्चार्ज देताना त्याच्या केस पेपरवर मात्र दाखल केल्याची तारीख १ मे तर डिस्चार्ज केल्याची तारीख १५ मे अशी टाकून बनावट केस पेपर तयार केल्याचा धोकादायक प्रकार समोर आला आहे. पॉझिटिव्ह असलेल्या तरुणाला २९ मे रोजी घरी पाठविण्यात आले. त्यावेळी त्याला त्रास कायम होता. त्याकडे दुर्लक्ष करून कोरोना रुग्णाची पुन्हा टेस्ट न करता त्याला घरी पाठविण्यात आले. अर्थात पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह झाला की नाही याची शास्त्रीय पद्धतीने खातरजमा न करता त्याला घरी पाठविण्यात आले. माञ त्रास कायम असल्याने हा तरुण २ जूनला पुन्हा शासकीय महाविद्यालयात परतला असता त्याचा अहवाल ४ जूनला पॉझिटिव्ह आला. या प्रकारामुळे त्याचे कुटुंबीय देखील संकटात सापडले आहे. अकोल्यात उघडकीस आलेला हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. शासकीय महाविद्यालय, महापालिका व जिल्हा प्रशासन हे रुग्णाच्या जीवाशी खेळत असल्याचे या रुग्णांच्या प्रकरणावरून दिसून आले आहे. रुग्ण सापडलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर नागरिक बाधित होत आहेत. परिणामी अकोला कोरोनाचा हॉट स्पॉट बनला असून जिल्ह्यातील रुग्ण मृत्यू दर विदर्भात सर्वाधिक आहे.जिल्हा प्रशासन व जिल्हा सामान्य रुग्णालय आणि मनपा मधील अधिकारीच गंभीर नसल्याने अकोला जिल्हा करीता तातडीने तीन स्वतंत्र आयएएस अधिकारी नेमण्यात यावेत. तसेच बाधीत तरुणाची फेरतपासणी न करता घरी पाठविल्या प्रकरणी दोषीं विरोधात तातडीने गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने मुख्यमंत्र्यकडे केली आहे.
              बैलजोड्याची खरेदी-विक्री बंद,शेतकरी यांना बैलांचा शेतीकामासाठी मोटा आधार


शिरसदेवी/शाम अडागळे
परिसरात खरीप हंगाम तोंडावर आला असून शेती मशागतीची लगबग वाढली आहे शेती कसण्यासाठी बैलांची आवश्यकता असते परंतु सद्या ताळेबंदी मूळे बैलबाजार बंद असल्यामुळे बैलजोड्यांची खरेदी विक्री बंद आहे. त्यामुळे सिरसदेवी परिसरातील  शेतकरी यांना चांगली बैलजोडी मिळवण्यासाठी  शोध घ्यावा लागत आहे. बैलांचे दर वाढल्याने   योग्य बैलजोडी मिळत नाहीत शेतकरी यांच्या समोर पेच निर्माण झाला आहे. छोट्या शेतकरी यांच्या जमीन मशागतीची मदार बैलावर अवलंबून असतो शेतीत यांत्रिकीकरण असते तरी अल्पभूधारक शेतकरी यांना बैलांचा शेतीकामासाठी मोटा आधार मिळतो या बैलजोड्यांची खरेदी विक्री मान्सूनपूर्व काळात होते तल तलवडा, नाथापूर येते बैलांचा मोटा बाजार भरतो परंतु ऐन हंगामात सुरू असलेल्या टाळे-बंदी मुळे बैलबाजार बंद आहे त्यामुळे बैल खरेदी बंद असल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत पुडील महिन्यात खरीप हंगाम सुरू होत आहे हा हंगाम बैलशक्तीवर अवलंबून असल्याने या व्यवहार महत्त्वाचे आहे यंदा टाळेबंदी सुरू असल्याने सर्व प्रकारचे बाजार बंद आहेत याचा फटका प्रामुख्याने जनावरांच्या बाजारात मोट्या प्रमाणात बसला आहे बैल बाजार बंद असल्याने शेतकरी वैक्तिक स्तरावर खरेदी करत आहेत.
                

                    पुरोगामी पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी विनोद काळे यांची फेर निवड


जालना,ब्युरोचीफ :- महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी दैनिक मराठवाडा साथीचे उपसंपादक विनोद काळे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक - अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी ही निवड केली आहे. महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचा कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ तसेच दक्षिण महाराष्ट्रातही विस्तार झालेला आहे. पुरोगामी पत्रकार संघ हे राज्यातील पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणारे मजबूत संघटन आहे. दरम्यान, येथील 
पत्रकार विनोद काळे यांची जालना जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड नुकतीच करण्यात आली आहे. श्री. काळे हे मागील सोळा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. या क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन संघटनेचे संस्थापक - अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी काळे यांची जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड केली आहे. पुढील काळात जालना जिल्ह्यातील पत्रकारांची मोट बांधून संघटनेची पाळेमुळे मजबूत करण्याची जबाबदारी श्री. काळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या निवडीबद्दल पत्रकार विनोद काळे यांचे अध्यक्ष विजय सुर्यवंशी , कार्याध्यक्ष डॉन के.के., उपाध्यक्ष  प्रवीण परमार, कोषाध्यक्ष राजाराम माने, सचिव डॉ. सुरेंद्र शिंदे, सल्लागार बाळासाहेब अडांगळे, कोअर कमिटीचे प्रदेशध्यक्ष विनोद पवार . उपाध्यक्ष प्रा .दशरथ वैजनाथ रोडे, विलास पाटील, प्रतिमा परदेशी, कैलास गडदे, संतोष परदेशी, प्रकाश चीतळकर, सुभाष परदेशी, सुनील चौधरी, छोटुलाल मोरे, कृष्णा भेडसे, संजय रुपनर, सचिन जाधव, सतीश परदेशी, हेमलता परदेशी ,साबीर बागवान, प्रल्हाद पाटील, विदर्भ विभागाचे  अध्यक्ष डॉ .प्रशांत गुरव आदी पदाधिका-यांच्यावतीने अभिनंदन  करण्यात आले.
जिल्ह्यात सोळा व्यक्तींचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर पंधरा रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज - जिल्हा शल्य चिकित्सक



जालना,प्रतिनिधी :- जिल्हा सामान्य रुग्णालयातुन जालना तालुक्यातील आठ, बदनापुर येथील एक, जाफ्राबाद येथील दोन  व अंबड येथील चार  अशा एकुण पंधरा  कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करुन व त्या सर्वांच्या दुस-या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात  आला. तसेच दि.4 जुन 2020 रोजी  16  व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला  असल्याची माहिती  जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
पॉझिटिव्ह सापडलेल्या व्यक्तींमध्ये मॉडेल स्कुल मंठा येथील विलगीकरण कक्षात भरती असलेले केंदळी, ता. मंठा येथील 13 वर्षीय मुलगी, 26 वर्षीय पुरुष असे एकुण 2 रुग्ण तर  नानसी ता. मंठा येथील 38 वर्षीय महिला, 22 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, 55 वर्षीय महिला असे एकुण 8 व्यक्तींचा, वैद्य वडगांव ता. जालना येथील 44 वर्षीय 1 पुरुष,  मोदीखाना येथील 50 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, 21 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, मंगळबाजार येथील 25 वर्षीय पुरुष असे एकुण जालना शहरातील एकुण 5 व्यक्तींचा समावेश असल्याचे  जिल्हा शल्य चिकित्सकांनी  कळविले आहे.जालना शहरातील 58 वर्षीय महिला अत्यावस्थ  परिस्थितील दि. 1 जुन 2020 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाली होत. सदर महिलेच्या  स्वॅबचा अहवाल दि. 2 जुन 2020  रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला  होता. संबंधित रुग्णावर उपचार सुरु असतांना  दि. 4 जुन 2020 रोजी  मृत्यु झाला.जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण -2707 असुन सध्या रुग्णालयात 79 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती 1122, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या - 39 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या 2959, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने – 16 ,असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -169 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 2738, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-369, एकुण प्रलंबित नमुने -48, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1040,14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 16, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती – 931,आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-110, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -418, विलगीकरण कक्षात  भरतीसाठी पाठविलेले संशयीत – 14,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 79,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-116, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-15, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या -71,  सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या- 94(+ एक रेफर औरंगाबाद), पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 5452 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 03 एवढी आहे. 
कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 418  व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-29,डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-25,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -31, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-37, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -104 कस्तुरबा गांधी बालिका वसतीगृह परतुर  -37, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-08, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-03 राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद-00 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -15 शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-22, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे –36 अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी -08, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल इमारत क्र.2-02, मॉडेल स्कुल मंठा-35, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -26 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 148 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 747 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 816 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली   3 लाख 10 हजार 230 असा एकुण 3 लाख 37 हजार  38 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
*आनंदाची बातमी...... कोरोनाला आपण हरवणारच राजेश टोम्पे ची गुड न्यूज*

मुंबई | दि. १ मे ते १ जून या कालावधीत राज्यातील रुग्ण वाढीचा वेग क्रमशः कमी होत असून दि. १ जून रोजी तो देशाच्या सरासरी पेक्षा (४.७४ टक्के) देखील कमी झालेला आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. त्याचवेळी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढताना दिसत आहे. यावरुन राज्यातील कोरोना प्रसाराचा वेग मंदावत असल्याचे स्पष्ट होते आहे.

देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्रात आहेत. बुधवारी महाराष्ट्राची कोरोनाबाधितांची संख्या 70 हजारांच्या पुढे पोहचली आहे. राज्यात कोरोना संसर्गाचं प्रमाण देखील वाढत असलं तरी शासन आणि प्रशासनाच्या उपाययोजांना यश मिळत असल्याचं दिसत आहे. अशातच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्याला मोठ्या गुड न्यूज दिल्या आहेत.

राज्यामध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मार्चच्या तुलनेत मे मध्ये सुमारे साडेतीन पटीने वाढून 43.35 % एवढे झाले आहे. गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता मे मध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झालेले दिसून येत आहेत. प्रत्येक दिवशी जवळपास 700 ते 800 रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी जात आहे. आतापर्यंत जवळपास 32329 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत

राज्यात आज ९९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३२ हजार ३२९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २५६० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३९ हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
*आ.सोळंके यांना चपराक; माजलगाव नगर परिषदेची अविश्वासाची विशेष सभा रद्द*

माजलगाव : येथील नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्याविरुद्ध अविश्वास ठरावाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार  4 जून रोजी विशेष सभाही जिल्हाधिकार्‍यांनी बोलावली होती. मात्र त्यापुर्वीच नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी बाजी मारली असून आज जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनीच या अविश्वासाची विशेष बैठक रद्द केली आहे. त्यामुळे हा विषय प्रतिष्ठेचा केलेल्या आ.प्रकाश सोळंके यांना सणसणीत चपराक मिळाली आहे.
कालच नगराध्यक्ष चाऊस यांनी हायकोर्टात याचिका दाखल करून अविश्वास ठरावाच्या सभेला स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हायकोर्टाने अशी स्थगिती देण्यास नकार देत केवळ निकाल जाहीर न करण्याचा निर्णय दिला. ही सुध्दा आ.सोळंके यांना एकप्रकारे चपराक होती.

जिल्हाधिकार्‍यांनी रद्द केली विशेष सभा! काय म्हटले आहे आदेशात?
माजलगाव नगर परिषदेच्या एकुण 18 नगरसेवकांनी दि.27.05.2020 रोजी महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 55 अन्वये माजलगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री.सहालबीन आमेरबीन चाउस यांध्या कामाकाजावर अविश्वास व्यक्त करत असलेबाबत निवेदन सादर केले होते.
संदर्भ क्र. 2 अन्वये महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 55 (2) अन्वये दि.04.06.2020 रोजी गुरुवार दुपारी 12.00 वाजता नगर परिषद माजलगाव च्या सभागृहात उपविभागीय अधिकारी माजलगाव यांचे अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली
कामात कसूर करणार्यां पल्लवी इंटरप्राजेस वर स्वछता निरीक्षकानी केला गुन्हा दाखल 
"”"""""""""""""""""""""""""""""""""""
*नांदेड हँलो रिपोर्टर*
विशेष प्रतिनिधी- *संजुकुमार गायकवाड*

 गायकवाड
सध्या देशात राज्यात कोविड-19चा शिरकाव फार मोठया प्रमाणात होत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने या व्हायरसचा शिरकाव रोखण्यासाठीचे  निर्देश सर्व शासकीय व निमशासकीय यंत्रणांना दिला होता.नांदेडजिल्हाधिकारी मा.विपीन इटनकर यांनी जिल्यातील सर्व स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्थाना या व्हयरसचा शिरकाव रोखण्यासाठी उपाय योजना करण्याचे सूचित केले होते.त्यास लागणाऱ्या निधीचीही वेवस्था मा.पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी प्रशासकीय यंत्रणेला कोणत्याच पद्धतीची हयगय खपऊन घेतली जाणार नसल्याचे बजावून सांगण्यात आले होते.तश्या पद्धतीचे पालन जिल्यातील बहुतांश स्थनिक स्वराज्य संस्थांनी केले असून ही या कोविड-19व्हायरस ची जिल्यात रोख थांब करण्यासाठी जिल्याचे शिलेदार अहोरात्र झटत असताना हिमायतनगर पंचायत येथे कमी वेळेत जास्त पैशे चुकीच्या पद्धतीने कमवण्याच्या कोणत्याही मार्गाचा अवलंब करून एका रात्रीत करोडोपत्ती होण्याचे स्वप्न बाळगून असतात पण वाडवडिलांनी सांगितलेल्या मांजर डोळे मिटुनी दूध पिते तिला वाढतें मी तर डोळे मिटून दुध पीत आहे.मला कोण पहाणार आहे. या मणी प्रमाणे हिमायतनगर पंचायत येथे घनकचरा व्येवस्था पणाचे काम पाहान्या साठी "पल्लवी इंटरप्रायजेस"या संस्थास हिमायतनगर पंचायत हद्दीत शहरातील नाली, रस्ते, व इतर कामे करण्यासाठी चालू वर्षाचे कामाचा ठेका  देण्यात आला  आहे.या मालकाने शहरात सुरवातीचे काही दिवस कोणचीच तक्रार न येऊ देता काम करून आधीकार्यांचे मनेजिंकली म्हणून मी काही केले तर कोण विचारणार या अती शोक्तीने शहरातील परमेश्वर मंदिर परिसरात बस्थानक परिसरातील मुख्य मार्गांवर प्रशासनाच्या वतीने शहर निर्जंतुकीकरण करण्यासाठी देण्यात आलेल्या सोडियम हायपोक्लोराइट ओषधाचा वापर करणे अपेक्षित असताना या गुतेदारांच्या माणसानी त्या फवारणीत सोडियम हायपोक्लोराइट चे मिश्रण योग्य प्रमाणात पाण्यात टाकून परिसर निर्जंतुकीकरण करावयास पाहिजे होते पण काही जागरूक नागरिकांनी भा.ज.पा.युवा मोर्च्यातालुकाध्यक्ष रामभाऊ सुरवंशी. व भा.ज.पाचे तालुकाध्यक्ष अशिष  सकवान यांनी कोरोना च्या काळात शहर सॅनिटाझर करण्याच्या नावाखाली होत असलेल्या निव्वळ पाण्याच्या फवारणीचा जनतेसामोर भाडाफोड करून याप्रकरणी सखोल चोकशी करण्याचे निवेदन हिमायतनगर तहसिलदार नगरपंचायतचे मुख्यधीकारी व जिल्हाअधिकारी नांदेड यांना केला.सदर प्रकरणी आदिक चोकशी करण्यासाठी नगरपंचायतच्या सहाय्यक अधीक्षिका मुक्ता कांदे व रत्नाकर डावरे यांनी जायमोक्यावर जाऊन पंचासमक्ष व त्या परिसरातील नागरिकांन समोर त्या फवारणी यंत्रातुन दोन बाटली भरून त्या बाटल्या न्याईक पडताळणी करण्यासाठी वैज्ञानिका कडे पाठवून अहवाल सादर करण्याचे सुचवण्यात आले होते.पण न्यायिक पडताळणीत त्या फवारणी यंत्रतुन तपासणी साठी घेण्यात आलेल्या बाटलीत कोणत्याच प्रकारचे सोडियम हायपोक्लोराइट ची मात्रा नसल्याचा अहवाल दिला असल्यामुळे हिमायतनगर पंचायतचे स्वच्छता निरीक्षक रमाकांत बाचे यांनी पल्लवी इंटरप्रायजेस चे मालक किशन विठ्ठल वनांळे रा.शिवाजीनगर इतवारा नांदेड  यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे तक्रार नोंदवली असून त्यानुसार हिमायतनगर पोलीस स्टेशन मध्ये सदरील इसमावर 420, 188, 269, 270, 271, भा.द.वी.व सह कलम महाराष्ट्र आपत्ती कायदा 2005चे कलम 53, 56, अनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत.
खासगी रुग्णालये तात्काळ सुरू करण्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जळगाव येथे आयएमएच्या पदाधिकाऱ्यांशी आरोग्यमंत्र्यांनी साधला संवाद.
#जळगाव_दि. ३ | जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. हा मृत्यू दर कमी करण्यास सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) सहकार्य करुन टास्क फोर्ससाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करुन द्यावेत. तसेच खासगी रुग्णालये तत्काळ सुरू करावीत, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहेत.

कोरोना विषाणूच्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मंत्री श्री. टोपे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आज सकाळी नियोजन भवनात आयएमएच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ. एन. एस. चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

मंत्री राजेश टोपे म्हणाले, सेवाभाव सर्वांत महत्त्वाचा आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तो रोखण्यासाठी राज्य शासन वेगवेगळ्या माध्यमातून उपाययोजना करीत आहे. अशा परिस्थितीत जळगाव जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालये तत्काळ सुरू करावीत. त्यासाठी आयएमएला दोन हजार पीपीई कीट उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच डेडिकेटेड हॉस्पिटलसाठी फिजिशियन्स व इन्सेन्टीव क्षेत्रातील किमान तीन- तीन तज्ज्ञ उपलब्ध करुन द्यावेत. त्यांना वेतन सुध्दा अदा करण्यात येईल. तसेच सुरक्षेसाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी आयएमएने पुढाकार घ्यावा. तसेच जे खासगी रुग्णालये सुरू होणार नाहीत त्यांच्या नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाने  करावी, असेही निर्देश मंत्री राजेश  टोपे यांनी दिले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, सध्या खासगी रुग्णालये सुरू होण्याची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी सामाजिक भावना जोपासत आपापली रुग्णालये सुरू करावीत, असेही आवाहन केले. खासगी रुग्णालये उद्यापासून सुरू केली जातील, असे आश्वासन आयएमएचे अध्यक्ष डॉ. दीपक पाटील, डॉ. स्नेहल फेगडे यांनी दिले.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...